✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

अ
अत्रुप्त आत्मा यांनी
Wed, 09/11/2013 - 18:47  ·  लेख
लेख
मागिल भागः- http://misalpav.com/node/25527 ...पुढे चालू आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर, यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्‍यांची नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी त्रिशंकू होइल,यात शंका नाही............. =============================
जखमे सारखं
चिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात. ह्यांच्या चेहेर्‍यावर अस्सा काहि भाव असतो की, आमच्या अंगावरचे कपडे, ते वरच्या खिशातलं मोबॉइल, देहाखालची गाडी, ह्या सर्व वस्तूंमधे भरलेला गुरुजी नामक देह त्या लायकीचाच नाहिये. किंवा हे सर्व आंम्ही चोरुन किंवा भाड्यानी आणून वापरतोय! "त्यापेक्षा जवळ येऊन एक जोडा मारा, पण हा नजरेचा बाण नको...'' असं ओरडावसं वाटतं. दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी, काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन.. असच म्हणतो. पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे स्वतःच अधःपतन करवून घेण्यासारखच आहे! इष्टस्थळी पोहोचल्यावर, यजमान सुद्धा आपल्या चेहेर्‍यावरून त्यांचा वड गाठायला गुरुजिंना किति फेरे घालायला लागलेत ते ओळखतात. पत्ता सांगण्याच्या निरनिराळ्या पद्धती पुण्यात आहेत. त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही! यापेक्षा चोर पाकिट सुद्धा कमी शिताफिनी काढीत असावा. शेवटी आपण विचारवं, "कुठे येते मग ही इमारत?" तर, "अहो,मी सुद्धा या भागात नविन(?) आहे" असं आपल्याला निरित्तर करणारं उत्तर येतं! आपण पुन्हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा करावा, "का हो?..तुंम्ही नविन आहात या भागात..हा "भाग" तुमच्या ध्यानात नाही का आला?" तर पुन्हा यांचं उत्तर तयार, "त्याचं काय आहे माहितिये का? की म्हटलं होइल आपल्यालाही या भागाची माहिती!" हे उत्तर ऐकून डोक्याची शकलं झाल्यानंतर कडेनी जाणार्‍या एखाद्या ट्रकमागचं ते संत/महंत/विचारवंत-छाप बोधवचन मला दिसतं-"चित्ती असू द्यावे समाधानं!" ... अता इतका ताप झाल्यानंतर माझं चित्त त्या तापानीच पूर्ण समाधानी होतं. आणी (एकदाचा) कळस गाठावा या इच्छेनी, मी त्याच दुष्ट ट्रक खाली देह ठेवायची इच्छा धरतो. पण पुण्यातले रस्ते आणी खड्डे पहाता, माझा देह(सरळ) वैकुंठाला न जाता, त्या ट्रक समोरच्या खड्ड्यात पडायचा आणी वरनं तो यमदूत तिथेही हुलकावणी देऊन जायचा! ... थोडक्यात..आमच्या नशिबी मरणाचं सुख ही सुखासुखी लाभायचं नाही! याच दुसर्‍या तापाचा उपभाग किंवा पत्ता शोध शास्त्रानुभवानुसार वर्णन करायचं झालं तर पश्चात्ताप! तो पश्च्चात्तप कसा होतो पहा.. त्यातुन तुंम्ही धनकवडी सारख्या चक्रव्यूहात गेला असाल तर अभिमन्यूच्या उलट अवस्था वाट्याला आल्याशिवाय रहात नाही! (हा ताप अता मोबॉइलमुळे बराचसा नामशेष झाला आहे, पण जंतू अजुन मेलेले नाहीत! ;) ) आपणः- अहो ते दिग्विजय अपार्मेंट कुठाय हो! ह्या पोस्ट ऑफिस जवळच आहे.आपल्याला माहित आहे का? टवाळ पोरांचं त्रिकूट:- ए पांग्या तुला म्हैत हे कारे अपारमेंट? पांग्या:-मला कशाला ** घालायला म्हैत असल? मी अता मुंबईला अस्तो,इसरला का भाड्या! (त्याच्यावर अता हा पहिला)-रंग्या:- आयच्या गावात...