गाभा:
मित्रहो,
परवा दिनांक २१ जुन २००८ रोजी मौजे पुणे येथे आपल्या लाडक्या मिसळपाव वरिल रथी, अतिरथी, महारथी मल्लांची दंगल आयोजित करण्याचा मानस आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन दस्तुरखुद्द मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेचे सरदार तसेच आद्य सात्विक कट्टा प्रणेते महारथी छोटा डॉन उर्फ ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर उपस्थित रहाणार असुन ब्रह्मानंदी टाळी लागल्यावर मिपाच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथा ते सांगणार आहेत.
या काथ्याकुटाचा उद्देश इच्छुक मल्लांची (अन मल्लीणींची पन ;) ) नावनोंदणी तसेच आखाड्याची जागा अन सोयीची वेळ ठरवणे हा आहे. इच्छुक पैलवानांनी इथे नावनोंदणी करावी तसेच त्यांचे दुरभाष जमतील त्या माध्यमाने आनंदयात्री किंवा अतिरथी धमाल मुलगा यांना कळवावेत.
आपलाच कुस्तीगिर,
(किंचित रथी) आनंदमल्ल
प्रतिक्रिया
19 Jun 2008 - 12:35 pm | डोमकावळा
ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकर यांच्या उपस्थितीत कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी रचलेल्या मनसुब्याचा आदर वाटतो.
दक्षिण दिग्विजय मोहिमेच्या रम्य कथांबद्दल अतिशय आकर्षण असून त्या मोहिमेचे सरदार महारथी छोटा डॉन यांच्या कडून ऐकण्याच्या कल्पनेनेच मन भारावून गेले आहे.
या दंगलीसाठी इच्छूक मल्ल म्हणून कुस्तीगीर आनंदमल्ल यांनी आमच्या नावाची नोंद घ्यावी. दुरभाष व्यं. नि. द्वारे कळवण्यात येईल....
दंगलेच्छूक मल्ल,
डोमकेसरी...
19 Jun 2008 - 12:42 pm | आनंदयात्री
>>डोमकेसरी
हा हा हा =)) ..
आपलाच,
(टावेल फाड पैलवान) आनंदमल्ल
19 Jun 2008 - 12:39 pm | अनिल हटेला
ह्या दन्गलीत इच्छा असुनही सहभागी होउ शकत नसल्याचा खेद वाटतो...
तरी ही कार्य सिद्धीस जाओ म्हणुन आम्ही प्रार्थना करू.....
कळावे.....
(अवान्तरः चुकन का हा बैल तिथे उपस्थीत राहीला तर ,काय होइल कल्पना सुद्धा करु नका)
19 Jun 2008 - 12:46 pm | धमाल बाळ
मी दंगल पहायला धमाल बाळासह उपस्थीत राहिन.
19 Jun 2008 - 10:08 pm | llपुण्याचे पेशवेll
दफ्तरीच्या गुप्त खबरीनुसार धमाल सासरा हे तेच ढगवाले विजुभाऊ(भाई?) आहेत.
(रियासतकार विजुभाऊ ढगवाले यांचा फॅन)
पुण्याचे पेशवे
19 Jun 2008 - 1:23 pm | ध्रुव
अरे वा... परत एकदा पुण्यात आखाडा... :)
जमेल की नाही अत्तच सांगता येणार नाही. जमत असेल तर उद्याच्या आत कळवेन.
अवांतरः मल्लांबरोबर मल्लीका पण येणार असल्यास संख्या बळावेल असे वाटते ;)
--
ध्रुव
19 Jun 2008 - 6:32 pm | ऍडीजोशी (not verified)
डॉन्या आमची लाज आता तुझ्या हातात आहे रे बाबा. तिथेही अर्ध्या पंगतीत लुडकलास तर लोकं अम्हाला नावं ठेवतील. ऍडी आणि अभिज्ञ नी काही वळण लावलं नाही म्हणतील. तर, करगोटा आवळून तयार हो मित्रा. हान तिज्या मायला.
मी फोन वरून चाव्या मारेनच. पण एक दया करा. ही दंगल सात्वीक करण्याच्या नादात य पैलवानांना ५-३-२ खेळायला लाऊ नका.
आपला,
ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/
19 Jun 2008 - 6:48 pm | विसोबा खेचर
मिसळपावच्या राज्यस्तरिय दंगलीला उपस्थित राहायचा अवश्य प्रयत्न करीन.. :)
तात्या.
19 Jun 2008 - 7:11 pm | आनंदयात्री
:)
19 Jun 2008 - 6:54 pm | सखाराम_गटणे™
हा अड्डा जोरात जमणार वाटते.
:)
सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))
20 Jun 2008 - 12:59 am | ब्रिटिश टिंग्या
आमच्या गैरहजेरीत दंगल भरवता लेको! १ महिना दम धरता येत नाही का? X(
असो, मजा करा लेको! मी आल्यावर परत दंगल करु ;)
(दंगलीची वाट बघणारा) टिंग्या 8>
20 Jun 2008 - 1:34 am | इनोबा म्हणे
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत. 8}
आपून आपून हाय, बाकी समदे ढेकूण हाय
वस्ताद झूंजारराव तूळपूळे यांचा पठ्ठा इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
20 Jun 2008 - 5:20 am | वरदा
मज्जा आहे ..आता कट्टा झाला आता दंगल्....माझ्या शुभेच्छा!!!
