Skip to main content

काय ह्या शाळा,

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/02/2014 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात साधू वासवानी स्कूल मध्ये नर्सरीची फी २६,००० वरून ७५,००० आणि ज्युनिअर के.जी. ची फी २८,००० वरून १,००,००० केल्यामुळे पालकांचे आंदोलन. अरेरे. काय ह्या शाळा, केव्हडा माजोरीपणा. कशी शिकायची मुले ? व मनात येते एव्हढ्या फिया घेवुन हे असे काय विषेश शिकवत असतिल? शाळांच्या फी दरवाढ विरोधात पालकांचे आक्रमक रूप आपण नेहमीच पाहिले आहे. याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. पुण्यात संतप्त पालकांनी चक्क मुख्यध्यापकांनाच फी दरवाढ विरोधात लक्ष्य केलं आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवड येथे साधू वासवानी इंटरनॉशनल स्कूलमध्ये ही घटना घडली आहे. संतप्त पालकांनी मुख्यध्यापकांना घेराव घालत काळ फासलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पालक वर्गात फी दरवाढ विरोधात संताप होता. अखेर आज या संतापाचा उद्रेक होत चक्क मुख्यध्यापकांनाच लक्ष्य केलं आहे. याप्रकरणी पालकांनी शाळा प्रशासनाविरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. शिक्षणसंस्था चालवणे हा एक प्रकारचा व्यवसाय म्हणूनही नावारूपाला य़ेत आहे .. असो..

वाचने 4441
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

अकुं , तुम्ही अखंड काथ्याकुट सप्ताह वगैरे सुरु केलाय की काय ? की मिपाकरांची शाळा घेताय ??

अहो त्या मोकळ्या केशसंभाराकडे बघा. नुकतेच टूर वरुन आलात ना?

कदाचित मटामध्यल्या ह्या बातमीवरून हा धागा काढला असावा अशी आशा आहे. अविनाशकुलकर्णी, कुठलाही धागा काढताना किमान त्याचे मुळ ऊगमस्थान तरी नमुद करा म्हणजे आम्हाला त्याचा काहीतरी बोध होईल. :) आता धाग्याचे ऊगमस्थान सुध्दा आम्हीच शोधुन काढायचे का? :)

In reply to by सस्नेह

जिल्बीवाल्याने जिल्बी पाडत राहावं. कुणी खायला आहे, की नाही याची चिंता करू नये. - धोंडो भिकाजी कुलकर्णी (जिल्बीवाले)