शनिवार दि. २२ जाने २०११
वेळ पहाटे २:०० स्थळः अंथरूण
खिडकीवर कबुतरांची टकटक.. खडबडून जाग आली.. पुन्हा झोपण्याच असफल प्रयत्न.. इ-सकाळ चाळून झाला.. सीएनएन.. एकमेव इंग्रजी वाहिनी.. फक्त अमेरिकेच्या बातम्या.. बहुतेक ५ वाजले.. टीव्हीच्या आवाजाने पुन्हा झोप चाळवली.. टीव्ही बंद केला.. डोक्यावरून क्विल्ट ओढले.. ट्रिंग ट्रिंग.. काय कटकट आहे.. इतक्या पहाटे कुणाचा फोन.. हॅलो.. अरे केसू कितीवेळा बेल वाजवतोय दार उघड.. दिनेशचा फोन.. बापरे ८ वाजले..
वेळ सकाळी ८:३० स्वाती दिनेश यांचे घर
कॉफी आणि केक.. व्हेन इन जर्मनी बिहेव लाइक जर्मन.. हा हा.. डायेटच्या ***** चला आवरून शनिवारची बाजारहाट करावी..
वेळ दुपारी १२:३० स्वाती दिनेश यांचे घर
उद्या त्सेंटा आजी, अकिम आजोबा येणार.. पिअर केकची तयारी करावी.. फोटो काढा.. पाकृ टाकायची आहे
वेळ दुपारी १३:३० स्वाती दिनेश यांचे घर
भूक लागली.. काय करावे.. स्पॅनिश ऑम्लेट??.. हो चालेल.. स्वाती : काय काय लागेल..
६ अंडी.. २ मध्यम कांदे.. २ मध्यम बटाटे.. अर्धी ढबू मिरची, एक वाटी कापलेला फुलगोबी.. मिरच्या.. १ लसूण पाकळी.. मिरं पूड कोथिंबीर हवीच.. आणि थोडे दूध...
वेळ दुपारी १३:३५ स्वाती दिनेश यांचे घर
हम्म चेपू वर स्टेटस अपडेट करावे..
दिनेश : कांदा कसा कापून हवा.. मध्यम बारीक आणि बटाटे चकत्या.. बटाटा भजीला कापतात त्या पेक्षा थोड्या जाड.. ओक्के..
हे सगळं ऑलिव्ह ऑइलवर खरपूस परततो, जिरे धणे पूड कुठे आहे.. एकदम देशी.. केसू स्टाइल.. हा हा
तोवर तू अंडी दूध फेटून दे..
केक झाला का बघा..
स्वाती : केकचा ओव्हन गरमच आहे त्या मुळे रेडीमेड प्रिहिटेड ओव्हन आयता तयार आहे..
बेकिंग ट्रे दे रे तो... त्यात ह्या खरपूस भाजलेल्या भाज्या पसरतो.. फेटलेली अंडी घालतो.. आणि वरून मिरं पूड
वेळ दुपारी १४:०० स्वाती दिनेश यांचे स्वयंपाक घर
आता ते ओव्हन मध्ये टाक.. आणि ओव्हन २०० डिग्री २० मिनिटे लाव..
वेळ दुपारी १४:२० स्वाती दिनेश यांचे स्वयंपाक घर
बेकिंग ट्रे बाहेर काढ रे.. आणि वरून कोथिंबीर हवीच.. एकदम झकास..
वेळ दुपारी १४:३० स्वाती दिनेश यांचे डायनिंग टेबल
चला स्पॅनिश ऑम्लेट तयार झाले आहे.. घ्या प्लेट..
वेळ दुपारी १४:४० स्वाती दिनेश यांचे डायनिंग टेबल
अंमळ जरा जास्त झाले नाही..
वेळ दुपारी १५:०० स्वाती दिनेश यांचे डायनिंग टेबल
चला ३ वाजले.. टाइम फॉर कॉफी...
वेळ दुपारी १५:३० स्वाती दिनेश यांचे घर
चला आता मी निघतो.. झोपेची नीतांत गरज आहे..