मुंबैला कदी पास्नं? पांग्या:-तुला म्हैत नाय व्हय आपल्या बापानी फ्लॅट घिऊन दिला आपल्याला..आता तिकडच धंदा! (इकडून आपण):- अहो म्हाइतीये का पत्ता? रंग्या:-ओ काका... नक्की कोन्चा चौक सांगितला तुंम्हाला? आपणः-अहो,हाच चौक सांगितला.पोश्ट ऑफिसचा.. (रंग्याला तोडून तिसरा संग्या चालू होतो) संग्या:- आओ काका, ते हितं नाय तिकडं गावठानातलं जुनं पोश्ट हे ना.. त्येच्या चौकात असल.. थांबा मी तुमाला दाखवतो! असं म्हणून तो महान संग्या आपल्या गाडीवर बसून येतो.आणी जुन्या ऑफिस जवळ उतरून, "हितं कोन्ला बी इचारा..सांगल तुमाला" असं म्हणून जातो! नंतर पत्ता अजुनच तिसरीकडे सापडल्यावर आपल्याला कळतं की त्या "संग्या"ला वरच्या चौकात यायची हुक्की आली होती,म्हणून त्यानी आज आपल्याला एकंदरीत "चौक" दाखवला! आणी अखेर मग एखादा टेलिफोन बुथ सापडून,त्या दिवशी मिळणारं धन-कवडी मोल करून,तो खर्‍या अर्थानी धनकवडी'तला पत्ता आपल्याला एकदाचा "मिळतो!" तिसरा ताप हा कमी प्रमाणात अढळतो... पण तरिही त्याचं एकंदर प्रमाण पहाता तोच सगळ्यात जास्ती म्हणायला हवा. कारण हा मनुष्यरूपी छळवादी ताप आहे. ताप देणार्‍या अश्या,ऐतिहासिक पाषाणांचे भग्नावशेष पुण्यात अजूनही शिल्लक आहेत. यांचा संग्रह केला तर एक संग्रहालय राजा केळकरच्या बाजूला दिमाखात उभं राहिल,याची मला खात्री आहे.
त्याचं होतं असं... ..की,
दिवस-भराचं काम संपवून आपण घरी यावं,आणी वकिलानी काळा कोट उतरवावा,तसं आपण "तो" ड्यूटी'चा ड्रेस बदलून,जं.....रा डेक्कन जिमखान्यावरून फेरफटका मारत जावं, तर अस्सा एखादा नग समोर येतो की विचारू नका! यावेळी फिरायला जाताना..तो गुरुजी धोतरातनं शर्ट-प्यांट मधे शिरून माणसात आलेला असतो. त्यावेळी त्याचं "आयुष्य" हे तीन अंकी प्रायोगिक नाटक जर स्त्री-पात्र विरहीत असेल तर जास्तीचा ताप! जसं, आई/वडीलांच छत्र असेल तर अपत्याचा साडेसातीचा ताप 'निम्म्यानी कमी होतो' -- असं म्हणतात! तसच, शर्टप्यांटीतल्या गुरुजिला बायको हे अर्धांग त्याच्या पूर्णांगाबरोबर असेल..तर..त्या भग्नावशेषांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरी, बायकोची "छाया" पडल्यानी तो गुरुजी नामक ग्रह त्याला दिसत नाही. फक्त "याला कुठेतरी पाहिलाय" असा ग्रह करवून घेऊन तो भग्नावशेष नामशेष होतो... इत्यर्थे-टळतो, तेंव्हा ग्रहण सुटतं! स्वतःच्या छोट्या जगाचा गुरुजी नामक स्वामी बायको विना जर श्रीमंत असेल, तर ती श्रीमंती उपभोगताना हे भग्नावशेष त्याला भिकेला लावतात. (आमचा पक्या नावाचा एरवी शिविलाही न शिवणारा दोस्त या भग्नावशेषांना "जिवंत-शनैश्चर" अशी परिपूर्ण धार्मिक शिवी देतो.. ती या छळामुळेच! ;) ) त्यामुळे आपण बायकोविहिन असलो की मग आली कंबख्ती...... भग्नावशेषः-"अरे..गुरुजी का?..याही कपड्यात फिरता वाटतं?" आंम्ही:- "आंम्हालाही तसच वाटतं!" भग्नावशेषः-(कवळी सावरत..) "पण खुरुजिंनी कसं कायम धोत्रात असलं पाहिजे!" आंम्ही:-" हो का??? बरोबरच आहे तुमचं. डॉक्टरनी देखिल दवाखाना झाल्यावर घरीदारी तो पांढरा कोट/टेथेस्कोप घालूनच फिरलं पाहिजे! नाही का?..त्याशिवाय त्याला काय स्कोप!?" भग्नावशेषः-(कवळी उडवून-हॅ हॅ हॅ करत..) "अरे व्वा.. टेथेस्कोप/कोटाचं उदाहरण देऊन चांगलच "कोट" केलत की आंम्हाला... हॅ हॅ हॅ भेटू परत!" आंम्ही:-(मनात.."