बाप्पाचा नैवैद्य - चुरमा लाडू आणि पंचखाद्याचे मोदक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in विशेष
31 Aug 2014 - 12:03 am
श्रीगणेश लेखमाला २०१४

नमस्कार मंडळी. गणपती बाप्प्च्या नैवेद्यासाठी चूरम्याचे लाडू आणि पंचखाद्याचे मोदक देत आहे. जरूर करून बघा!

चूरमा लाडू

सर्व मिपाकरांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!

.

साहित्यः

१ वाटी कणिक
१/४ वाटी रवा
१/२ वाटी वितळलेले तूप +२ टेस्पून तूप
३/४ वाटी पिठीसाखर (आवडीप्रमाणे कमी-जास्तं)
१/२ वाटी भाजलेली खसखस
दूध कणिक भिजवण्याकरिता
काजू-पिस्ता तुकडे
१/२ टीस्पून वेलचीपूड
१/४ टीस्पून मीठ
तळायला तूप / तेल

.

पाकृ:

एका भांड्यात कणिक, रवा व मीठ एकत्र करावे.
त्यात २ टेस्पून तूप घालून चांगले मिक्स करुन घ्यावे.
लागेल तसे दूध घालून घट्ट कणिक भिजवून घ्यावी.
झाकून १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे.

.

१०-१५ मिनिटांनी कणिक चांगली मळून घ्यावी.
कणकेच्या छोट्या पुर्‍या/ मुटके/ गोळे करुन घ्यावे.
तुम्ही ह्या पुर्‍या तुपात मंद आचेवर डिप फ्राय करु शकता.
मी आप्पेपात्रात चमचाभर तूप घालून मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घेतल्या आहेत.
तळून किचन टिश्युवर काढून ठेवाव्यात.
पूर्ण गार झाल्यावर खल-बत्त्यात थोडे कुटून घ्यावे व मग मिक्सरला बारीक फिरवून घ्यावे.

.

चुरम्याला एका ताटात काढून घ्यावे.
त्यात काजू-पिस्ता तुकडे, वेलचीपूड घालून मिक्स करावे.
पिठीसाखर घालून छान एकत्र करावे.
त्यात थोडे पातळ केलेले तूप घालून मध्यम आकाराचे लाडू बांधावेत.
तयार लाडू खसखशीत घोळवून घ्यावे.

.

बाप्पाला नैवेद्य दाखवून खावे :)

.

आमच्या घरची गणेशपूजा आणि नैवेद्य :)

.

गणपती बाप्पा मोरया !!
__/\__

----------------------------------------

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक

.

साहित्य पंचखाद्यः

१ वाटी सुके खोबरे
१ टेस्पून खसखस
१/२ वाटी खडीसाखर
१ टेस्पून बेदाणे (किसमिस)
१ टेस्पून खजूर बारीक तुकडे करुन
१/२ टीस्पून वेलचीपूड

पंचखाद्यात खारकेचा वापर करतात पण मला इथे खारीक मिळत नसल्यामुळे मी खजूर वापरला आहे. तुम्ही खारीक घेऊ शकता, फक्त त्याची पूड करून घ्यावी.

.

पाकृ:

एका पॅनमध्ये सुक्या खोबर्‍याला मंद आचेवर हलक्या तांबूस रंगावर भाजून घ्यावे.
बाजूला काढून ठेवावे व त्याच पॅनमध्ये खसखस हलकी भाजून घ्यावी.
खडीसाखरेला खल-बत्त्यात थोडे कुटून घ्यावे.
सुके खोबरे, खसखस गार झाले की एकत्र करावे, त्यात कुटलेली खडीसाखर मिसळून मिक्सरला बारीक फिरवून घ्यावे.
ह्या मिश्रणात आता बेदाणे, खजूरचे तुकडे व वेलचीपूड घालून एकत्र करावे.

.

साहित्य मोदक आवरणः

१ वाटी मैदा
१/२ वाटी रवा
दूध मैदा भिजवण्यापुरते
१/४ टीस्पून मीठ
व ३ टेस्पून तेलाचे मोहन

.

पाकृ:

एका भांड्यात रवा, मैदा व मीठ एकत्र करावे.
त्यात कडकडित मोहन घालावे.
चांगले मिक्स करावे, थोडे थोडे दुध घालून घट्ट पिठ मळून घ्यावे.
तासभर झाकून ठेवावे.
तासाभराने पिठ पुन्हा एकदा मळून घ्यावे व त्याचे छोटे-छोटे गोळे करावे.

.

पंचखाद्याचे - खिरापतीचे तळणीचे मोदकः

गोळ्याची छोटी पारी लाटून मुखर्‍या पाडून घ्याव्यात.
त्यात चमचाभर सारण भरून, हलक्या हाताने मोदकाचे तोंड बंद करावे.
अश्या प्रकार सर्व मोदक बनवून घ्यावे.
कढईत तेल तापत ठेवावे, आच मंद असावी.
एक-एक करुन तयार मोदक त्यात सोडावे व मंद आचेवर सोनेरी रंगावर तळावेत.
छान खुसखुशीत होतात मोदक.

.

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून प्रसाद म्हणून सर्वांना द्यावे :)

.

गणपती बाप्पा मोरया !! __/\__

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 12:09 am | मुक्त विहारि

आधीच सांगून ठेवत आहे...