संध्याकाळी परत ये रे.. उद्या तुला आजी आजोबासाठी शाही अंडा बिर्याणी करायची आहे त्याची तयारी करायची आहे ना.. हो हो.. चला बाय..
प्रतिक्रिया
22 Jan 2011 - 9:27 pm | वेताळ
जबरदस्त अऑम्लेट............... नादखुळा..
22 Jan 2011 - 10:43 pm | सर्वसाक्षी
उत्तम लेखन/ पाकृ/चित्रण
23 Jan 2011 - 3:21 am | धनंजय
+१
22 Jan 2011 - 11:03 pm | रेवती
तुम्ही माझ्या धाग्याला प्रतिसाद न दिल्याने मीही तुमच्या धाग्याला प्रतिसाद देणार नाही.
फोटू चांगले आलेत हे तर अजिबात सांगणार नाही.
22 Jan 2011 - 11:17 pm | केशवसुमार
मी प्रतिसाद दिला नाही..!! मग मी प्रतिसाद दिला आहे असा मला भास झाला असेल..;)
(आभासी)केशवसुमार
22 Jan 2011 - 11:20 pm | सखी
ऑम्लेट खात नाही, पण मस्तच एवढी एकच प्रतिक्रिया द्यावीशी वाटते. सर्वसाक्षींनी म्हटल्याप्रमाणे - उत्तम लेखन/ पाकृ/चित्रण!!
पण गल्ली चुकलं का हो हे भाऊ- पाकृ विभागात पाहीजे का काथ्याकुट ऐवजी?
23 Jan 2011 - 8:41 am | चिंतामणी
प्रथम शिर्षकामुळे थोडी फसगत झाली. पण उघडुन वाचल्यावर (आज चतुर्थी असल्याने नेत्रसुखाने) समाधान झाले.
शाही अंडा बिर्याणीची पाकृ वाचल्यावर लगेचच करून बघितली होती आणि भन्नाट झाली होती. त्याचप्रमाणे हे ऑम्लेटसुध्दा भन्नाट होणार खात्री आहे.
सगळेच फटु छान आहेत. परन्तु १,६,८ एकदम कातीलच. (आणि जळवणारे)
( चिरलेला भरपुर कांदा दाखवुन समस्त भारतीयांच्या भावना दुखवल्याबद्दल मात्र निषेध X( )
X(
23 Jan 2011 - 1:13 am | नंदन
चविष्ट रोजनिशी :). बाकी स्पॅनिश ऑम्लेट ओव्हनमध्ये बेक केल्याने अंमळ फ्रिटाटा सारखे झाले आहे का?
23 Jan 2011 - 1:55 am | प्रियाली
अगदी!! :)
होय मलाही तसेच वाटते. फ्रिटाटा आणि किशसारखे.
असो.
माझा शनिवारचा (विकतचा) ब्रेकफास्ट -
सुमात्रन ब्लेंड कॉफी
कॅलिफोर्निया ऑम्लेट विद अॅवाकॅडो, मश्रूम्स, चेड्डार चीज अँड ऑनियन
सिनॅमन टोस्ट
ब्वोल ऑफ फ्रेश फ्रुटस
आणि सोबत ३ मैत्रिणींची चॅव-चॅव फुकट. ;)
निदान माझा आजचा ब्रेकफास्ट मस्त झाल्याने केसुंची डीश पाहून जळजळ झाली नाही.
23 Jan 2011 - 9:34 pm | केशवसुमार
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!
किश म्हणजे जर्मनी मध्ये जो चीज केक मिळतो त्याच्या चुलत भाऊ.. किश मध्ये फ्रोजन पाय क्रस्ट वापरला जातो आणि त्यावर अंडी , क्रीम आणि चीज एकत्र फेटून त्यावर जायफळ टाकतात.. बाकी बेकिंग ची पद्धत सारखीच आहे..
23 Jan 2011 - 9:19 pm | केशवसुमार
प्रतिसादा बद्दल धन्यवाद!..
फ्रिटाटा मध्ये चीज आणि प्राण्याची प्रेतं घालतात. त्यामध्ये ज्या भाज्या वापरल्या जातात त्यात जास्ती करून झुकीनी आणि मश्रूम असते.. बनवायची पद्धत पण एकच आहे..
