मागिल भागः- http://misalpav.com/node/25527 ...पुढे चालू
आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर, यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही.............
=============================
जखमे सारखं
चिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात. ह्यांच्या चेहेर्यावर अस्सा काहि भाव असतो की, आमच्या अंगावरचे कपडे, ते वरच्या खिशातलं मोबॉइल, देहाखालची गाडी, ह्या सर्व वस्तूंमधे भरलेला गुरुजी नामक देह त्या लायकीचाच नाहिये. किंवा हे सर्व आंम्ही चोरुन किंवा भाड्यानी आणून वापरतोय! "त्यापेक्षा जवळ येऊन एक जोडा मारा, पण हा नजरेचा बाण नको...'' असं ओरडावसं वाटतं.
दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी, काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन.. असच म्हणतो. पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे स्वतःच अधःपतन करवून घेण्यासारखच आहे! इष्टस्थळी पोहोचल्यावर, यजमान सुद्धा आपल्या चेहेर्यावरून त्यांचा वड गाठायला गुरुजिंना किति फेरे घालायला लागलेत ते ओळखतात. पत्ता सांगण्याच्या निरनिराळ्या पद्धती पुण्यात आहेत. त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही! यापेक्षा चोर पाकिट सुद्धा कमी शिताफिनी काढीत असावा. शेवटी आपण विचारवं, "कुठे येते मग ही इमारत?" तर, "अहो,मी सुद्धा या भागात नविन(?) आहे" असं आपल्याला निरित्तर करणारं उत्तर येतं! आपण पुन्हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा करावा, "का हो?..तुंम्ही नविन आहात या भागात..हा "भाग" तुमच्या ध्यानात नाही का आला?" तर पुन्हा यांचं उत्तर तयार, "त्याचं काय आहे माहितिये का? की म्हटलं होइल आपल्यालाही या भागाची माहिती!" हे उत्तर ऐकून डोक्याची शकलं झाल्यानंतर कडेनी जाणार्या एखाद्या ट्रकमागचं ते संत/महंत/विचारवंत-छाप बोधवचन मला दिसतं-"चित्ती असू द्यावे समाधानं!" ...
अता इतका ताप झाल्यानंतर माझं चित्त त्या तापानीच पूर्ण समाधानी होतं. आणी (एकदाचा) कळस गाठावा या इच्छेनी, मी त्याच दुष्ट ट्रक खाली देह ठेवायची इच्छा धरतो. पण पुण्यातले रस्ते आणी खड्डे पहाता, माझा देह(सरळ) वैकुंठाला न जाता, त्या ट्रक समोरच्या खड्ड्यात पडायचा आणी वरनं तो यमदूत तिथेही हुलकावणी देऊन जायचा! ... थोडक्यात..आमच्या नशिबी मरणाचं सुख ही सुखासुखी लाभायचं नाही!
याच दुसर्या तापाचा उपभाग किंवा पत्ता शोध शास्त्रानुभवानुसार वर्णन करायचं झालं तर पश्चात्ताप! तो पश्च्चात्तप कसा होतो पहा.. त्यातुन तुंम्ही धनकवडी सारख्या चक्रव्यूहात गेला असाल तर अभिमन्यूच्या उलट अवस्था वाट्याला आल्याशिवाय रहात नाही! (हा ताप अता मोबॉइलमुळे बराचसा नामशेष झाला आहे, पण जंतू अजुन मेलेले नाहीत! ;) )
आपणः- अहो ते दिग्विजय अपार्मेंट कुठाय हो! ह्या पोस्ट ऑफिस जवळच आहे.आपल्याला माहित आहे का?
टवाळ पोरांचं त्रिकूट:- ए पांग्या तुला म्हैत हे कारे अपारमेंट?
पांग्या:-मला कशाला ** घालायला म्हैत असल? मी अता मुंबईला अस्तो,इसरला का भाड्या!
(त्याच्यावर अता हा पहिला)-रंग्या:- आयच्या गावात...मुंबैला कदी पास्नं?
पांग्या:-तुला म्हैत नाय व्हय आपल्या बापानी फ्लॅट घिऊन दिला आपल्याला..आता तिकडच धंदा!
(इकडून आपण):- अहो म्हाइतीये का पत्ता?
रंग्या:-ओ काका... नक्की कोन्चा चौक सांगितला तुंम्हाला?
आपणः-अहो,हाच चौक सांगितला.पोश्ट ऑफिसचा..
(रंग्याला तोडून तिसरा संग्या चालू होतो) संग्या:- आओ काका, ते हितं नाय तिकडं गावठानातलं जुनं पोश्ट हे ना.. त्येच्या चौकात असल.. थांबा मी तुमाला दाखवतो!
