<कायकू>

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जे न देखे रवी...
3 Aug 2011 - 2:02 pm

आमची प्रेरणा ............. सांगायलाच पायजे का?

शिग्रेटी फुंकशी
पेग पटीयाला
दुबार रीपीट...

पहीली धारा
वर्दळ सैरावैरा
उत्साही बाटल्या

चखणा हातात
ग्लास रीकामा
बाटली सैरावैरा

पाऊल अडखळे
आधार अनोळखी
द्वारपालाचा

बोलला पती
बायको वोवाळी
हैराण शेजारी

ऐसेची हायकू
मिपावरी लोक
लिखतेच कायकू?

शृंगारऔषधोपचार

प्रतिक्रिया

गणेशा's picture

3 Aug 2011 - 2:12 pm | गणेशा

हायकु चे विडंबन जमलेले नाही
मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे.
त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि.
एकुन सपक झालेय लिखान

पंगा's picture

3 Aug 2011 - 7:14 pm | पंगा

हायकु चे विडंबन जमलेले नाही

सहमत.

मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे.

सहमत/असहमत.

"५-७-५ क्रम नाही, (म्हणून) हायकू नाही" याबद्दल सहमत. परंतु, "हे (म्हणजे हे विडंबन-किंवा-जे-काही-असेल-ते) हायकू आहे" असा दावा विजूभाऊंनी कोठे केल्याचे दिसले नाही, म्हणून असहमत.

त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि.

सहमत.

एकुन सपक झालेय लिखान

सहमत.

विजुभाऊ's picture

3 Aug 2011 - 2:37 pm | विजुभाऊ

हायकु चे विडंबन जमलेले नाही
शक्य आहे. माझाही तसा दावा नाहिय्ये.
मुळ विदेश यांच्या हायकु मध्ये ५-७-५ असा क्रम आहे.
एखाद्या गोष्तीवरून काही लिहीले म्हणजे त्यात शब्द क्रम /अक्षर संख्या तश्शाच हव्यात असा आग्रह कशाला?
त्यात विडंबन करायचे म्हणजे कायम बाटली -नशा, सिगारेट अश्याच गोष्टी हव्या आहेत असे का वाटते येथे विडंबन करणार्या बर्याच मंडळींना तेच कळत नाहि.
ऑफिस, साहेब ,बायको , दारू या शिवाय विडंबन काव्य करून दाखवा.( चॅलेन्ज समजा हवे तर)
दारु पिउन लटपटणारा माणूस हेच एक विडंबन असते.
एकुन सपक झालेय लिखान
स्पष्त मतप्रदर्शनाबद्दल धन्यवाद.

विजुभाऊ , स्पष्ट मताचा राग मानुन घेवु नये... राग असला तर माफी असावी.
-------
प्रत्येक ओळीला रिप्लाय दिला नसता तर जास्त योग्य वाटले असते.
असो , कुठलेही विडंबन हे मुळ काव्यासी सुसंगत हवे असे वाटते. (अगदी त्याची गेयता असेल तर तशीच गेयता विडंबनात ही यायला हवी असे वाटते.) जर तसे जमत नसेल तर स्वतंत्र काव्य काय वाईट आहे मग ?
असो वाचक अनेक असतात, कदाचीत प्रत्येकाचे म्हणने वेगळे असते, माझे ही वेगळेच आहे मानावे. त्यामुळे जास्त मनावर न घेने.

तुम्ही म्हणता तसे दारु, बाई, साहेब, ऑफिस विना विडंबन आहे माझ्याकडे, पण ते येथे देने मला योग्य वाटत नाही. स्वताची जाहिरात किंवा स्वताचेच खरे असे माझे म्हणणे नाही म्हणुन येथे ते देत नाही.. (चॅलेंज म्हंटला आहे म्हणुन व्यनी करतो, ते ही नको वाटते आहे पण करतो कारण उगाच दारु हा विषय घ्यायचा आणि सुमार विडंबन करायचे खरेच आवडत नाहि)

विडंबन हा काव्य प्रकार मुळातच परोपजिवी आहे.
एखाद्या खिल्ली उडवावी हा विडंबन काव्याचा उद्देश असतो. त्यातून उपहास या प्रकारचा विनोद निर्माण होतो.
मूळ कविता चांगली असेल तर विडंबन देखील बरे होते.
उदा : आम्ही कोण म्हणोनी काय पूसता..... ( गोविंदाग्रज( गडकरी) ..... केशवकुमार( अत्रे) )
साधारण कवितेचे विडंबन साधारणच होते

अत्रुप्त आत्मा's picture

3 Aug 2011 - 6:00 pm | अत्रुप्त आत्मा

मस्त केलय विडंबन.वाचुन खदाखदा हस्लो...ह्हा ह्हा ह्हा ... :-):Smile:

या निमित्तानी एक विनोदी हायकू अठवले...