स्पॅनिश ऑम्लेट पॅन मध्ये केले तर जास्त फ्लपी होत नाही.. आणि पॅन मध्ये ऑम्लेटच्या जाडी मुळे ते उलटायला पण त्रासदायक होते..म्हणून ओव्हन मध्ये कले..
23 Jan 2011 - 2:49 am | गणपा
खल्लास अंदाजे बयाँ.
बर तरी बर भरल्या पोटी धागा उघडयायची सुबुद्धी झाली.
आवांतरः यावेळी केसुंची ऐपत वाढलेली दिसतेय. ;)
खुद से बांता: पाककृती विभाग नसल्याने सदर धाग्याला प्रतिसाद देण्यास हरकत नसावी नाही का गण्या.
नाही तरी केसु-दिनेश दर विकांती डाएट ची ऐशी-तैशी करतात तेव्हा तुच काय घोडं मारलयस.
23 Jan 2011 - 5:28 am | सन्जोप राव
केशवसुमारा, तू म्हणजे आमची इवलीशी जीवने समृद्ध करायला आलेली देवाघरची देणगी आहेस. न मागता दिलेली - न सांगता परत नेण्याचे नंतर बघू.
एकूण तुझे आयुष्य अंड्यांभोवती फिरते आहे, असे दिसते. अरेरे! अळूचे फदफदे पाठवून देऊ का?
हल्ली जर्मनीमध्ये कोंबड्या एकमेकींना 'बेटी सो जा, सो जा, नही तो केसु आयेगा' असे म्हणतात असे ऐकून आहे. यात काही तथ्य आहे आ?
हॅव अ लाफ अ डे. इट इज बेटर दॅन स्पॅनिश ऑम्लेट. अॅट लीस्ट दी हेन्स थिंक सो.
23 Jan 2011 - 12:19 pm | श्रावण मोडक
हाहाहाहा...
या चार छोटेखानी परिच्छेदातील भाषा पाहता चार वेगवेगळ्या आयडींना (माणूस एकच असू शकतो त्यामागील) तीर मारलेला आहे का, असा प्रश्न घोंगावून गेला काही क्षण... ;)
23 Jan 2011 - 2:34 pm | नंदन
'हेन्स' अॅट लीस्ट श्रामो थिंक्स सो ;)
23 Jan 2011 - 2:47 pm | श्रावण मोडक
_/\_
23 Jan 2011 - 11:08 am | बिपिन कार्यकर्ते
sighhhhhhhhhhhhhhhhhh
23 Jan 2011 - 12:40 pm | अवलिया
मस्त केसुशेट !! :)
23 Jan 2011 - 9:37 pm | प्राजु
च्या *****!!! या केसु गुर्जींना काहीतरी काम लावायला हवे. उगाच नाही ते पाकृ चे प्रयोग चालतात यांचे. त्यात स्वातीताई.. म्हणजे.. ....छ्या!!
काय हे! इतकी जळजळ..!
बाय द वे फ्रीटाटा चाच हा प्रकार का?? कारण मी फिटाटा असाच करते. भरपूर भाज्या घालून.
केक चे बरेच प्रकार दिसताहेत डिशमध्ये? कोणकोणते आहेत ते? :)
23 Jan 2011 - 11:39 pm | चित्रा
छान बेत, आणि मित्रांबरोबर एकत्र ब्रेकफास्ट करण्याची गंमत काही वेगळीच.
24 Jan 2011 - 8:54 am | गुंडोपंत
अजूनही एकही विडंबन न आल्याने धाग्याचा निषेध...
केसुराव हवे तर आम्ही भारतातून पोष्टाने आम्लेट पाठवू.
पण तुम्ही विडंबने बंद करू नका, हीच विनंती फेटून फेटून करत आहे.
असो,
आम्लेट भारी 'दिसते' आहे.
पण अंड्यात बटाटा हे काही जमत नाही ब्वॉ आमच्या सारख्या म्हातार्याला.
शिवाय ओव्हन कुठून आणायचा? तेव्हा खा आणि मजा करा.