आपण कोण आहोत?
आपण कोण आहोत?....
गरीब भारताचे गरीब रहिवासी? दुर्बळ भारताचे अतिदुर्बळ नागरिक ? धर्मनिरपेक्ष भारताचे धर्माभिमानी हिंदू? प्रगत भारताचे अती ( IT) प्रगत मजदूर? कोण आहोत आपण?
एका बलाढ्य राष्ट्राचा राष्ट्र्पती इथे येतो काय ? मुलांसोबत नाचतो काय? दिवाळी साजरी करतो काय? "जय हिंद" म्हणतो काय ! सारेच अजब !
तीन दिवस एकाच देशात ? इथे आहे काय असे तीन दिवस घालवायला? अहो, आम्ही तर इथल्या सगळ्या "सिस्टिमच्या" नावावर बोंबा ठोकत फिरतो मग असे एकदम काय घडले की जगावर राज्य करण्याचे स्वप्न पाहणार्या आणि तसे प्रत्यक्षात आणणार्या त्या राष्ट्रपतीला इथल्या मातीत रमावेसे वाटले? आमच्या शेम्बड्या मुलांमध्ये नाचावेसे वाटले? साप-विन्चवांच्या या देशामध्ये तीन दिवस आणि दोन रात्री थांबण्याचे धाडस करावेसे वाटले ? स्वतःच्या देशात नियान (Neon) दिव्यांचा डोळे दिपेल इतका झगमगाट असताना आमच्या मातीच्या मिणमिणत्या दिव्यांकडे बघून जगाला संदेश द्यावासा वाटला?
तुम्ही बघताय का हे सगळे? नीट बघताय की फक्त बातम्या वाचून वृत्तपत्र बाजूला ठेवुन परत येरे माझ्या मागल्या करत सकाळी ७.०७ ची वसई लोकल पकडण्यासाठी जीवाचा आटापिटा करता ?..हो आणखी काय म्हणा ? असो.
मला यातून मात्र एक स्फुर्तिदायक संदेश मिळतोय... की मी आता एका दुर्बल देशाचा नागरिक नाही तर एका अत्यन्त बलाढ्य देशाचा शक्तिशाली आणि तितकाच प्रेमळ/दयाळू नागरिक आहे ..हो ..नाहीतर जगातल्या सर्वात प्रगत राष्ट्राचे महामहीम आमच्याकडे मदत मागायला कशाला आले असते, आणि तेही न बोलाविता? आणि आम्ही तरी उदार ह्रुदयाने , सढळ हाताने, प्रेमळ अंतःकरणाने मदत का केली असती ?
पण नव्हे...
गोरया कातडीचा रांग आतून फिकुटलेला आहे हे आता सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. हे कधितरी होणार होतेच, ते याचि देहि ..बघायला मिळाले. आता ते विचारतील आणि आम्ही सांगू " ठिक आहे! तुमच्या पोरासोरांची आबाळ आम्ही होउ देणार नाही , तुम्हाला नक्की काम मिळेल" ..व्वा , क्या बात है. . आम्ही ठरवू आणि ते ऐकतिल ...करता काय..! ऐकावेच लागेल..
...................आम्ही आहोत २१ व्या शतकातील जगाचे मार्गदर्शक.....
. ...अहाहा...सोनियाचा दिनू ..
लेखनप्रकार
याद्या
3371
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
अहाहा...सोनियाचा दिनू
आपण कोण आहोत
शब्द
In reply to आपण कोण आहोत by गणेशा
असो ..
In reply to शब्द by नितिन थत्ते
असो ..
In reply to शब्द by नितिन थत्ते
एका उदयोन्मुख महासत्तेविरुद्ध
सही
In reply to एका उदयोन्मुख महासत्तेविरुद्ध by नगरीनिरंजन
काय नाय हो. ओबामा भारतात आला
"काय नाय हो. ओबामा भारतात आला
In reply to काय नाय हो. ओबामा भारतात आला by सुक्या
तुमचं म्हणण काहि अंशी खरं
In reply to "काय नाय हो. ओबामा भारतात आला by बद्दु
स्किल्ड मॅनपावर हेच बरोबर आहे...
In reply to तुमचं म्हणण काहि अंशी खरं by सुक्या
मी स्वता बेशिस्त नाही..
In reply to काय नाय हो. ओबामा भारतात आला by सुक्या
गणेशा जी / राव, असले प्रतीसाद
In reply to मी स्वता बेशिस्त नाही.. by गणेशा
ओके हो. क्षमा मागावी असे मी
In reply to गणेशा जी / राव, असले प्रतीसाद by सुक्या
ढ
जबराट.
तो काय शब्द होता हो...
हास्यास्पद.
who am I पुस्तकचि आठवन झालि