वांग्याच भरीत

Primary tabs

गणपा's picture
गणपा in पाककृती
17 Jun 2010 - 6:37 pm

नमस्कार मित्रहो
आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ?

जर अजुन ठरल नसेल तर हा झटपट होणारा पदार्थ कसा वाटतोय?

साहित्यः

१ भल मोठ्ठ वांग.
१ मध्यम कांदा बारीक चौकोनी कापुन.
२-४ चमचे भाजलेल्या दाण्याच कुट.
१-२ हिरव्या मिरच्या (ज्या प्रमाणात तिखट आवडत त्या नुसार) बारीक चिरुन.
१/२ चमचा हळद.
१ लहान चमचा लाल तिखट.
फोडणीसाठी राई , तेल.
मीठ चवीनुसार.

कृती:

वांग्याला काट्याने/टुथपीक ने टोचे मारुन घ्यावे.

वांग्याला तेलाच बोट लावुन ते गॅसवर मध्यम आचेवर चांगले भाजुन काढावे.

भाजलेले वांगे गार झाल्यावर त्याचे साल काढुन, त्याचा गर काढावा (मॅश करुन घावं.)

तेलावर मोहरीची , मिरचीची फोडणी करुन त्यातच कांदा परतुन घ्यावा.

कांदा गुलाबी झाल्यावर त्यात वांग्याचा गर, लाल तिखट हळद, दाण्याच कुट आणि चवी नुसार मीठ टाकुन एक ५-१० मिनिट परतुन घावं.

गरमागरम फुलक्यां सोबत लुफ्त घ्या. :)

आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे. ;)

प्रतिक्रिया

वेताळ's picture

17 Jun 2010 - 6:43 pm | वेताळ

आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे.

मला हा वांग्याच भरीत प्रकार जास्त आवडत नाही.तसेच गवारीची भाजी, ही खाणे म्हणजे एक शिक्षाच आहे.

वेताळ

विनायक पाचलग's picture

17 Jun 2010 - 6:46 pm | विनायक पाचलग

वांगे भरीत ..
फेवरीट
लय भारी ..

विनायक पाचलग
वाँट टु टॉक

परिकथेतील राजकुमार's picture

17 Jun 2010 - 6:43 pm | परिकथेतील राजकुमार

आ हा हा गणपाशेठ अ प्र ति म !!!

ह्या भरीताबरोबर गरमा-गरम भाकरीच पाहिजे :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

सहज's picture

17 Jun 2010 - 6:45 pm | सहज

मस्त भाकरी - भरीत.

बाकी गणपाचे किचन पण कायम चकाचक. तिकडे तुझा कुकरी शो असतो का रे? एकदम चकाचक स्टुडिओ किचन :-)

गणपा's picture

17 Jun 2010 - 6:53 pm | गणपा

सब्र करो पराशेठ,
नॉनव्हेज सोबत टाकतोच आहे गरमागरम भाकरी ;)

शुचि's picture

18 Jun 2010 - 12:12 am | शुचि

भाकरी + भरीत+ दही+ लसणाची चटणी.
मेले!! गतप्राण झाले. मला बोगदा दिसतोय जिथे अनेक आत्मे घुटमळतायत.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

मीनल's picture

18 Jun 2010 - 4:30 am | मीनल

माझ्या ही लक्षात आले. तूमचा गॅस किती पांढरा स्वच्छ आहे.
आई शप्पथ सांगते मी नियमीत स्वच्छ करते. तरी काळे डाग जात नाहीत.
त्याची पण एकदा युक्ती टाका मिपावर.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

चित्रा's picture

19 Jun 2010 - 6:24 am | चित्रा

बरेच लोक त्या गॅसभोवती अ‍ल्युमिनम फॉइल लावून शेगडीचे डागांपासून रक्षण करतात.. मला ते अजिबात जमत नाही, तसे लावले की मला स्वैपाकच करावासा वाटत नाही.

मागे एकदा पांढर्‍या शेगडीला असेच डाग पडले, आणि जाता जाईनात.. आमच्या तेव्हाच्या घराच्या मालकिणीने मग एक धातूची चौकोनी चकती आणून दिली आणि अगदी हलक्या हाताने नुसते पाण्याने + चकतीने चरे न पडता डाग काढायला शिकवले. अर्थात एवढे उद्योग करण्यापेक्षा बहुदा फॉईल बरी, पण मग मी स्वैपाकच करणार नाही, त्यापेक्षा हे बरे.. हाहाहा.. !

