साहित्य : एक मोठा ब्रॉकोलीचा गड्डा, कणिक, आलं- लसूण - हिरवी मिरची पेस्ट, मीठ, थोडी साखर, लिंबूरस, तेल
कृती : ब्रॉकोलीचा फुलांचा भाग किसून घ्यावा. दांडे घ्यायचे नाहीत, पण थोडे किसले गेल्यास चालतील. छोटे देठ पडले असल्यास काढून टाकावेत.
आता ब्रॉकोलीच्या किसामध्ये आलं लसूण व मिरची पेस्ट घालावी. चवीनुसार मीठ, थोडी सा़खर घालावी.
एक चमचा लिंबाचा रस घालावा. चमचाभर तेल व मावेल तेवढी कणिक घालून एकत्र करावे. अगदी थोडे पाणी वापरून पीठ मळून घ्यावे.
पाच मिनिटांनी पराठे करावेत. भाजताना तेल लावून भाजावेत.
ह्यात बदल म्हणून हि. मिरची ऐवजी लाल तिखटही वापरता येते.
लिंबूरसाऐवजी आंबट दही वापरता येते, त्यावेळी पाण्यात पीठ भिजवायची आवश्यकता नाही. दह्याचे पाणी पुरेसे असते.
शुभेच्छा!
प्रतिक्रिया
16 Oct 2008 - 7:38 pm | प्राजु
ब्रोकली चा असा उपयोग करता येईल. लक्षातच नाही आलं.
करून बघेन नक्की. नाहीतरी ती ब्रोकली नुसती खाणं जीवावरच येतं..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Oct 2008 - 7:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ही पाकृ छानच आहे.
करून बघेन नक्की. नाहीतरी ती ब्रोकली नुसती खाणं जीवावरच येतं..
ब्रोकलीवर चीज घालून ते बेक करायचं. (नक्की कसं काय विचारु नकोस, एक मित्र बनवायचा मी हादडायचे फक्त!) चीज किसून घाल आणि त्यावर चवीप्रमाणे मीठ, मिरपूड घालायचं. बरोबर थोडं सॅलड, गार्लिक ब्रेड, हवं तर साल्सा सॉस ... मस्त लागतं.
16 Oct 2008 - 7:47 pm | प्राजु
तसं केलं तरंच ती ब्रोकली खाल्ली जाते नाहीतर नाही. पण चीज सारखं........ :? म्हणजे वजनं वाढायला कारण.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Oct 2008 - 7:51 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
>> .... म्हणजे वजनं वाढायला कारण.
:-) तू पण?
काही हरकत नाही. ब्रोकली उकडायची, थोडं मीठ घालून! पास्त्याबरोबर मला (आणि माझ्या युकेच्या सगळ्याच विक्षिप्त हाऊसमेट्सना) तरी आवडायची!
16 Oct 2008 - 7:51 pm | शितल
अरे वा,
रेवती पराठाच्या पाककृती मस्त.
अग ब्रॉकोली कोशंबिर करायला वापरते पण तेथे मनापासुन नाही आवडत :(
पण पराठा करून नक्की बघेन. :)
16 Oct 2008 - 9:02 pm | चकली
मस्त आहे पाकृ.. बर्याचदा ब्रोकोली मी पास्त्यात वापरते..पण हि आयडीया मस्त आहे :)
चकली
http://chakali.blogspot.com
17 Oct 2008 - 1:01 pm | विसोबा खेचर
अरे वा! खाऊन पाहिले पाहिजेत एकदा हे पराठे..! :)
तात्या.
17 Oct 2008 - 8:34 pm | रेवती
दिलेल्या व न दिलेल्या सर्वांचे आभार
रेवती
19 Oct 2008 - 7:18 pm | स्वाती दिनेश
रेवती,आत्ता पाहिले तुझे ब्रोकोली पराठे..आता नक्की करुन पाहतेच.(नाहीतरी ब्रोकोलीला पास्त्यात घालून तरी किती खाणार?:))
स्वाती
19 Oct 2008 - 11:51 pm | मीनल
पराठयाची कृती मस्त आहे.
मी सरळ कूकर मधे शिजवते.एखादा लसूणही घालते शिजताना.
मग मिक्सर मधे ग्राइंड करते.गाळ्प्प्न घेऊन चवीनुसार मिरपूड,मीठ घालते.
आणि सूप म्हणून पिते.हेल्दी ,ईझी सूप!
कोणी बाहेरचे येणार असतील तर त्यात क्रिम घालून सर्व्ह करते.
मीनल.