मदत : दुवा कसा द्यावा?

गणपा's picture
गणपा in जनातलं, मनातलं
4 Aug 2011 - 4:52 pm

दुवा (लिंक) कसा द्यावा?

काही नवीन सदस्यांना भेडसावणारा अजुन एक प्रश्न म्हणजे एखाद्या गोष्टीचा दुवा कसा द्यावा.
माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न करित आहे.
(हीच एकमेव सोप्पी पद्ध्त आहे असा माझा मुळीच दावा नाही. :) )

१) ज्याचा दुवा द्यायचा आहे त्याचा जालावरील पानाचा पत्ता (URL) कॉपी करावा.

२) प्रतिसादाची खिडकी उघडावी.

हवा असलेला शब्द टंकावा. (जसे या उदाहरणात "पाककृती" टंकले आहे.)
तो शब्द हायलाईट करावा.
नंतर Insert / Edit link या बटणावर क्लिकावे. (उजवी कडुन सहावं बटण.)
आणि मगाशी कॉपी केलेला पत्ता Link href मध्ये पेस्ट करावा.

पुर्वदृश्य करुन, मग प्रकाशित करावे.

तंत्रशिक्षणप्रश्नोत्तरेमदतमाहिती

प्रतिक्रिया

विनायक प्रभू's picture

4 Aug 2011 - 5:00 pm | विनायक प्रभू

थँक्स.
पातोळ्या खाउन नागपंचमी साजरी केलीत का नाहीत गणपा?

गणपा's picture

4 Aug 2011 - 5:03 pm | गणपा

कुणी नैवेद्यच नाही दाखवला. ;)

सहज's picture

4 Aug 2011 - 5:05 pm | सहज

गणपा द ग्रेट!!!

मागे असाच एक सोपा धागा मदत -मिपावर फोटो चिकटवणे करुन दिला होता.

व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2011 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार

व्यवस्थापनाने गणपाचे दोन्ही धागे वाविप्र मधे उपलब्ध करुन द्यावे.

सहमत आहे. (गणपाने ते आपल्या खवत लावल्यास अजुन उत्तम)

गणपा ह्या धाग्याबद्दल देखील तुला 'दुवा' द्यावा तेवढा कमीच ;)

वाचनखूण साठवल्या गेली आहे.

प्रशांत's picture

4 Aug 2011 - 6:43 pm | प्रशांत

गणपाशेठ..
कमी शब्दात अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद

विकास's picture

4 Aug 2011 - 6:44 pm | विकास

रेसिपी आवडली! ;)

धन्यवाद. वाविप्र मधे ठेवायला हवे. पण वाविप्र बघायला हवे हे नव्यांना कसे कळणार? ;)

पल्लवी's picture

4 Aug 2011 - 7:27 pm | पल्लवी

>>>>>रेसिपी आवडली!

सहमत आहे. आणि "प्रेझेंटेशन" ( पक्षी : स्क्रीनशॉट्स :) ) पण मस्त. :P

मृत्युन्जय's picture

4 Aug 2011 - 7:32 pm | मृत्युन्जय

प्रयत्न करुन बघतो दुवा बरोबर देता येतो आहे का ते

काय आज चूल बंद का?

नाही त्या नापाकक्रिया कसल्या करत बसलायस. ;)

ajay wankhede's picture

4 Aug 2011 - 9:48 pm | ajay wankhede

छ्यान.. अचुक माहिती दिल्याबद्द्ल धन्यवाद

मितभाषी's picture

4 Aug 2011 - 10:05 pm | मितभाषी
बिपिन कार्यकर्ते's picture

4 Aug 2011 - 10:42 pm | बिपिन कार्यकर्ते

मी नेहमी दुवा देताना तो नविन खिडकीत उघडेल असाच देतो. दुवा देताना खालीलप्रमाणे कोड लिहावा,

मगे ते असं दिसतं...

परवशता पाश दैवे... भाग १

गणपा's picture

4 Aug 2011 - 11:58 pm | गणपा

हे आपल्याला माहीत नव्हते बॉ.

श्रावण मोडक's picture

4 Aug 2011 - 10:45 pm | श्रावण मोडक

अच्छा. असा देतात होय दुवा. धन्यवाद रे गणपा. ;)

ज्योति प्रकाश's picture

4 Aug 2011 - 11:41 pm | ज्योति प्रकाश

दुवा कसा टाकायचा याची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद्.प्रयत्न करुन बघते.