असेच काय?" असे म्हणत) "ह्हं ह्हं ह्हं .. भेटू हो... या अता!" असे म्हणतो आणी रस्ता धरतो... अता हाच प्रसंग,जेंव्हा पाठशाळा नावाच्या सर्वार्थानी-अज्ञाताच्या साळेतनं - सुटलेल्या एखाद्या तरुण, म्हणजे हल्लीच्या भाषेत "यं..ग" गुरुजिच्या बाबतीत घडतो तेंव्हा तो प्रसंग समरप्रसंगच! अता, हा धंद्यामधे दोन/चार वर्ष रुळावलेल्या आणी खाद्यधर्माचारशास्त्र याची नीट 'समज' आलेल्या गुरुजीचं मानस कसं व्यक्त होतं ते पहा.. "सारस बाग किंवा तत्सम ठिकाणी आपण आनंदात पावभाजी चाखित असतो. थम्सअप/आईस्क्रीम योग जुळून आलेला असतो. आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. अश्या सौंदर्याला मी दुरुनच पाहातो, कारण (केवळ निरखण्यासाठी) थोडं जवळ जायचं धाडस केलं, की तो "बहर" बिब्ब्यासारखा उततो! (असा माझ्या मित्राचा अनुभव आहे!) त्याची व माझी कुंडली एकच आहे, म्हणून मी माझ्या कुंडलीवर हा कुंडलिनी प्रयोग करायला जात नाही... तर चाललं होतं काय..की, आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. कडेनी डोसे/भेळ असे निरनिराळे वास आपला उरला सुरला श्वास रोखीत असतात. आपली पावभाजिही रंगात आलेली असते.
आणी..अश्यावेळी
भग्नावशेष "शेष" होऊन चावायला तिथं येतो! आवाज-रिक्षाच्या फुटक्या सायलेन्सर सारखा...चिरका! वय-(असलच तर!) सत्तरी ओलांडलेलं! हातात एक काठी! जिचा वापर स्वतःला आधार देण्यापेक्षा दुसर्‍याच्या सुखात व्यत्यय आणून, त्याला ढोसण्यासाठी किंवा तीचा धाक दाखवून "ढोस" देण्यापलिकडे नसतो. ते सुरु होतात..त्यांचं अण्णावंही 'ढेकणे' असं वगैरे अगदी स्वभाव सदृश असतं! ढेकणे:- आँ... गुरुजी??? या कपड्यात??? इथं!? गुरुजिंच्या भुमिकेतून विचार करता "हे" पटतं का तुंम्हाला? आंम्ही:-ढेकणे अजोबा...तुंम्हीही माणसाच्या भुमिकेतून विचार करा ना? असं विचारणं तुंम्हाला पटतं का ते!? ढेकणे:-संपूर्ण पटतं? आंम्ही:-कसं क्काय? ढेकणे:-माणूस म्हणून मला तुंम्हाला काहि प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? (ह..क्क. वर जोर देऊन!) आंम्ही:-आंम्हाला माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाही का? ढेकणे:-आहे..पण तरी मी प्रश्न विचारणार आंम्ही:-(छळ नुस्ता!) विचारा..पण मी प्रश्न पाहुन उत्तरं देणार! ढेकणे:-असं का बरं? आंम्ही:-आंम्ही तुमच्या घरी आल्यावर,"काय अजोबा तुंम्ही एव्हढे धार्मिक आणी जानवं नाही का गळ्यात?" असा प्रश्न केल्यावर तुंम्ही, "अहो,गुर्जी काळाप्रमाणे बदललं पाहिजे" (आंम्ही-मनात-"जानवं का?" हा प्रश्न दाबून!) असा नवा वेदांत आंम्हाला शिकवताच ना? ढेकणे:-श्शूक..श्शूक..हळू बोला.आजुबाजुला लोक ऐकताहेत आंम्ही:-का? का? अता का? तरी नशिब समजा. तुंम्ही जानवं देण्याबद्दल मला अकरा रुपये लाच दिल्याचं तुमच्या होम-मिनिस्टरना मी सांगितलं नाहिये अजून! माझं हे वाक्य पूर्ण होइपर्यंत अजोबा गृहमंत्र्यांच्या भितिने सारस बागेतून पेशवे बागेत एका रिकाम्या पिंजर्‍यात जाऊन दडल्याचं नंतर कळलं मला! नशिब अंधारात सिंव्हाच्या पिंजर्‍यात नाही गेले!...... हे सिंव्हाचं नशिब... कारण यांनी त्याला ही ह्यांना खाईपर्यंत "तुला हे शोभतं का?" "चित्रगुप्ताकडे तक्रार करीन मी..की पुढचा जन्म मला रिंगमास्टरचा दे, आणी तुला पुन्हा सर्कशीत माझ्या चाबकाखाली ड्यूटिला पाठव!" असा प्रश्नांचा भडीमार करून त्या सिंव्हाचीही शेळी केली असती धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....! ======================================= क्रमशः

