व्यावहारिकदृष्ट्या बिनकामाच्या माहितीचा अफाट खजिना ...... मी.
भावनिक जगाच्या हिंदोळ्यात डोलणारा..........................मी
नको तितकं खरं नाही त्या ठिकाणी बोलून पस्तावणारा ..........मी
तिला पाहुन खुदकन हसणारा आणि आपलं हसु दाबणाराही....हो ..मी च.
मी गर्दित उभा असतो गर्दितला एक बनून
पण त्या धामधुमीत्,त्या गर्दीतही बघत असतो बाहेरच्या गोबर्या गुलाबावरचा
टप्पोरा थेंब तल्लीन होउन
मी असतो अफाट काम करणारा...
तथाकथित "थॅंकलेस्" जॉब करणारा....
पण ते केल्यावर लोकांचं समाधान पाहुन भरुन पावणारा.
माझ्या मनात आहे इच्छा ओंजळभर भूतकाळ बदलण्याची....
माझ्यात आहे उर्मी उद्याचं भविष्य घडवायची.
थोडासा बावळट्,किंचित भोळ्सट दिसत असेनही.
वागायला मात्र थोडासा खट्याळ बराचसा नाठाळ असेनही.
पण तु नसताना तुझ्याच आठवणीत रमलेला मी असेनही....
सगळ्या दोस्तांत एकमेव मी....
भरल्या गर्दित एकटाच मी.......
माझा मलाच पुरत नाही मी!
जगभर सांडुन इथं तिथं सगळिकडं भरुन राहिलोय मी
दोस्तांनो, ह्या सफळ्यातला कुठला तरी "मी" तुम्हीही असणारच.
का ह्याहुन वेगळे, आपल्या सप्तरंगात स्वच्छंद तरी तुम्ही असणारच.
इथं लिहिलय तस्साच आहे मी...
तुम्हीही सांगा कसे,कोण आहात तुम्ही?
समस्त मिपा करांना शुभ प्रभात.....
काहिंना सध्यासाठी; अमेरिकेतल्यांना उद्यासाठी.
प्रतिक्रिया
1 Oct 2008 - 9:58 am | अनिरुध्द
छान आहे आणि मी ही 'मी' च आहे.
1 Oct 2008 - 1:34 pm | गणा मास्तर
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
1 Oct 2008 - 2:46 pm | मदनबाण
मी माझा आणि माझा मी..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
4 Oct 2008 - 9:39 am | स्व
पाहुन छान वाटलं की इथही "मी" आहेच.
किंवा "मी" आहेतच.
गणा मास्तर्,मदनबाण , काउ...
सगळ्यांचे आभार.....
स्व....
एक अस्तित्व....
4 Oct 2008 - 9:51 am | प्रभाकर पेठकर
आता मात्र पाऽऽर 'गोंधळलेला मी'.
तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
4 Oct 2008 - 10:15 am | अनिल हटेला
सगळ्या दोस्तांत एकमेव मी....
भरल्या गर्दित एकटाच मी.......
खरच असा आहे मी !!!!!
पण माझ्यात मी पणा नाही!!!!!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..