काही श्लोक

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
7 Oct 2011 - 3:12 am

आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही.

आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा. (६) बीज आदि मंत्र (७) नामावली

गायत्री मंत्र , अष्टक, पंचरत्नम वगैरे वरील यादीत घातले नाही कारण त्या सर्वात देवतेची स्तुती असते तेव्हा ते पहील्या प्रकारात मोडतात आणि गायत्री हा छंदाचा प्रकार झाला, अष्टकात ८ श्लोक असतात वगैरे पण पहील्याच प्रकारात मोडतात.

पण काही श्लोक असे आढळले ज्यांना बराचसा युनिव्हर्सल अपील आहे. म्हणजे जे एकाच देवतेपुरते सीमीत नसून जे व्यापक आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे -

गणपती अथर्वशीर्षामधील शांतीमंत्र -

ओम् भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: |
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: |
व्यशेम देवहितं यदायु:

अर्थ - हे देवांनो आमच्या कानांवर (सदैव) शुभ वचने पडावीत.
आमच्या नयनांना (सदैव) शुभ द्रुश्ये दिसावीत.
तुमची स्तुती करण्यासाठी आम्हाला भरपूर आयुष्य लाभो.

दुसरा मंत्र आहे ऋग्वेदातील -
'आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:
अर्थ - चहूबाजूंनी आमच्यापर्यंत कल्याणकारी विचार येवोत.

तीसरा मंत्र आहे -
सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥

अर्थ - सर्वजण सुखी व्हावेत. सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. सर्वांनी शुभ घटना/ गोष्टी पहाव्यात. कोणाच्याही वाट्याला यातना / दु:ख येऊ नये.

मिपाकरांना अजून काही असे "युनिव्हर्सल अपील" असणारे श्लोक माहीत असल्यास भर घालावी.

धर्मसद्भावनाआस्वाद

प्रतिक्रिया

मिपाकरांना अजून काही असे "युनिव्हर्सल अपील" असणारे श्लोक माहीत असल्यास भर घालावी.

ज्ञानदेवाचं पसायदान. अर्थात त्या मराठीतल्या ओव्या आहेत. श्लोकाच्या व्याखेत बसतील की नाही याबद्दल शंका आहे.

तै, हे उपनिषदं, पोथ्या-पुराणं, स्मृती, वेद वगैरेंच्या जोडीने कधीतरी सावरकरांचे "विज्ञाननिष्ठ निबंध" ही वाचा. :)

अत्रुप्त आत्मा's picture

7 Oct 2011 - 4:14 pm | अत्रुप्त आत्मा

सावरकरांचे "विज्ञाननिष्ठ निबंध" ही वाचा. ... विशेषतः मनुष्याचा देव आणी विश्वाचा देव

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Oct 2011 - 6:41 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

शुचि, चांगलंच घडावं, दिसावं, कानावर पडावं अशी आशा असणं गैर नाही. फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं.

हे खेदाने नमूद कर्तो.

अर्धवटराव's picture

8 Oct 2011 - 12:16 am | अर्धवटराव

प्रचंड हसु आले...
या विनोदाला वैज्ञानीक बैठक आहे काय... विचार करतोय...

(विनोदी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

8 Oct 2011 - 1:29 pm | आत्मशून्य

आपण विचार करताय ही फार चांगली गोश्ट आहे.

अर्धवटराव's picture

8 Oct 2011 - 8:27 pm | अर्धवटराव

तुम्हाला परत विनोद करायची हुक्की आलेली दिसतेय !!
हा हा हा हा

(तुफान विनोदी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

8 Oct 2011 - 8:50 pm | आत्मशून्य

हसायची हूक्कि आलेली असली की सगळं काही तूफान विनोदी वाटत नै ?

शहाणपण आणि विनोद हातात हात घालुन चालतात... असं कोण्या महान व्यक्तीने म्हटलय (याला सुद्धा विनोद म्हणावा काय?? ;) )

(महान) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

11 Oct 2011 - 10:15 pm | आत्मशून्य

कोण्या महान व्यक्तीने म्हटलेलं काही तूम्ही लक्षात ठेवू शकता, ही सूध्दा फार चांगली गोश्ट आहे.

अर्धवटराव's picture

12 Oct 2011 - 4:14 am | अर्धवटराव

हा चांगुलपणा जाणवुन देण्याबद्दल आभारी आहे.
पण तसं फार काहि कठीण नाहि ते..

