ऑन लाइन शॉपिंग च्या व्यवसायाने चांगलेच बाळसे धरल्याचे दिसते.
स्टार सी.जे.एन्डीटी,व्ही..टाईम्स..रेडिफ..एक ना दोन अनेक वेब साईत्स अनेक नावीन्य पूर्णं वस्तुंनी सजलेल्या दिसत आहेत..
इतर वेब साईट्स प्रमाणे ह्या वेब साईट्स पाहणे हा पण एक छान टी.पी आहे
पूर्वी क्रेडिट कार्ड हे मस्ट असायचे पण आता कॅश ऑन डिलिव्हरी चा पर्याय बहुतेक साईट्स वर उपलब्ध असल्याने खरेदी सोपी झाली आहे...शिवाय डेलिव्हरी घरपोच..मोफत
किचन..संगणक..टी.व्ही..पादत्राणे...साड्या.. कपडे ..मुलांचे कपडे..एक ना अनेक अश्या विविध ब्र्यांड च्या वस्तू मिळू लागल्या आहेत..
ऑनलाईन शॉपिंग करताना प्रोडक्ट्स रिव्यू बघूनच पुढची खरेदी करावी म्हणजे नंतर होणारा मनस्ताप टाळता येतो.
सर्वात पहिली शर्टाची खरेदी मी रेडीफ मधून केली..अनुभव चांगला आला
नंतर मी एक मायक्रो व्हेव व शर्ट स्टार मधून खरेदी केला.. मायक्रो व्हेव सॅमसंग ची असल्याने दर्ज्या बद्दल काळजी नव्हती..
शिवाय पेमेंट पण वस्तू मिळाल्यावर केले होते...शिवाय हॅंड मिक्सर..प्रवासी बॅग..व मायक्रो व्हेव साठी भांडी गिफ्ट च्या स्वरूपात मिळाली...
मला तर आता पर्यंत चांगला अनुभव आला आहे..
प्रतिक्रिया
19 Oct 2011 - 3:52 pm | गवि
फ्लिपकार्ट डॉट कॉम या साईटवरुन मी अनेक वर्षे पुस्तकं, मोबाईल वगैरे मागवतो. रिलाएबल, फास्ट म्हणजे खरेच परफेक्टली इन टाईम.. सुरक्षित आहे हे इतक्या वर्षांत सिद्ध झालंच आहे.
19 Oct 2011 - 3:57 pm | प्रचेतस
फ्लिपकार्ट बेस्ट.
डिलिव्हरी टाईम, पॅकिंग, क्वालिटी सगळेच उत्तम. शिवाय सवलतही भरपूर.
19 Oct 2011 - 4:32 pm | धन्या
प्रचंड सहमत.
ऑनलाईन शॉपिंगचा अनुभव किती वाईट असू शकतो हे अनुभवायचं असेल तर नापतोल डॉट कॉम वरुन काही मागवा. नापतोल वरुनच काय पण आयुष्यात पुन्हा कधी भारतात ऑनलाईन शॉपिंग करताना हजार वेळा विचार कराल. :)
19 Oct 2011 - 4:45 pm | किसन शिंदे
गेल्या आठवड्यातच रारंगढांग मागवलं होतं जे मागवल्यानंतर दोन दिवसातच मला मिळालं, शिवाय त्यांचे शिपींग चार्जेसही बिलकुल नसतात.
19 Oct 2011 - 4:53 pm | गवि
फ्लिपकार्टला इतकं कौतुक मिळत असल्याने आता दुसर्याचं ते कार्टं आपलं ते फ्लिपकार्टं.. असा वाक्प्रचार रुढ करायला हरकत नसावी. :)
19 Oct 2011 - 5:33 pm | ५० फक्त
'आता दुसर्याचं ते कार्टं आपलं ते फ्लिपकार्टं..'
सध्याच्या परिस्थितीवरुन सांगतो गवि, तुम्हि हाडाचे नाहि तर पार लिगामेंटचे लेखक आहात.
19 Oct 2011 - 4:01 pm | छोटा डॉन
फ्लिपकार्ट मी पण वापरतो बर्याचदा.
ह्याशिवाय इंडियाप्लाझा.इन आणि इ-बे या संकेतस्थळांचा माझा अनुभव चांगला आहे.
