क्रिकेट आणि मी

kurlekaar's picture
kurlekaar in जनातलं, मनातलं
18 Mar 2014 - 8:00 am

क्रिकेट आणि मी

क्रिकेट चं माझं वेड अगदी लहानपणापासून -म्हणजे चौथी पांचवी पासूनचं. तेंव्हा तो खेळ देखिल कळायचा नाहीं व इंग्रजीतील commentary सुद्धा. पण विजय हजारे खेळायला आला की मी रेडीओ जवळ बसुन राह्यचो. तेंव्हाची audio technology सुद्धा फारशी प्रगत नव्हती. फलंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही. पण हजारे खेळत असताना असला disturbance खूपच सुखद वाटायचा.

विजय मांजरेकर चं या खेळात पदार्पण झालं तेंव्हा मला बऱ्यापैकी हा खेळ समजायला लागला होता व थोडं फार इंग्रजी देखील समजायला लागलं होतं. या काळांत मी क्वचितच ब्रेबॉर्न वरचा सामना चुकवला असेल. हजारे ला प्रत्यक्षात फलंदाजी करताना मी पाहू शकलो नव्हतो पण मांजरेकर ची फलंदाजी अनेकदा पाह्यलीय.

हे सर्व मी मुंबईत शाळेत असेपर्यंत कारण नंतर मी मुंबईबाहेर पडलो व आजतागायत. बाहेर असलो तरी मुंबईच्या रणजी ट्रॉफी टीम वरचं प्रेम कायम होतं. सुट्टीवर मुंबईत असतांना Times Shield च्या सामन्यात देखिल मला इंटरेस्ट असायचा. बऱ्याच वेळा मला सुट्टी नेमकी पावसाळ्यात मिळायची. कांगा लीग चे सामने मला वाटतं जुलै च्या दुसऱ्या आठवड्यात सुरु व्हायचे; तेंव्हा ऐकायला मिळायचं की कांगा लीग मध्ये खेळतांना ground strokes न खेळणं कसं अपरिहार्य असतं कारण ओल्या outfield मुळे जोरात मारलेला चेंडू देखिल लांबवर जाउ शकत नव्हता. Lift them up, that is the only way. या काळात ओवल, आझाद व क्रॉस मैदानावरची space sharing arrangement बघून मजा यायची. एका सामन्यातला लोंग ऑफ किंवा लोंग ऑन चा क्षेत्ररक्षक दुसऱ्या सामन्यातल्या स्लीप मध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या जवळ.

मुंबई चा फलंदाज म्हणजे तंत्रशुद्धता हे समिकरण जे मी पाहिलं ते मांजरेकर पासून सुरु झालं व पुढे दिलीप सरदेसाई, सुनिल गावसकर, दिलीप वेंगसरकर, संजय मांजरेकर व सचिन तेंडूलकर व आत्ता रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे पर्यंत तसंच चालू राह्यलं --अजूनही ते तसंच राहू शकेल पण या खेळाने आपलंच तंत्र बिघडवून घेतलंय त्याला मुंबई तरी काय करणार.
-२-
सुनील गावसकर नावाचं वादळ त्याच्या १९७०/७१ च्या वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर जे अंगावर आलं ते त्यानंतर बरीच वर्षे मला झपाटून गेलं.

