ही सारस्वत पध्दतीची आमटी शेवग्याच्या शेंगा घालून करतात... एक वेगळी चव!
४०० ग्रॅम सोललेली कोलंबी (धुऊन घ्यावी)
अर्ध्या नारळाचे खोबरे
१ वाटी नारळाचे घट्ट दूध
१ मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला
१ शेवग्याची शेंग (४'' चे तुकडे करावे)
कैरीचा तुकडा - नाहीतर बोराएवढी चिंच
पाव चहाचा चमचा धने
४ मिर्याचे दाणे
४ सुक्या मिरच्या
हळद
मीठ चवीप्रमाणे
किंचित तेलात धने + मिरे + सुक्या मिरच्या परतून खोबर्याबरोबर वाटाव्या.
कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा. कांदा पारदर्शक झाला की घने-खोबर्याचं वाटण व मीठ घालून मंद आचेवर पाच मिनिटे उकळवा. नारळाचे दूध घालून एक मंद उकळी येऊ द्या.
गरम भातावर तळलेल्या हलव्याच्या तुकड्यांबरोबर ही आमटी स्वर्गीय! ;)
इथे पाककृती पहिल्यांदाच लिहितेय... आवडली तर कळवा. मला माहित असलेल्या सारस्वत रेसिपी लिहित जाईन.
प्रतिक्रिया
15 Oct 2008 - 7:15 pm | मनस्वी
पाककृती खूपच आवडली.
>मला माहित असलेल्या सारस्वत रेसिपी लिहित जाईन.
:)
मनस्वी
15 Oct 2008 - 7:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पाककृती आवडली.
कोलंबीच्या रश्श्यात शेवग्याच्या शेंगा... :? भारीच लागत असतील बॉ !!!
15 Oct 2008 - 7:20 pm | baba
'कोलंबी' जाम आवडते.. शेवग्याची शेंग टाकून कधी खाल्ली नाय बॉ... एकदा ट्राय करुन बघतो..
अजुन रेसिपी लिहित रहा...
...बाबा
15 Oct 2008 - 7:24 pm | प्राजु
करून पहायला हवी.
तुम्ही तुमच्या सारस्वत रेसिपीज इथे नक्कि लिहित रहा. आम्हाला चवीत बदल हवाच असतो हो.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
16 Oct 2008 - 5:48 pm | वल्लरी
करून पहायला हवी.
तुम्ही तुमच्या सारस्वत रेसिपीज इथे नक्कि लिहित रहा. आम्हाला चवीत बदल हवाच असतो हो
सहमत...
चवीत बदल हवाच ........ :SS
15 Oct 2008 - 7:27 pm | विनायक प्रभू
http://vipravani.wordpress.com/
ललिता,कोंकणी गो तूं.मस्कासांग घालन कोलंबीचे आंबट. बरे जाता शितासंग खावच्याक
15 Oct 2008 - 7:28 pm | ललिता
धन्यवाद सर्वांना! काय धडाधड दाद मिळतेय! इंप्रेस्सड! :)
15 Oct 2008 - 7:33 pm | ललिता
विनायका, कोकणीच रे हाव!
मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!
15 Oct 2008 - 7:49 pm | baba
'मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!'
घाटावरच्या बाबाला वरील वाक्य घाटी मर्हाठीत सांग्ता का, प्लीज...
:)
.. बाबा
15 Oct 2008 - 7:54 pm | ललिता
'मस्कासांग घालन सुंगटा आबंट शिताचेर घालन खावच्या बरे लागता!'
अर्थात मराठीतः
शेवग्याच्या शेंगा घालून कोलंबीची आमटी भातावर घालून खायला बरी लागते!
:) :)
15 Oct 2008 - 8:06 pm | baba
असं हाय व्हय..आमीबी असच खाऊ मंग...:)
..बाबा
15 Oct 2008 - 8:17 pm | रेवती
व्हेजीटेरीयनांसाठी पाककृती लिहाव्या अशी विनंती.
रेवती
15 Oct 2008 - 8:33 pm | ललिता
लिहिते वेळ मिळाला की! :)
16 Oct 2008 - 12:57 am | विसोबा खेचर
ख ल्ला स...!
16 Oct 2008 - 4:40 am | बेसनलाडू
आमटी नुसती वाचूनच आवडली; करेन तेव्हा आणखी आवडेल हेही नक्की.
मला माहित असलेल्या सारस्वत रेसिपी लिहित जाईन.
कृपया डाळमेथीबद्दल लिहाच. आणि ज्या कृती लिहाल, त्याबरोबर जमल्यास फोटोही डकवत जा. काही वेळा काही कारणाने एखादी पाककृती करणे शक्य झाले नाही, तर कमीत कमी फोटो पाहून काही भूक भागवता येते :)
(हावरट)बेसनलाडू
16 Oct 2008 - 8:50 am | सहज
>तर कमीत कमी फोटो पाहून काही भूक भागवता येते
सहमत.
पाकृ करुन पाहीलीच पाहीजे अशी.
16 Oct 2008 - 2:25 pm | सुनील
कृपया डाळमेथीबद्दल लिहाच
तुम्हाला उडीद मेथी म्हणायचे आहे का? अहो, बांगड्याबरोबर काय फक्कड लागते म्हणून सांगू?
च्यायला, लिहिताना पण तोंडाला पा॑णी सुटलं!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
16 Oct 2008 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर
सहज सोपी पाककृती. खोबरेल तेल वापरावे का? मस्त लागेल.
कोलंबी, कांदा, कैरी किंवा चिंच, शेवग्याच्या शेंगेचे तुकडे व हळद थोडे पाणी घालून शिजवा.
कांदा पाण्यात शिजवायचा? बऽऽरं. करून पाहतो. कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगा ह्यांच्या शिजण्याच्या वेळात फरक आहे. (कोलंबी पटकन शिजते). शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर कोलंबी टाकली तर?
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
16 Oct 2008 - 3:27 pm | ललिता
>खोबरेल तेल वापरावे का? <
खोबरेल तेलांत कांदा काळसर तळून घेऊन नंतर तयार आमटीत फोडणी देतात. धने मिरच्या हव्या तर खोबरेलात तळू शकता.
>कांदा पाण्यात शिजवायचा? <
हो, कांदा तळल्याशिवायच कोलंबीबरोबर शिजवतात.
>कोलंबी आणि शेवग्याच्या शेंगा ह्यांच्या शिजण्याच्या वेळात फरक आहे. (कोलंबी पटकन शिजते). शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर कोलंबी टाकली तर?<
माझ्या अनुभवाप्रमाणे परत खोबर्याचे वाटण घालून आमटी शिजवली जाते तेव्हा शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित शिजतात. कोलंबी नीट शिजली तरच आमटीला स्वाद चांगला येतो, जरा जास्त शिजवल्या तरी विरुन जात नाहीत.
16 Oct 2008 - 6:37 pm | मनीषा
मस्त पाककृती ..