अजूनही मराठी लेखन अवघड आहे ?

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
5 Dec 2013 - 5:09 pm
गाभा: 

आंतरजालावर युनिकोडात मराठी टाईप करण्याच्या आतापर्यंत खूप सगळ्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.तरीही मराठी विकिपीडियावरील आकडेवारी नुसार आजही ६०% लोकांना मराठी विकिपीडियावर मराठीत टाईपकरणे जमत नाही.दिवसाकाठी किमान २ ते ४ नवी रोमनलिपीतून मराठीत लिहीण्याचा प्रयत्न करणारी मंडळी थांबवावी लागते.विवीध पद्धतीने सहाय्य उपलब्ध करून देऊन सुद्धा आपण नेमके कुठे कमी पडतो हे कळेनासे होते.

मराठी विकिपीडियावर या रोमन लिपीतून मराठी लिहिणार्या मंडळींना, थांबवले जाताना सध्या दाखवला जाणारा संदेश (दुवा) सराव सुविधा सुद्धा उपलब्ध करतो.(इतरही साहाय्यपाने पॉवरपॉईंट इत्यादी उपलब्ध आहेतच) या संदेशात नेमक्या कोणत्या सुधारणा (उपलब्ध) केल्यास मराठी विकिपीडियावरील मराठी टंकलेखन नवागतांकरीता सुलभ होईल या बद्दल आपणा सर्वांकडून जाणून घेऊ इच्छीतो.

आपल्या प्रतिसादांच्या प्रतिक्षेत

धन्यवाद

प्रतिक्रिया

मराठीत टंकायच्या पद्धती विविध मराठी टायपिंग सॉफ्टवेअर्समध्ये वेगळ्या असतात. श्री-लिपी, शिवाजी, बरहा अशी बरीच सॉफ्टवेअर्स उपलब्ध असतील. यांतील काहींची टंकनपद्धती आंतरजालावरील युनिकोडात होणा-या टायपिंगशी साधर्म्य राखून असते, काहींची एकदमच वेगळी असते. त्यामुळे अशा वेगळ्या टंकनपद्धतीची सवय असलेल्यांना आंतरजालावर सर्वप्रकारचे टंकनसाहाय्य उपलब्ध असूनही मराठीतून टंकणं अवघड जाऊ शकतं असा एक अंदाज.

माहितगार's picture

5 Dec 2013 - 7:58 pm | माहितगार

या (दुवा) ऑनलाईन सर्वेक्षणानुसार ४० % लोक ज्या मराठी संकेतस्थळावर जी पद्धती उपलब्ध असेल ती वापरतात.हि आकडेवारी मराठी विकिपीडियावर मराठी टंकनकरू शकणार्या ४०% आकड्याशी क्रॉसटॅली होते.

सर्वेनुसार विंडोज आयएमई आणि इन्स्क्रीप्ट मिळून ६ टक्के लोक वापरतात.२२ टक्के लोक गूगलने उपलब्ध केलेली पद्धटी वापरतात(सध्याच्या आकडेवारींनुसार एकच पद्धती वापरणार्र्यात हा टक्का सर्वात मोठा आहे).बराहा गमभन आणि इतर मिळून आकडा ५ ते ६%च्या पुढे जात नाही.मागच्या पिढीतल्या टंकन पद्धती वापरणारी बहुतांश मंडळी उपरोक्त पद्धतीपैकी एखादी पद्धत वापरावयास लागली अथवा इंटरनेट युनिकोड मराठीशी त्यांनी तेवढे जुळवून घेतले नाही.मागच्या पिढीतील इंटरनेट युनिकोड मराठीशी जुळवून न घेणार्यांची संख्याही मोठी म्हणजे दहावीस लाखांच्या घरात तरी असू शकते पण नेमकी आकडेवारी देणे कठीण आहे.

मराठी विकिपीडियावर मराठी टंकता न येणारी सध्याची आकडेवारी बहुतांश नवीन पिढीची आणि बरच प्रमाण सेमी अर्बन आणि ग्रामीण क्षेत्रातील असाव.साधारणतः दहावी झाल्यानंतर इंटरनेटवरचा वावर वाढतो जर वर्षाकाठी ९ लाख मुले (मराठी माध्यमातन) दहावी होऊन बाहेर पडत असतील तर त्यांचा मराठी इंटरनेटवरचा वावर फारच कमी आहे हे वास्तव लक्षात घेणे सोपे जाईल.

मी_आहे_ना's picture

5 Dec 2013 - 5:31 pm | मी_आहे_ना

धाग्याचा विषय पाहून वाटलं मिपावरच्या शुद्ध-लेखनाबद्दल आणि ज्वलंत धाग्यांबद्दल काहीतरी आहे. आमचा पास.