Book traversal links for गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४

  • ‹ गुरुंजींचे भावं विश्व! भाग-३
  • Up
  • गुरुजिंचे भावं विश्व! भाग-५ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
मौजमजा
लेखनप्रकार (Writing Type)
विरंगुळा

प्रतिक्रिया द्या
41799 वाचन

💬 प्रतिसाद (91)

प्रतिक्रिया

सुरेख वर्णन

अनिरुद्ध प
Wed, 09/11/2013 - 19:01 नवीन
सुरेख वर्णन (एक खवचट प्रश्ण विचारतो,या सद्ध्या सणान्च्या,घाईगडबडीत्,गुरुजीना लेख लिहायला वेळ बरा मिळतो?)
  • Log in or register to post comments

रात्र आपलीच असते ना साहेब,

अत्रुप्त आत्मा
Wed, 09/11/2013 - 20:54 नवीन
रात्र आपलीच असते ना साहेब, दुसरिकडे लेखनाची पूर्व तयारी करुन ठेवायला! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

मान गये

अनिरुद्ध प
गुरुवार, 09/12/2013 - 12:04 नवीन
साब स्टेमीना खूपच चान्गला आहे लगे रहो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मन:पूर्वक धन्य वाद!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/12/2013 - 12:08 नवीन
मन:पूर्वक धन्य वाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

लई भारी

मी-सौरभ
Wed, 09/11/2013 - 19:35 नवीन
हे गुर्जी लईच भारी लिहीतात अन या टायमाला draft पण छान केलयत :)
  • Log in or register to post comments

मस्त...

