रूमानी

अनाम's picture
अनाम in जे न देखे रवी...
4 Apr 2014 - 12:12 pm

देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात
अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा.
दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो
मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो.
सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.

भर दिवसा मला आभाळ भरलेले नसतांना
वीजा चमकल्याचा अन् गडगडाटांचा भास होतो,
कोणताच आवाज पोहचत नाही तुला

काठावर स्पर्श करुन परत फिरणारी तू
समुद्रलाटेसारखी  धडकत असते मला.

सृष्टीतले  चैतन्य समजून घेतांना
पा-याचा तो पारदेश्वरही समजून  घ्यावा लागतो.
एकाच खोडात वाढेला पिंपळ-लिंब अन
कुमारिकेचा भयान चेहरा मंत्र-तंत्र पुजा.

रुईच्या रोपट्याशी तिचा विवाह पाहतांना.
माणसाचा जन्म असा कसा गं कोणत्या श्रद्धेचा
स्वतःचे  सर्व अस्तित्व  विसरलेला..?

अन सखे,
माझा जीव हल्ली लागत नाही गं तिथे,
अघोरीपणाने ओढले जातोय जरासे रुमानी होतांना.

कविता

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

4 Apr 2014 - 12:32 pm | प्रचेतस

सुरेख

रुमानी's picture

4 Apr 2014 - 1:27 pm | रुमानी

छान
आपल्या कवितेत एक नव्हे तर दोन -तीन विषय एकत्र दडलेले दिसतात .त्यापैकी एक प्रियकर प्रेयसीची कथा वाटते . तर एक विवाह इच्छुक तरूणीची अंध श्रद्धेशी पडलेली गाठ आणि त्य सर्व गोष्टीन मुळे जसे पूजा-आर्च व तंत्र - मंत्र ह्या मुळे दोलायमान झालेले मानवी मन …. .!देवाचे बोट धरू कि आधुनिकतेचे बोट धरू असे वाटते आहे… आणि हे सगळे एकी कडे चालू असताना त्या प्रियकराला त्याच्या सखीची आठवण सातत्याने येते आहे व ती ही समुद्राच्या लाटेप्रमाणे एक सारखी … त्याच्या मनाला स्पर्श करून जाते आहे .

प्यारे१'s picture

5 Apr 2014 - 2:12 am | प्यारे१

+११११

असेच म्हणतो!

किसन शिंदे's picture

4 Apr 2014 - 1:48 pm | किसन शिंदे

थोडीशी अनाकलनीय, गुढ पण तितकीच सुरेख.!!

असेच म्हणतो....आवडतेय, पण कळली असं वाटत नाही!

स्पंदना's picture

4 Apr 2014 - 4:01 pm | स्पंदना

अरे वा!
नविन कवि महाराज दिसतात.
लिहितात मात्र थोडसं अमृता प्रितमसारख.
मिपावर स्वागत.

आम्ही आता नवा व्युत्क्रम लिहू...

शुचि's picture

4 Apr 2014 - 7:13 pm | शुचि

पहिलं कडवं फार आवडलं.

आत्मशून्य's picture

4 Apr 2014 - 11:04 pm | आत्मशून्य

.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2014 - 11:47 pm | अत्रुप्त आत्मा

हम्म्म्म...छान..!

जरा ग्रेसां'ची अठवण आली. :)

पैसा's picture

4 Apr 2014 - 11:56 pm | पैसा

स्वागत असं म्हणणार होते, पण तुम्ही यापूर्वी काही कोडी घातली होती. ही कविताही कोड्यापेक्षा कमी नाही. अ.आ.बुवा, बघा, कोड्याचं उत्तर सापडतंय का!

रुईच्या रोपट्याशी विवाह :- किती सोपा मार्ग शोधून काढलाय शास्त्रकारांनी.
जर यामुळे एक स्त्री विधवा होण्यापासून वाचणार असेल तर काय हरकत आहे हा प्रयोग करून पाहायला.
कारण १७व्या शतकातच संत तुकाराम सांगून गेले आहेत "वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरें"
साभार: संत तुकाराम, गायक: विष्णुपंत पागनीस,लता मंगेशकर

तद्दन मूर्खपणा वाटतो आहे.

आयुर्हित's picture

6 Apr 2014 - 10:08 pm | आयुर्हित

तद्दन अज्ञानी लोकच असे म्हणू शकतात.
जगात अशा बऱ्याच गोष्टी आहेत, ज्या आपल्याला ठावूक असतीलच असे नाही.
आपल्याला त्यामागील विज्ञान माहित नाही, असेच मी म्हणेल.

शुचि's picture

7 Apr 2014 - 12:10 am | शुचि

Ok. Let's agree to disagree.

अजया's picture

5 Apr 2014 - 10:28 am | अजया

आवडली कविता.

भ ट क्या खे ड वा ला's picture

6 Apr 2014 - 10:49 pm | भ ट क्या खे ड वा ला

छान

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

7 Apr 2014 - 11:03 am | मिसळलेला काव्यप्रेमी

भन्नाट रचना... मांडणी अतिशय सुरेख. तुमच्या अजुन रचना वाचायला आवडतील.