आताशा माझे पिल्लू ३ वर्षे १० महिन्यांचे आहे, कधी अड़ते कधी पड़ते. कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
हे त्याच्या वागन्या पेक्षा माझ्या मूड वर जास्त अवलंबून असते. नंतर उगाच विचार करतो बाबा पण असेच काही करायचे ना.
लहानपणी मी एकदा घरात काहीतरी माझ्या मनासारखे झाले नाही म्हणून चिडून बसलो होतो आणि मग घर सोडायला निघालो होतो, फकत बाबांची वाट पाहत होतो. अशासाठी की बाबा येउन माझा प्रश्न सोडवू शकतील अशी आशा होती. बाबा आले शालेतुन आणि घराबाहेर पाय-यावर बसून माझ्या बरोबर बोलत होते १० च मिनिटे. काय बोलले ते आता आठवत नाही पण ते जे काही होते बहुधा तोच माझ्या आयुष्याचा बेस झाला आहे.
मुंजित वडिलांना गुरु मानून जो गुरुमंत्र देतात ना हे त्या पेक्षा ही पवित्र आणि गंभीर होते, बाबा मला बहुधा आमच्या परिस्थिति बद्दल सांगत असावेत असे वाटतेय. मला समजले की नाही माहित नाही पण माझा राग मात्र शांत झाला होता.
आज पण गोंधळ झाला की आपोआप तो कोड excute होतो आणि गोष्टी सोप्या वाटायला लागतात.
आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो तेंव्हा आपसुकच डोळे भरून येतात, मग वयामागे आणि वेळेमागे गेलेल्या आणि तिथेच अड़केल अशी भीती असणा-या मनाला पुन्हा वर्तमानात आणताना कष्ट होतात
हर्षद
पुर्व प्रकाशित - http://harshad-gaaanikha.blogspot.com/
प्रतिक्रिया
26 Oct 2010 - 1:31 pm | भाऊ पाटील
चांगलं लिहिलय...थोडे अजुन खुलविता आले असते तर सुंदर लेख झाला असता.
18 Jul 2012 - 5:53 pm | जेनी...
खरच ५० ,अजुन खुलवायला हवं होतं ..
मस्त मस्त मस्त लिहिलय .
26 Oct 2010 - 1:35 pm | यशोधरा
चांगलं लिहिलं आहे. अजून खुलविले असते तर अधिक चांगले झाले असते, असे मलाही वाटले.
26 Oct 2010 - 1:52 pm | गणेशा
आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो तेंव्हा आपसुकच डोळे भरून येतात, मग वयामागे आणि वेळेमागे गेलेल्या आणि तिथेच अड़केल अशी भीती असणा-या मनाला पुन्हा वर्तमानात आणताना कष्ट होतात ....
अतिषय भावनात्मक शेवट .. मनाची होणारी स्थीती समजुन येते आहे ...
(अवांतर : माझा एक ऑर्कुट फ्रेंड आहे .. देवेंद्र(प्रोफाईल नेमः निशब्द देव) म्हणुन, त्याची एक कविता आहे .. " मी माझ्या बापाला रडताना पाहिलय" मिळाल्यास नक्की वाचा .. आता सगळ्या साईट ब्लॉक आहेत नाहीतर पाठवली असती )
26 Oct 2010 - 3:34 pm | क्रान्ति
हर्षद, चांगलं लिहिलंस. शेवट खूपच भिडला मनाला. लिहित रहा.
26 Oct 2010 - 3:59 pm | गणपा
:)
:(
26 Oct 2010 - 8:45 pm | ईन्टरफेल
<आज मी बाप झाल्यावर माझ्या बाबांबद्दल विचार करतो >....
कार्ट बापावर गेलेल दिसतय?
26 Oct 2010 - 8:48 pm | रेवती
छान लिहिलय.
आज मीही मुलावर सकाळी उगीच चिडले असं वाटतय.
रमतगमत आवरत होता. शाळेत जायला उशीर होइल म्हणून आणि माझाही मूड नव्हता.:(
26 Oct 2010 - 11:23 pm | पिवळा डांबिस
कधी त्याला समजावतो कधी रागावतो.
पिल्लू लहान आहे, तर त्याचं ल्हानपण तुम्ही दोघेही एन्जॉय करा...
ते कायमचं ल्हान रहाणार नाहिये, तुमचा रागही कायमचा रहाणार नाहिये....
मग कशाला रागवायचं आणि मोलाचे क्षण नासवायचे?
बघा पटतंय का!
(स्वगतः अजून पावणेचार वर्षांचंच आहे! जरा मोठं होऊन आई-बापाचीच अक्कल काढायला लागलं की बघा!!)
:)
26 Oct 2010 - 11:55 pm | शिल्पा ब
<<<अजून पावणेचार वर्षांचंच आहे! जरा मोठं होऊन आई-बापाचीच अक्कल काढायला लागलं की बघा!!
ते दिवस आजकाल फार उशिरा येत नाहीत...माझं आता दोन महिन्यात ५ वर्षाचं होईल पण आताच मला सांगतं आई असं नाही तसं म्हणून..काल ट्रेडर जो ज मध्ये गेले होते..जरा तिथल्या बाकड्यावर बसून तिला जवळ घेतले तर लगेच माझा हात झिडकारून टाकला (बाजूला तिच्यापेक्षा थोडी मोठी मुलगी बसली होती)..
26 Oct 2010 - 11:46 pm | प्राजु
छान लिहिलं आहेस..
होतं असं कधी कधी/ बरेचदा..
उगाचच चिडलो असं वाटत राहतं...
26 Oct 2010 - 11:58 pm | ५० फक्त
आपणां सगळ्यांचे मनपुर्वक आभार प्रोत्साहनाचे शब्द वाचुन छान वाट्लं, आता पुढचा प्रबास सुखाचा व्हावा हि अपेक्शा.
18 Jul 2012 - 5:22 pm | स्पा
सुरेख
18 Jul 2012 - 11:23 pm | अत्रुप्त आत्मा
+१
19 Jul 2012 - 9:07 am | मोदक
+२