मुक्त विहारि
Wed, 09/11/2013 - 19:44 नवीन
झक्कास..
  • Log in or register to post comments

मस्त!

पैसा
Wed, 09/11/2013 - 20:35 नवीन
खुसखुशीत! परत कीबोर्डावरचा स्पेसबार विसरलात बर्कां!!
  • Log in or register to post comments

अआ, हा लेख सुद्धा छान झालायं

संजय क्षीरसागर
Wed, 09/11/2013 - 23:01 नवीन
त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही!
शर्टप्यांटीतल्या गुरुजिला बायको हे अर्धांग त्याच्या पूर्णांगाबरोबर असेल..तर..त्या भग्नावशेषांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरी,बायकोची "छाया" पडल्यानी तो गुरुजी नामक ग्रह त्याला दिसत नाही.फक्त "याला कुठेतरी पाहिलाय" असा ग्रह करवून घेऊन तो भग्नावशेष नामशेष होतो...
हे विषेश आवडलं.
  • Log in or register to post comments

मस्त ! खुसखुशीत !! पुभाप्र.

डॉ सुहास म्हात्रे
Wed, 09/11/2013 - 23:09 नवीन
मस्त ! खुसखुशीत !! पुभाप्र.
  • Log in or register to post comments

खुसखुशीत लेख !

जॅक डनियल्स
Wed, 09/11/2013 - 23:24 नवीन
खुसखुशीत लेख !
दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी,काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन..
अगदी खरे आहे, मला साप पकडताना हाच अनुभव आहे, साप राहिला बाजूला, त्या जागे पर्यंत पोहचायचे म्हणजे खरे साहस असयाचे. या लेखात मी ते लिहिले आहे. punyache patte !
  • Log in or register to post comments

@ त्या जागे पर्यंत पोहचायचे

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/12/2013 - 00:00 नवीन
@ त्या जागे पर्यंत पोहचायचे म्हणजे खरे साहस असयाचे. >>> खि: खि: खि: ! खरे आहे... आम्चेही तेच..! पूजेला जाण्याचा पत्ता मिळवण्यासाठी,पत्याचीच पूजा करावी लागते! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॅक डनियल्स

लेखमाला वाचतोय गुर्जी.

प्यारे१
गुरुवार, 09/12/2013 - 00:54 नवीन
लेखमाला वाचतोय गुर्जी. खुसखुशीत जिलेबी- आपलं- लेखमाला आहे. आधीच्या लेखांची देखील इथेच पोच देतोय. (मागच्या नि आताच्या सत्यनारायणाची दक्षिणा एकदम ह्या चालीवर) :)
  • Log in or register to post comments

झकास

चित्रगुप्त
गुरुवार, 09/12/2013 - 01:57 नवीन
झकास माला.
  • Log in or register to post comments

झकास एकदम!!! आवडेश हो अआ

बॅटमॅन
गुरुवार, 09/12/2013 - 02:07 नवीन
झकास एकदम!!! आवडेश हो अआ :)
  • Log in or register to post comments

हा हा हा. भारीच किस्से.

