गाभा:
साहित्यिक , कलावंत यांना आपण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आदर्शवत मानतो. मात्र त्यांचेही पाय मातीचे असण्याचा अनुभव कधी येतोच. प्रस्तुत प्रसंगामधली विसंगती विशेष लक्षणीय आहे.
पाठार्यांनी ताम्रपट मधे ज्या पुरुषप्रधान संस्कृतीचे चित्रण केले आहे त्याच गुन्ह्याबद्दल जबाबदार धरवून घेण्याचा प्रसंग हा डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा आहे. "नामुष्कीचे स्वगत" आणि "टोकदार सावलीचे वर्तमान" नावाची पुस्तके लिहिणार्या पठार्यांची वर्तमान नामुष्की ही अशा स्वरूपाची आहे.
प्रतिक्रिया
15 May 2010 - 8:44 am | नितिन थत्ते
अरे युयुत्सुंना बोलवा कुणीतरी.......
इथे न्यायालयात सुनावणी होऊन निकाल दिलेला असल्याने खोटी केस दाखल केली होती असे बहुधा कोणी म्हणणार नाही.
>>साहित्यिक , कलावंत यांना आपण त्यांच्या अंगभूत गुणांमुळे आदर्शवत मानतो. मात्र त्यांचेही पाय मातीचे असण्याचा अनुभव कधी येतोच.
पूर्वी हिंदी पडद्यावरील मूर्तिमंत प्रेमळ आईचेही नाव अशा बाबतीत ऐकले होते.
नितिन थत्ते
15 May 2010 - 8:53 am | प्रकाश घाटपांडे
बातमी अतिशय संयमित दिली आहे. माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्गात अजुन ही दिसतो. याला दुसरी बाजु देखील असणार आहे. व्यक्तिगत आचरण व सामाजिक प्रतिमा यातील द्वंद्व व्यक्तिच्या सदसदविवेकबुद्धीच्या साक्षीने चालू असते. ती साक्ष कशी काढायची हा खरा प्रश्न आहे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 May 2010 - 3:56 pm | युयुत्सु
अडचणीच्यावेळी माहेरून पैसे आणावेत अशी अपेक्षा ठेवली तर तो हूंडा किंवा छळ होत नाही असा निकाल पुण्याच्या(?) कुटुम्बन्यायालयाने दिल्याचे आठवते.
युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||
- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.
16 May 2010 - 9:39 am | प्रकाश घाटपांडे
कशा पद्धतीने ही अपेक्षापुर्ती करावी यावर ते अवलंबुन आहे.स्त्रीला माहेरील संपत्तीत कायदेशीर वाटा आहे व सासरकडच्या देखील.त्यामुळे ही अपेक्षा वाढते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 May 2010 - 10:47 am | Dipankar
>>>>>माहेरुन पैसे आणावेत असा आग्रह अनेक नवसुशिक्षित व नवसुसंस्कृत वर्गात अजुन ही दिसतो. याला दुसरी बाजु देखील असणार आहे
?????????????????????
आम्ही वाजंत्री कृतिपेक्षा तोंड वाजवणे योग्य समजतो
15 May 2010 - 11:58 am | बिपिन कार्यकर्ते
कलाकार आणि त्याची कलाकृती यांच्यातील विरोधाभास किती असू शकतो याचे उदाहरण. अर्थात, घाटपांडे म्हणतात तसं, काही दुसरी बाजू असेलच एखादे वेळेस.
बिपिन कार्यकर्ते
15 May 2010 - 12:14 pm | नितिन थत्ते
माझ्या वरच्या प्रतिसादातले अधोरेखित वाक्य महत्त्वाचे आहे.
नितिन थत्ते
15 May 2010 - 12:17 pm | सहज
थत्तेंशी सहमत.
15 May 2010 - 11:47 pm | शिल्पा ब
+१
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
15 May 2010 - 12:21 pm | इन्द्र्राज पवार
मराठीमध्ये असा एक समज आहे :
"मोराच्या पिसार्याचे दर्शन फक्त समोरून घ्यावे.... त्याच्या मागे जाण्याचा हट्ट धरू नये..."
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
15 May 2010 - 4:13 pm | वेताळ
उंटाच्या संदर्भात आहे.
वेताळ
15 May 2010 - 4:23 pm | परिकथेतील राजकुमार
अय्य्याआआआअ !
उंटाला पण पिसारा असतो ?
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
15 May 2010 - 5:05 pm | वेताळ
;)
वेताळ
15 May 2010 - 5:25 pm | स्पंदना
=)) =)) =)) =))
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
15 May 2010 - 5:38 pm | ऋषिकेश
ह्म्म्म
सुनेबद्दल वाईट वाटले मात्र का कोण जाणे धक्का बसला नाहि
ऋषिकेश
------------------
तुम्ही कोणीही असा, तुम्हाला जे येते त्यावर लिहा.. केवळ लिहा नाहि तर मराठीत लिहिते व्हा!