(आभारी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

12 Oct 2011 - 10:18 am | आत्मशून्य

तूम्हाला तूमचा चांगुलपणा जाणवुन देण्याबद्दल आभार माननं फारस कठीण वाटत नाहि पण फक्त असं घडणार नाही याची तयारी ठेवणं इष्ट. ते जास्त व्यवहार्य वाटतं, नाही का ?

अर्धवटराव's picture

12 Oct 2011 - 7:21 pm | अर्धवटराव

"ध" चा "मा" केलात. चांगुलपणा असणे फार कठीण नाहि...
पण तो जाणवुन देण्याकरता तुम्ही नेहमी अव्हेलेबल राहाणार काय?

(प्रश्नार्थी) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

13 Oct 2011 - 12:18 am | आत्मशून्य

वाक्य व्यवस्थीत वाचावे.

अर्धवटराव's picture

13 Oct 2011 - 2:15 am | अर्धवटराव

चुका करणे हा आमचा स्वभाव आहे... त्याला इलाज नाहि. पण चुका अर्धवट नाहित ना???

(करेक्ट) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

13 Oct 2011 - 2:19 am | आत्मशून्य

.

अर्धवटराव's picture

13 Oct 2011 - 11:01 pm | अर्धवटराव

टारोबांनी म्हणतात "शक्यता नाकारता येत नाहि" !!

(चान्सबाज) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

13 Oct 2011 - 11:42 pm | आत्मशून्य

.

अर्धवटराव's picture

14 Oct 2011 - 3:00 am | अर्धवटराव

म्हणजे शक्यता नकारता येत नाहि.

(रीपीटींग) अर्धवटराव

आत्मशून्य's picture

14 Oct 2011 - 1:19 pm | आत्मशून्य

नाही का ?

अर्धवटराव's picture

14 Oct 2011 - 7:56 pm | अर्धवटराव

होतं असं कधी कधी !!

(अब्दुल "कमाल") अर्धवटराव

पैसा's picture

14 Oct 2011 - 8:14 pm | पैसा

प्रश्नोत्तरामधला वेळ पाहता तुमचा हा संवाद कधी पुरा होणार?

आत्मशून्य's picture

14 Oct 2011 - 9:39 pm | आत्मशून्य

.
@पैसा
अहो त्यांच मत अर्धवट आहे की फक्त डावीकडे झूकलेलं याचा सोक्ष व मोक्ष जोपर्यंत त्यांना लागत नाही तोपर्यंत मला वाटत नही ते संवाद पूरा होउ देतील... बाकी हे कारण सोडून इतर काही त्यांच्या मनात असेल तर ते वो ही जाणे....

काय ? माझं म्हणन पटत नाहीये ? बघाच आता त्यांचा यावर प्रतीसाद आज ना उद्या येतो की नाही ते.

अर्धवटराव's picture

15 Oct 2011 - 8:27 pm | अर्धवटराव

मला कल्पनाच नव्हती कि माझी मते डावीकडे वगैरे झुकलेली असतील (डावीकडे मत झुकणे म्हणजे काय हे ही नेमके माहित नाहि :( )
हां... अर्धवट मत असण्यबद्दल काहि संशय नसावा... ते तर अगदी उघड आहे. पण तुम्ही संवाद पूरा व्हायची वाट बघताय तर मी फुल्लस्टॉप मारतो.

(विसंवादी) अर्धवटराव

आपण फुल्लस्टॉप मारला आहेच तर मग आता आपण उल्लेखित केलेल्या शंकांचा सोक्ष व मोक्ष न होताच विषय मिटला म्हणतो.

चेतन सुभाष गुगळे's picture

7 Oct 2011 - 1:32 pm | चेतन सुभाष गुगळे

गंगाधर पानतावणे यांचं एक वाक्य आठवलं :-

निराशादेखील माणसाला बळ पुरविते कधी कधी

माझ्या माहीतीमधले ... आणि जे सर्वांनाच माहीती असतील

कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती |
करमूले तु गोविंदम् प्रभाते कर दर्शनम् ||

आपल्या पुर्वजांनी सुद्धा कर्मवाद महत्वाचा मानला आहे ... दैववाद नाही

विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्वमे ||

आणि हे पृथ्वी (विष्णुपत्नी) तुला नमन करते/तो आणि माझ्या पायांचा तुला स्पर्श होतो म्हणून तु मला क्षमा कर .
(आपल्याकडून दूसर्‍याला होणार्‍या त्रासाबद्दल सदैव जाणिव ठेवण्याची शिकवण दिलेली आहे )

बाकी आदिती म्हणते ते अगदी योग्य ...