असं म्हणून तो महान संग्या आपल्या गाडीवर बसून येतो.आणी जुन्या ऑफिस जवळ उतरून, "हितं कोन्ला बी इचारा..सांगल तुमाला" असं म्हणून जातो! नंतर पत्ता अजुनच तिसरीकडे सापडल्यावर आपल्याला कळतं की त्या "संग्या"ला वरच्या चौकात यायची हुक्की आली होती,म्हणून त्यानी आज आपल्याला एकंदरीत "चौक" दाखवला!
आणी अखेर मग एखादा टेलिफोन बुथ सापडून,त्या दिवशी मिळणारं धन-कवडी मोल करून,तो खर्या अर्थानी धनकवडी'तला पत्ता आपल्याला एकदाचा "मिळतो!"
तिसरा ताप हा कमी प्रमाणात अढळतो... पण तरिही त्याचं एकंदर प्रमाण पहाता तोच सगळ्यात जास्ती म्हणायला हवा. कारण हा मनुष्यरूपी छळवादी ताप आहे. ताप देणार्या अश्या,ऐतिहासिक पाषाणांचे भग्नावशेष पुण्यात अजूनही शिल्लक आहेत. यांचा संग्रह केला तर एक संग्रहालय राजा केळकरच्या बाजूला दिमाखात उभं राहिल,याची मला खात्री आहे.
त्याचं होतं असं...
..की,
दिवस-भराचं काम संपवून आपण घरी यावं,आणी वकिलानी काळा कोट उतरवावा,तसं आपण "तो" ड्यूटी'चा ड्रेस बदलून,जं.....रा डेक्कन जिमखान्यावरून फेरफटका मारत जावं, तर अस्सा एखादा नग समोर येतो की विचारू नका! यावेळी फिरायला जाताना..तो गुरुजी धोतरातनं शर्ट-प्यांट मधे शिरून माणसात आलेला असतो. त्यावेळी त्याचं "आयुष्य" हे तीन अंकी प्रायोगिक नाटक जर स्त्री-पात्र विरहीत असेल तर जास्तीचा ताप! जसं, आई/वडीलांच छत्र असेल तर अपत्याचा साडेसातीचा ताप 'निम्म्यानी कमी होतो' -- असं म्हणतात! तसच, शर्टप्यांटीतल्या गुरुजिला बायको हे अर्धांग त्याच्या पूर्णांगाबरोबर असेल..तर..त्या भग्नावशेषांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरी, बायकोची "छाया" पडल्यानी तो गुरुजी नामक ग्रह त्याला दिसत नाही. फक्त "याला कुठेतरी पाहिलाय" असा ग्रह करवून घेऊन तो भग्नावशेष नामशेष होतो... इत्यर्थे-टळतो, तेंव्हा ग्रहण सुटतं! स्वतःच्या छोट्या जगाचा गुरुजी नामक स्वामी बायको विना जर श्रीमंत असेल, तर ती श्रीमंती उपभोगताना हे भग्नावशेष त्याला भिकेला लावतात.
(आमचा पक्या नावाचा एरवी शिविलाही न शिवणारा दोस्त या भग्नावशेषांना "जिवंत-शनैश्चर" अशी परिपूर्ण धार्मिक शिवी देतो.. ती या छळामुळेच! ;) )
त्यामुळे आपण बायकोविहिन असलो की मग आली कंबख्ती......
भग्नावशेषः-"अरे..गुरुजी का?..याही कपड्यात फिरता वाटतं?"
आंम्ही:- "आंम्हालाही तसच वाटतं!"
भग्नावशेषः-(कवळी सावरत..) "पण खुरुजिंनी कसं कायम धोत्रात असलं पाहिजे!"
आंम्ही:-" हो का??? बरोबरच आहे तुमचं. डॉक्टरनी देखिल दवाखाना झाल्यावर घरीदारी तो पांढरा कोट/टेथेस्कोप घालूनच फिरलं पाहिजे! नाही का?..त्याशिवाय त्याला काय स्कोप!?"
भग्नावशेषः-(कवळी उडवून-हॅ हॅ हॅ करत..) "अरे व्वा.. टेथेस्कोप/कोटाचं उदाहरण देऊन चांगलच "कोट" केलत की आंम्हाला... हॅ हॅ हॅ भेटू परत!"
आंम्ही:-(मनात.."असेच काय?" असे म्हणत) "ह्हं ह्हं ह्हं .. भेटू हो... या अता!" असे म्हणतो आणी रस्ता धरतो...
अता हाच प्रसंग,जेंव्हा पाठशाळा नावाच्या सर्वार्थानी-अज्ञाताच्या साळेतनं - सुटलेल्या एखाद्या तरुण, म्हणजे हल्लीच्या भाषेत "यं..ग" गुरुजिच्या बाबतीत घडतो तेंव्हा तो प्रसंग समरप्रसंगच! अता, हा धंद्यामधे दोन/चार वर्ष रुळावलेल्या आणी खाद्यधर्माचारशास्त्र याची नीट 'समज' आलेल्या गुरुजीचं मानस कसं व्यक्त होतं ते पहा..
