जगणे कसले

पद्मश्री चित्रे's picture
पद्मश्री चित्रे in विशेष
8 Mar 2015 - 1:51 am
महिला दिन

जगणे कसले रोज नव्याने मरणे येथे
निष्ठा कसली रात्र उगवता सजणे येथे..

स्वप्नामधली निळी निळाई जाई विरुनी
आयुष्याच्या चिन्ध्या साऱ्या लटकत येथे..

नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी
एक वितीची भूक सजविते सज्जा येथे...

शरीर चिरडत घुमे वासना चढ़त्या रात्री
बुभुक्षितांचे थवे तोड़ती लचके येथे....

रंगीत चेहरे डोळे मोडीत झुले जवानी
रात्रीच्या गर्भातुन ये रात्र च येथे...

-पद्मश्री
( वैशाली हळदणकर चे -बारबाला पुस्तक वाचल्यावर सुचलेली कविता.)
.
चित्र-पियुशा

प्रतिक्रिया

सविता००१'s picture

8 Mar 2015 - 3:06 pm | सविता००१

अस्वस्थ करणारी पण यथार्थ कविता.
पियुशाने काढलेलं चित्र ही अगदी समर्पक

जुइ's picture

9 Mar 2015 - 3:56 am | जुइ

पियुशाने कढालेले चित्र अगदी समर्पक आहे.

अस्वस्थ करणारी कविता.चित्रही समर्पक.

प्रीत-मोहर's picture

9 Mar 2015 - 2:30 pm | प्रीत-मोहर

:(

सामान्य वाचक's picture

9 Mar 2015 - 5:09 pm | सामान्य वाचक

वाचले कि फार अस्वस्थता येते :(

Mrunalini's picture

9 Mar 2015 - 8:53 pm | Mrunalini

:( :(
माझे तर असे काहि वचले कि डोकेच फिरते. दिवसभर तेच डोक्यात चालु राहते. नको वाटते अगदी. :'(

+१ असेच वाटते ...चित्र मस्त !!

स्वाती दिनेश's picture

9 Mar 2015 - 10:14 pm | स्वाती दिनेश

वाचून रेस्टलेस झाले आहे.
स्वाती

मधुरा देशपांडे's picture

10 Mar 2015 - 2:14 am | मधुरा देशपांडे

:(

पिशी अबोली's picture

10 Mar 2015 - 12:02 pm | पिशी अबोली

अस्वस्थ करणारी कविता. :(

कविता१९७८'s picture

10 Mar 2015 - 8:34 pm | कविता१९७८

अस्वस्थ करणारी वास्तववादी कविता

प्राची अश्विनी's picture

11 Mar 2015 - 10:52 am | प्राची अश्विनी

+११

स्रुजा's picture

11 Mar 2015 - 12:10 am | स्रुजा

अवघड आहे :(

अस्वस्थ करणारी कविता.चित्रहि समर्पक!

पद्मश्री चित्रे's picture

11 Mar 2015 - 3:20 pm | पद्मश्री चित्रे

कवितेवरचं चित्र छान …
अगदी समर्पक .
अशीच कुणी तरी होती मनात

स्पंदना's picture

12 Mar 2015 - 4:09 am | स्पंदना

नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी
एक वितीची भूक सजविते सज्जा येथे...

अगदी खरं!!

झटक्यात एक आख्खं जीवन पुढ्यात आलं कविते मार्फत. :(

पियु च्या रेषांनी कविता समर्पक रित्या सामोरी आली.

सानिकास्वप्निल's picture

12 Mar 2015 - 3:32 pm | सानिकास्वप्निल

अस्वस्थ, बेचैन करणारी कविता , चित्रही समर्पक.

कविता आवडली. वेदना ठळक करणारी !!!!

रेवती's picture

13 Mar 2015 - 6:51 pm | रेवती

अस्वस्थ करणारी कविता! पियुशाने काढलेले चित्र समर्पक आहे.

विशाखा पाटील's picture

14 Mar 2015 - 9:17 pm | विशाखा पाटील

मोजक्या आणि समर्पक शब्दांत उभं केलेलं भेदक चित्र. जोडीला असलेलं चित्र कवितेतल्या चित्राला अजून गडद करणारं.

नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी -

....खासच!

उमा @ मिपा's picture

15 Mar 2015 - 2:58 am | उमा @ मिपा

एखादं पुस्तक वाचल्यानंतर त्यावरील प्रतिक्रिया कवितेतून इतक्या भावस्पर्शी शब्दात व्यक्त होणं, हे खूप आवडलं. त्याबद्दल तुमचं मनःपूर्वक अभिनंदन!
प्रखर वास्तव तितक्याच प्रखरपणे मांडणारी कविता.
पियुशा, चित्र स्तब्ध करणारं! तुझं खूप खूप अभिनंदन!

कविता१९७८'s picture

19 Mar 2015 - 1:56 pm | कविता१९७८

वाचुन अस्वस्थ वाटले

पैसा's picture

19 Mar 2015 - 7:44 pm | पैसा

काळीज हलवणारी कविता आहे.