प्रचेतस
गुरुवार, 09/12/2013 - 08:47 नवीन
हा हा हा. भारीच किस्से. आम्हालाही असाच एक किस्सा आठवतोय. स्थळ: एसपीज् बिर्याणी हाऊस, सदाशिव पेठ. व्यक्ती: आम्ही ५ जण मित्र. दोघे मांसाहारी तर तिघे शाकाहारी. तिघांतला एक म्हणजे भटजी पण तो सुद्धा शर्ट प्यांटीत. प्रसंगः आम्ही शाकाहारी व्हेज बिर्याणी तर उरलेले दोघे मस्तपैकी मटन बिर्याणी चापून अगदी आरामशीरपणे एसपीज् च्या पार्किंग मध्ये चालत येतात तर समोरून भटजींचे एक यजमान. यजमानः काय भटजी, इकडं कुठे? भटजी (अगदीच कुचंबल्या चेहर्‍याने): हॅ हॅ हॅ. यजमानांच्या चेहर्‍यावर किंचित कुत्सित हसू. भटजी: काही नाही, जरा आलो होतो मित्रांबरोबर, व्हेज बिर्याणी खायला. (हे व्हेज बिर्याणी नाव सांगणं म्हणजे भटजींनी हळूच केलेले जस्टिफिकेशनच) यजमानः (हसंत हसंत) असं का. बरं बरं. भटजी: (कुचंबलेला चेहरा अजूनही तसाच) बरं येतो आता. कामं उरकायची आहेत. यजमान: भेटूच परत. बाय. इकडं भटजी बाहेर आल्यावर (मांडी घालून अ‍ॅक्टिव्हावर बसत) प्रतिज्ञा करतात की आता निदान शहरातल्या मध्यवस्तीतल्या नॉनव्हेज हाटेलांत तरी मी तुमच्याबरोबर येणार नाही. अ आ बुवा, तुमच्या बाबतीतही काही असे किस्से घडले असल्यास ते सांगा ना प्लीज.
  • Log in or register to post comments

अ आ बुवा, तुमच्या बाबतीतही

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/12/2013 - 10:25 नवीन
अ आ बुवा, तुमच्या बाबतीतही काही असे किस्से घडल असल्यास ते सांगा ना प्लीज.>>> ह्ही! ह्ही! ह्ही! किति तो सोज्वळपणा! ;-) ह्या प्रति सादा तल्या यजमानाचे अंत: करणी ,त्या वेळी एका दु..दु.. राक्षसाचा आत्मा शिरला असणार! :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तरीच ते भटजी 'मदिना' ला यायला

मालोजीराव
गुरुवार, 09/12/2013 - 12:34 नवीन
तरीच ते भटजी 'मदिना' ला यायला का नको म्हणत होते ते कळलं आता !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

एक प्रश्ण

अनिरुद्ध प
गुरुवार, 09/12/2013 - 13:30 नवीन
(
मांडी घालून अ‍ॅक्टिव्हावर बसत)
हे कस काय बुवा?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

हे असं.

प्रचेतस
गुरुवार, 09/12/2013 - 15:03 नवीन
हे असं. जो हताशपणे हे बघत उभा आहे तो कलोनियल कझिन्सपैकी धाकटा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

(No subject)

यशोधरा
गुरुवार, 09/12/2013 - 15:06 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

क्या बात है!

पैसा
गुरुवार, 09/12/2013 - 15:07 नवीन
गुर्जी सॅक वापरतात हे बघून ऊर भरून आला हो! झालस्तर ती मार्केट यार्डातून आणलेली फुल आणि मरून कलर टोपी! वा वा वा! तो धाकटा कझिन एवढा हताश का झाला ब्वॉ? मला वाटलं तो आणखी चॅप्टर हाय म्हणून!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

शी.......

अभ्या..
गुरुवार, 09/12/2013 - 15:14 नवीन
शी....... एवढे पण लक्षात येइना का ? पण आता आलेत गुरजी कागद आणि फुले घेउन.:-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

आता कळ्ळं!

पैसा
गुरुवार, 09/12/2013 - 15:22 नवीन
रच्याकने, वल्लीला चित्र काढायला शिकवण्यात तुझा काही हात नाही ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

वल्लीला काही शिकवायची गरज आहे

अभ्या..
गुरुवार, 09/12/2013 - 15:28 नवीन
वल्लीला काही शिकवायची गरज आहे का? तो शिकवतो दुसर्याना ;-) पण हात माझाच :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अजून एक

पैसा
गुरुवार, 09/12/2013 - 15:32 नवीन
या चित्रातले गुर्जी समोर न बघता हळूच दुसर्‍या दिशेने का बघतायत असं वाटतं तुला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

हभप आहेत असे म्हणायचे आहे का

मोदक
गुरुवार, 09/12/2013 - 22:30 नवीन
हभप आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला..? मला त्यांच्या चेहर्‍यावरचे भाव पाहून ते एकदम "मोगॅम्बो खुश हुवा" असे काहीतरी म्हणतील असे वाटत आहे! :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

खरंच की रे!