"सारस बाग किंवा तत्सम ठिकाणी आपण आनंदात पावभाजी चाखित असतो. थम्सअप/आईस्क्रीम योग जुळून आलेला असतो. आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. अश्या सौंदर्याला मी दुरुनच पाहातो, कारण (केवळ निरखण्यासाठी) थोडं जवळ जायचं धाडस केलं, की तो "बहर" बिब्ब्यासारखा उततो! (असा माझ्या मित्राचा अनुभव आहे!) त्याची व माझी कुंडली एकच आहे, म्हणून मी माझ्या कुंडलीवर हा कुंडलिनी प्रयोग करायला जात नाही... तर चाललं होतं काय..की, आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. कडेनी डोसे/भेळ असे निरनिराळे वास आपला उरला सुरला श्वास रोखीत असतात. आपली पावभाजिही रंगात आलेली असते.
आणी..अश्यावेळी
भग्नावशेष "शेष" होऊन चावायला तिथं येतो! आवाज-रिक्षाच्या फुटक्या सायलेन्सर सारखा...चिरका! वय-(असलच तर!) सत्तरी ओलांडलेलं! हातात एक काठी! जिचा वापर स्वतःला आधार देण्यापेक्षा दुसर्याच्या सुखात व्यत्यय आणून, त्याला ढोसण्यासाठी किंवा तीचा धाक दाखवून "ढोस" देण्यापलिकडे नसतो.
ते सुरु होतात..त्यांचं अण्णावंही 'ढेकणे' असं वगैरे अगदी स्वभाव सदृश असतं!
ढेकणे:- आँ... गुरुजी??? या कपड्यात??? इथं!? गुरुजिंच्या भुमिकेतून विचार करता "हे" पटतं का तुंम्हाला?
आंम्ही:-ढेकणे अजोबा...तुंम्हीही माणसाच्या भुमिकेतून विचार करा ना? असं विचारणं तुंम्हाला पटतं का ते!?
ढेकणे:-संपूर्ण पटतं?
आंम्ही:-कसं क्काय?
ढेकणे:-माणूस म्हणून मला तुंम्हाला काहि प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? (ह..क्क. वर जोर देऊन!)
आंम्ही:-आंम्हाला माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाही का?
ढेकणे:-आहे..पण तरी मी प्रश्न विचारणार
आंम्ही:-(छळ नुस्ता!) विचारा..पण मी प्रश्न पाहुन उत्तरं देणार!
ढेकणे:-असं का बरं?
आंम्ही:-आंम्ही तुमच्या घरी आल्यावर,"काय अजोबा तुंम्ही एव्हढे धार्मिक आणी जानवं नाही का गळ्यात?" असा प्रश्न केल्यावर तुंम्ही, "अहो,गुर्जी काळाप्रमाणे बदललं पाहिजे" (आंम्ही-मनात-"जानवं का?" हा प्रश्न दाबून!) असा नवा वेदांत आंम्हाला शिकवताच ना?
ढेकणे:-श्शूक..श्शूक..हळू बोला.आजुबाजुला लोक ऐकताहेत
आंम्ही:-का? का? अता का? तरी नशिब समजा. तुंम्ही जानवं देण्याबद्दल मला अकरा रुपये लाच दिल्याचं तुमच्या होम-मिनिस्टरना मी सांगितलं नाहिये अजून!
माझं हे वाक्य पूर्ण होइपर्यंत अजोबा गृहमंत्र्यांच्या भितिने सारस बागेतून पेशवे बागेत एका रिकाम्या पिंजर्यात जाऊन दडल्याचं नंतर कळलं मला! नशिब अंधारात सिंव्हाच्या पिंजर्यात नाही गेले!...... हे सिंव्हाचं नशिब... कारण यांनी त्याला ही ह्यांना खाईपर्यंत "तुला हे शोभतं का?" "चित्रगुप्ताकडे तक्रार करीन मी..की पुढचा जन्म मला रिंगमास्टरचा दे, आणी तुला पुन्हा सर्कशीत माझ्या चाबकाखाली ड्यूटिला पाठव!" असा प्रश्नांचा भडीमार करून त्या सिंव्हाचीही शेळी केली असती
धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
=======================================
क्रमशः
प्रतिक्रिया
11 Sep 2013 - 7:01 pm | अनिरुद्ध प
सुरेख वर्णन (एक खवचट प्रश्ण विचारतो,या सद्ध्या सणान्च्या,घाईगडबडीत्,गुरुजीना लेख लिहायला वेळ बरा मिळतो?)
11 Sep 2013 - 8:54 pm | अत्रुप्त आत्मा
रात्र आपलीच असते ना साहेब, दुसरिकडे लेखनाची पूर्व तयारी करुन ठेवायला! :)
12 Sep 2013 - 12:04 pm | अनिरुद्ध प
साब स्टेमीना खूपच चान्गला आहे लगे रहो.
