श्रद्धांजली

शैलेश हिंदळेकर's picture
शैलेश हिंदळेकर in जे न देखे रवी...
3 Mar 2013 - 10:03 pm

नाही विसरलो तुम्हा
स्मॄती अजुन जपल्या
प्रिय होतात रे तुम्ही
परिवारात आपल्या

परिवार म्हणजे मी
आणि भावंडे तुमची
घट्ट होती अशी मैत्री
तेव्हा आपली सर्वांची

होतो एकसाथ जेव्हा
किती वाटायचे छान
सारे लोक न्याहाळती
रोज वळून पाहून

कसे गेलात सोडून
एक एक ते करुन
नाही पाहिलेत तुम्ही
पुन्हा मागेही वळून

वा-यावरती तुमचे
भुरभुरून उडणे
आठवते मज आता
येते मनात रडणे

जाण्यामुळे तुमच्या रे
झाले आहे मी टकला
कंगवाही कधीचा मी
अडगळीत टाकला

कविता

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2013 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

शेवटच्या चार ओळींनी जीवाभावाच्या माणसापेक्षा
कंगव्याचे दु:ख अधोरेखित करणं आपल्याला महत्त्वाचं
वाटलेलं दिसतं.

काय बोलू.... :(

-दिलीप बिरुटे

तुमच्या या प्रतिसादामुळे मी शेवटच्या चार ओळी वाचल्या. मलाही ते खटकलं. म्हणून मग कविता पुर्ण वाचली तेव्हा लक्षात आलं की हे टक्कल पडलेल्या माणसाचं रडगाणं आहे. :D

@शैलेशरावः गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया अफलातून आहे. लगे रहो. !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2013 - 10:24 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> टक्कल पडलेल्या माणसाचं रडगाणं आहे.
हाहाहा. च्यायला, मी आपलं सिरियस झालो होतो.

''वा-यावरती तुमचे
भुरभुरून उडणे''

इथे दौट आला होता. पण, म्हटलं सालं कवीच्या कोणी जवळचं-बिवळचं... असो.
त्यामुळे कविता आली असावी. इथे तर कवीनं आमची विकेट काढली.

धन्य आहे. शाब्बास अजून येऊ दे भो. :)

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

3 Mar 2013 - 11:27 pm | अत्रुप्त आत्मा

गिर्‍हाईक खेचण्याची आयडीया अफलातून आहे. लगे रहो. !!!>>> +++++++१११११११११ ;-)

संजय क्षीरसागर's picture

4 Mar 2013 - 12:12 am | संजय क्षीरसागर

धाग्यांमुळे तुमच्या रे
गेलो आहे मी पकला
विचारतोय कधीचा मी
का उघडला? का उघडला?

धन्या's picture

3 Mar 2013 - 10:09 pm | धन्या

कोण गेलं हे वाचायला धागा उघडला होता... हल्ली लेखनाला "कॅची" नावे देण्याची फॅशन आलेली दिसतेय. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2013 - 10:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> कोण गेलं हे वाचायला धागा उघडला होता.
सेम टू सेम... वाटलं.

>>> हल्ली लेखनाला "कॅची" नावे देण्याची फॅशन आलेली दिसतेय.
काय बोलू... पुन्हा तुम्ही म्हणाल. लिहिणार्‍याला आंजारुन-गोंजारुन सांगा.

-दिलीप बिरुटे

लौंगी मिरची's picture

3 Mar 2013 - 10:15 pm | लौंगी मिरची

श्रद्धांजली .

वाचुन मीहि तेच पहायला आले कि आता आणखी कोण ??

पण शेवटच्या ओळीतलं दु:ख आधीच्या कडव्यांना स्पर्शहि करत नाहि हे खासकरुन नमुद करावेसे वाटले म्हणुन हा प्रतिसाद .

शैलेश हिंदळेकर's picture

3 Mar 2013 - 10:49 pm | शैलेश हिंदळेकर

सस्पेन्स राखायचा प्रत्यत्न होता तो, आधीच्या कडव्यात कळलं असतं तर काय मजा होती, तुम्ही पूर्ण कविता वाचलीत याबद्दल धन्यवाद

पैसा's picture

3 Mar 2013 - 10:56 pm | पैसा

पण डारेक्ट श्रद्धांजलि? रजनीभाईसारखा फ्याशनेबल विग घाला की राव!

स्पंदना's picture

4 Mar 2013 - 7:16 am | स्पंदना

होय !

नाही तर काय? अहो सर सलामत तो विग पचास! उगा श्रद्धांजली कशाला ? जाहीरात नाही करायची.

श्री गावसेना प्रमुख's picture

4 Mar 2013 - 8:31 am | श्री गावसेना प्रमुख

तुमच्या दुखावर उतारा
1
रजनी ही वापरतो1