अर्थात हे ज्याच्यात्याच्या अनुभवावर डिपेंड आहे.
अवांतर :
ह्या क्षेत्रातले आमचे एक जाणकार मित्र मात्र 'ऑनलाईन खरेदी अजिबात करु नये' असा सल्ला देतात व त्यांनी दिलेले पुरावे पाहुन हे ही मत पटते, असो.
- छोटा डॉन
19 Oct 2011 - 4:10 pm | चिरोटा
कमीत कमी त्रासदायक वस्तु म्हणजे पुस्तके, वाढदिवसाच्या भेटी वगैरे ऑनलाईन घ्याव्यात. वॉशिंग मशीन्,फ्रिज,१००० रुपयांचे शर्टस ऑनलाईन घेणारे महान असतात असे माझे मत आहे.
19 Oct 2011 - 4:17 pm | सुहास..
आपण तर ऑनलाईन अजिबात खरेदी करत नाही ,
प्रॉडक्ट घेतो, चेक करतो, प्रचंड घासाघिस करतो, दुकानदाराचा कधी-कधी व बर्याच दा दुकानदाराकडुन अपमान करवुन घेतो , चुकीचे निघाले की मग परत जावुन त्याची कॉलर धरतो, आणी चांगले निघाले तर त्याचा नंबर घेवुन ठेवतो.इतरांना देताना " माझ नाव सांग त्याला " म्हणुन सांगतो आणी भाव खातो ;)
19 Oct 2011 - 4:40 pm | निवेदिता-ताई
मी पण असेच करते...
ऑनलाईन खरेदीवर विश्वास नाही मा़झा..
19 Oct 2011 - 4:24 pm | आत्मशून्य
कॅश ओन डीलीव्हरी.. अनूभव चांगला होता.
19 Oct 2011 - 4:28 pm | कुंदन
इतका चांगला अनुभव असुन काथ्या का कुटताय ?
19 Oct 2011 - 4:56 pm | पिंगू
रेडीफवरचा कॅश ऑन डिलीवरी पर्याय वापरुनच शॉपिंग केले आहे. पण दुकानात जाऊन घासाघिस करुन केलेली शॉपिंग केव्हाही चांगलीच हे माझं मत आहे.
बाकी फ्लिपकार्ट केव्हाही बेष्ट..
- पिंगू
19 Oct 2011 - 5:20 pm | मराठी_माणूस
होमशॉप१८ वरुन एक स्टील चा डिनर सेट घेतला होता , तो खुपच तकलादु निघाला. पॅक उघडतानाच काही भांड्यांचे हँडल तुटले. त्या नंतर तिथुन काहीच घेतले नाही.
19 Oct 2011 - 5:50 pm | गणपा
घासाघीस नाही तर खरेदीत मजा नाही. म्हणुन आजवर कधीही ऑनलाईन खरेदी केली नाही.
तस्मात आम्ही हा काथ्या कुटाण्यात असमर्थ आहोत.
19 Oct 2011 - 6:05 pm | बाप्पा
फ्लिपकार्ट चा माझा अनुभव तितकासा चांगला नाही. मी फ्लिपकार्ट वरुन पुस्तके व एक पेन ड्राइव्ह मागवला होता. डिलीव्हरी फार पटकन मिळाली. १ - २ दिवसांनी मी पेन ड्राइव्ह व्यवस्थीत चालत नसल्याची तक्रार केली. त्या नंतर त्यांनी ३ वेळा त्यांचा मानुस परत न्यायला येतो असं सांगुन आलाच नाही. १५ दिवसांनी त्यांचा मानुस ते परत घेउन गेला त्या नंतर ९ दिवसांनि फ्लिपकार्ट ने माझे पैसे फ्लिपकार्ट च्या खात्यात क्रेडिट म्हणुन जमा केले.
डिलीव्हरी फास्ट आहे पण फ्लिपकार्ट ची रीट्र्न पोलीसी खराब आहे आणि खुपच स्लो आहे. शक्यतो १००-२०० पेक्शा महाग वस्तुंसाठी तरी फ्लिपकार्ट वापरु नये अस माझा सल्ला आहे. बाकी आपण सुज्ञ आहातच..