12 Sep 2013 - 12:08 pm | अत्रुप्त आत्मा
मन:पूर्वक धन्य वाद!
11 Sep 2013 - 7:35 pm | मी-सौरभ
हे गुर्जी लईच भारी लिहीतात
अन या टायमाला draft पण छान केलयत :)
11 Sep 2013 - 7:44 pm | मुक्त विहारि
झक्कास..
11 Sep 2013 - 8:35 pm | पैसा
खुसखुशीत! परत कीबोर्डावरचा स्पेसबार विसरलात बर्कां!!
11 Sep 2013 - 11:01 pm | संजय क्षीरसागर
हे विषेश आवडलं.
11 Sep 2013 - 11:09 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त ! खुसखुशीत !! पुभाप्र.
11 Sep 2013 - 11:24 pm | जॅक डनियल्स
खुसखुशीत लेख !
अगदी खरे आहे, मला साप पकडताना हाच अनुभव आहे, साप राहिला बाजूला, त्या जागे पर्यंत पोहचायचे म्हणजे खरे साहस असयाचे.
या लेखात मी ते लिहिले आहे.
punyache patte !
12 Sep 2013 - 12:00 am | अत्रुप्त आत्मा
@ त्या जागे पर्यंत पोहचायचे म्हणजे खरे साहस असयाचे. >>> खि: खि: खि: ! खरे आहे... आम्चेही तेच..! पूजेला जाण्याचा पत्ता मिळवण्यासाठी,पत्याचीच पूजा करावी लागते! ;)
12 Sep 2013 - 12:54 am | प्यारे१
लेखमाला वाचतोय गुर्जी. खुसखुशीत जिलेबी- आपलं- लेखमाला आहे.
आधीच्या लेखांची देखील इथेच पोच देतोय. (मागच्या नि आताच्या सत्यनारायणाची दक्षिणा एकदम ह्या चालीवर) :)
12 Sep 2013 - 1:57 am | चित्रगुप्त
झकास माला.
12 Sep 2013 - 2:07 am | बॅटमॅन
झकास एकदम!!! आवडेश हो अआ :)
12 Sep 2013 - 8:47 am | प्रचेतस
हा हा हा. भारीच किस्से.
आम्हालाही असाच एक किस्सा आठवतोय.
स्थळ: एसपीज् बिर्याणी हाऊस, सदाशिव पेठ.
व्यक्ती: आम्ही ५ जण मित्र. दोघे मांसाहारी तर तिघे शाकाहारी. तिघांतला एक म्हणजे भटजी पण तो सुद्धा शर्ट प्यांटीत.
प्रसंगः आम्ही शाकाहारी व्हेज बिर्याणी तर उरलेले दोघे मस्तपैकी मटन बिर्याणी चापून अगदी आरामशीरपणे एसपीज् च्या पार्किंग मध्ये चालत येतात तर समोरून भटजींचे एक यजमान.
यजमानः काय भटजी, इकडं कुठे?
भटजी (अगदीच कुचंबल्या चेहर्याने): हॅ हॅ हॅ.
यजमानांच्या चेहर्यावर किंचित कुत्सित हसू.
भटजी: काही नाही, जरा आलो होतो मित्रांबरोबर, व्हेज बिर्याणी खायला. (हे व्हेज बिर्याणी नाव सांगणं म्हणजे भटजींनी हळूच केलेले जस्टिफिकेशनच)
यजमानः (हसंत हसंत) असं का. बरं बरं.
भटजी: (कुचंबलेला चेहरा अजूनही तसाच) बरं येतो आता. कामं उरकायची आहेत.
यजमान: भेटूच परत. बाय.
इकडं भटजी बाहेर आल्यावर (मांडी घालून अॅक्टिव्हावर बसत) प्रतिज्ञा करतात की आता निदान शहरातल्या मध्यवस्तीतल्या नॉनव्हेज हाटेलांत तरी मी तुमच्याबरोबर येणार नाही.
अ आ बुवा, तुमच्या बाबतीतही काही असे किस्से घडले असल्यास ते सांगा ना प्लीज.
12 Sep 2013 - 10:25 am | अत्रुप्त आत्मा
अ आ बुवा, तुमच्या बाबतीतही काही असे किस्से घडल असल्यास ते सांगा ना प्लीज.>>> ह्ही! ह्ही! ह्ही! किति तो सोज्वळपणा! ;-)
ह्या प्रति सादा तल्या यजमानाचे अंत: करणी ,त्या वेळी एका दु..दु.. राक्षसाचा आत्मा शिरला असणार! :P
12 Sep 2013 - 12:34 pm | मालोजीराव
तरीच ते भटजी 'मदिना' ला यायला का नको म्हणत होते ते कळलं आता !
12 Sep 2013 - 1:30 pm | अनिरुद्ध प
(
हे कस काय बुवा?