20 Jun 2008 - 8:56 am | शेणगोळा
मी पण दंगलीला येणार. कुठे आहे दंगल? स्थळ कळवा.
20 Jun 2008 - 10:02 am | विजुभाऊ
लेका ही मिनी कुस्ती नाही. तिथे लाल मातीत मुरलेले पैलवान पायजेत
शंका असल्यास अतीलाइट वेट चॅम्पीयन धमु च्या अंगकाठी कडे पहा......
हा आमचा बारामतीचा पैलवान आहे.
तो ज्याच्या खांद्यावर हात ठेवतो त्याचे काय होते ते बारामती च्या काकाना विचारा.....
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
20 Jun 2008 - 10:24 am | धमाल मुलगा
=))
अतिलाईट वेट कॅटेगरी = वजन १२ किलो ते ४२ किलो.
मंडळी,
कोथरुडचं शांग्रिला गार्डन सोईस्कर पडेल का?
जमायचं शनिवारी असल्यामुळे, आपल्याला लवकर जागा आरक्षित करावी लागेल. आमच्या पुण्यात विकांताला ९०% लोक घरी स्वयंपाक करत नाहीत त्यामुळे सगळी हाटिलं फुल्ल असतात.
कृपया इतर स्थळंही सुचवावीत :)
20 Jun 2008 - 12:56 pm | मनस्वी
बाणेर रोड - औंध वरचं 'राजवाडा' पण मस्त आहे.
मनस्वी
"मृगजळाला पाहुन तुम्ही फसला नाहीत तर स्वतःच्या बुद्धीची तारिफ करु नका. हे मान्य करा की तुम्हाला तहान लागली नव्हती."
20 Jun 2008 - 1:32 pm | धमाल मुलगा
राजवाडा फॅन्टास्टिकच !!!
पण विजुभाऊ, सरसेनापती डानराव ह्यांच्यासारखे पार नगर रोडवरुन येणार...काहीजण कात्रज-धनकवडीकडून येणार..
येतानाचं ठीक आहे, पण गप्पा रंगल्यावर रात्री उशीरा घरी जाताना इतकं लांब सोयीचं नाही पडायचं ना त्यांना!
मला हुब्या पुन्यात, पुन्याच्या आसपासच्या वाड्यावस्त्यांत, धरणाकडंला, कुठंबी बलवा.....आपल्याला काय प्रॉब्लेम न्हाय!!!
20 Jun 2008 - 12:41 pm | चावटमेला
दस्तुरखुद्द थोरल्या राजांच्या जहागिरीत दंगल भरविण्याचा मानस निश्चितच स्तुत्य आहे, विशेषतः ह.भ.प. बाबा सात्विक महाराज बंगळुरकरकरांची उपस्थिती कार्यकमाची शोभा दुपटीने वाढवेल.दंगलीस येण्याचा जातीने प्रयत्न करेन
आपला,
चावटकेसरी
http://chilmibaba.blogspot.com
20 Jun 2008 - 1:37 pm | धमाल मुलगा
दंगलीला येणार्यांनी कृपया आपले भ्रमणध्वनी क्र. मला अथवा आनंदयात्रीला कळवावेत. संपर्कास सोपे जाईल.
उद्या विकांत असल्याने कोण कोण लॉग इन असेल ह्याची शंकाच आहे. त्यामुळे ठिकाण ठरताच सर्वांना कळवणे भ्रमणध्वनीमुळे योग्य ठरेल.
माझा भ्रमणध्वनी क्र.:
९७६ ६२५ ४५२५
९३७ ००५ ६४२७
-ध मा ल.
20 Jun 2008 - 1:49 pm | अभिज्ञ
डोन्या, नाव राख रे बाबा आमचे.
तुला मागच्या वेळेला धोबीपछाड शिकवला आहेच. ;)
दंगलीला शुभेच्छा.दंगल जोरदार होवो. <:P
अभिज्ञ.
20 Jun 2008 - 2:33 pm | नीलकांत
या विकांताला पुण्याबाहेर असल्यामुळे या दंगलीला हजर राहू शकत नाही.
दंगलीला मनापासून शुभेच्छा !
नीलकांत
20 Jun 2008 - 3:56 pm | कावळा
मी पण येणार आहे
आपलाच
कावळा
(विवेक वि.)
21 Jun 2008 - 4:33 pm | आनंदयात्री
मित्रहो शांग्रिला गार्डन इथे आज रात्री ७.३० वाजता दंगलीआठी आखाडा ठरवला आहे, आपणा सर्वास अगत्याचे आमंत्रण. वरद, गटणे, चावट मेला अन शेणगोळा यांनी येण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे पण त्यांचे दुरभाष अजुन प्राप्त झाले नाहित, त्यांनी कृपया मला (९८८१७४१३५१) किंवा धमाल मुलगा यांना संपर्क करावा ही विनंती.