19 Oct 2011 - 6:08 pm | अमोल केळकर
अहो १५ दिवसानी का होईना पैसे परत मिलाले हे नशिब !!! :)
अमोल केळकर
19 Oct 2011 - 6:13 pm | योगी९००
मी अॅमॅझॉन आणि डीलएक्स्त्रीम (dealextreme) वरून बर्याचदा गोष्टी घेतल्या आहेत. त्यांचाही अनुभव चांगला आहे..
गंमत म्हणजे जर अॅमॅझॉनकडुन चुकीचे प्रॉडक्ट मिळाले आणि तक्रार केली, तर लगेच नविन पाठवले जाते आणि जुनेही.(चुकून मिळालेले) तुमच्याकडेच ठेवा असे सांगितले जाते. आपण ते जर दुसर्याकोणाला विकले तर आपलाच फायदा होतो.
19 Oct 2011 - 6:49 pm | धन्या
चर्चेचा एकंदरीत रंग पाहता चर्चा भारतामधील ऑनलाईन शॉपिंग संदर्भात आहे असे वाटते. :)
19 Oct 2011 - 6:58 pm | क्लिंटन
अरे वा. घरबसल्या खरेदीच्या सोयीचा तुम्ही पण लाभ घेत आहात हे वाचून चांगले वाटले. पण त्या मागे आय.टी वाल्यांचे (त्याच आय.टी वाल्यांचे-- ज्यांना १२-१२ तास मशीनसमोर उभे राहायला, तेलात हात घालायला आवडत नाही पण ए.सी मध्ये बसून आरामातली नोकरी आणि पैसा हवा आणि १९९५ नंतरच्या जागतिकीकरणाच्या लाटेत मेक्यानिकल इंजिनिअरींगची वाट लावणार्या त्याच आय.टी वाल्यांचे) योगदान आहे. असो.
तुम्हाला ऑनलाईन शॉपिंगचा अधिकाधिक फायदा यापुढील काळात होऊ दे ही शुभेच्छा.
19 Oct 2011 - 9:27 pm | प्रशांत उदय मनोहर
रेडिफ शॉपिंग फार पूर्वीपासून करत आलोय.
टीशर्ट्स, कॅज्युअल वेअरमध्ये फ़ॅशन-स्ट्रीट-क्वालिटी किंवा थोड्या बर्या क्वालिटीचे टीशर्ट्स रेडिफ़वरून पूर्वी विकत घेतले होते ते बर्यापैकी चांगले निघाले.
अर्थात् रंगांच्या बाबतीत फार चॉईस नसतो, त्यामुळे "रंगबिंग काही नाही, फक्त मळखाऊ बघायचं, आणि रास्ताबिस्ता काही नाही, कपडा सस्ता आहे की नाही, हे बघायचं" असं धोरण असल्यास बिनधास्त कपडे-खरेदी करता येते.
या खेरीज टूलकिट, डब्यांचा सेट, हॅवरसॅक, बर्थडे केक, फळे, फुले, इ. गोष्टी विकत घेणे/गिफ़्ट करणे यांसाठीही रेडिफ़ हा चांगला पर्याय आहे.
अगदी पाच-सहा वर्षांपासून कॅश-ऑन-डिलिव्हरी हा पर्याय उपलब्ध असल्यामुळे क्रेडिड/डेबिट कार्ड वापरायच्या फ़ंदात पडलो नाही. नेटबॅंकिंगचा पर्याय (मला वापरता) आल्यापासून तर हाच पर्याय मी निवडतो.
बिग-बझार/फ़्यूचर बझार या ऑनलाईन बाजारांमध्ये जास्त फिरकलो नाही.
भारतातल्या ऑनलाईन शॉपिंगमध्ये एक त्रुटी आहे. मोठ्या शहरांमधला पत्ता असल्यास फ़्री डिलिव्हरी देणार्या या संस्था लहान गावांमध्ये खेड्यांमध्ये "पेड" डिलिव्हरी द्यायलाही तयार नसतात.
(क्रमशः)
19 Oct 2011 - 9:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अरे वा...! माहितीपूर्ण चर्चा. मी कधी ऑनलाइन खरेदी केलेली नाही.
