जगणे कसले रोज नव्याने मरणे येथे
निष्ठा कसली रात्र उगवता सजणे येथे..
स्वप्नामधली निळी निळाई जाई विरुनी
आयुष्याच्या चिन्ध्या साऱ्या लटकत येथे..
नितीच्या त्या थोर कल्पना भरल्या पोटी
एक वितीची भूक सजविते सज्जा येथे...
शरीर चिरडत घुमे वासना चढ़त्या रात्री
बुभुक्षितांचे थवे तोड़ती लचके येथे....
रंगीत चेहरे डोळे मोडीत झुले जवानी
रात्रीच्या गर्भातुन ये रात्र च येथे...
-पद्मश्री
( वैशाली हळदणकर चे -बारबाला पुस्तक वाचल्यावर सुचलेली कविता.)
चित्र-पियुशा
चित्र-पियुशा
विशेष
वाचने
5856
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
:(
सुन्न करणारी कविता
अस्वस्थ करणारी कविता.चित्रही
:(
असे काहि
:( :(
+१ असेच वाटते ...चित्र मस्त !
In reply to :( :( by Mrunalini
अस्वस्थ..
:(
अस्वस्थ करणारी कविता. :(
अस्वस्थ करणारी वास्तववादी
+११
In reply to अस्वस्थ करणारी वास्तववादी by कविता१९७८
अवघड आहे :(
अस्वस्थ करणारी कविता.चित्रहि
पियुशा ...
नितीच्या त्या थोर कल्पना
:(
कविता आवडली. वेदना ठळक करणारी
अस्वस्थ करणारी कविता!
मोजक्या आणि समर्पक शब्दांत
एखादं पुस्तक वाचल्यानंतर
वाचुन अस्वस्थ वाटले
आवडली कसं म्हणू?