सुहास झेले's picture

31 Aug 2014 - 12:23 am | सुहास झेले

बाप्पा आणि मिपाकर दोन्ही खुश ... आभार ह्या प्रसादासाठी :) :)

मधुरा देशपांडे's picture

31 Aug 2014 - 12:24 am | मधुरा देशपांडे

सुरेख. पंचखाद्याच्या सारणाला किंचित ओलसरपणा यावा म्हणुन मी अगदी थोडे कंडेन्स्ड मिल्क घालते. त्यातच साखर असल्यामुळे मग खडीसाखर घालत नाही. दोन्ही पाकृ आवडल्या.

रेवती's picture

31 Aug 2014 - 1:25 am | रेवती

सुरेख पाकृ आणि फोटू! गणपतीबाप्पा मोरया!

प्यारे१'s picture

31 Aug 2014 - 3:06 am | प्यारे१

गणपती बाप्पा मोरया!
आराध्य आणि भक्त दोन्ही खुश. बेष्टाडच.

सस्नेह's picture

31 Aug 2014 - 8:24 am | सस्नेह

हम गणपतीबाप्पा होते !
(कमीतकमी स्वप्नीलभौ तरी होते ! )

पंचखाद्याचे - खिरापतीचे मोदक मी फस्त केले आहेत असे समजावे. ;)

{मोदक प्रेमी} :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- गणाधीशा भालचंद्रा गजवक्त्रा गणराया वक्रतुंडा धुम्रवर्णा गणपती बाप्पा मोरया :- मोरया

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 2:49 pm | मुक्त विहारि

उगाच नाही पहिला नं. लावला...

तुम्ही आपले फोटो बघत बसा....

कवितानागेश's picture

31 Aug 2014 - 2:11 pm | कवितानागेश

नुसती बघत बसलेय त्या फोटोंकडे... :)

अनन्न्या's picture

31 Aug 2014 - 2:43 pm | अनन्न्या

चुरमा लाडू कधी केले नाहीयेत, करून पहायला हवेत.

अजया's picture

31 Aug 2014 - 7:38 pm | अजया

छान पाकृ.! करुन पाहीनच.

मुक्त विहारि's picture

31 Aug 2014 - 9:04 pm | मुक्त विहारि

आणि

पुढच्या वेळी कट्ट्याला घेवून या...

प्रचेतस's picture

31 Aug 2014 - 7:46 pm | प्रचेतस

सुरेख.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

31 Aug 2014 - 9:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक तर पाककृती विभाग बंद करावा नै तर सास्व यांना ब्यान करावे ! :(

मोदक आवडले.

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2014 - 12:21 am | अत्रुप्त आत्मा

मला गमापतीबाप्पा व्हायचय! :-\

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 12:48 am | मुक्त विहारि

त्यापेक्षा सानिका ताईंकडे सत्यनारायणाची पुजा सांगायला जा.

दक्षिणा पण मिळेल आणि उदरभरण पण होईल.

(हा उपयुक्त (अनाहूत?) सल्ला दिल्याबद्दल, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.)

अत्रुप्त आत्मा's picture

1 Sep 2014 - 6:05 am | अत्रुप्त आत्मा

@, तुम्ही मला असिस्टंट म्हणून न्याल, अशी आशा आहे.>>>> :-D असि स्टंट करायची (मला) काहीही जरूरी नाही! :P

मुक्त विहारि's picture

1 Sep 2014 - 9:19 pm | मुक्त विहारि

चालायचेच....

मला सोडून एकट्याने खायला गेलात तर बघा....

मी पण काटा-किर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र मिसळ यानबूतून पुण्याला येईन आणि तुम्हाला टूक-टूक करून खावून जाईन.

वरून, मिपावर फोटो पण टाकीन.

(सध्या मुलगा आकूर्डीकर असल्याने पुण्यात चकरा व्हायचे चान्सीस आहेत, ह्याची नोंद करून ठेवावी.)

मनुराणी's picture

1 Sep 2014 - 7:58 am | मनुराणी

मोदक काय सुंदर दिसत आहेत. कळ्या पण अगदी पर्फेक्ट झाल्या आहेत.

इशा१२३'s picture

1 Sep 2014 - 11:56 am | इशा१२३

मस्तच ग ..दोन्ही पदार्थ अप्रतिम.चुरम्याचे लाडु बरेच वर्षात केले नाहियेत.बरी आठवण करुन दिलीस.फोटो नेहेमीप्रमाणेच.

इरसाल's picture

1 Sep 2014 - 12:04 pm | इरसाल

ह्य बै ना मिपावरुन हद्द्पार करण्यात यावे. (उम्म !)

पैसा's picture

1 Sep 2014 - 2:31 pm | पैसा

दोन्ही नैवेद्य एकदम खासम-खास झालेत!

समीरसूर's picture

1 Sep 2014 - 4:56 pm | समीरसूर

जे हात झणझणीत चिकन रस्सा बनवती,
जे हात सुक्क्या चिकनची मेजवानी सजवती
तेच हात लंबोदरासाठी मोदकांची रास रचवती
अशा पाकनिपुण हातांसमोर माझे कर जुळती

झकास आणी फर्मास!! बाप्पा प्रसन्न आहेच हिच्यावर - आता तर काय? :-)
फोटोही खूप सुरेख असतात, पाककृतीला आणि प्रेझेंटेशनला योग्य न्याय देतात! :-)

सुहास..'s picture

1 Sep 2014 - 7:44 pm | सुहास..

देवाSSSSSSS !!!!!!!!!!