12 Sep 2013 - 3:03 pm | प्रचेतस
हे असं.
जो हताशपणे हे बघत उभा आहे तो कलोनियल कझिन्सपैकी धाकटा.
12 Sep 2013 - 3:06 pm | यशोधरा
=))
12 Sep 2013 - 3:07 pm | पैसा
गुर्जी सॅक वापरतात हे बघून ऊर भरून आला हो! झालस्तर ती मार्केट यार्डातून आणलेली फुल आणि मरून कलर टोपी! वा वा वा!
तो धाकटा कझिन एवढा हताश का झाला ब्वॉ? मला वाटलं तो आणखी चॅप्टर हाय म्हणून!
12 Sep 2013 - 3:14 pm | अभ्या..
शी.......
एवढे पण लक्षात येइना का ?
पण आता आलेत गुरजी कागद आणि फुले घेउन.:-D
12 Sep 2013 - 3:22 pm | पैसा
रच्याकने, वल्लीला चित्र काढायला शिकवण्यात तुझा काही हात नाही ना?
12 Sep 2013 - 3:28 pm | अभ्या..
वल्लीला काही शिकवायची गरज आहे का?
तो शिकवतो दुसर्याना ;-)
पण हात माझाच :-D
12 Sep 2013 - 3:32 pm | पैसा
या चित्रातले गुर्जी समोर न बघता हळूच दुसर्या दिशेने का बघतायत असं वाटतं तुला?
12 Sep 2013 - 10:30 pm | मोदक
हभप आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला..?
मला त्यांच्या चेहर्यावरचे भाव पाहून ते एकदम "मोगॅम्बो खुश हुवा" असे काहीतरी म्हणतील असे वाटत आहे! :-))
12 Sep 2013 - 10:32 pm | पैसा
त्यांनी लेखात लिहिलंय नै का ते बहार - बिब्बा उतणे वगैरे!
12 Sep 2013 - 3:32 pm | यशोधरा
फुले ठीके एक वेळ, कागद कशाला? :D
12 Sep 2013 - 3:26 pm | बॅटमॅन
=)) =)) =))
अगागागागागागागा, काय रे हे वल्ली आपलं अगोबा ;)
बाकी, बुवांचा चेहरा अंमळ गांधारदेशीय/मिस्रदेशीय वाटून राहिलाय. ३०० फिल्ममध्ये हे बुवा एकदम शोभतील खरे.
12 Sep 2013 - 3:28 pm | मृत्युन्जय
मला तर चेहर अल्ल्लादिन कार्टुनमधल्या खलनायक शास्त्रज्ञासारखा दिसतो आहे.
12 Sep 2013 - 3:39 pm | बॅटमॅन
हाहाहाहा!
12 Sep 2013 - 3:33 pm | अभ्या..
बुवा गाडी चालवताना राग पुष्पगंधार आळवतात त्यामुळे कदाचित गांधार देशीय वाटतात.:)
मिस्र चा सम्बन्ध मिश्रीबरोबर असावा :-D
12 Sep 2013 - 3:39 pm | बॅटमॅन
क्या बात है श्लेषमाष्टर!
12 Sep 2013 - 3:43 pm | डॉ सुहास म्हात्रे
बुवा गाडी चालवताना राग पुष्पगंधार आळवतात त्यामुळे
त्यामुळेच ते रागीट दिसत आहेत का?!12 Sep 2013 - 3:36 pm | डॉ सुहास म्हात्रे
12 Sep 2013 - 3:47 pm | मालोजीराव
या चित्राला अत्तराचा वास येत असावा काय? :))
12 Sep 2013 - 4:44 pm | अनिरुद्ध प
बुवाना पाय जमीनिला न लावता गाडी चालवण्याची सिद्धि प्राप्त झालेली दिसते ?
12 Sep 2013 - 5:37 pm | सूड
त्या कझिनचं पोट फार सुटल्यासारखं वाटतंय. साय फार खाल्लेली दिसत्ये आताशा!! ;)
12 Sep 2013 - 7:59 pm | चौकटराजा
अरे हा तर स्कूटरवरचा निखिल वागळे ! ऑ तिकडे भाई, अभ्यंकर , दलवाई ना अमेरिकेत नोकरी लागली का काय ? बाकी नि वा ने नवीन व्यवसाय चांगला निवडलाय ! आत फक्त फरक एवढाच की हातवारे करीत यजमानाच्या अंगावर धावून जायचे मंत्र म्हणत !
12 Sep 2013 - 9:46 pm | अत्रुप्त आत्मा
अगोबाsssssssssssssssssssss!!!
अगोबा ढगोबा हत्ती! मोडली तुझ्या पल्सरची बत्ती!
अगोबाला बशिवलं वॉशिंग मशिनवर! सुरु झाली त्याच्या अंगाची थरथर! =))
अभ्याच्या मागून करतो माझी कोंडी!
