आम्ही कुणीच नाही. आम्हाला चेहरा नाही. आमची ओळख नाही. आम्हाला धर्म नाही. आम्हाला जात नाही. आम्हाला पेशा नाही. आम्हाला देश नाही. आम्हाला लिंग नाही. आम्हाला वय नाही. आम्हाला कुठलीही बंधने नाही. आम्हाला कुठलाही उद्देश नाही. आम्हाला एकत्र करणारा फक्त एकच समान धागा .. आम्ही सर्व बंधने झिडकरून देतो आणि मनमुक्त वागतो.
आम्ही तुमच्यातीलच आहोत. पण आम्हाला आमची गुप्तता प्रिय आहे. आमचे भेटायचे एकच असे ठिकाण नाही. आम्ही आंतरजालावर भेटतो. कधी आय आर सी चॅट वर, कधी फोरम्स वर, तर कधी विकी वर.
आम्ही अनामिक आहोत. आम्ही विस्कळित आहोत. आम्हाला कुणीही नेता नाही. वेगवेगळ्या प्रसंगी आमच्यतीलच एक आम्हाला दिशा दाखवतो आम्हाला पुढे घेऊन जातो. प्रसंग संपल्यावर परत आमच्यापैकीच एक अनामिक बनून जातो. पण आम्हाला दुबळे समजू नका. आमच्या पैकी एकावर हल्ला हा आम्हा सगळ्यावर हल्ला आहे. आम्हाला डिवचू नका, आणि जर डिवचलेत तर लक्षात ठेवा .. तुम्ही आमच्याशी पंगा घेतला आहे .. निर्नामकांशी.
======================
हाफ हूफ .. हाफ हूफ
"अजून फक्त दोन राउंड्स" स्टीवने स्वत: ला धीर देत सांगितले. खर तर एके काळी न थांबता आरामात बागेला १०-१२ राउंड्स मारू शकत असे. आज फक्त चार राउंड्स मध्येच फे फे उडाली. अचानक आपल्या स्टॅमिनाला काय झाल असाव याचा विचार स्टीव करू लागला. ह्म्म एक तर काल खूप प्यायली ते तरी, किंवा मग लिली बरोबर रात्रभर खूप .. स्टीव मनाशीच खूप हसला. गेले अकरा महीने सगळ कस एकदम धमाल चालू आहे. नवीन कंपनी मध्ये कार्यकारी संचालकाच्या पदावर नियुक्ती. आणि गेले सहा महिने लिली. साले सगळे मित्र जळून खाक होतात. दर आठवड्याला एकजण तरी म्हणतोच "शी ईज़ सच अ फाइन पीस ऑफ अॅस". पण साली वर लक्ष ठेवायला पाहीजे. तशी ती एकदम बिच आहे. माझ्या आधी त्या वेब २.० स्टार्ट अप च्या प्रमुखा बरोबर झोपत होती. बिचार्याचे दुसर्या फेरीतील फंडिंग संपले, कंपनी डब्यात गेली, आणि ही त्याला सोडून आली.
बझ्झ बझ्झ .. खिशातल्या आय फोन नि स्टीव ला भानावर आणले. च्यायला एव्हढ्या सकाळी सकाळी कुठल्या गाढवानी फोन केला असेल. स्टीवने फोन कट करण्याआधी सहज नजर टाकली .. मॅथ्यू मॅकब्रूडी .. आठशे लोकांच्या कंपनी मधील स्टीव चा एकमेव बॉस. एम टी झी च्या दोन सिस्टर कंपनीजचा प्रेसिडेण्ट. हा फोन घेणे भाग होते.
"हे मॅट, वास्सप डॉग?"
"फाइन स्टीव, हाउ आर यू?"
"रॉकिंग"
"मग आपण त्या प्रपोज़ल साठी अप्लाय करायचा का?
"अम्म कुठल प्रपोज़ल?"
"मेल्स चेक केल्या नाहीत का? काल संध्याकाळी मी तुला एका महत्वाच्या प्रपोज़ल ची मेल पाठवली होती".
स्टीव ने स्वत: ला खूप शिव्या घातल्या. सहसा त्याने काम जरी केले नाही तरी अशी हलगर्जी तो कधीच करत नसे.
मेल्स ला उत्तर देऊन काम पुढे चालू आहे असा आभास निर्माण करण त्याला सहज जमत असे. काल नेमकं त्यानी ४ वाजता कलटी मारली आणि त्याचा आय फोन पण डिसचार्ज झाला होता. त्यानंतर रात्री बारा पर्यंत यारदोस्तांबरोबर खूप प्यायला आणि मग लिली.
"सॉरी बॉस. काल जरा घरी एमर्जेन्सी होती. आईला बरे नव्हते."
"ओके नो प्रॉब्लेम. जरा एक नजर टाकून ठेव. तर मी तुला संक्षिप्त स्वरूपात सांगून ठेवतो. काही महिन्यान पूर्वी विकी लीक्स मुळे झालेल्या गोंधळामुळे डार्पानी नवीन प्रपोज़ल जाहीर केले आहे. सायबर इनसाइडर थ्रेट किंवा थोडक्यात सिन्डर. हे प्रपोज़ल आपल्याला मिळाले तर खूप पैसे मिळतील. शिवाय आपल्या इतर प्रॉडक्ट्स च्या दृष्टीतून ही हे खूप फायदेशीर आहे. त्यांनी नुकत्याचा निविदा मागवल्या आहेत. अजून एक महिना आहे. एक नजर टाक आणि मग आपणा डिसकस कारू. ओके सी यू"
"बाय"
पाळणे पुरे झाले आता. स्टीव थांबला.
