चिक्कू हलवा.

Primary tabs

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in अन्न हे पूर्णब्रह्म
26 Sep 2012 - 4:51 pm

Chikku-Halwa

साहित्यः

पिकलेले चिकू १/२ किलो.
खवा १५० ग्रॅम
साखर १०० ग्रॅम
वेलची पूड १ लहान चमचा.
साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून)
बदामाचे काप सजावटीसाठी

तयारी:

चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या.

कृती:

कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता. साखर घातल्यावर मिश्रण जरा पातळ होईल. ते जरा घट्ट होईपर्यंत आणि त्याला तुप सुटेपर्यंत परतत राहा. मिश्रणाने कढई सोडायला सुरुवात केली की एखाच्या चांगल्या सटात काढून जरा थंड होऊ द्या.

चिकू हलवा बदामाच्या कापांनी सजवा.

गणपती बाप्पा मोरया!

प्रतिक्रिया

स्पा's picture

26 Sep 2012 - 4:53 pm | स्पा

वाह.. काका

कसला भारी दिसतोय.. एकदम नवीन पाकृ आहे हि

मातोश्रींना सांगायला हवी , करायला :)

गणपा's picture

26 Sep 2012 - 5:12 pm | गणपा

वाह !

घरी ढिगाने चिक्कू पडलेली असतात, पण हे असं करायचं कधी सुचलं नाही.
आई बाबांना मेल करतो ही पाककृती.
मी गेल्यावर मीच ट्राय करणारे.

प्रचेतस's picture

26 Sep 2012 - 5:25 pm | प्रचेतस

काय खतरा झालीय पाकृ

मेघवेडा's picture

26 Sep 2012 - 5:57 pm | मेघवेडा

जबरा!

सानिकास्वप्निल's picture

26 Sep 2012 - 6:00 pm | सानिकास्वप्निल

चिक्कू हलवा कसला जबरी दिसत आहे :)
धन्यवाद काका

सहीच काका.... मस्त पाकृ.

चिक्कुप्रेमी :)

किसन शिंदे's picture

26 Sep 2012 - 6:12 pm | किसन शिंदे

गृहमंत्र्यांना सांगायला हवी हि पाककृती. :)

अन्या दातार's picture

26 Sep 2012 - 6:35 pm | अन्या दातार

@किसन, कुणाच्या ग्रुहमंत्र्यांना?? ;-)

काका, पाक्रु जबरीच. :-)

सुंदर पाकृ आणि फोटू पाहून धन्य झाले.
गणपतीबाप्पा प्रसन्न झाले असणार.
ग्रेटच!

प्रभाकर पेठकर's picture

26 Sep 2012 - 7:39 pm | प्रभाकर पेठकर

स्पा, गणपा, वल्ली, मेघवेडा, सानिकास्वप्निल, Mrunalini, किसन शिंदे, अन्या दातार, रेवती. सर्वांचे मनःपूर्वक आभार.

हिच पाककृती वापरून आंब्याचा, केळ्याचा, पेरूचा इ.इ. हलवा करता येईल.

सूर्यपुत्र's picture

28 Sep 2012 - 12:26 pm | सूर्यपुत्र

चिक्कूंना हलवण्याची (पाक)कॄती भारी आहे. :)
पेरुचा हलवा करतांना पेरुंची साले आणि बिया काढायच्या का?

-सूर्यपुत्र.

मी_आहे_ना's picture

26 Sep 2012 - 9:07 pm | मी_आहे_ना

मस्त पाकृ.

मनीषा's picture

26 Sep 2012 - 9:30 pm | मनीषा

छान आहे पाकृ
इथे चिक्कु मिळाले तर नक्की करणार.

जेनी...'s picture

26 Sep 2012 - 9:33 pm | जेनी...

मला आवडतो ,माझि आई करते ...चिकु हलवा :)
एकदम चिकुडी पिकुडी लागतो :P

जाई.'s picture

26 Sep 2012 - 10:44 pm | जाई.

साँलीड

अत्रुप्त आत्मा's picture

26 Sep 2012 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा

ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआआआआआआआ................! नीट जेवण झालेलं आहे,रात्रीचा गार वारा खात गच्चीत बसल्रेलो आहे,विविधभारतीवर नॉस्टॅलजिक करणारं असं काहि ऐकू येतय,आणी अश्या वेळी हा चिक्कू हलवा, कोणताही मारवाडीपणा न करता निवांतपणे खाण्यासाठी चांगला पातेलंभर कुणितरी* आणून द्यावा........! बा........................स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स!
आणखि आयुष्यात काहिही नको..... :)

*>??? >>> कोण ते अजुनं(ही) नक्की नसलेले ;-)

आश's picture

27 Sep 2012 - 12:44 am | आश

इथे अमेरीकेत चिकु ताजे मिळत नाहीत :-(

प्रभाकर पेठकर's picture

27 Sep 2012 - 12:51 am | प्रभाकर पेठकर

चिकू, मँगो, पेरू हे फ्रोजन पल्प वापरले तरी चालेल. चवीत जरा उणेपणा येईल परंतू 'नाही मामा पेक्षा काणा मामा बरा'.