द्या त्या दु..दु.. अगोबाला,तोफेच्या तोंडी!
बत्ती आत्मा---भिंत-धडक-अगोबा! =))
12 Sep 2013 - 10:26 pm | मोदक
आणखी चार ओळी लिहा की.. दिवाळीचा बाण सारखे खंग्री काव्य होवून जावूदे!! :-)
13 Sep 2013 - 6:55 am | प्रचेतस
13 Sep 2013 - 9:38 am | नाखु
याच (बाल्या अवस्थेतील) रेखांकन मला व चौ रा काकांना दाखवलं होतच पन फाय्नल एक्दम झक्क्कास.
तुमच्या अभ्याशेठचेही आभार.
12 Sep 2013 - 11:06 pm | कोमल
या प्रश्नाची वाट वल्ली लै दिसांपासून पाहात होता.. :))
शेवटी विच्छा पूरी झाली म्हणायची.. ;)
12 Sep 2013 - 9:28 am | विटेकर
वाचतोय... !
यजमान जेव्हा आपल्याला देखील वैदिक धर्माचे ज्ञान आहे असा आव आणतात , तेव्हाची गंमत लिहा ना जरा !
12 Sep 2013 - 10:03 am | आतिवास
लेखमालिका एका वेगळ्या विश्वाची ओळख करुन देते आहे.
लेखनशैली आवडली :-)
12 Sep 2013 - 12:56 pm | आतिवास
मघा गडबडीत 'पूर्वपरीक्षण' ऐवजी 'प्रकाशित करा' वर क्लिक झाल्याने एक मुद्दा राहून गेला आहे.
पूजापाठ, यज्ञयाग,शांती वगैरे वगैरे करण्यातलं 'ज्ञान आणि कौशल्य' ही इतर व्यवसायांसारखीच व्यावहारिक जगातली एक उपजीविका आहे; त्याचा धर्म, अध्यात्म वगैरेंशी संबंध नाही - हे माहिती होतंच - आता 'इनसायडर व्ह्यू' मिळाल्याने त्याचा बराच उपयोग होईल इतरांशी या विषयावर संवाद साधताना :-)
12 Sep 2013 - 10:44 am | चौकटराजा
आम्हाला माहीत असलेले एक गुर्जी यकदम बंडखोर ! पार माउंसाहार देखील त्याना वर्ज नाही. एवढेच काय बार बार नाही
पण वाकेजनली एखादा प्येग बी उं .... अशा गुर्जीना सायलेन्सर ची फ्याक्टरी मालकीची असलेला यजमान बार मधे भेटला
तर गुर्जी नी बार मालकाला अमुक अमुक याग करायचा आहे म्हणून इकडे आलो होतो असे सांगून वेळ मारून नेली.
12 Sep 2013 - 12:19 pm | बॅटमॅन
बाकी, स्वतः 'भ्रष्ट' झाले तरी गुर्जींकडून मात्र सोज्ज्वळपणाची अपेक्षा ठेवणारे लोक पाहून डोळे पाणावले.
12 Sep 2013 - 12:25 pm | प्रचेतस
अहो ते म्हणतात ना नेहमी की सीजरची पत्नी नेहमी संशयातीतच हवी ते. =))
12 Sep 2013 - 12:38 pm | बॅटमॅन
हाहाहा =))
12 Sep 2013 - 3:53 pm | अत्रुप्त आत्मा
अत्ता माझि सत्यनारायण २०/२० सुरू आहे..!
रात्री आलो कि बघतो, एकेका(कि)ला!:P :P :P
12 Sep 2013 - 3:55 pm | यशोधरा
स्मायलीपंत, मी काई केले नाही. फक्त हसून घेतले आहे.
12 Sep 2013 - 4:09 pm | अत्रुप्त आत्मा
ठिक आहे. एक कि कमी! :-D
अता उरलेली एक कि,आणि बाकिचे सगळे 'का' :P
12 Sep 2013 - 4:26 pm | यशोधरा
उरलेल्या कि ला तुम्हीच टरकाल! =))
12 Sep 2013 - 5:01 pm | अत्रुप्त आत्मा
@तुम्हीच टरकाल! Lol>>> ह्हूं... इतकाही मी काही ए का कि नैय्ये! :P =))
12 Sep 2013 - 5:05 pm | पैसा
तुम्ही फक्त नावंच सांगा एकेकाची!