पिवळा डांबिस's picture

5 Aug 2011 - 12:19 am | पिवळा डांबिस

"गनपा, द्येव तुजं भलं करो! पोराबाळांचं खिल्लार वाढो तुज्या घरात"
असा दुवा द्यावा...
:)

मी-सौरभ's picture

5 Aug 2011 - 12:42 am | मी-सौरभ

आमेन!!

गुड गुड, नाठाळांना अजून दोनचार गोष्टी शिकवा बुवा गणपाशेठ.

प्रतिसाद कसा द्यावा, उपप्रतिसाद कसा द्यावा, सही मोठी असावी का प्रतिसाद वगैरे. ;-)

आदिजोशी's picture

5 Aug 2011 - 3:38 pm | आदिजोशी

हात वर करावा आणि दुवा द्यावा

snowy's picture

6 Dec 2011 - 7:36 pm | snowy
चिगो's picture

27 Apr 2012 - 12:02 pm | चिगो

धन्यवाद गणपाभौ.. ह्याच ठीकाणी पराशेठनाही धन्यवादाची पोचपावती देतो, ज्यांनी हा दुवा दिला..

Vishal Agrawal's picture

4 Jan 2016 - 12:03 pm | Vishal Agrawal

धोका तिला झाला होता
पण तो मी नव्हतो
घात कोणी केला
सजा मला मिळाली

थकलो होतो समजाउनि तिला
की तो मी नव्हे
तिचा नेहमीचा पालुपद
तुम्ही सर्व सारखेच्
तुम्ही सर्व सारखेच्

Vishal Agrawal's picture

4 Jan 2016 - 12:04 pm | Vishal Agrawal

धोका तिला झाला होता
पण तो मी नव्हतो
घात कोणी केला
सजा मला मिळाली

थकलो होतो समजाउनि तिला
की तो मी नव्हे
तिचा नेहमीचा पालुपद
तुम्ही सर्व सारखेच्
तुम्ही सर्व सारखेच्

सस्नेह's picture

4 Jan 2016 - 12:07 pm | सस्नेह

तुम्हाला खरंच मदतीची गरज आहे :(

विकास's picture

4 Jan 2016 - 6:04 pm | विकास

त्यांना दुव्याची गरज असावी ... ;)

अनु. अध्याय श्लोक शब्द ओवी शब्द
१ १ ४७ ५७० २७५ ३१०१
२ २ ७२ ९३२ २७५ ४५१५
३ ३ ४३ ५५० २७६ ३२२६
४ ४ ४२ ५१७ २२५ २७५०
५ ५ २९ ३५६ १८० २२३६
६ ६ ४७ ५८४ ४९७ ६०३६
७ ७ ३० ४०८ २१० २६२७
८ ८ २८ ३८१ २७१ ३४९९
९ ९ ३४ ४४८ ५३५ ७०६९
१० १० ४२ ५६१ ३३५ ४३१५
११ ११ ५५ ८७३ ७०८ ९०८५
१२ १२ २० २७४ २४७ २६५८
१३ १३ ३४ ४१३ ११६९ १२७८१
१४ १४ २७ ३२८ ४१५ ४५०५
१५ १५ २० २९० ५९९ ७०४४
१६ १६ २४ २८९ ४७३ ५३९०
१७ १७ २८ ३४४ ४३३ ५०२३
१८ १८ ७८ ९९१ १८१० २१०६८
एकूण १८ ७०० ९११२ ९०३३ १०६९२८

अनिंद्य's picture

18 Sep 2019 - 11:18 am | अनिंद्य

माझा लेख

चाचणी करून बघतोय !

सुजित जाधव's picture

15 Dec 2021 - 10:57 am | सुजित जाधव
सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 6:41 pm | सुजित जाधव

सुजित जाधव's picture

1 Jun 2022 - 6:42 pm | सुजित जाधव

यु ट्युब वरील चित्रफित प्रतिसादामध्ये किंवा लेखामध्ये कशी टाकावी ?
जर यु ट्युब वरील दुवा न देता चित्रफित जर दृष्यस्वरुपात दिलीत तर इतरांना ती पाहणे सोपे होते.