फ्लिपकार्टचा उपयोग घ्यावा असे वाटायला लागले आहे.
-दिलीप बिरुटे
19 Oct 2011 - 9:43 pm | प्रशांत उदय मनोहर
उदा. मी सध्या पिलाणी (राजस्थान) येथे राहतो. सर्वात जवळचा बिग बझारचा मॉल दिल्ली किंवा जयपूर या शहरांमध्ये (दोन्ही ठिकाणं सहा तासांच्या बसच्या प्रवासाच्या अंतरावर, पिलाणीत रेल्वे नाही त्यामुळे अन्य पर्याय - टॅक्सीचा, अत्यंत खर्चिक) आहे. खरंतर अशा ठिकाणी या ऑनलाईन पर्यायांचा खूप उपयोग होऊ शकतो. पण इथला पोस्टल इंडेक्स नंबर (PIN) टाकला की त्यांची सर्व्हिस दिलेल्या पत्त्यावर उपलब्ध होऊ शकत नाही असा निरोप येतो. रेडिफ़ असो किंवा बिगबझार असो किंवा इतर काही. हा त्रुटी खूप मोठी आहे असं माझं मत आहे.
असंच एकदा रेडिफ़वर मी ऑर्डर केली आणि पेयमेंटच्या आधी पत्ता विचारतात त्या ठिकाणी आमचं गाडं अडलं होतं. अर्थात ऑर्डर पुढे सरकेना. रेडिफ़वर मी ऑनलाईन होतो, पण ऑर्डर करताना कुठल्यातरी लोच्यात अडकलोय हे रेडिफ़च्या लक्ष्यात आलं तेव्हा रेडिफ़च्याच एका कर्मचाऱ्याचा मला मदतीसाठी फोन आला. मी त्यांना सांगितलं की अमुक अमुक प्रॉब्लेम आहे. तेव्हा तो म्हणाला की दिल्ली किंवा जयपूरचा एखादा पत्ता दिल्यास ते तिथे डिलिव्हरी करतील. मग मी म्हटलं, की तिथला पत्ता असता तर मी ऑनलाईन कशाला तडमडलो असतो? स्वतःच दुकानात जाऊन वस्तू विकत घेता आली नसती?
तात्पर्य, आपल्याकडे सेवासुविधा सुरू झाल्या असल्या तरी उपाशी माणसाला पथ्य आणि पोट फुटेपर्यंत जेवलेल्या माणसाला आग्रह असाच प्रकार असल्यामुळे हे पर्याय "गरज" म्हणून कधीच वापरता येत नाही. (आता इथे अमेरिकेशी तुलना केली तर "देशभक्त" मेणबत्त्या जाळत रस्त्यावर चालतील. पण त्रुटी कबूल करणंही दूर आणि त्या सुधारणं त्याहूनही दूर...)
20 Oct 2011 - 9:54 am | मराठी_माणूस
तात्पर्य, आपल्याकडे सेवासुविधा सुरू झाल्या असल्या तरी उपाशी माणसाला पथ्य आणि पोट फुटेपर्यंत जेवलेल्या माणसाला आग्रह असाच प्रकार
योग्य उदाहरण दिलेत.
ह्यातला सेवासुविधा हा शब्द तितकासा बरोबर वाटत नाही , हे लोक फक्त धंदा बघतात त्यात ग्राहकाला कुठलीही सेवा सुविधा पुरवण्याचा हेतु नसतो.
19 Oct 2011 - 9:49 pm | पैसा
आता क्रेडिट किंवा डेबिट कार्ड वापरून ऑनलाईन शॉपिंग करताना २ पासवर्ड वापरावे लागतात, त्यामुळे इतर हॉटेलात वगैरे कार्ड वापरण्यापेक्षा हे जास्त सुरक्षित आहे.
मी ईबे आणि फ्लिपकार्टत दोन्हीवरून वस्तू नेहमी खरेदी करते. स्थानिक बाजारापेक्षा अनेकदा स्वस्त मिळतात. ४०००/- रु पर्यंत मोबाईल्स सुद्धा घेतलेत (स्वतःसाठी आणि लष्करच्या भाकर्या म्हणून). कधी प्रॉब्लेम आला नाही. एक खराब होता, तो विक्रेत्याने ताबडतोब बदलून दिला.