आत्ता हेल्मेट न घालता कोणीही फलंदाजी करायला धजणार नाहीं.पण तेंव्हा गावसकर हेल्मेट का वापरत नाही या बद्दल बोलताना एक प्रसिद्ध समालोचक म्हणाला होता, “he does not need a helmet”. गावसकरच्या तंत्रशुद्धतेचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर “Never take your eyes off the ball’. पाकिस्तान च्या दौऱ्यावर असताना TV वरदाखविलेलं एक क्षणचित्र मी कधीच विसरणार नाही. इम्रान चा अंगावर उसळून आलेला एक चेंडू खेळणं अशक्य होतं व त्याला सोडण हेच अपरिहार्य होतं. इथे बरेचसे फलंदाज गोंधळून गेले असते व त्यांनी हा चेंडू एकतर अंगावर /हेल्मेटवर घेतला असता किंवा तो खेळायचा अनैच्छिक, केविलवाणा प्रयत्न करून slip cordon मधल्या टीकुठल्यातरी क्षेत्ररक्षकाकडे सोपा झेल देऊन तो मोकळा झाला असता. Not Sunil Gavaskar. हेल्मेट शिवाय असलेला सुनील कमरेत पूर्णपणे मागच्या मागे वाकला व शेवटपर्यंत त्याने आपली नजर चेंडूवरून काढली नाहीं. तेंव्हा सामन्याचं वर्णन करणारा पाकिस्तानी समालोचक् सामना सोडून हेच क्षणचित्र पुन्हा पुन्हा दाखवीत राह्यला “This is a lesson in true technique for all young batsmen” असं अर्ध स्वतःशीच व अर्ध इतरांसाठी पुटपुटत.
लष्करात असतांना एका ठिकाणी माझ्यापेक्षा एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीशी ओळख झाली. पहिल्याच भेटीत या बाईचं क्रिकेट वरचं ज्ञानपूर्वक प्रेम पाहून मी आश्चर्यचकित झालो. तिला गावसकर व महिन्दर अमरनाथ खूप आवडायचे पण या दोघांत सुनील अग्रस्थानी असायचा. आम्ही भेटलो की फक्त सुनील गावसकर बद्दल बोलत बसायचो. सुनीलची तिसावी व तेंव्हाची रेकॉर्ड ब्रेकिंग सेन्चुरी झाली तेंव्हा नेमकी माझी बदली सिकरान्दाबाद ला झाली व या सेचुरीचा पूर्वार्ध ट्रेन मधेच गेला पण सुदैवाने उत्तरार्ध मी ऐकू शकलो. या नंतर आम्ही एकमेकांना एक लांबलचक व भावविवश पत्र लिहिलं व विषय होता गावसकरची हे तिसावी सेन्चुरी. नंतर या बाई मला पुण्यात भेटल्या पण तो पर्यंत गावसकर नावाचं वादळ शमलं होतं व मुंबईने दुसऱ्या एका वादळाला जन्म दिला होता.

गावसकरने निवृत्ती घेतली तेंव्हा माझ्या डेक्कन क्वीन च्या पुणे-मुंबई फेऱ्या सुरु होत्या. पिंपरी चिंचवड भागात कुठल्यातरी एका इमारतीवर कुणीतरी एक बोर्ड लावला “सुनील तुझ्याशिवाय आम्ही टी व्ही बघूच शकत नाहीं.” मी पहिल्यांदा हा बोर्ड पाह्यला व दचकलो. आपल्याला मनापासून कांहीतरी म्हणायचं असतं व ते कुणीतरी आधीच म्हणून जातं.
(यातलं बरंच कांही मी कांही वर्षांपूर्वी लिहिलं होतं व आत्ता update केलंय. तेंव्हा सचिनचं नुक्तच पदार्पण झालं होतं सचिन वर लिहायचं तर ते स्वतंत्रपणे लिहावयास हवं कारण त्यात क्रिकेट बरोबर इतर कांही गोष्टींचाहि समावेश करायला लागेल.)

क्रीडाविचार

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

18 Mar 2014 - 1:27 pm | संजय क्षीरसागर

संपली वाट्टं ! ही घ्या नवी :

.

प्यारे१'s picture

18 Mar 2014 - 8:08 pm | प्यारे१

बडे बुढोंने कहा हय....

आलेल्या गिफ्ट दुसर्‍यांना पुन्हा गिफ्ट म्हणून देऊ नयेत. ;)

रामपुरी's picture

18 Mar 2014 - 8:54 pm | रामपुरी

एक सारख्या खूप वस्तू भेट म्हणून आल्या तर त्या पुन्हा भेट म्हणून देण्याशिवाय पर्याय नसतो.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2014 - 2:54 pm | मुक्त विहारि

सुनील गावस्कर बद्दल तुमच्या ज्या भावना आहेत, त्याच माझ्या सचिनबद्दल.

लेख आवडला.

श्रीगुरुजी's picture

18 Mar 2014 - 6:14 pm | श्रीगुरुजी

चांगला लेख आहे. मी १९८७ पर्यंत सुनील गावसकरचा जबरदस्त फॅन होतो. तो माझा अत्यंत आवडता खेळाडू. तो निवृत्त झाल्यावर काही काळ क्रिकेटमधला रस संपला होता. सचिनच्या उदयानंतर परत रस निर्माण झाला.

अवांतर - मिपावर क्रिकेटवर फार क्वचितच लेख येतात. इथे क्रिकेट फॅन्स फार कमी दिसतात.

