काश्मिरी पुलाव ..

Primary tabs

पियुशा's picture
पियुशा in पाककृती
8 Aug 2011 - 3:43 pm

काश्मिरी पुलाव :

हा माझा आवडता प्रकार आहे बर्याच दिवसापासून विचार करत होते कि ,एकदा वीकेण्ड्ला बनवावा ,पण साहित्याची जमवाजमव होत नव्हती.
गाजर आहे तर अननस नाही , अननस आहे तर सफरचंद नाही ,हिरवे मटार आहेत तर काजुबदाम संपलेले !
शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व साहित्य जमा करायचं आणी पुलाव बनवायचाच !
योगायोग बघा ,घरातले सर्वजण साखरपुड्याला बाहेर गेलेले ,घरात फक्त मी आणि आज्जी .
म्हटलं चला आज श्री गणेशा करूनच टाकूया .
एरवी किचनमध्ये माझी लुडबुड चालू असते तेव्हा " झाले हिचे उपद्व्याप सुरु ,,"हिला काय अवार्ड-बिवार्ड मिळणार आहे का? "उगा का संजीव कपूरच्या पोटावर पाय " असेच टोमणे ऐकायला मिळतात पण आज कुणी नव्हत टोमणे मारायला ;)
असो ..
चला मग लागा तयारीला .....

साहित्य :
२ कप बासमती तांदूळ (लांब शीत असणारा )
२ कप दुध
१ कप मलई
१ चमचा साखर ,मीठ चवीनुसार
जीर अर्धा चमचा
लवंग ३-४ ,
दालचिनी १-२ तुकडे ,
हिरवी इलायची ४-५
१ तेज पत्ता ( तमाल पत्र )
२ चमचे तूप
मनुके २ चमचे
गाजराचे काप अर्धी वाटी
हिरवा मटार ३ चमचे ,
बिन्स २ चमचे
मक्याचे दाने उकडलेले १ चमचा (ऑप्शनल)
अननसाचे तुकडे अर्धी वाटी (तुम्हाला जी फळे आवड्तात त्या नुसार)
काजू ,बदाम आवडीनुसार हवे तेवढे
सुके काळे मनुके २ चमचे
केसर चुटकी भर

कृती :
बासमती तांदूळ स्वच्छ धुवून १५ - २० मिनिट ड्रेन करा
दुध ,मलाई ,साखर ,केसर यांचे मिश्रण करून घ्या .
एका नॉनस्टिक पॅनमध्ये /कुकरमध्ये मध्ये २ चमचे तूप गरम करा
त्यात जीरा ,दालचिनी ,लवंग ,तेजपत्ता याचा तडका द्या
आता यात धुतलेले तांदूळ ३-4 मिनिट हळुवार परतून घ्या
चवीनुसार मीठ घाला
आता यात मिश्रित दुध घालून पॅनवर झाकण ठेवा
तांदळाची शीत अखंड राहावी या करिता त्याला एकदाच व्यवस्थित हलवून घ्या.
तांदूळ अर्धा शिजला कि , त्यात गाजराचे काप,बिन्स ,सुके मनुके ,अननसाचे काप ,काळे मनुके ,तळुन घेतलेले काजु घाला.
(फळे शिजायला जास्ती वेळ लागत नाही म्हणून ,तांदूळ अर्धा शिजल्यावर फळे घालावीत ,नाहीतर फळांचा लगदा होईल )

हा पुलाव चवीला गोडसर आणि यम्मी लागतो :)
(तुम्ही यात तुमची आवडती फळे पण घालू शकता संत्र ,सफरचंद ,अननस ,काळी द्राक्ष इत्यादी )
pulaw

प्रतिक्रिया

स्वानन्द's picture

8 Aug 2011 - 3:51 pm | स्वानन्द

मस्तच!!
म्हणजे भात दुधात शिजवायचा?? आणि ते प्लेट्मध्ये दोन सोयाबीन चे ठो़कळेआहेत का?
अवांतरः स्पष्ट चित्र टाकल्याबद्दल अभिनंदन!!

धन्यवाद :)
हो ते सोया क्युब्स आहेत
भात काय म्हणतोस? हो पुलाव दुधात शिजवायचा
मला पण जमतय आता फटु कसे टाकायचे ते ;)

तसचं, सोया क्यूब्ज बघून डोळे पाणावले.

पल्लवी's picture

8 Aug 2011 - 4:06 pm | पल्लवी

गोड पुलाव मला फारसा रुचत नाही.
पण फटु बघुन भूक चाळवली.. एकदम ढिन्च्याक.. आवडेश.

स्पा's picture

8 Aug 2011 - 4:21 pm | स्पा

ओह्ह.. आय सी .. ते सोय क्युब्स आहेत होय...

