खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
आऊचा काऊ तो ह्याचा मावसभाऊ असतो
पण त्याच्याबद्दल याला काहीच माहित नसतं
सांगायला जावे तर ह्याचे लक्षच नाही
आणि तरी म्हणे आम्हा बायकांनाच काही कळत नाही
सकाळी तास न तास वाची पेपर
एवढे काय वाचतो तेच मला कळत नाही
गहू तेलाचे भाव मात्र याला कधी माहित नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही
पाठवावे याला कधी भाजीबाजारात
घेऊन यावा ह्याने ढीगभर शेपू अन कांद्याची पात
घरातल्यांच्या आवडी निवडी याला ठाऊक नाहीत
आणि म्हणे आम्हा बायकांना काहीच कळत नाही
रात्र रात्र जागून पाहतो टी.व्ही.
axn स्टार स्पोर्ट्स आणि स्टार मुव्ही
सारखी तीच हाणामारी बघून कंटाळा कसा येत नाही
आणि म्हणे आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
मित्रांशी तास न तास गप्पा मारी
वर बालवाडीतल्या मैत्रिणींची खुशाली विचारी
बायकोचा वाढदिवस मात्र याच्या लक्षात नाही
खरंच, आम्हा बायकांना काही म्हणजे काहीच कळत नाही
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2873
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
अजुन येऊ द्या.
कविता कळ्ळी........
बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी
In reply to कविता कळ्ळी........ by अत्रुप्त आत्मा
@ तुम्हा आम्हाला अपेक्षित
In reply to बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी by गणामास्तर
बुवा पॉप कॉर्न घेऊन फांदी
In reply to कविता कळ्ळी........ by अत्रुप्त आत्मा
मित्रांशी तास न तास गप्पा
परफेक्ट खरच!!
आवडली :-)
छान ...
ओ
In reply to छान ... by छोटा डॉन
पॉप कॉर्न घेतोय, बघू अजून
मस्त...
चांगली आहे.
छान आहे कविता. अजून दोन तीन
सगळेच असे नसतात..
सहमत.
In reply to सगळेच असे नसतात.. by माम्लेदारचा पन्खा
समद कळत असत वला! निस्त