मृगनयनी's picture

27 Sep 2012 - 4:08 pm | मृगनयनी

जबराट्ट!!!..........

नंदन's picture

27 Sep 2012 - 8:14 am | नंदन

झकास दिसते आहे पाकृ

मस्त हो काका ,लै आवड्ला चिकु हलवा :)

सस्नेह's picture

27 Sep 2012 - 3:54 pm | सस्नेह

मस्त पाकृ.
चिक्कूपासून अशी टिकाऊ मिठाई बनते हे नवीन समजले.

कवितानागेश's picture

27 Sep 2012 - 4:59 pm | कवितानागेश

फार टिकू शकेल असे वाटत नाही! ;)

पिकलेल्या चिक्कूंपेक्षा जास्त टिकेल असे वाटते.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 2:48 am | प्रभाकर पेठकर

दोन दिवसांपेक्षा जास्त टिकली तर, आपली पाककृती फसली आहे, असे समजावे.

पैसा's picture

27 Sep 2012 - 11:26 pm | पैसा

अगदी मस्त पाकृ!

झकासराव's picture

28 Sep 2012 - 10:05 am | झकासराव

मस्त :)

निखिल देशपांडे's picture

28 Sep 2012 - 10:53 am | निखिल देशपांडे

फोटो मस्त दिसतोय..
पाककृती करुन बघावयास हवी.

प्रभाकर पेठकर's picture

28 Sep 2012 - 11:41 am | प्रभाकर पेठकर

चिकूचा गर, मिक्सर मध्ये, एकजीव करताना पाणी घातलं होतं का? आवश्यकता नसते. तसेच, गर शिजवताना (तसा शिजतो लवकर) त्यातील जास्तीचे पाणी जरा आटू द्यायचे. खवा मिसळल्यावर आणि साखर घातल्यावरही हलवा पातळ होतो तो सतत परतत राहून पाणी आटवून घ्यायचं. गरम असताना थोडा पातळ असतो पण जस जसा थंड होईल तस तसा तो जरा घट्ट होतो. पण हा फ्रिजमध्ये ठेवायचा नाही. रुम टेंपरेचरलाच खायचा. उरलेला फ्रिज मध्ये ठेवला तरी खाताना जरा गरम करूनच खायचा.

काल प्रयोग केला होता, कुठंतरी काहीतरी चुकलं असावं, थोडा पातळ झाला होता हा प्रकार. बाकी चव मस्त आली होती.

इरसाल's picture

28 Sep 2012 - 12:19 pm | इरसाल

सध्या इतकेच.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Sep 2012 - 12:38 pm | परिकथेतील राजकुमार

सदेह वैकुंठगमन !!

मोहनराव's picture

28 Sep 2012 - 12:51 pm | मोहनराव

मस्तच!

मैत्र's picture

29 Sep 2012 - 2:21 am | मैत्र

आहे. पण इतकी सुंदर पाककृती बघून त्रास झालेला आहे. आता कधी काळी भारतात गेल्यावर शंभर टक्के प्रयत्न करण्यात येईल..

ती वाचनखूण कुठे गेली उर्ध्व श्रेणीकरणा नंतर?

मीनल's picture

29 Sep 2012 - 4:13 am | मीनल

करून पहायला हवा. कमी कटकटीचे काम आहे. जमेल मला बहुधा !!

जास्त गोडघाश्या नसल्याने दुसर्‍याला सजेस्ट करण्यात येईल !

( पण पर्‍याने पाजलेल्या मस्तानीचा फॅन ! )

मला लेख का दिसत नाहीए..??? फक्त प्रतिसाद्च दिसतायत.

विजुभाऊ's picture

6 Oct 2012 - 12:09 pm | विजुभाऊ

चिक्कू हलवा.
नुसतेच शीर्षक दिसतय.मजकूर काहीच नाहिय्ये.
बहुधा "चिक्कू हलवा" असा प्रदेशाध्यक्षांचा आदेश दिसतोय.
हलवतो...........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 Oct 2012 - 12:25 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तांत्रिक कारणामुळे आणि मिपाचे बांधणीचे काम चालु असल्यामुळे काही लेख प्लेन एचटीएमल मोड्मधे गेले आहेत. असे काही लेख असल्यास संपादकांना हाक मारा. तात्पूरती सोय करुन देण्यात येईल.

-दिलीप बिरुटॆ
(संपादक)

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

8 Oct 2012 - 12:07 am | निनाद मुक्काम प...

काका
ही पाककृती जबरदस्त झाली आहे.

मदनबाण's picture

8 Oct 2012 - 4:19 pm | मदनबाण

आह्ह ! :)