डावीकडे एक बाई
उजवीकडे एक बाई
मधे कुणीच नाही...ह्ही ह्ही ह्ही...:bigsmile:

परिकथेतील राजकुमार's picture

3 Aug 2011 - 6:07 pm | परिकथेतील राजकुमार

डावीकडे एक बाई
उजवीकडे एक बाई
मधे कुणीच नाही...

वरच्या हायकू मधील पहिल्या दोन ओळीत बदल केल्यास संपूर्ण विनोदावरच पाणी फेरले जाईल हे नम्रपणे नमूद करु इच्छीतो.

डावीकडे शबाना बाई
उजवीकडे नंदीता बाई
..........

हासा... हासा आता.

तु तर एकदम 'आग'च लावलीस. ;)

अत्रुप्त आत्मा's picture

4 Aug 2011 - 2:04 am | अत्रुप्त आत्मा

ब्बाबो ब्बाबो...हसुन हसुन मरायची पाळी आली...ह्ही ह्ही ह्ही...:bigsmile:

प...रा इज ओन ''फायर''... ;-) :wink:

विजुभाऊ's picture

4 Aug 2011 - 4:08 pm | विजुभाऊ

डावीकडे शबाना बाई
उजवीकडे नंदीता बाई
..........

हासा... हासा आता.
प रा या ओळी अधीक व्यापक केल्या तर ?
आता बघ ना
डावीकडे ममताबाई
उजवीकडे जयललीताबाई
मधे भेटले बाजपेयी...........
बघ ना तिनोळीला कसे वजन प्राप्त झाले. ;)
अवांतरः या ओळी लिहीण्यात कोणत्याही राजकी पक्षाला कंट्रोल करणार्‍या संघटनेबद्दल कोणतीही छुपी कृती व्यक्त झालेली नाहिय्ये

परिकथेतील राजकुमार's picture

4 Aug 2011 - 4:19 pm | परिकथेतील राजकुमार

विजुभौ प्रबळ
थत्तेचाचा बळकट
संघ हलकट

अवांतर धारा
संपादक सैरावैरा
द्वेष्टे उत्साही !

सदस्य देशात
सदस्य परदेशात
मिपा जात्यात ..

डॉन्या तोर्‍यात
धनाजीवाकडे जोषात
हाल किबोर्डाचे !

सोत्री पेटले
बिका हळवे
नॉस्टेल्जिया जोरात ..

धमाल मुलगा's picture

4 Aug 2011 - 4:26 pm | धमाल मुलगा

=)) =)) =))
पाणी पित होतो रे भाड्या....नरड्यात अडकलं पाणी...

गणपा's picture

4 Aug 2011 - 7:13 pm | गणपा

=)) =)) =))

प्रभो's picture

4 Aug 2011 - 7:20 pm | प्रभो

=)) =)) =))

शुचि's picture

4 Aug 2011 - 10:58 pm | शुचि

हाहाहा

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Aug 2011 - 11:38 pm | बिपिन कार्यकर्ते

*ड्या

विजुभाऊ's picture

4 Aug 2011 - 4:33 pm | विजुभाऊ

नरड्यात अडकलं पाणी...
बरे झाले कापी नव्हती ते.कळफलक वाचला..........

धमाल मुलगा's picture

4 Aug 2011 - 4:43 pm | धमाल मुलगा

जाणारा जातो जिवानिशी, अन् टंकणारा म्हणतो.....

असो. नशिबच आहे आमचं, त्याला कोण काय करणार? :(

विनायक प्रभू's picture

4 Aug 2011 - 4:51 pm | विनायक प्रभू

चान चान.
अवांतरः झाली का नागपंचमी विजुभौ?