फ्लिपकार्ट हे पुस्तकांसाठी खूपच चांगलं आहे. तर ईबेवर अनेकदा १०% पर्यंत डिस्काउंट ईबेतर्फे मिळतो, त्या त्यावेळेला आवश्यक असलेली वस्तू आधी ठरवून घेणं फायद्याचं ठरतं. ईबेवर खरेदी करताना मी नेहमी विक्रेत्याला किती पॉझिटिव्ह प्रतिसाद आहेत ते पाहूनच घेते.
क्रेडिट कार्ड वापरताना आपण एका झटक्यात सगळे पैसे भरू शकू आणि हप्त्यांच्या जंजाळात सापडणार नाही याची खबरदारी मात्र अवश्य घ्या.
19 Oct 2011 - 11:18 pm | रेवती
अकुकाका धन्यवाद!
माहितीपूर्ण धागा.
20 Oct 2011 - 9:51 am | स्वतन्त्र
Online खरेदी च्या फंदात अजून तरी पडलेलो नाही.
तुमचा हा धागा वाचून पडावस वाटतंय !
20 Oct 2011 - 10:49 am | सुहास झेले
फ्लिपकार्ट डॉट कॉम बेश्ट ....
20 Oct 2011 - 10:56 am | मदनबाण
फ्लिपकार्ट डॉट कॉम बेश्ट ....
सुहासराव तुमच्या तिथल्या खरेदीची लिस्ट द्या की राव... ;)
बाय द वे बझ बंद होत असल्याने आता आपण गुगल प्लसवर भेटु रे... ;)
20 Oct 2011 - 11:45 am | सुहास झेले
अरे मराठी/इंग्रजी पुस्तके, एक्स्टर्नल हार्डडिस्क, वडिलांसाठी ब्लडप्रेशर मेजरमेंट डिव्हाईस... सगळं कसं उत्तम आणि २-३ दिवसात घरपोच, ते पण फोकट में ;-)
20 Oct 2011 - 11:53 am | मदनबाण
काय बोलतोयस काय ? सहीयेयेये.... ;)
फोकट ते पौष्टिक काय ? ;)
20 Oct 2011 - 12:07 pm | सुहास झेले
यप्प... !!
आणि जी प्लस मी डिसेबल केलंय... बझ्झ बंद झाल्यावर बघू काय करायचं ते ;-)
गुगलने सगळ्यांना धंद्याला लावलंय :D :D :D
20 Oct 2011 - 12:20 pm | मदनबाण
जी प्लस मी डिसेबल केलंय... बझ्झ बंद झाल्यावर बघू काय करायचं ते
डिसेबल ? छ्या राव एनेबल करा एनेबल ! ;)
बाकी बझ बंद होणार हे नक्की...
http://www.theinquirer.net/inquirer/news/2117609/google-shut-buzz-products
गुगलने सगळ्यांना धंद्याला लावलंय
खरयं... फेसबुकच्या आणि बझच्या चुकां मधुन शिकुन त्यांनी प्लस मधे टाळक वापरल आहे असं ही गुगलवाली मंडळी म्हणत आहे रे...लेट्स ट्राय इट बडी, ;)
20 Oct 2011 - 12:35 pm | सुहास झेले
हो बझ्झ बंद होतंय ते नक्की, पण जी+ शॉट होता रे डोक्याला सुरुवातीला... जानेवारीत बघू. तोपर्यंत बझ्झ जिंदाबाद :) :)
22 Oct 2011 - 1:15 pm | मदनबाण
पण जी+ शॉट होता रे डोक्याला सुरुवातीला... जानेवारीत बघू. तोपर्यंत बझ्झ जिंदाबाद
ह्म्म खरयं... लोड व्ह्यायला पण लय टेम घेत च्यामारी,पण होईल नीट... :)
फेसबुक हे ओल्डस्कुल स्लॅमबुक सारखे वाटते,त्यामुळे ते कधी आवडले नाही,शिवाय प्रायव्हसीचे वांदे ! त्यामानाने प्लस जास्त चांगले आहे असे सध्या तरी दिसतय...