बॅटमॅन's picture

19 Mar 2014 - 4:43 pm | बॅटमॅन

आहा..................!!!!!!!!!!!!!!!!!

डॉळे निवले अन अंमळ पाणावलेदेखील हे वाचून. कसं काय नजरेतून हे सुटलं होतं कुणास ठौक?????????? जुने दिवस आठवले, अलीकडे क्रिकेट इतके बघवत नाही, गुणी लोक अजूनही असले तरी ती भावना होत नाही. विशेषतः २००३ पर्यंत लै कुत्र्यागत क्रिकेट पहायचो, तेव्हाच्या अनेकोत्तम आठवणी जाग्या झाल्या. तो माहौल, ती कमेंट्री अन तो "हौऽऽऽ" आवाज- विशेषतः शारजामधला- अजूनही डोक्शात आहे.

मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता.

बाकी १९८३ च्या म्याचबद्दल तीर्थरूपांकडून इतके अन इतक्यावेळा ऐकलेय म्हणून सांगू! ती म्याच, ते विंडीजचे एकाहून एक कभिन्न प्लेयर्स यांबद्दल त्यांची कमेंट्री अजूनही कधी विषय निघाला तर त्याच उत्साहाने येत असते.

२००३ ची ९८ धावांची खेळी तर अशक्य प्रकार होता राव.....तो अन नेटवेस्टवाला प्रसंग, गांग्यानं जेव्हा शर्ट काढून भिरकावलेला.....

पुढे वर्ल्ड कप जिंकल्यावर या सर्वांवर आनंदाचं एक फायनल गारगार शिंपण बसलं. सच्यानं २०० केल्या तेव्हाही तेच.

च्यायला, कधी नव्हे ते क्रिकेटबद्दल इतकं नॉस्टॅल्जिक केलंत. गविंचा तो गल्ली क्रिकेटवाला लेखही तसाच. आज जुने व्हिडिओ पहायलाच लागणार असं दिसतंय!!!!!

अत्रुप्त आत्मा's picture

19 Mar 2014 - 5:06 pm | अत्रुप्त आत्मा

@ये बात कुछ हजम नही हुइ. हे घ्या आमच्या लेखांचे काही दुवे:>>> मृत्युं...जय हो http://www.sherv.net/cm/emo/happy/happy-clap.gif

आणि खाटुकम्यानशी (मृत्युंजयगारु, तुम्हांला या निमित्ताने इणंती करतो की शारजा मालिकेबद्दलही तुम्ही काही लिहावे. बाकी युद्धांबद्दलही संजय बनून तुम्ही लिहिले आहेच, पण शारजासुद्धा जबरी प्रकार होता.) +++++++१११११११११११

श्रीगुरुजी's picture

19 Mar 2014 - 9:01 pm | श्रीगुरुजी

धन्यवाद! लेख वाचून प्रतिक्रिया देतो. सध्या ट-२० विश्वचषकाची धामधूम आहे. त्यापूर्वी भारताचा द. आफ्रिका व न्यूझीलँडमध्ये दारूण पराभव झाला. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ५-० असा मार दिला. गेल्या २ महिन्यात ग्रॅमी स्वान, ग्रॅमी स्मिथ, सचिन, कॅलिस इ. मोठे खेळाडू निवृत्त झाले. परंतु मिपावर यावर एकही लेख आला नाही. एकंदरीत क्रिकेटवरील लेखांचे प्रमाण कमी दिसते.

आदूबाळ's picture

18 Mar 2014 - 6:41 pm | आदूबाळ

आवडलं!

तुम्ही क्रिकेट बघण्याच्या काळात माईलस्टोन म्हणावे असे अनेक प्रसंग घडले. उदा. १९७१चा परदेशातला पहिला विजय, १९७५ची ३-२ हारलेली कसोटी मालिका, केरी पॅकर प्रकरण, विश्वचषक विजय वगैरे. क्रिकेटप्रेमी अलिप्त राहूच शकणार नाही अशा घटना. त्याबद्दल तुमचे विचार, आठवणी वाचायला आवडतील.

kurlekaar's picture

19 Mar 2014 - 7:26 am | kurlekaar

पाहूया कसं जमत ते.