बाकी पाककृती आणि फोटो झकास. मलाही याला लसणीची फोडणी आवडते.

प्रियाली's picture

17 Jun 2010 - 6:48 pm | प्रियाली

उपवासानंतर केलेले भरीत असल्याने त्याला लसणाची फोडणी नसावी.

अन्यथा, लसणाची चरचरीत फोडणी देऊन केलेले भरीत अप्रतिम लागते.

मराठे's picture

17 Jun 2010 - 6:52 pm | मराठे

नेहमीप्रमाणेच मस्त ....
इथे आमच्या अपार्टमेंट्मधे हॉटप्लेटवाली शेगडी आहे आणि खाली ओव्हन.. तेव्हा ही वांग्याचं भरीत करताना वांग्याला अल्युमिनियम फॉइल लाउन ओव्हनमधे ठेवते.. (किति वेळ्/तापमान वगैरे माहित नाही.. माझं काम फक्त खाण्याचं असतं).. पुढच्यावेळी (म्हणजे उद्याच..) करताना टूथपीकने टोचून करायला पाहीजे...(आमची अगं वाचत असेलच)

jaypal's picture

17 Jun 2010 - 6:58 pm | jaypal

णिशेध सभा
fsdfsdf
लसणाची फोडणी किंवा कमित कमी तेलाची धार तरी पाहीजे वरती.
सिंहगडच्या ट्रेकची आठवण झाली. चुलीवर भाजलेल भरीत, गरमागरम भाकरी, ठेचा आणि दही ...आहाहा
=P~
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

गणपा's picture

17 Jun 2010 - 6:59 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
साला याचा प्रतिसाद म्हणजे एक प्रकारची ट्रिटच असते.

विसोबा खेचर's picture

17 Jun 2010 - 7:06 pm | विसोबा खेचर

झकास...

(गणपाचा फ्यॅन) तात्या.

प्रभो's picture

17 Jun 2010 - 8:20 pm | प्रभो

मस्तच!!!

मीनल's picture

17 Jun 2010 - 8:43 pm | मीनल

आमच्या घरी भरीत खूप आवडत. पण ते भाजताना गॅसवर फार मेस होतो. ते तेल इकडे तिकडे पसरते. त्याच्या सफाईचा वैताग येतो.
काही उपाय ???

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पंगा's picture

17 Jun 2010 - 8:48 pm | पंगा

...वापरून बघितलीयेत? :?

- पंडित गागाभट्ट.

मीनल's picture

18 Jun 2010 - 4:26 am | मीनल

अ‍ॅल्युमिनियम फॉइल?????????
ती कशी वापरायची?
गॅस खालच्या ओव्हन मधे होतच नाही तासंतास भाजून.
मीनल.
http://myurmee.blogspot.com/

पंगा's picture

18 Jun 2010 - 4:59 am | पंगा

गॅस खालच्या ओव्हन मधे होतच नाही तासंतास भाजून.

ओह... मला वाटले गॅसवर भाजताय, बर्नरवर फिरवून म्हणून. नेव्हर माइंड. (घरात गॅस आहे, "कासवछाप" नव्हे, हे गृहीत धरतो आहे. "कासवछाप"वर वांगे भाजण्याचा प्रयोग करून पाहिलेला नाही.)

(पण तरीही गॅसच्या खालच्या ओव्हनमध्ये भाजून होत नाही हे तितकेसे पटत नाही. फारा वर्षांपूर्वी एकदा ओव्हनमध्ये वांगे ठेवून त्याबद्दल पूर्णपणे विसरून गेल्यावर, आणि आधी सुरीने किंचित चिरून ठेवावे ही अक्कल तोवर आलेली नसल्याने, वांगे फुटून ओव्हनच्या अंतर्भागाचा सत्यानाश झालेला आठवतो. पण वेळ लागतो हे पटण्यासारखे. असो.)

गॅसवर भाजायचे असल्यास स्टव्हटॉपला (तेवढी बर्नर बाहेर येण्यापुरती गोल जागा वगळून) अ‍ॅल्युमिनियम फॉइलने लाइन करून घेतल्यास स्टव्हटॉप खराब होऊ नये. (किंवा चौकोनी आकाराचे आयते लायनर्ससुद्धा मिळावेत ग्रोसरी स्टोअर्समध्ये.)

ओव्हनमध्ये भाजताना वांगे जाळीवर ठेवण्यापूर्वी जाळीवर फॉइल ठेवून त्यावर वांगे ठेवून बघता येईल, पण त्याने वांग्याला थेट उष्णता मिळण्यावर कितपत परिणाम व्हावा, कल्पना नाही.