20 Oct 2011 - 10:57 am | गवि
आता फ्लिपकार्टने या धाग्यावरच्या आपल्या प्रशंसकांना एकेक पुस्तक भेट म्हणून पाठवायला काही हरकत नाही.. :)
22 Oct 2011 - 11:23 am | तिमा
आम्ही तर चहा पण ऑनलाईनच मागवतो.
22 Oct 2011 - 3:24 pm | वाहीदा
एन्ड देन व्हॉट अबाऊट 'पाणी' ? ;-)
चहासाठी पाणी पण लागते ना अन साखर पण ..अरे हो आले पण राहिले की ..
मग ते पण ऑनलाईन का ? ;-)
22 Oct 2011 - 1:03 pm | सुहास..
आम्ही तर चहा पण ऑनलाईनच मागवतो. >>.
=))
=))
=))
लईच, आवराच !
22 Oct 2011 - 3:30 pm | चिरोटा
१९९८-२०००च्या काळात असेच स्वप्न बघणार्या डॉट्.कॉम कंपन्यांना असेच 'आवरा' म्हणायची वेळ आली होती. पाळीव जनावरांचे खाणे ऑनलाईन विकणार्या, लग्नाच्या मंडपात शिरायच्या वेळेपासून हनिमूनला जाईपर्यंत जे जे काही लागते ते सर्व ऑनलाईन विकणार्या डॉट कॉम कंपन्या होत्या. भारतात चायपानी.कॉम, गपशप्.कॉम नामक कंपन्या होत्या. मुंबईतल्या उपनगरात खायचे पान ऑनलाईन विकणारा पानवाला होता. एकूण ऑनलाईन पाने मागवून किती लोकांनी तोंडे लाल केली काही कल्पना नाही पण त्याच्या ह्या 'आयडियाचे' कौतुक झाले होते.त्यात कडी म्हणजे सन माय्क्रोसिस्टिम नावाची एक मोठी कंपनी स्वतःला "we are dot in dotcom" म्हणून घ्यायची.२००१ साली डॉटचे बारा वाजले आणि सगळे जमीनीवर आले.
24 Oct 2011 - 11:54 am | मैत्र
ऑनलाईन विक्रीच्या किंवा खरं तर सर्वसामान्य ग्राहकांकडून होणार्या खरेदीच्या व्हॉल्युम्स (मराठी?) मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने अनेक साईट आणि कंपन्या यात उतरल्या. एकूण इतर खर्च कमी -- इन्फ्रास्ट्रक्चर / कॅपिटल कॉस्ट जवळजवळ नाही. साईट / कॉल सेंटर हाच मुख्य ऑपरेटिंग एक्स्पेंडिचर. शिपिंग हे सहसा भौगोलिक विभागानुसार कंत्राटाने दिलेले. बर्याच वेळा तर फक्त ट्रेडिंग कि ऑर्डर मिळाली की एकीकडून माल उचलायचा (आधी ठरवलेल्या किंमतीत) आणि दुसरा शिपर वापरून पोचवायचा. लो / मॉडरेट मार्जिन आणि बेटर व्हॉल्युम्स. एकूणात सध्या सद्दी चांगली चालू आहे असं मॉडेल.
आत्तापर्यंत तरी अनुभव चांगला आहे. ७ हजाराचा मोबाईल इबे इंडियावर २-३ वर्षांपूर्वी घेतला. बाजारात नसलेला रंग मिळवून सर्वात कमी किंमतीत आणि पूर्ण वॉरंटीसह पाठवला होता इबे सेलरने आणि त्यानेच तो पोचेपर्यंत पाठपुरावा केला. पुस्तके काही वेळा घेतली. गेल्याच आठवड्यात इंडिया प्लाझा वर एक पुस्तक घेतले एकूण ४०% कमी किंमतीत २-३ दिवसात उत्तम पॅकिंग मध्ये नीट आले.
ऑनलाईन पुष्पगुच्छ / मिठाई पाठवण्याचा अनुभवही उत्तम आहे. -- www.fernsnpetals.com / www.floraindia.com
अतिशय वेळेत, उत्कृष्ट दर्जाची फुले आणि मिठाई. अर्थात भाव तसा असतो पण सोय आणि सेवा उत्तम आहे.