म्हणूनच " Hope for the Best , prepare for the Worst "

आमच्या शाळेत एक शिक्षिका म्हणत असत, " whatever you think, god says tathastu. so always think positive". ते आठवलं.

आण्णा चिंबोरी's picture

8 Oct 2011 - 12:00 am | आण्णा चिंबोरी

पश्येमाक्षिभिर्यजत्रा नसून पश्येमाक्षभिर्यजत्राः असावे असे वाटते. (नुकतेच अथर्वशीर्ष पाठ केल्याने आठवत आहे)

श्लोक चांगलेच आहेत.
पण वेदोक्त श्लोकांत स्वर असतात.. त्यांच्यामुळे उच्चारात फरक पडतो. ते तसेच लिहावेत.

राघव

पिवळा डांबिस's picture

9 Oct 2011 - 11:06 am | पिवळा डांबिस

काले वर्षतु पर्जन्यः, पृथिवि: सस्यशालिनी
देशो यं क्षोभरहितो, ब्राम्हणा: सन्तु निर्भया: |
अपुत्रा पुत्रिणा सन्तु, पुत्रिणा सन्तु पौत्रिणा
अधना सधना सन्तु, जीवन्तु शरदः शतम् ||

पाऊस वेळेवर पडो, धरती पिकाने भरो...
देश संतुष्ट होवो, बाम्हण (विद्वान)निर्भय होवोत...
संतानरहितांना पुत्र होवोत, पुत्रधारकांना नातू होवोत
निर्धनांना धनलाभ होवो, सर्वजण शंभरी गाठोत....

दोन वर्षापूर्वी एका भारतभेटीत एका निकटच्या स्नेह्याच्या पुत्राच्या लग्नाला जायचा प्रसंग आला...
तोही पुण्यातल्या सदाशिवपेठेत!!!
लग्नाची ट्रेडिशनल पंगत बसली असतांना अचानक मला एक श्लोक म्हणण्याचा आग्रह झाला...
काही लोक हसले, बदसूर असा की हा अमेरिकेला जाऊन सगळं विसरलेला, हा काय श्लोक म्हणणार?
मग मी वरील श्लोक उच्चारवात म्हटला....
:)
माणसं श्लोकाच्या शेवटी जागर करायला विसरली...
ज्यांना भान होतं त्यांनी गुळमुळीत 'जय जय रघुवीर समर्थ' केलं......
शेवटी मलाच त्यांना सांगावं लागलं की जर मराठी श्लोक म्हंटला तर 'जय जय रघुवीर समर्थ; म्हणतात (कारण मराठीत म्हटले जाणारे बहुतेक श्लोक रामदासस्वामींचे आहेत) , पण जर श्लोक संस्कृतात असेल तर "स्वामिन्, सर्वेजना: सुखिनौ भवन्तु" म्हणतात....
:)
...
...
...
...आणि मी पाताळविजयम सिनेमातल्या राक्षसासारखा खदखदून हसलो, भर पंगतीत!!!!!!!
:)

पैसा's picture

9 Oct 2011 - 11:14 am | पैसा

पिडां, तुमची आठवण लै भारी आणि श्लोक तर कय बोलावं? सगळ्यांचं कल्याण होऊ दे या अर्थाची ही पहिली प्रार्थना असावी.

अमेरिकेत रहात असून सुद्धा पुण्यासारख्या जगप्रसिद्ध शहरात आणि सदाशिव पेठे सारख्या महत्वाच्या ठिकाणी आपले मित्र आहेत हे दाखवण्याचा एक क्षीण प्रयत्न .

जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही .

अवांतर : पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे.

पिवळा डांबिस's picture

9 Oct 2011 - 11:51 am | पिवळा डांबिस

जेवणाच्या पंगती मधे घडलेला प्रसंग वर्णन करताना.. आळूची भाजी आणि मठ्ठ्याचा उल्लेख न करणं तसेच पंगतीत किती जिलब्या संपवल्या हे न सांगण अजिबात योग्य नाही .
आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा...
ज्याची त्याची समज आणि आवड....
:)

पाताळविजयम हा चित्रपट जालावर उपलब्ध असल्यास दुवा देणे.
शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल.
सापडला की परत इथे या, मग चर्चा सुरु करू.....
:)

आम्हाला श्लोक महत्वाचा होता, तुम्हाला आळूची भाजी अन मठ्ठा...
ज्याची त्याची समज आणि आवड...
.