माहितगार's picture

5 Dec 2013 - 8:01 pm | माहितगार

धाग्यास भेट देण्याकरता धन्यवाद

पैसा's picture

5 Dec 2013 - 5:37 pm | पैसा

विकिपिडियावर मराठी संस्थळांवर लेख तुम्हीच लिहिला आहे का? त्यातली माहिती फार जुनी आहे म्हणून विचारते.

माहितगार's picture

5 Dec 2013 - 8:14 pm | माहितगार

आपण मराठी संकेतस्थळे या लेखा बद्दल विचारत असल्यास,आत्तापर्यंत ३५ सहभागी सदस्यांप्रमाणेच मीही त्या लेखात अंशतः लेखन योगदान दिले त्यालाही तीन एक वर्षे लोटली.माझे स्वतःचे ८० टक्के लक्ष साहाय्य विषयक लेखनावर असते.
त्या आणि इतर अनेक लेखांची स्थिती हा स्वतंत्र धाग्याचाही विषय ठरावा पण या धाग्यात म्हटल्या प्रमाणे मराठी टंकनातच बॉटलनेक प्रॉब्लेम आल्याने लेखकांची संख्या मिळवण्याच्या महत्वपूर्ण गोष्टीत व्यत्यय येतो.म्हणूनच मराठी विकिपीडियावर प्रत्यक्ष मराठी टंकनाचे प्रत्यक्ष परिक्षणकरून फिडबॅकची मिपाकरांकडून अपेक्षा ठेऊन हा धागा काढला पण अद्यापतरी या धाग्याचा प्रतिसाद पुर्वींच्या धाग्यांच्या मानाने कमी वाटतो आहे.

धागा निटसा कळाला नाही .
पण जर मराठी टंकण्याबद्दल असेल तर , मी google वर जातो , english to marathi translation लिहीतो . मग chingati नावाची वेबसाईट येते . तिथे लेख टंकुन इथे चोप्य पस्ते करतो . अजुनही मला मिपावर मराठी टाईप येत नाही

काळा पहाड's picture

5 Dec 2013 - 11:51 pm | काळा पहाड

http://marathi.changathi.com/
परम धन्यवाद. आता लिहिणे सोपे झाले आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

9 Dec 2013 - 12:21 pm | डॉ सुहास म्हात्रे

हि वेबसाईट चांगली आहे पण "र्‍या" (Ryaa) टाईप केला की त्याचा "र्या" होतो हा प्रॉब्लेम मला अजून सुटला नाही.

नमस्कार,

आपण सध्या वापरत असलेल्या कॉपीपेस्ट पद्धतीची माहिती दिल्या बद्दल धन्यवाद.पण त्याचवेळी मिपाटंकनातील अडचणींची नेमकी नोंदच केली न गेल्यास मिपा टंकन बनवणार्र्यास साहाय्य पान बनवणार्र्यास सुविधेत काय बदल करावयाचा हे ध्यानात येत नाही. अशीच अडचण मराठी विकिपीडियावरही येते.

तर या धाग्यातून अपेक्षा अशी की मराठी विकिपीडियाला प्रत्यक्ष भेट दिली जाईल.आणि तेथे टंकण्याचा प्रयत्न करून सध्याच्या सुविधेतील आणि साहाय्यातील उणीवा माहिती करून मिळतील.कारण आपण बनवलेली सुविधा साहाय्य आपले आपल्याला परिपूर्ण वाटते पण वापरकर्त्यांच्या अडचणी समजत नाहीत.त्या समजून घेणे हा धाग्याचा उद्देश आहे.

पैसा's picture

5 Dec 2013 - 8:34 pm | पैसा

फोनेटिक कीबोर्ड लोकांना टायपिंग करायला अवघड का वाटत असावा याचा मला अंदाज येत नाही. जेव्हा गमभन, गूगल हिंदी इ उपलब्ध नव्हते तेव्हाही मी एक किरण नावाचा एक देवनागरी फॉण्ट होता तो वापरून मराठी/हिंदी टाईप करत होते. आता युनिकोड, आणि इतर सोयी असताना खरे तर मराठी टायपिंग कठीण जाऊ नये.

माहितगार's picture

6 Dec 2013 - 7:58 am | माहितगार

मराठी विकिपीडियावरचा प्रत्यक्ष अनुभव लोक यातही अडखळतात हाच आहे.नविन शिकताना अथवा इतरांना शिकवताना लोक त्यांच्या अडचणी नोंदवण्याचे टाळतात त्यामुळे नेमके उपाय काय योजावेत ते उमजत नाही. यूजर बिहेवीयर स्टडीवर अवलंबून रहावयास लागते पण नोंदी नसल्यास निव्वळ युजर बिहेवीयर स्टडीवर विसंबण्यात पुरेशी सटीकता आणि परिपूर्णता आणण्यात अडचणी येतात.