मुक्त विहारि व श्रीगुरुजी. तुम्हांला काय वाटतं ते मी समजू शकतो कारण माझं देखिल क्रिकेट प्रेम गावसकर नंतर थोडं थंडावलं पण त्याने सचिन आल्यानंतर पुन्हा उचल घेतली,फारच उचल घेतली. सचिन निवृत्त झाल्यानंतर पुन्हा एकदा सन्नाटा. विराट कोहली नसता तर क्रिकेट पाहणं मी आत्तापर्यंत क्वचित सोडूनही दिलं असतं. पण कधी कधी वाटतं की जो पर्यंत मुंबईकर भारताकडून खेळत आहेत तो पर्यंत पाहत रहावं. . .
मला वाटलं की मिपा वर बरेच मुंबईकर असतील व मुंबईकर by default क्रिकेट-प्रेमी असतो. सचिनवर मला लिहायचंय, भरभरून लिहायचंय. पण मराठीत एवढं लांबलचक लिहिण्याची मला अजूनतरी संवय नाहीं. तरी पण कधी व कसं जमेल ते पाहूया.
तुम्हां दोघांच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

मुक्त विहारि's picture

18 Mar 2014 - 7:40 pm | मुक्त विहारि

पण लिहा....

आणि फक्त क्रिकेट बद्दलच कशाला?

तुम्ही जिथे नौकरी करता, तिथल्या बर्‍या वाईट अनुभवांविषयी पण लिहा.

क्रिकेट व्यतिरीक्त देखील ह्या देशात भरमसाठ खेळ उपलब्ध असताना फक्त क्रिकेट बद्दल लेख मिपावर येतात आणि त्याचा उदोउदो होतो म्हणून एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

तुमचा अभिषेक's picture

18 Mar 2014 - 11:54 pm | तुमचा अभिषेक

क्रिकेटवर बरेच चांगले लेख लिहिले जात असले तरी त्यावर बनलेले चित्रपट मात्र सपशेल आपटतात...
एक लगान वगळता.. अर्थात त्यालाही पार्श्वभूमी आधुनिक खेळाची नव्हती..
मात्र ईतर खेळांवर बरेच चांगले चित्रपट निघतात, जसे की फरहानचा भाग मिल्खासिंग भाग, फूटबॉलवरचा अर्शद वारसी आणि जॉनचा दे दणादण गोल, बेंड ईट लाईक बेकहम, हॉकीवर तर चक दे सारखा सर्वोत्कृष्ट चित्रपट बनला आहे, मिथुनचा बॉक्सरही हिट गेलेला, इतरही छोट्या मोठ्या चित्रपटांत बॉक्सींग आणि कुस्ती वा कराटे या हाणामारीच्या खेळाचे प्रसंग हिट जातात.. अरे हो, जो जिता वही सिकंदरमधील सायकल रेसिंग राहीलीच की..

आठवायला घेतले की निघतील अजून, तर अगदीच काही शरम वाटावी अशी परिस्थिती नाहीये.
इतर खेळही भारतीयांच्या स्पोर्टसभावना जागवतात म्हणून हे सिनेमे चालतात असे म्हणता येईल ना :)

आदूबाळ's picture

19 Mar 2014 - 12:22 am | आदूबाळ

"अव्वल नंबर" विसरू नका!

मुक्त विहारि's picture

19 Mar 2014 - 8:12 am | मुक्त विहारि

त्यात देव आनंद बरेच काही असतो, तोच ना?

म्हणजे चीफ ऑफ आर्मी स्टाफ, मग पोलीस, आणि मग जमलेच तर क्रिकेट बोर्डात आणि मग जमलेच तर ह्या सिनेमाचा एकमेव प्रेक्षक.

परत एकदा बघायला हवा.जाम भारी सिनेमा आहे.(अर्थात सलग हा सिनेमा पचवायची ताकद नाही,तुकड्या तुकड्यांतच बघायला लागेल.)

आदूबाळ's picture

19 Mar 2014 - 3:41 pm | आदूबाळ

बरोब्बर, तोच!

सहमत - जाम भारी आहे. सगळे ऑष्ट्रेलियन बोलर आमिर खानाला फुलटॉसच टाकतात. बाकी अलौड नाही.

साहजीकच आहे.

आता खूद्द "देव आनंद" क्रिकेट बोर्डात असल्याने, ते तरी दुसरे काय करणार?

आले देवाच्या मना, तेथे कुणाचे चालेना.

