खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो
पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं
सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही
आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही
सकाळी तास न तास वाची पेपर
एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही
गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही
पाठवावे याला कधी भाजीबाजारात
घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात
घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही
रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही.
axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही
सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा कसा येत नाही
आणि म्हणे आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
मित्रांशी तास न तास गप्पा मारी
वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी
बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
प्रतिक्रिया
27 Oct 2012 - 1:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहमत आहे. कवितेतील भावनेशी. :)
-दिलीप बिरुटे
27 Oct 2012 - 2:43 pm | अत्रुप्त आत्मा
कविता कळ्ळी........ ;-)

चालू द्या...
27 Oct 2012 - 5:48 pm | गणामास्तर
बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी पकडून काही फायदा नाय वो, तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार
नाहीये इथे. ;)
27 Oct 2012 - 10:14 pm | अत्रुप्त आत्मा
@ तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार
नाहीये इथे. smiley>>> मला काहि अपेक्षितच नाहिय्ये... :-p
27 Oct 2012 - 5:50 pm | गणामास्तर
बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी पकडून काही फायदा नाय वो, तुम्हा आम्हाला अपेक्षित असणारे काही होणार
नाहीये इथे. ;)
27 Oct 2012 - 2:53 pm | सारथी
मित्रांशी तास न तास गप्पा मारी
वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी
बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही >>>>>> हे भारी हाय :)
27 Oct 2012 - 7:29 pm | अनन्न्या
अगदी परफेक्ट!!
27 Oct 2012 - 7:44 pm | श्रीरंग_जोशी
कवितेतल्या भावनेशी मीही सहमत.
(नव) विवाहित पुरुषांच्याही या प्रकारच्या भावना असतात. बहुतांश वेळा त्या बोलल्या जात नाहीत.
27 Oct 2012 - 9:54 pm | छोटा डॉन
एक बाजु बहुतेक व्यवस्थित मांडलेली असल्याचे दिसत आहे. काव्य आवडले.
आता दुसर्या बाजुची वाट पहात आहे ;)
- छोटा डॉन
28 Oct 2012 - 2:32 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
ओ चोता दोन वाट कशाला पाहताय? येऊ द्या कि तुमच्याकडूनच ;)
28 Oct 2012 - 2:45 pm | बॅटमॅन
पॉप कॉर्न घेतोय, बघू अजून कोणकोण काय काय बोलतंय ते ;)
28 Oct 2012 - 4:57 pm | मुक्त विहारि
झक्कास..
29 Oct 2012 - 1:38 am | प्रभाकर पेठकर
कविता (म्हणून) चांगली आहे.
29 Oct 2012 - 7:36 am | सांजसंध्या
छान आहे कविता. :) अजून दोन तीन कडवी हवी होती.
कवितेतील अंत्ययमकामुळे माझ्या एका कवितेची आठवण झाली.
http://www.misalpav.com/node/21440
29 Oct 2012 - 9:43 am | माम्लेदारचा पन्खा
कविता सुंदरच आहे परंतु कवितेतल्या भावनेशी थोडा असहमत....
हल्ली अश्या लाडिक तक्रारी करणारी बायको असतेच कुठे......
आता एक घाव आणि दोन तुकडे........
29 Oct 2012 - 11:56 am | गवि
सहमत.
रेडिओतल्या श्रुतिकांसारखं असं वातावरण आता कुठे असतं.. (पूर्वीही असायचं का माहीत नाही !)
29 Oct 2012 - 3:18 pm | प्रकाश घाटपांडे
समद कळत असत वला! निस्त म्हनायला काही कळत नाही म्हंत्यात.