खटपट्या's picture

6 Dec 2013 - 1:09 am | खटपट्या

खालील लीकंवर तर मराठी टंकन अत्यंत सोपे झाले आहे.

http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/

होय सध्या गूगल टंकन सर्वाधिक म्हणजे २२% लोक वापरतात .गूगल टंकन अवजार इतर संस्थळांवर सरळ टंकण्या साठी वापरता येते तरी पण वापर मुख्यत्वे कॉपी पेस्टींगनेच अधिक केला जातो असे आढळून येते.

अव्यक्त's picture

6 Dec 2013 - 3:31 am | अव्यक्त

खटपट्या आपण उपयुक्त संस्थळ सुचवले त्याबद्दल मनःपूर्वक आभार…अजुन काही संस्थळ आपणांस ठाऊक असल्यास इथे
टंकव्यावात…आणि मराठी fonts उदाहरण म्हणजे शिवाजी आणि इतर font जे कळफलका बरहुकुम चालतात अस्से उपलब्ध करावेत…धन्यवाद!!!

अजून एक संस्थळ खालीलप्रमाणे

http://www.gamabhana.com/gamabhana_ex/demo/

यातील डाव्या खिडकी मध्ये सर टंकायला सुरवात करा. आणि चोप्य पस्ते करा.

माहितगार's picture

6 Dec 2013 - 11:44 am | माहितगार

मराठी विकिपीडियाचा कळफलक बनवताना गमभनचाही कळफलक विचारात घेतला होता त्यामुळे बरेचसे मॅच होते.प्रतिसादाकरता धन्यवाद

माहितगार's picture

6 Dec 2013 - 11:33 am | माहितगार

नमस्कार

आज सकाळी सुमारे साडेनऊ वाजता मराठी विकिपीडियाच्या गाळणीने थांबवलेली दोन संपादने उदाहरणाखातर खाली देत आहे. एक रोमनलिपी मराठीत आहे आणि एक चक्क इंग्रजी आहे. :

*bharat deshatil tuthpest ani soap cha company chi yadi ani mahiti dene
*I would like to know the available courses related to social work.

तशीही हि संपादन विश्वकोशीय स्वरूपाची नाहीत पण किमान देवनागरी मराठीतह लिहीली जात नाहीत आणि रोजचे किमान दोनचार लोक मराठी टायपींगला असे पास देत असतील तर बाकी दहा जणांनाही मराठी टायपींग अवघड असत हेच सांगतील. या बद्दल बरेच बदल गेल्या दहा वर्षात करून पाहीले पण सर्वांना मराठी टायपींग सहज जमल पाहीजे हे उद्दीष्ट अजून काही पूर्ण होताना दिसत नाही.

पैसा's picture

6 Dec 2013 - 12:22 pm | पैसा

एक कारण कदाचित हे असेल की देवनागरी टायपिंग म्हणजे बहुतेकांना तो मराठी टाईपरायटरचा अगम्य इन्स्क्रिप्ट कीबोर्ड आठवतो. त्यामुळे फोनेटिक कीबोर्ड वापरणं किती सोपं आहे हे बघण्याचा हे लोक प्रयत्नच करत नाहीत.

मिलिंद's picture

6 Dec 2013 - 12:56 pm | मिलिंद

"बहुतेकांना तो मराठी टाईपरायटरचा अगम्य इन्स्क्रिप्ट कीबोर्ड"

इनस्क्रीप्टचे kbdtut वापरुन बघा एकदा म्हणजे अगम्य राहणार नाही. ४ दिवसांत मराठीच काय भारतातल्या कोणत्याही भाषेत टाईप करता येईल.
आत्ताच्या घडीला इनस्क्रीप्ट हा एकमेव BIS मानक असलेला किबोर्ड लेआऊट आहे.

पैसा's picture

6 Dec 2013 - 1:30 pm | पैसा

पण मला वाटतं प्रत्येकासाठी प्रश्न आपल्याला काय सोपं/कम्फर्टेबल वाटतं हा आहे. जे थोडंबहुत देवनागरी टायपिंग शिकले आहेत त्यांना इन्स्क्रिप्ट वगैरे इतर कीबोर्ड्स कठीण वाटणार नाहीत. पण ज्याला त्यात डोकं घालायची इच्छा नाही आणि कामचलाऊ टायपिंग आलं की पुरे वाटतं त्यांना फोनेटिक कीबोर्ड बरा वाटेल. त्यात बरा-वाईट डावं-उजवं असं काही नसावं.