हॅ हॅ

मृत्युन्जय's picture

9 Aug 2011 - 1:36 pm | मृत्युन्जय

#$#@*^&@

तुझ्या कल्पनाशक्तीला शतशः प्रणाम

_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\__/\_

गणपा's picture

8 Aug 2011 - 4:24 pm | गणपा

गुरुदक्षिणा पोहोचली बर का. ;)
फटु लै कलरफुल आणि भारी आलाय.
फक्त ते गॉड लागत म्हणुन आम्ही त्यातुन फळे बाद करुन त्याच्या जागी कोलंबी, चिकन वा मटण टाकुन प्रयोग करु. ;)

पियुशा's picture

8 Aug 2011 - 4:42 pm | पियुशा

@ गणपा
धन्यवाद गुरुवर्य ;)

कच्ची कैरी's picture

8 Aug 2011 - 4:57 pm | कच्ची कैरी

व्वा !पियु ,फोटो एकदम मस्त आला हं! लगे रहो :)

गोड पुलाव केल्याबद्दल निषेध.. आपल्याला तिखट चवीचा पुलाव आवडतो. त्याची फर्माईश पूर्ण केली जावी..

- (तिखट) पिंगू

गोड पुलाव केल्याबद्दल निषेध.. आपल्याला तिखट चवीचा पुलाव आवडतो. त्याची फर्माईश पूर्ण केली जावी..
आयला, ह्या मि पा वरच्या काही लोकान्च काही कळ्तच नाही राव !
तिखट ,झणझणीत बनवल तर "काय नुसता तिखट्जाळ पा.क्रु.
आणी गोड बनवल ,तर तिखट पाहिजे ?
कहा (डुब मरे ) जाये हम ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

11 Aug 2011 - 5:35 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बाप आणि मुलाची जोडी गाढवाबरोबर जात असते, ती गोष्ट माहित आहे ना ?

बाकी, पाकृ छान. गणपा शेठ म्हणतात त्याप्रमाणे याचा सामिष प्रयोग व्हायला पाहिजे.

सूड's picture

8 Aug 2011 - 5:44 pm | सूड

फटू दिसत नाहीये.

कच्चा पापड पक्का पापड's picture

8 Aug 2011 - 6:10 pm | कच्चा पापड पक्क...

कलरफुल फोटो :-)
मला तर बुवा गोड भात आवडतो .
नक्की प्रयत्न करुन बघेन

निवेदिता-ताई's picture

8 Aug 2011 - 6:13 pm | निवेदिता-ताई

मस्त ग ...करुनच पहाते...पुलाव

स्मिता.'s picture

8 Aug 2011 - 6:15 pm | स्मिता.

पाकृ आणि फोटु, दोन्ही पण मस्त गं पियुशा!

शिकली गं बाई पोरगी एकदाची ;)

विशाखा राऊत's picture

8 Aug 2011 - 6:23 pm | विशाखा राऊत

अरे वाह पियु शिकलीस ग :)

एकदा कॉलेजमध्ये असताना खाल्ला होता पण अननस गोड भात आवडला नाही त्यापेक्षा तिखट काहीही चालेल :)
बाकी फोटो मस्त

पिवळा डांबिस's picture

8 Aug 2011 - 9:50 pm | पिवळा डांबिस

शेवटी या विकेंडला ठरवलंच सर्व साहित्य जमा करायचं आणी पुलाव बनवायचाच !
योगायोग बघा ,घरातले सर्वजण साखरपुड्याला बाहेर गेलेले ,घरात फक्त मी आणि आज्जी .
बिचारी आज्जी!
या वयात तिला अननसाची खिचडी खायला लागतीय!!!!!!
;)

बिचारी आज्जी!
या वयात तिला अननसाची खिचडी खायला लागतीय!!!!!!

हा काका पक्का जागतोय त्याच्या नावाला. =)) =))

इंटरनेटस्नेही's picture

9 Aug 2011 - 1:53 pm | इंटरनेटस्नेही

बर्‍यापैकी जमले आहे. फोटो देखीलॅ चान चान..
पियुषा विरोधकांकडे संपुर्ण दुर्लक्ष कर, आणि पाककृतींचे प्रयोग सुरु ठेव.. शुभेच्छा!

सुंदर फोटो. पुलाव ही छान सजवला आहे आपण.
पाइनापल राईस मला आवडतो. त्यामुळे हा पुलाव ही आवडेल.

सुंदर फोटो. पुलाव ही छान सजवला आहे आपण.
पाइनापल राईस मला आवडतो. त्यामुळे हा पुलाव ही आवडेल.

सविता००१'s picture

9 Aug 2011 - 7:23 pm | सविता००१

मस्त आहे तुझी रेसिपी आणि फोटोपण धिन्च्याक.

फोटो खुप छान आला आहे..... आवड्ला :)
गोडसर पुलाव चविला वेगला आणि रुचकर दिसतोय!!!!!

सुप्रिया's picture

11 Aug 2011 - 11:01 am | सुप्रिया

मस्त रेसिपी. पुलाव आवडला.

देशीसंत्रा's picture

22 Sep 2011 - 5:40 pm | देशीसंत्रा

काश्मिरी पुलाव चा फोटु

पाकृ अतिशय सुंदर आहे. हा घ्या आमच्या प्रयोगाचा फोटु, आणि सांगा पास झालोय का नाही ते !

चिंतामणी's picture

30 Sep 2011 - 10:50 am | चिंतामणी

खाउन पाहील्याशिवाय कसा निर्णय देणार.

("आमच्या प्रयोगाचा फोटु" ह्या "आमच्या"मधे कोण कोण सहभागी आहेत???);) ;-) :wink:

@ देशी सन्त्रा
अहो फोटो दिसत नाहिये