(छोट्या आकाराच्या टोस्टर ओव्हनमध्ये भरताचे वांगे मावावे का? साशंक आहे.)

- पंडित गागाभट्ट.

अविनाशकुलकर्णी's picture

17 Jun 2010 - 9:39 pm | अविनाशकुलकर्णी

वांगे म्हणजे एक टांगेची कोंबडी..लइ भारी

रेवती's picture

17 Jun 2010 - 10:26 pm | रेवती

गणपाभौ,
काय बोलायचं.....जाऊ दे!
छान!

रेवती

पिंगू's picture

17 Jun 2010 - 11:01 pm | पिंगू

कुलकर्णीसाहेब खर आहे!!!!!!! बाकी भन्नाट पाककृती.....

- (गणपा गुरुंचा शिष्य) पिंगू

रामदास's picture

18 Jun 2010 - 12:09 am | रामदास

बेगुण (बैंगन)ला गुण बहाल करणारी पाककृती सुंदर रीतीने सादर केल्याबद्दल गणपाचे अभिनंदन.
पाकीस्तानची मॅच बघताना त्यांचा विकेटी प्रत्येक बॉलनंतर शाबाश शकी ..
बहोत अच्छे बहोत अच्छे अशी आरोळी द्यायचा. तुमच्या प्रत्येक पाककृतीनंतर मलाही असेच काही म्हणावेसे वाटते. शबाश गणपा ...बहोत अच्छे बहोत अच्छे.
तसं पाहीलं तर रंग सोडून वांग्यात एकही कौतुकास्पद गुण नाही.
(वैगुण्य आचेवर खरपूस भाजल्यावर नाहीसे होते ही काव्यात्मक कल्पना आहे.)
उत्तरेत मुल अवगुणानी हाताबाहेर जात असेल तर त्याच्या हाती देवाला वांगे अर्पण करतात.
(तेज नसलेल्या बेढब हिर्‍याला मठ्ठ हिरा म्हणतात आणि तो सुधारता येत नाही आणि तुम्ही मात्र बेगुणाला गुण आणलेत.)
रांधपात वांग्याचे भरीत हा एक बडा ख्याल आहे.मॅगीसारखी क्वीकी पाककृती नाही. त्यासाठी वांग ताजं तर असावंच लागतं पण हा ख्याल रंगायला गृहीणीला पण निवांत वेळ हवा.तापीकाठचं वांगं मिळालं तर आ..हा....
रविवारी साप्ताहीक भविष्य वाचताना 'सुखद अनुभव येईल ' असं लिहीलं असेल तर समजा आज भरताचा बड ख्याल जमणार आहे.
फुलक्याबरोबर वांग्याचं भरीत खाणं म्हणजे रागाचं फक्त लक्षण गीत गाण्यासारखं आहे.सोबत भाकरी हवी. शेपटीवाले कांदे, सतेज लिंबाच्या फोडी हव्यात,ताजे लोणी हवे.(दोन दिवसापूर्वी केलेलं मथीत नको. त्याला इतर वासाचा संसर्ग नको.)
आता आमच्या या वयात वाचनमात्र धाग्यासारखी सैपाकमात्र बायको घरात असली की रविवारी सुखद अनुभव आणखी तो काय असणार. ?

नंदन's picture

18 Jun 2010 - 5:00 am | नंदन

शीर्षक (आमोद सुनासि...) आणि प्रतिसादाला शि. सा. न.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

सहज's picture

18 Jun 2010 - 5:26 am | सहज

काय प्रतिसाद आहे!

:-)

गणपा's picture

18 Jun 2010 - 12:57 pm | गणपा

_/\_
:)

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 3:21 pm | धमाल मुलगा

रामदासकाका रॉक्स! :)

गणपा's picture

18 Jun 2010 - 12:57 pm | गणपा

_/\_

:)

बिपिन कार्यकर्ते's picture

18 Jun 2010 - 3:28 pm | बिपिन कार्यकर्ते

मिष्टर रामदास गप्प बसायचे काय घ्याल?