12 Sep 2013 - 10:25 pm | अत्रुप्त आत्मा
छळछावणी सदस्य---
क्रमांकः- १) आगलावे महामंडळ प्रमुख..मा.अगोबा ढगोबा हत्ती! http://misalpav.com/comment/509450#comment-509450
२) त्याला छुपं सह्हाय्य करणारे अब्याडब्या ब्यानर कर! =)) गुन्ह्याची काबुली.. ;) आपलं ते हे.. कबुली देतांना- http://misalpav.com/comment/509470#comment-509470
३) अगोबानि लावलेली आग "फुंकून..फुंकुन" ;) फुलवणार्या मा. पै..तै! http://misalpav.com/comment/509474#comment-509474
४) जाता जाता हळूच खोडी काढलेल्या "यशोधारा" ! http://misalpav.com/comment/509473#comment-509473
शी..शी.. हताशी कागद घेतला यांनी! =))
५) कधि नव्हे ते, "आम्च्या बाजुनी हाय.." असं दाखवत "त्या" =)) पार्टीच्या कामाचा आणंद लुटणारा...
बट्टमण्ण!
६) आमच्या अनेक धाग्यांवर खौटपणे ;) टपली मारणारे मालोजीराव! या ही ऐति-हासिक कटात सामिल व्हावे... ? ... शोभत नैत हो अस्ली वागणी!!! =))
७) पाखरा*च्या मागे लागावं तसं माझ्यामागे रॅकेट घेऊन लागलेले चौरा .. का? का?
*तेच म्हनतात,आम्मी अजुण तरून हाव म्हून!
सगळी णावे णिर्भयपने डिली...!
================================
सगळे जणं दु..दु..दु.. आहेत .. माझा कचकुन बाजार उठवला! llllllllllllllllllllluuuuuuuuuuu :-/
अमि नै ज्जा!
12 Sep 2013 - 10:28 pm | पैसा
या सगळ्यांनी तुम्हाला ट्यार्पी पण दिलाय. या दोन्ही गोष्टींचा विचार करून शिक्षा काय ते पण सांगा तुम्हीच!
12 Sep 2013 - 10:36 pm | अत्रुप्त आत्मा
@या दोन्ही गोष्टींचा विचार करून शिक्षा काय ते पण सांगा तुम्हीच!>>> :D सगळ्यांनी आरश्यात बगून दु..दु.. म्हणा! =))
12 Sep 2013 - 10:39 pm | अत्रुप्त आत्मा
मताय..याला ट्यार्पी म्हणतात त्ये म्हैतच नव्हतं!
12 Sep 2013 - 10:58 pm | पैसा
*crazy* *scratch_one-s_head* *acute* *bomb* *diablo* *NO* *dash1*
12 Sep 2013 - 11:24 pm | कोमल
बुवांनी माझ्या सम्द्या स्मायली धापल्या
बुवांचा निसेद..
आमी बी पार्टी बदललेली हाये..
वल्ली साह्येबांना शेल्युट
13 Sep 2013 - 12:38 am | अत्रुप्त आत्मा
=))
मी पण दिल्यात कि.
आधि? :P
13 Sep 2013 - 8:58 am | चौकटराजा
कृपया आमची प्रोफाईल वाचा . वात्रटपणा हा आमचा आवडता छंद आहे. त्यात अगोबाचे घर आमच्या घराच्या नैऋत्येला आहे
तिकड्न येणारा वारा या वात्रटपणाच्या छंदाचे स्वरूप वणव्यात करतो. अगोबाला म्हणावे गाडी नको घर नवे घे म्हणजे दिशा
बदलेल व चौ रा च्या वात्रटपणाला लगाम येईल.
12 Sep 2013 - 4:56 pm | डॉ सुहास म्हात्रे
काय की बा. पन मंडळी लय टरकून हायेत बरं का तुमाला, गुर्जी ;)
12 Sep 2013 - 5:08 pm | प्रचेतस
मी पण काहीही केले नाहिये. मी तर फक्त अनिरुद्ध प यांच्या प्रश्नाला उत्तर दिलेय. त्यातले अक्टिव्हावाले बुवा तुम्हीच असा दावा पण मी केला नाहिये. इतरांना तसे वाटले असल्यास ते चित्र प्रातिनिधिक आणि सार्वत्रिक असल्याचा पुरावा मानता येईल.
12 Sep 2013 - 3:59 pm | बॅटमॅन
पण आत्मूस, आम्ही तुमच्याच बाजूने मतदान केलेय लक्षात घ्या. :)
12 Sep 2013 - 4:48 pm | अनन्न्या
तुमच्या लेखाची प्रतिक्रिया स्मायलीतून देण्याचा प्रयत्न!
12 Sep 2013 - 6:14 pm | निश
काय हो वल्ली साहेब, ऐस पी मध्ये सामीष व शाकाहारी साठी स्वयंपाक घर ऐकच आहे का हो? व भांडी पण तीच तीच वापरतात काहो सामिष ची भांडी शाकाहारी करायला? व तस असेल तर मग भट्जी बूवा आले कि सामिष लोकांमध्ये.
12 Sep 2013 - 6:25 pm | अनिरुद्ध प
ती काय xxx पुण्याचि खानावळ आहे का? तिथे ,"आमच्याकडे उपवासाचे पदार्थ वेगळ्या तव्यावर करतात" अशी पाटी असलेली?