पैसा
गुरुवार, 09/12/2013 - 22:32 नवीन
त्यांनी लेखात लिहिलंय नै का ते बहार - बिब्बा उतणे वगैरे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

फुले ठीके एक वेळ, कागद कशाला?

यशोधरा
गुरुवार, 09/12/2013 - 15:32 नवीन
फुले ठीके एक वेळ, कागद कशाला? :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

=))

बॅटमॅन
गुरुवार, 09/12/2013 - 15:26 नवीन
=)) =)) =)) अगागागागागागागा, काय रे हे वल्ली आपलं अगोबा ;) बाकी, बुवांचा चेहरा अंमळ गांधारदेशीय/मिस्रदेशीय वाटून राहिलाय. ३०० फिल्ममध्ये हे बुवा एकदम शोभतील खरे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

मला तर चेहर अल्ल्लादिन

मृत्युन्जय
गुरुवार, 09/12/2013 - 15:28 नवीन
मला तर चेहर अल्ल्लादिन कार्टुनमधल्या खलनायक शास्त्रज्ञासारखा दिसतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

हाहाहाहा!

बॅटमॅन
गुरुवार, 09/12/2013 - 15:39 नवीन
हाहाहाहा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

बुवा गाडी चालवताना राग

अभ्या..
गुरुवार, 09/12/2013 - 15:33 नवीन
बुवा गाडी चालवताना राग पुष्पगंधार आळवतात त्यामुळे कदाचित गांधार देशीय वाटतात.:) मिस्र चा सम्बन्ध मिश्रीबरोबर असावा :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

क्या बात है श्लेषमाष्टर!

बॅटमॅन
गुरुवार, 09/12/2013 - 15:39 नवीन
क्या बात है श्लेषमाष्टर!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

बुवा गाडी चालवताना राग

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/12/2013 - 15:43 नवीन
बुवा गाडी चालवताना राग पुष्पगंधार आळवतात त्यामुळे त्यामुळेच ते रागीट दिसत आहेत का?!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

(No subject)

डॉ सुहास म्हात्रे
गुरुवार, 09/12/2013 - 15:36 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

या चित्राला अत्तराचा वास येत

मालोजीराव
गुरुवार, 09/12/2013 - 15:47 नवीन
या चित्राला अत्तराचा वास येत असावा काय? :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे बापरे

अनिरुद्ध प
गुरुवार, 09/12/2013 - 16:44 नवीन
बुवाना पाय जमीनिला न लावता गाडी चालवण्याची सिद्धि प्राप्त झालेली दिसते ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

कलोनियल कझिन्स

सूड
गुरुवार, 09/12/2013 - 17:37 नवीन
त्या कझिनचं पोट फार सुटल्यासारखं वाटतंय. साय फार खाल्लेली दिसत्ये आताशा!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अरे हा तर ....

चौकटराजा
गुरुवार, 09/12/2013 - 19:59 नवीन
अरे हा तर स्कूटरवरचा निखिल वागळे ! ऑ तिकडे भाई, अभ्यंकर , दलवाई ना अमेरिकेत नोकरी लागली का काय ? बाकी नि वा ने नवीन व्यवसाय चांगला निवडलाय ! आत फक्त फरक एवढाच की हातवारे करीत यजमानाच्या अंगावर धावून जायचे मंत्र म्हणत !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

अगोबाsssssssssssssssssssss!!!

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 09/12/2013 - 21:46 नवीन
अगोबाsssssssssssssssssssss!!! अगोबा ढगोबा हत्ती! मोडली तुझ्या पल्सरची बत्ती! अगोबाला बशिवलं Image removed. वॉशिंग मशिनवर! सुरु झाली त्याच्या अंगाची थरथर! =)) अभ्याच्या मागून करतो माझी कोंडी! द्या त्या दु..दु.. अगोबाला,तोफेच्या तोंडी! Image removed. बत्ती आत्मा---भिंत-धडक-अगोबा! =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

आणखी चार ओळी लिहा की..