माहितगार's picture

6 Dec 2013 - 3:56 pm | माहितगार

वापरकर्त्यांची आकडेवारी बोलकी आहे २२ टक्के गूगल ट्रांसलीटरेशन वापरतात,४० टक्के ज्या मराठी संस्थळावर जो आहे तो म्हणजे मुख्यत्वे ट्रांसलीटरेशन.गमभन बराहा काही आएमई मिळून दहाटक्के ट्रांसलीटरेशनच वापरतात. तर इनस्क्रीप्ट केवळ सहा टक्के.शेवटी वॉशींग मशिन टॉपलोडींग कम्फर्टेबल का फ्रंटलोडींग कम्फर्टेबल हे वापरकर्त्यांनी ठरवलेल बर. मराठी विकिपीडियावर अक्षरांतरण,फोनेटीक किंवा इन्स्क्रीप्ट पैकी कोणतीही ऑनलाईन सुविधा एनेबल करता येते. प्रश्न तीनही प्रकारच्या सुविधा देऊनही हा धागा लावावा लागतो आहे हा आहे.

उद्दाम's picture

6 Dec 2013 - 12:30 pm | उद्दाम

ऑटोसजेशनवालं टायपिंग सॉफ्टवेअर पाहिलं की आम्ही ते बादच करतो. आपण झरझर लिहित जावं आणि ते मराठीत उमटावं ..

मी प वर लिहिण्यासाठी अडचण येत नहिये. पण तुम्ही लोक smilies कशा तक्ता ते सांगा न. त्यासाठी कुठली लिंक आहे का? कि मी प वरच काही provision आहे?

उद्दाम's picture

6 Dec 2013 - 1:40 pm | उद्दाम

स्मायलीचीही कुठेतरी इथे लिंक आहे.

पण मला इथली एकच स्मायली येते. : आणि ) ही दोन चिन्हे सलग टाइप करा , त्यांच्या आधी नंतर काहीही अक्षर त्याना जोडून ठेऊ नका. आणि मग प्रतिसाद प्रकाशित करा. प्रतिसादात :) ही स्मायली येईल.

उद्दाम's picture

6 Dec 2013 - 1:41 pm | उद्दाम

मायबोलिवर या. तिथे भरपूर स्मायल्या आहेत.

मराठी_माणूस's picture

6 Dec 2013 - 10:19 pm | मराठी_माणूस

मिपा वर सुध्दा मराठी टायपिंग होत नाही . इतरत्र टाईप करून पेस्ट करावे लागते

मीपा वर सुद्धा मराठी टायपिंग होते. गमभन चे नियम पाळावे लागतात. अडचण एकच आहे. जेव्हा बै-स्पेस दाबतो तेव्हा सगळा गोंधळ सुरु होतो ))

ऑफलाईन मराठी लिहिण्यासाठी किती पर्याय उपलब्ध आहेत? विंडोजमधील पर्यायांचा विचार करू. गमभनच्या एडिटरमध्ये टंकून ते दुसरीकडे चिकटवणे हा पर्याय मला कंटाळवाणा वाटतो. बरहा आजकाल फुकट मिळत नाही. गुगल ट्रान्स्लिटरेट हे शब्दांचा अंदाज करत बसते, जे मला आवडत नाही. अनेकदा मी T दाबले तरीही गुगल त्याला त समजते. मोठा किचकट शब्द टंकायचा असेल तर तो गुगलला कळत नसल्याने तुकडे करून टंकावा लागतो. इन्स्क्रिप्टचा कळफलक नव्याने शिकण्याची इच्छा नाही.
लिनक्स-उबंटूमध्ये मी iBus चा मराठी कळफलक वापरतो. हा बऱ्यापैकी फोनेटिक असलेला कळफलक आहे. मी बऱ्याचदा लिनक्सच वापरतो. कधीतरी विंडोज वापरावे लागले, तर गुगल ट्रान्स्लिटरेट वापरतो.
विंडोजमध्ये ऑफलाईन वापरण्यासाठी फोनेटिक कळफलक कोणाला ठाऊक आहेत काय?

पैसा's picture

6 Dec 2013 - 10:43 pm | पैसा

तुमच्या विंडोज सिस्टीमवर भाषांच्या पर्यायामधे युनिकोड अ‍ॅक्टिव्हेट करा आणि भाषाइंडिया (मायक्रोसॉफ्ट) ची http://bhashaindia.com/downloads/pages/home.aspx प्रणाली वापरा. यासाठी पूर्ण सूचना http://raisen.nic.in/pdf/nic/unicode_solution.pdf इथे उपलब्ध आहेत.

खबो जाप's picture

10 Dec 2013 - 3:12 pm | खबो जाप

आपण बाबा इथ जातो आणि काय टायपायाचे ते टायीपतो आणि कापी पेष्ट करतो
हाय काय आन नाय काय
http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/