काही श्लोक
आपण जे काही वाचतो, पहातो त्याचे आपल्या मनःपटलावर विचारतरंग उमटत असतात. आणि हे बरेवाईट विचारतरंग मूर्त स्वरुपात घटना बनून आपल्या आयुष्यात येतात. मला याचा इतक्यादा अनुभव आला आहे की योगायोग म्हणवत नाही.
आतापर्यंत देवाची भक्ती करताना मी जे काही मंत्र म्हटले आहेत त्यामध्ये ढोबळमानाने मला पुढील प्रकार आढळले - (१) देवतेची स्तुती, (२) रक्षण करणारे कवच, (३) सुप्रभात, (४) धूप, शेज आदि आरती, (५)पाळणा. (६) बीज आदि मंत्र (७) नामावली
गायत्री मंत्र , अष्टक, पंचरत्नम वगैरे वरील यादीत घातले नाही कारण त्या सर्वात देवतेची स्तुती असते तेव्हा ते पहील्या प्रकारात मोडतात आणि गायत्री हा छंदाचा प्रकार झाला, अष्टकात ८ श्लोक असतात वगैरे पण पहील्याच प्रकारात मोडतात.
पण काही श्लोक असे आढळले ज्यांना बराचसा युनिव्हर्सल अपील आहे. म्हणजे जे एकाच देवतेपुरते सीमीत नसून जे व्यापक आहेत. त्यातील काही पुढीलप्रमाणे -
गणपती अथर्वशीर्षामधील शांतीमंत्र -
ओम् भद्रं कर्णेभि: शृणुयाम देवा: |
भद्रं पश्येमाक्षिभिर्यजत्रा: |
स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनुभि: |
व्यशेम देवहितं यदायु:
अर्थ - हे देवांनो आमच्या कानांवर (सदैव) शुभ वचने पडावीत.
आमच्या नयनांना (सदैव) शुभ द्रुश्ये दिसावीत.
तुमची स्तुती करण्यासाठी आम्हाला भरपूर आयुष्य लाभो.
दुसरा मंत्र आहे ऋग्वेदातील -
'आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:
अर्थ - चहूबाजूंनी आमच्यापर्यंत कल्याणकारी विचार येवोत.
तीसरा मंत्र आहे -
सर्वे भवन्तु सुखिनः। सर्वे सन्तु निरामयाः।
सर्वे भद्राणि पश्यन्तु। मा कश्चित् दुःख भाग्भवेत्॥
अर्थ - सर्वजण सुखी व्हावेत. सर्वांना उत्तम आरोग्य लाभावे. सर्वांनी शुभ घटना/ गोष्टी पहाव्यात. कोणाच्याही वाट्याला यातना / दु:ख येऊ नये.
मिपाकरांना अजून काही असे "युनिव्हर्सल अपील" असणारे श्लोक माहीत असल्यास भर घालावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मिपाकरांना अजून काही असे
धनाजीरावांशी सहमत
शुचि, चांगलंच घडावं, दिसावं,
अशा वाटण्याल्या कोणतीही वैज्ञानीक बैठक नाही
हा हा हा हा हा !!!
वा वा वा....
नक्की ??
:)
अहो हि नाण्याची दुसरी बाजु आहे !!
कोण्या महान व्यक्तीने
धन्यवाद !!
तूम्हाला तूमचा चांगुलपणा
इथे तिथे !!
चूकतायं.
त्यात काय नविन...
कसं शक्य आहे ?
का नाहि?
म्हणजे ?
शक्यता आहे !!
कमाल है ?
हो तर !!
आँ?
कारण ?
बस्स्स का !!!!
स्पश्टीकरणाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
+१
माझ्या माहीतीमधले ... आणि जे
आमच्या शाळेत एक शिक्षिका
पश्येमाक्षिभिर्यजत्रा
श्लोक चांगलेच आहेत. पण
अजून एक!
लै भारी!
अमेरिकेत रहात असून सुद्धा
हा हा हा!!!
आम्हाला श्लोक महत्वाचा होता,
आपले म्हणणे स्पष्ट करण्यासाठी
पाताळविजयम वागैरे माहित आहे
ओह!
हॅहॅहॅ
अजून काही...
अता पूर्ण झाला...
मना सज्जना भक्तिपंथेचि