बिपिन कार्यकर्ते

धमाल मुलगा's picture

18 Jun 2010 - 5:41 pm | धमाल मुलगा

बहुतेक वांग्याचं भरीत! :D

वाहीदा's picture

18 Jun 2010 - 5:05 pm | वाहीदा

क्रिकेट ची मैच नाही पण फुटबॉल विश्वचषक आहे ना तसे आमचे झाले आहे कधी फुटबॉल जागु च्या धाग्यावर तर कधी गणपाच्या
वाचकांचाच फुटबॉल झाला आहे जणू ..
__/\__
~ वाहीदा

शुचि's picture

19 Jun 2010 - 12:22 am | शुचि

रामदासकाका वांग्यावर लेख टाकायचात ना. कशाला इतकं सुंदर लिखाण प्रतिक्रियेत दवडलत? :

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

अक्षय पुर्णपात्रे's picture

18 Jun 2010 - 2:03 am | अक्षय पुर्णपात्रे

छान पाकृ. वाखु साठवली आहे.

नंदन's picture

18 Jun 2010 - 5:12 am | नंदन

झकास पाकृ!

>>> आपल्या मांसाहारी मंडळींसाठी याच नॉन्व्हेज व्हर्जन लौकरच टाकणार आहे.
--- ब्येष्ट! सोडे घालून का? टाका लवकर. :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

जागु's picture

18 Jun 2010 - 12:01 pm | जागु

गणपा फोटो आणि रेसिपी दोन्ही छान.

गणपा's picture

18 Jun 2010 - 12:58 pm | गणपा

समस्त वाचक / प्रतिसादकर्त्यांचे मनापासुन आभार.
:)

अविनाशकुलकर्णी's picture

18 Jun 2010 - 4:51 pm | अविनाशकुलकर्णी

तुम्हि कसले थ्यांक्यु..आम्हिच थ्यांक्यु

आशिष सुर्वे's picture

18 Jun 2010 - 9:42 pm | आशिष सुर्वे

लेका, नेमीपरमानं झ्याक पाकृ..
गाव आठवायला लावलंस रे!

>>आई शप्पथ सांगते मी नियमीत स्वच्छ करते. तरी काळे डाग जात नाहीत.>>

गॅस बदला की ओ!!

======================
कोकणी फणस

आम्ही पन ब्लॉगतो बर्र का!
http://ashishsurve.blogspot.com/

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2012 - 5:42 am | श्रीरंग_जोशी

एकदम फर्मास पाककृती आहे.

मला एक प्रश्न विचारायचा आहे.

जर भरीताच्या वांग्यात खूप बिया असतील तर वांगी भाजून झाल्यावर जास्त गरे न वाया घालवता त्या बियांचे प्रमाण कमी कसे करावे.

अमेरिकेत मला केवळ कॅलिफोर्नियामध्येच (मेक्सिकोच्या कृपेने) कमी बियांची वांगी मिळाली. नंतर जेव्हाही प्रयत्न केलाय तेव्हा प्रमाणाबाहेर बिया होत्या. वेचून वेचून बिया कमी करायचा प्रयत्न केल्यास गरे जवळ जवळ निम्म्याहून अधिक वाया जाते अन तरीही बिया शिल्लक राहतात. रसभंग होतो.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी कुणी विशेष कॢप्ती वापरत असेल तर कृपया त्याबाबत इथे लिहून उपकृत करावे.
देव आपल्यास भरपूर कमी बियांची वांगी देईल :-).

कपिलमुनी's picture

19 Oct 2012 - 10:12 am | कपिलमुनी

नंतर मिक्सर मधून काढा !

श्रीरंग_जोशी's picture

19 Oct 2012 - 10:30 am | श्रीरंग_जोशी

पण इतर कुठलाच उपाय शिल्लक नसेल तर हेच करावे लागेल... :-(.

कपिलमुनी's picture

17 Oct 2012 - 2:29 pm | कपिलमुनी

अवांतर : गणपा ....
>>आजच्या उपवासाच्या दिवशी संध्याकाळी उपवास सोडताना काय बेत आहे आज ?

शिन्च्या !!! उपास सोडताना कांदा-लसूण खातोस क ..धर्म बुडवलास की रे !!

वांगी निवडतांनाच कमी बियांची निवडावीत

वांगी निवडतांनाच कमी बियांची निवडावीत

श्रीरंग_जोशी's picture

17 Oct 2012 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी

बापू मामा - विकत घेताना बाह्यरूपावर अंदाज बांधून वेगवेगळे प्रयोग केले पण बियांची संख्या कधीच कमी झाली नाही. अनेकांना विचारून पाहिले त्यांचाही अनुभव माझ्यासारखाच.

त्यामुळे काहीतरी कल्पक उपाय वापरल्याखेरीज यावर तोडगा नाही...

वांगी निवडताना छोटि छोटि निवडावीत, एकतर बिया कमी असतील नाहीतर बीया तरी छोट्या असतील.......