काय ह्या शाळा,

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
21 Feb 2014 - 3:04 pm
गाभा: 

पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ?
व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल?

शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे.

पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालक वर्गात फी दरवाढ विरोधात संताप होता. अखेर आज या संतापाचा उद्रेक होत चक्क मुख्यध्यापकांनाच लक्ष्य केलं आहे.

याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

शिक्षणसंस्था चालवणे हा एक प्रकारचा व्यवसाय म्हणूनही नावारूपाला य़ेत आहे ..
असो..

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 3:10 pm | बॅटमॅन

कोनाड्यात उभी हिंदमाता
अकुंच्या धाग्यावर प्रतिसाद देतो, माझा नंबर पयला!!!!

टवाळ कार्टा's picture

21 Feb 2014 - 4:12 pm | टवाळ कार्टा

नुस्ता कोनाडा का "समोरचा" कोनाडा?? =)

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 4:21 pm | बॅटमॅन

पायजे तो घ्या ;)

चिन्मय खंडागळे's picture

21 Feb 2014 - 6:15 pm | चिन्मय खंडागळे

आणि हिंदमाता नाही , 'व्हिंदमाता' असं आहे ते. उगीच पाठभेद करू नका.

बॅटमॅन's picture

21 Feb 2014 - 11:29 pm | बॅटमॅन

आयमाय स्वारी!

प्रसाद गोडबोले's picture

21 Feb 2014 - 3:12 pm | प्रसाद गोडबोले

अकुं , तुम्ही अखंड काथ्याकुट सप्ताह वगैरे सुरु केलाय की काय ? की मिपाकरांची शाळा घेताय ??

विनायक प्रभू's picture

21 Feb 2014 - 3:25 pm | विनायक प्रभू

अहो त्या मोकळ्या केशसंभाराकडे बघा. नुकतेच टूर वरुन आलात ना?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Feb 2014 - 4:04 pm | अत्रुप्त आत्मा

@अहो त्या मोकळ्या केशसंभाराकडे बघा. >>> http://www.sherv.net/cm/emo/laughing/rolling-on-the-floor-laughing-smiley-emoticon.gif

शिद's picture

21 Feb 2014 - 4:19 pm | शिद

=)) =)) =))

ठ्या... फुटलो.

तुमचा अभिषेक's picture

21 Feb 2014 - 5:08 pm | तुमचा अभिषेक

सक्तीचे कुटुंबनियोजनाचा कुटील बेत आहे हा ..

टवाळ कार्टा's picture

24 Feb 2014 - 7:32 pm | टवाळ कार्टा

=))

कदाचित मटामध्यल्या ह्या बातमीवरून हा धागा काढला असावा अशी आशा आहे.

अविनाशकुलकर्णी,
कुठलाही धागा काढताना किमान त्याचे मुळ ऊगमस्थान तरी नमुद करा म्हणजे आम्हाला त्याचा काहीतरी बोध होईल. :)
आता धाग्याचे ऊगमस्थान सुध्दा आम्हीच शोधुन काढायचे का? :)

अकुकाका , कुछ लेते क्यू नही ?

जिल्बीवाल्याने जिल्बी पाडत राहावं. कुणी खायला आहे, की नाही याची चिंता करू नये.
- धोंडो भिकाजी कुलकर्णी (जिल्बीवाले)

अनन्त अवधुत's picture

26 Feb 2014 - 6:45 am | अनन्त अवधुत

होमस्कुलिन्ग करावे म्हणतो