फ्लिपकार्टचा एकूण अनुभव लोकांचा चांगला आहे. एक नवीन मोबाईल आठवड्यात येतो आहेच तेव्हा समजेलच..
एकूणात गेल्या काहि वर्षात या स्वरुपाच्या सेवांचा दर्जा स्पर्धेमुळे खूपच सुधारला आहे.
24 Dec 2011 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
फ्लीपकार्ट मस्त आहे राव.
सर्वप्रथम मोबाईलचं कव्हर. (येतं का नाही ते पाहण्यासाठी अक्कल खाते) नंतर पेन ड्राइव्ह आणि आत्ता फिलीप्सचा डिव्हीडी प्लेयर. मस्त पॅकींग मधे पोहचलं.
धन्यवाद मित्र हो......!
-दिलीप बिरुटे
25 Dec 2011 - 7:21 am | सुहास झेले
चांगली शक्कल.... ;)
पण फ्लिपकार्ट ने आजवर कधीही निराश केलं नाही..... आणि करेल अशी शक्यता पण नाही.
म्हणतात नं If you like me, raise your hand, if not raise your standard :D :D :D
25 Dec 2011 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पण फ्लिपकार्ट ने आजवर कधीही निराश केलं नाही..... आणि करेल अशी शक्यता पण नाही.
असं वाटतंय खरं पण माझ्या तालुक्याच्या गावी फ्लीपकार्टा डॉट कॉम पोहचू शकले नाही. माझ्या असं लक्षात आलं की, तालुक्याच्या गावी या कुरीयर्स वाल्यांना जरा वस्तू पाठवायचं जरा जिवावर येतं. मला कुरीयर्सवाल्यांचा फोन आला की, आपल्या गावात आमची कुरीयर सर्व्हीस नाही. आपण आपली वस्तू आमच्या कुरीयर सेंटर वर घेऊन गेला तर बरे राहील. नसता आपली वस्तू आम्ही परत पाठवत आहोत. मी म्हटलं शुन्य मिनिटात आपल्या कुरीयर्सवर हजर होतो. फ्लीपकार्ट डॉट कॉमला मी आपण तीन-चार दिवसात वस्तू मिळेल असं म्हणाला होता परंतु अजूनही मला काही वस्तू मिळाली नाही असं म्हणल्यावर या फ्लीपकार्ट डॉटा कॉम वाल्यांनी सतत फोन करुन मला वस्तू मिळाली पाहिजे म्हणून माझ्या ते सतत संपर्कात होते, मला त्यांचा अनुभव खूप आशादायी वाटला होता. अर्थात पुढे मी माझ्या जिल्ह्याच्या ठिकाणचा पत्ता देऊ लागल्यामुळे लैच अर्जंट सर्वीस मिळाली हे सांगणेही गरजेचेच आहे. :)
-दिलीप बिरुटे
8 Oct 2014 - 12:40 pm | मदनबाण
सध्या दिवाळीमुळे अनेक बेस्ट डील्स विविध ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवर उपलबध होणार आहेत... फ्लीपकार्ट वाजलेली पुंगी आणि त्याचे माफी पत्र सध्या जालावर चर्चेचा विषय आहे.
सध्या कुठे कुठे कुठल्या प्रॉडक्टवर बेस्ट डील आहे ते सांगेल का ? त्यासाठी वेगळा धागा काढला तरी चालेल. :)
आज मी माझे पहिले ऑनलाईन शॉपिंग केले http://www.amazon.in वर. एक्स्टर्नल १ टिबी हार्ड डिस्क्च्या चांगल्या ऑफर वाटल्या म्हणुन Seagate Expansion 1TB Portable External Hard Drive घेतली 7,200.00 ची ही Hard Drive 3,998.00 पडली. आता डिलेव्हरी वाट पाहतो आहे.
कॅमेरा प्रेमींसाठी लेन्सच्या ऑफर सुद्धा दिसत आहेत. ;) Nikon AF-S DX Nikkor 35mm f/1.8G Prime Lens ही १६,०००.०० ची लेन्स चक्क ७,२४९.०० उपलबध आहे बरं का. ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Hiring records 14% growth; IT/Telecom sector shines again: TimesJobs RecruiteX