टवाळ कार्टा's picture

19 Mar 2014 - 3:54 pm | टवाळ कार्टा

फूटबॉलवरचा अर्शद वारसी आणि जॉनचा दे दणादण गोल

ड्वाळे पाणावले =))

तुमचा अभिषेक's picture

30 Mar 2014 - 11:52 pm | तुमचा अभिषेक

म्हणजे सिनेमाचे नाव वगैरे चुकले की तुम्हाला तो चित्रपट बंडल वाटतो.
कारण खरेच चांगला चित्रपट आहे तो. शेवटाला खासच होत जातो. जॉन अब्राहमच्या साथीने इमोशनल एण्डींग, इतर कोणी सांगितले असते तर मलाही पचायला जड गेले असते पण स्वता हा अनुभव घेतला आहे. जर हा चित्रपट पाहिला नसेल कोणी तर नक्की बघा म्हणून सजेस्ट करेन. आवडला नाही तर पैसे परत.

खूप मस्त, जेव्हा सुनील रिटायर होत होता तेव्हा वाटल आता काही मज्जा नाही बघण्यात. पण interest काही कमी झाला नाही ( मला वाटत तो होत नाही , पण कमी झाले असे वाटणे हे शनिक असत). नंतर सचिन आला, वेड लावलं, बात्तिंग बघण्याच्या नादात एका सेमिस्टर चा पेपर दिलाच नाही आणि त्याच वाईट पण नाही वाटल, सचिनचे फटके जे पहिले तो समोर येउन मारायचा, त्याची शरीराची gomentry , त्याच्या बदल भरभरून बोलणारे समालोचक, मेडिया सर्वे वेड लावणारे होते. सचिन म्हणझे एक वादळ होते असे वाटायचे कि कधी शांत होउचे नये, त्याच्या कोन्च्याच इंनिंग मुले समाधान असे भेटतच नवते अस वाटायचं अजून खेळायला पाहिजे होते. सचिन ने पराकोटीचा आनंद दिला पण तृप्ता ता मात्र नाही मिळाली कारण माझी भूक वाढवली होती, तसच अझहरच wrist वर खेळण, सर्व अप्रतिम. bating येवडी सिम्पल आहे आणि क्रिकेट हे वेड लावणारे आहे ते सचिन मूळेच. आत्ता फक्त त्याच्या आठवणी आणि त्यात रमण्यात पण एक खूप आनंद आहेस. मस्त मस्त यार सुनील , सचिन,

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Mar 2014 - 9:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला. क्रिकेट बघत नाही, चेंडू ते फटके त्या धावा, रेकोर्ड क्रिकेट तंत्र-मंत्र. खेळाडू , तो भावनिक वावर. ती गर्दी, समालोचक, कित्ती कित्ती बोअर होतं ;)

पण आपलं क्रिकेट पोहोचलं पुले शुभेच्छा !!!

-दिलीप बिरुटे
(खोडकर)

स्पंदना's picture

20 Mar 2014 - 3:24 am | स्पंदना

हो.ना.
प्राडॉ त्यामुळे फक्त दु:खी नाहीतर खुषीन बेहोष होतात.
अधली मधली स्टेपच नाही.

खटपट्या's picture

20 Mar 2014 - 2:01 am | खटपट्या

सचिन जबरदस्त आहे.

पण माझ्या मते आपल्याला कसोटी जिंकायची आणि लढायची सवय लावली सुनील गावस्कर ने

आत्मशून्य's picture

20 Mar 2014 - 3:02 am | आत्मशून्य

असच उगाच...सहजच.

पैसा's picture

29 Mar 2014 - 2:57 pm | पैसा

लेख आवडला. गावस्करबद्दल लिहाल तेवढं थोडंच. केवळ खेळच नव्हे तर पाकिस्तानी अन ब्रिटिश लोकांना तो ज्या खुन्नसने उत्तरे द्यायचे तेही जबरदस्तच! कालच बातमी आहे की आयपीएल त्याच्या हातात दिलं आहे. काही सुधारणा होते का पाहू. बीसीसीआयचा तो कधीच आवडता नव्हता. त्यामुळे जरा आश्चर्यच वाटलं.

फारएन्ड's picture

30 Mar 2014 - 4:20 am | फारएन्ड

जबरी लिहीले आहे. आवडले.

लंदाजाने फटका मारला की वाऱ्याची झुळुक यावी तशीच एक disturbance ची wave रेडीओवर यायची.पण तो एक चौकार होता का एकेरी वा दुहेरी धावा होत्या ते कळायचं नाही. >>> हे पूर्वी अनुभवल्याचे आठवते. एकदम चपखल आहे.