हा झाला तुमचा अनिवासी, अपुणेरी दृष्टीकोन ... आमच्या पुण्यात काय चालतं .. म्हणजे काय महत्वाचं असतं ते सांगीतलं.

शोधा. शोधा म्हणण्यापेक्षा जरा मराठी साहित्य वाचा, संदर्भ सापडेल.
आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही .

पिवळा डांबिस's picture

9 Oct 2011 - 6:14 pm | पिवळा डांबिस

आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी दूसर्‍याला संदर्भ शोधण्यास सांगणे बरोबर नाही .
मला मुळात माझं म्हणणं आहे त्यापेक्षा अजून स्पष्ट करायचंच नाही. तुम्हाला जर ते आकलन होत नसेल तर तो तुमचा प्रश्न...

पाताळविजयम वागैरे माहित आहे हो मला ...

कृ. ह. घे. ... ( हे वरच्या प्रतिक्रियांबरोबर देखील वाचणे .)

पिवळा डांबिस's picture

10 Oct 2011 - 10:29 pm | पिवळा डांबिस

ओके!
ह. घेतलं!!
:)

मितभाषी's picture

10 Oct 2011 - 2:51 pm | मितभाषी

प्रवचन देता देता बाई दणादण ड्वाले मारतेय हे पाहुन ड्वाले पाणावले

विकास's picture

12 Oct 2011 - 12:47 am | विकास

ॐ असतो मा सद्गमय ।
तमसो मा ज्योतिर्गमय ।।
मृत्योर्मामृतं गमय ।
ॐ शान्ति शान्ति शान्ति ।।

---------------------

जेवतानाचा:

वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे
सहज हवं होते नानाम घेता फुकाचे
जीवन करी जीवित्वा अन्न है पूर्ण ब्रम्ह
उदाराभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म

अथवा

मुखी घास घेता करावा विचार
कशासाठी हे अन्न मी सेवणार
घडो माझीया हातूनी देश सेवा
म्हणोनी मिळूदे मला शक्ती देवा

त्याचेच हिंदी आणि अधिक वैश्विक रुपांतरः

अन्नग्रहण करनेसे पेहले विचार मनमे करना है
किस हेतूसे इस शरीर का रक्षण पोषण करना है
हे परमेश्वर एक प्रार्थना, नित्य तुम्हारे चरणोंमे
लग जाये तन मन धन मेरा, विश्व धर्म की सेवा मे

ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् ।
ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥

ॐ सह नाववतु ।
सह नौ भुनक्तु ।
सह वीर्यं करवावहै ।
तेजस्विनावधीतमस्तु ।
मा विद्‌विषावहै ॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:: ॥

अत्रुप्त आत्मा's picture

15 Oct 2011 - 7:20 am | अत्रुप्त आत्मा

ब्रहमार्पणं ब्रहमहविर्‌ब्रहमाग्नौ ब्रहमणा हुतम् ।
ब्रहमैव तेन गन्तव्यं ब्रहमकर्मसमाधिना ॥

हरिर्दाता हरिर्भोक्ता हरिर्रंन्नम प्रजापति:।
हरिर्विप्रःशरीरस्थो भुंक्ते भोजयते हरि:॥

चतुर्भिश्च चतुर्भिश्च द्वाभ्यां पंचभिरेवच।
हूयतेच पुनर्द्वाभ्यां समे विष्णु: प्रसीदतू॥ ................ अता पूर्ण झाला... :-)

मदनबाण's picture

17 Oct 2011 - 5:54 pm | मदनबाण

मना सज्जना भक्तिपंथेचि जावें।तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें॥
जनीं निंद्य तें सर्व सोडूनि द्यावें।जनीं वंद्य ते सर्व भावे करावे॥२॥

प्रभाते मनी राम चिंतीत जावा।पुढे वैखरी राम आधी वदावा॥
सदाचार हा थोर सांडूं नये तो।जनीं तोचि तो मानवी धन्य होतो॥३॥

जनीं सर्वसूखी असा कोण आहे।विचारें मना तूंचि शोधूनि पाहे॥
मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले।तयासारिखे भोगणें प्राप्त जाले ॥११॥

संदर्भ :--- http://goo.gl/DZy3M