"नाइस डॉग" जवळून कुत्र्यासोबत पळत जाणार्या एका ब्लॉंंड कडे पाहून स्टीव म्हणाला.
"ओह थॅंक यू" ब्लॉंंड हसून म्हणाली आणि लाडीक पणे पुढे जायला लागली. स्टीव वाकून धापा टाकता टाकता तिच्या पाठमोर्या फिगर कडे बघत होता.
घरी जाऊन गेटोरेडची एक अख्खी बाटली संवायला लागणार आहे. नाहीतर हा हॅंग ओवर जीव घेईल. आणि मस्त पैकी भरपूर चीज घालून ३-४ अंडी खाऊ यात म्हणजे हॅंग ओवर च काम तमाम. आणि ती सिन्डर ची काय भानगड आहे ते पण बघायला लागणार आहे. स्टीव ने खिशात हात घालून कारची चावी काढली आणि आजूबाजू ची हिरवळ टिपत तो गाडी कडे वळला.
(क्रमशः)
प्रतिक्रिया
10 Mar 2011 - 3:35 am | शेखर
फारच लहान भाग टाकलाय ... जरा मोठे भाग टाका....
10 Mar 2011 - 8:45 am | नगरीनिरंजन
असेच म्हणतो. कथेचा भाग स्कर्टसारखाच असावा असे आमचे मत आहे. :-)
10 Mar 2011 - 9:08 am | स्पंदना
>>कथेचा भाग स्कर्टसारखाच असावा असे आमचे मत आहे>>>>
????????????????
निर्मामक म्हणजे का?
10 Mar 2011 - 4:17 am | रेवती
कथेची सुरुवात चांगली झालिये.
अवांतर: संपादकांच्या दृष्टीने प्रतिसादांवर लक्ष ठेवण्याजोगा भाग आहे.
10 Mar 2011 - 5:55 am | विजुभाऊ
सुरवात छान झाली आहे. मिपावर शुद्ध लेखनाचे एवढे वावडे नाही. पण साहेब जरा शब्द सुट्टे टंका ना.
स्टीव वाकून धापा टाकता टाकता तिच्या पाठ मोरयाफिगर कडे बघत होता.
तुमच्या टंकण्यामुळे तिच्या पाठमोर्या फिगर ची एकदम मोरयाफिगर झाली आहे. ;)
10 Mar 2011 - 6:47 am | गोगोल
;)
आता जर तिची फिगर मोरया सारखी असती तर काळं कुत्रं तरी तिच्याकडे बघेल का?
चूक लक्षात आणून दिल्या बद्द्ल धन्यवाद.
10 Mar 2011 - 9:51 am | विजुभाऊ
ओक्के.... तुमच्या संपादनामुळे आमचा एक झ्याकास जोक वाया गेला की ;)
10 Mar 2011 - 9:06 am | स्पंदना
वरिल परिच्छेद काय आहे? तो लिखाणाचा पुर्वांश आहे की तुमच स्वतःच स्वगत आहे?
खालील कथा आवडली.
एकुण वारुणी, वारांगना अन वीरा भोवतालची कथा दिसतेय, म्हणजे चविष्ट!
10 Mar 2011 - 9:08 am | आनंदयात्री
बेश्ट. सिलिकॉन वॅलीतली स्टोरीने पहिल्या भागातच रंग आणलाय.
उद्या दुसरा भाग .. कसे ?
10 Mar 2011 - 9:50 am | ५० फक्त
अतिशय छान टिझर गोगोल. आवडला. मात्र वर रेवतीतै ने म्हणल्याप्रमाणे अवांतर: संपादकांच्या दृष्टीने प्रतिसादांवर लक्ष ठेवण्याजोगा भाग आहे.
रेवती
10 Mar 2011 - 9:54 am | प्रास
गोगोलसाहेब,
आयटी फील्ड बद्दल आमचं ज्ञान अगदीच टोकडं आहे. तुमच्या या चविष्ट लेखनाने त्यात भर पडेल अशी आशा निर्माण झालेली आहे.
क्रमशःचं लांबण फार लांबवू नये ही विनंति.
आणि हो, त्या नमनाच्या घडाभर तेलाबद्दल जरा नीट सांगितलंत तर आनंदात भर....
पुलेप्र.....
10 Mar 2011 - 10:11 am | विनायक प्रभू
चांगली सुरुवात
10 Mar 2011 - 10:35 am | टारझन
वाचतोय !! बिच वर एक संक्षिप्त भाग होउन जाऊ द्या :)
- (बेवॉच प्रेमी) बिचल जॉनसन
10 Mar 2011 - 7:30 pm | निनाद मुक्काम प...
@काही महिन्यान पूर्वी विकी लीक्स मुळे झालेल्या गोंधळामुळे डार्पानी नवीन प्रपोज़ल जाहीर केले आहे. सायबर इनसाइडर थ्रेट किंवा थोडक्यात सिन्डर.
ह्या वाक्यात कथानकाचे स्वरुप लक्षात येत आहे .
कार्पोरेट जीवनशैलीवर आधारीत ही कथा सस्पेन्स थ्रीलर / असावी असा अंदाज आहे .
11 Mar 2011 - 9:43 am | अभिज्ञ
वाचतोय.
अभिज्ञ.
13 Mar 2011 - 9:34 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चांगली सुरुवात.
-दिलीप बिरुटे
19 Mar 2011 - 4:07 pm | महेश हतोळकर
मस्त सुरुवात.
पु.भा.प्र.
19 Mar 2011 - 4:07 pm | महेश हतोळकर
मस्त सुरुवात.
पु.भा.प्र.