रेषेवरची अक्षरे दिवाळी २०११: अंक चौथा

मेघना भुस्कुटे's picture
मेघना भुस्कुटे in विशेष
26 Oct 2011 - 8:19 am
दिवाळी २०११

मंडळी,
सलग चौथ्या वर्षी ’रेषेवरची अक्षरे’च्या अंकासह तुमच्या भेटीला येताना आनंद तर वाटतो आहेच, खेरीज थोडा अभिमान आणि जबाबदारीही.
इथे ’रेषेवरची अक्षरे २०११’चा अंक ब्लॉगवर आणि पीडीएफमध्येही उपलब्ध आहे.
दर वर्षीपेक्षा तिपटीनं ब्लॉग वाचूनही संकलित साहित्याचा भाग मात्र संख्येनं आणि दर्जानंही आहे तिथेच आहे, याची खंत आहेच. पण ब्लॉगरांकडून नवं काही लिहून घेण्याचा प्रयोग यंदा यशस्वी झाला आणि ’लैंगिकता आणि मी’ यासारख्या अनवट विषयावरचं साहित्य अंकात सामील करता आलं, त्याचा आनंदही आहे.
अंक वाचा, आपल्या सुहृदांना पाठवा, तुमच्या प्रतिक्रिया, तक्रारी, सूचना, सुधारणा कळवा. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहतो आहोत.
तुम्हा सगळ्यांना, तुमच्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! ही दिवाळी सुखासमाधानाची, आनंदाची आणि भरपूर सकस साहित्याची जावो...
ए सेन मॅन, ट्युलिप, मेघना, संवेद
संपादक
रेषेवरची अक्षरे
२०११

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

26 Oct 2011 - 3:06 pm | प्रकाश घाटपांडे

उत्तम अंक आहे. अनेक मराठी संस्थळांना प्रगल्भतेकडे नेणारा आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Oct 2011 - 11:42 pm | बिपिन कार्यकर्ते

मेघना, तुझे आणि सर्व टीमचे मनःपुर्वक अभिनंदन. खरं तर मागच्या आठवड्यात विचारणारच होतो. सलग चार वर्षे हा उपक्रम चालवत आहात तुम्ही. स्पृहणिय!

अंक जरूर वाचेन.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

27 Oct 2011 - 12:00 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रेषेवरची अक्षरे दिवाळी अंक प्रकाशित करणार्‍या सर्व मंडळीचे अभिनंदन...!!!

धनंजयचा आणि नचिकेतचा लेख वाचून संपवला.
आपल्या वैचारिक जाणीवा रुंदावतात ते अशा काही लेखनाने.

-दिलीप बिरुटे

.. कौतुकाबद्दल धन्यवाद..!!

अर्धवट's picture

27 Oct 2011 - 1:14 pm | अर्धवट

खुप छान अंक आहे, हळुहळू वाचतोच आहे.

चित्रा's picture

28 Oct 2011 - 2:21 am | चित्रा

अभिनंदन! अंक सुरेख आणि अतिशय दर्जेदार आहे.

नगरीनिरंजन's picture

28 Oct 2011 - 9:28 am | नगरीनिरंजन

अंक वाचनीय. विशेषतः 'लैंगिकता आणि मी' हे सदर उल्लेखनीय आहे.

मेघना भुस्कुटे's picture

28 Oct 2011 - 11:34 pm | मेघना भुस्कुटे

कौतुकाबद्दल आभार मंडळी! काही चुका, तक्रारी, सुधारणा, सुचवण्या... यांचंही स्वागत आहे. त्यानंही खरंच खूप मदत होते...

विकास's picture

29 Oct 2011 - 1:26 am | विकास

अंक चांगला काढला आहे. संपादक-लेखक-लेखिका-कलाकारांचे अभिनंदन!

सहज सुचले म्हणून: "लैंगिकता आणि मी" या सदरात डॉ. आनंद नाडकर्णींचा लैंगिक शिक्षणावरून लेख चांगला ठरला असता.

रेवती's picture

29 Oct 2011 - 6:42 am | रेवती

अंक आवडला.

जाई.'s picture

29 Oct 2011 - 2:18 pm | जाई.

वाचनीय अंक