12 Sep 2013 - 6:25 pm | प्रचेतस
आता मी कशाला त्यांचं स्वैपाकघर बघायलोय उगा? बाकी तुम्ही कधी हाटेलात गेल्यावर डोकावता का ओ तिकडं?
12 Sep 2013 - 6:30 pm | बॅटमॅन
बर मग???? प्राब्ळम काये?
12 Sep 2013 - 6:26 pm | प्यारे१
वल्ल्या, अभ्या, बॅटॅ, चौरा काका, सूड सगळेच सुटलेत की मस्त !
बेक्कार हसतोय च्यामारी.
गुर्जी, आगोबा आहेच दु दु दु दु .
त्याचं घरच बांधा उन्हात! ;)
12 Sep 2013 - 6:28 pm | प्रचेतस
सही टाकायला विसरलात का ओ प्यारेकाका
"(१०० चूहे खाऊन हाजला गेलेला) प्यारेखान" अशी.
12 Sep 2013 - 6:29 pm | बॅटमॅन
लोल @ उंदीरखाऊ प्यारेखान =)) =)) =)) =))
12 Sep 2013 - 7:21 pm | प्यारे१
अरे अजून कुठं गेलोय बे हाजला? नि चूहे पण १०० नाहीत झाले अजून.
बाकी संपादकांनी धाग्यावर घातलेला गोंधळ पाहून एक मिपाकर म्हणून....... ढाक्की चिकी... लई आनंद झाला. ;)
-प्यारे बोका (आज काका नको. ;) )
12 Sep 2013 - 6:33 pm | मोदक
वरचे अवांतर प्रतिसाद कळाले नाहीत.
(निरागस) मोदक
13 Sep 2013 - 9:44 am | नाखु
मी एकटाच निरागस नाही (या धाग्या साठी तरी) हे पाहून बरे वाटले..
12 Sep 2013 - 6:41 pm | निश
अहो तस नाही? मी आपल विचारल कारण की माझा ऐक नातलग पेशाने भटजी आहेत ठाण्यातले ते ठाण्याला गोखले रोड वर उषाकीरण म्हणुन सामिष व शाकाहारी अस दोन्हीही मिळणार बार युक्त होटेल आहे, तिथुन मित्रमंडळींबरोबर शाकाहारी जेउन बाहेर पडत होते तेथे नेमका त्यांचा सामीष खाणारा यजमान आला. त्याने भटजी बुवाना बघितल व भटजी बुवा सामीष होटेलात जेवले म्हणुन त्याना घरी पुजा सांगायला बोलवायच बंद केल म्हणुन विचारल अस मी.
12 Sep 2013 - 6:46 pm | प्रचेतस
ओके
12 Sep 2013 - 6:46 pm | बॅटमॅन
लोकं तेच्यायला ढोंगी एक नंबर. स्वतः काहीही खाऊ, पण भटाने मात्र व्हेजच पाहिजे. हे कोण लागून गेले टिकोजीराव?
12 Sep 2013 - 6:52 pm | अनिरुद्ध प
फार वाईट वाटले गुर्जीन्चे एक यजमान कमी झाले म्हणुन,पण असे सुद्धा असु शकते कि त्यानी घरी पूजा घालण्याचे बन्द केले असेल काही वेगळ्या अपरिहार्य कारणास्तव.
12 Sep 2013 - 7:22 pm | सूड
व्हेज नॉन व्हेज वर प्रतिसाद झडायला लागले की 'बाटगा जोरात बांग देतो' या म्हणीचा प्रत्यय आल्याशिवाय राहात नाही. 'सुरमईत फार काटे असतात' या वाक्याला सहमती देणार्यांना व्हेज नॉन व्हेज वादात पडायचा काय अधिकार आहे मी म्हणतो.
12 Sep 2013 - 7:28 pm | बॅटमॅन
सुडक्या, भावनाओंको समझो. काटे काय गिनून र्हायले?
12 Sep 2013 - 7:32 pm | प्यारे१
सुरमईत फार काटे असतात म्हणणारा पोट भरण्यासाठी खात असावा. खवैय्या/ दर्दी म्हणून नाही.
12 Sep 2013 - 10:48 pm | प्रसाद गोडबोले
ह्या निमित्ताने लहानपणी एक म्हण ऐकली होती ती आठवली
जसे सुरमईत काटे तसे आईचे धपाटे
13 Sep 2013 - 2:09 am | किसन शिंदे
आयाया!! काय तो गोधंळ.?!
मुळ लेख राहीला बाजूलाच आणि लोकांनी उगा अॅक्टीवावर मांडी घालून बसणार्या त्या बुवांना छळायला सुरूवात केलीय. :D
13 Sep 2013 - 10:30 am | मृत्युन्जय
आयला आत्मा तृप्त झाला असावा आज :)
15 Sep 2013 - 5:10 pm | सुधीर
खुसखुशीत लेख, आवडला!