मोदक
गुरुवार, 09/12/2013 - 22:26 नवीन
आणखी चार ओळी लिहा की.. दिवाळीचा बाण सारखे खंग्री काव्य होवून जावूदे!! :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

(No subject)

प्रचेतस
Fri, 09/13/2013 - 06:55 नवीन
Image removed.Image removed.Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

धन्यवाद

नाखु
Fri, 09/13/2013 - 09:38 नवीन
याच (बाल्या अवस्थेतील) रेखांकन मला व चौ रा काकांना दाखवलं होतच पन फाय्नल एक्दम झक्क्कास. तुमच्या अभ्याशेठचेही आभार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

या प्रश्नाची वाट वल्ली लै

कोमल
गुरुवार, 09/12/2013 - 23:06 नवीन
या प्रश्नाची वाट वल्ली लै दिसांपासून पाहात होता.. :)) शेवटी विच्छा पूरी झाली म्हणायची.. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिरुद्ध प

फारच छान ..

विटेकर
गुरुवार, 09/12/2013 - 09:28 नवीन
वाचतोय... ! यजमान जेव्हा आपल्याला देखील वैदिक धर्माचे ज्ञान आहे असा आव आणतात , तेव्हाची गंमत लिहा ना जरा !
  • Log in or register to post comments

लेखमालिका एका वेगळ्या

आतिवास
गुरुवार, 09/12/2013 - 10:03 नवीन
लेखमालिका एका वेगळ्या विश्वाची ओळख करुन देते आहे. लेखनशैली आवडली :-)
  • Log in or register to post comments

आणखी एक मुद्दा

आतिवास
गुरुवार, 09/12/2013 - 12:56 नवीन
मघा गडबडीत 'पूर्वपरीक्षण' ऐवजी 'प्रकाशित करा' वर क्लिक झाल्याने एक मुद्दा राहून गेला आहे. पूजापाठ, यज्ञयाग,शांती वगैरे वगैरे करण्यातलं 'ज्ञान आणि कौशल्य' ही इतर व्यवसायांसारखीच व्यावहारिक जगातली एक उपजीविका आहे; त्याचा धर्म, अध्यात्म वगैरेंशी संबंध नाही - हे माहिती होतंच - आता 'इनसायडर व्ह्यू' मिळाल्याने त्याचा बराच उपयोग होईल इतरांशी या विषयावर संवाद साधताना :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आतिवास

आम्हाला माहित असलेले गुर्जी ...

चौकटराजा
गुरुवार, 09/12/2013 - 10:44 नवीन
आम्हाला माहीत असलेले एक गुर्जी यकदम बंडखोर ! पार माउंसाहार देखील त्याना वर्ज नाही. एवढेच काय बार बार नाही पण वाकेजनली एखादा प्येग बी उं .... अशा गुर्जीना सायलेन्सर ची फ्याक्टरी मालकीची असलेला यजमान बार मधे भेटला तर गुर्जी नी बार मालकाला अमुक अमुक याग करायचा आहे म्हणून इकडे आलो होतो असे सांगून वेळ मारून नेली.
  • Log in or register to post comments

बाकी, स्वतः 'भ्रष्ट' झाले तरी

बॅटमॅन
गुरुवार, 09/12/2013 - 12:19 नवीन
बाकी, स्वतः 'भ्रष्ट' झाले तरी गुर्जींकडून मात्र सोज्ज्वळपणाची अपेक्षा ठेवणारे लोक पाहून डोळे पाणावले.
  • Log in or register to post comments

अहो ते म्हणतात ना नेहमी की

प्रचेतस
गुरुवार, 09/12/2013 - 12:25 नवीन
अहो ते म्हणतात ना नेहमी की सीजरची पत्नी नेहमी संशयातीतच हवी ते. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा