अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे. वाचकांचा आधारामुळे व काल सकाळी तात्यांबरोबर झालेल्या सामंजस्यपूर्ण वार्तालापामुळे हा चिघळलेला वाद संपुष्टात आला आहे. मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे.
अनेक गोष्टी बद्दल सल्लामसलत करत असताना दस्तुरखुद्द तात्यासाहेबांनी लेखन करा वाचा व प्रतिक्रिया देत रहा व संपर्कात राहा असे प्रेमाने सांगितले, अगदी मित्रासारखे अर्थात त्यांचा दैनंदिन कारभाराची मला जाणीव होतीच. दिवसागणिक शेकडो लेखांची पडताळणी, त्याचा प्रतिक्रिया व त्याचे मेंटेनेंस करणे म्हणजे खायचे काम नाही. या क्षेत्रात मी असल्या मुळे ते मी समजू शकलो.
माझ्या लेखनामुळे कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत याची नक्कीच काळजी घेईन. तरीही मला आपल्या मौलिक प्रतिक्रिया नेहमीच मिळतील अशी आशा बाळगतो, तात्यासाहेब व मिपा सदस्यांचा पाठींबा सदैव राहू दे. हिच प्रार्थना.
मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 1:23 am | शुचि
पावसकर, ज्या गोष्टीचा अंत चांगला ती चांगली. आपल्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
9 Mar 2010 - 1:26 am | टारझन
छ्या .. च्यायला मंग्या .. =)) काही खरं नाही ..
एकतं भांडणं करायची नाय लेका .. आणि केली तर अशी मिटवायची नाय ... =))
छ्या दोन मिंटं कौतुक वाटलं होतं तुझं .. ग्येलं बग समदं !!
एक लक्षात ठिव .. इथं एकसे एक येडझवी लोकं आहेत .... सगळेच आपापली जळजळ काढत आसत्यात .. पण आशी जाहिर आणि सोज्वळ माफी कोण मागत नाय .. ते काय करत्यात .. स्वत:च्या चू़का कळल्या .. की सुमडीत गप्प बसत्यात .. नाही तर विषयांतर करत्यात .. आणि काही वेळानी परत आपण काय केलंच नाय ह्या तोर्यात मिरवत्यात ... त्ये जमलं की बाबा तु बी इथलाच :)
- चोंग्या
9 Mar 2010 - 1:31 am | शेखर
>>की सुमडीत गप्प बसत्यात .. नाही तर विषयांतर करत्यात .. आणि काही वेळानी परत आपण काय केलंच नाय ह्या तोर्यात मिरवत्यात
टार्या लेका , 'सग'ळच तत्वज्ञान सांगितले की ....
9 Mar 2010 - 10:29 am | jaypal
तत्ववेत्ते, महान हट्ट योगी टारुनाथ महाराज की..............जय
कळ(कळीचा) शिष्य
जयपाल
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 5:09 pm | II विकास II
कंपु करायचा, सगळे संकेतस्थळ वेठीस धरण्याचा प्रयत्न करायचा, मग चपला मिळतात. ते झाले की दुसर्या संकेतस्थळावर जाउन मिपाविषयी गरळ ओकायची आणि राहीलेल्या वेळात येथे येऊन लावालाव्या करायच्या.
हे राहीलेच ना !!!!
9 Mar 2010 - 5:36 pm | विसोबा खेचर
जाऊ दे हो, चालायचंच! :)
तात्या.
9 Mar 2010 - 1:28 am | मिसळभोक्ता
वादाचा अंत रबरात झालेला पाहून अंमळ मौज वाटली.
तात्या, हल्ली नवीन सदस्य देखील सुरक्षिततेची किती काळजी घेतात, ते लक्षात आले ना ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
9 Mar 2010 - 1:32 am | टारझन
रबर डॉटेड आहे की फ्लेवर्ड ? =))
9 Mar 2010 - 1:36 am | शुचि
ए काय चावट्पणा लावलाय रे आज्काल जो तो उठतो तो रबर नाहीतर मेणबत्तीवर घसरतो =))
<पळते आता>
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
9 Mar 2010 - 4:01 am | राजेश घासकडवी
खल्लास!
बाकी वादाचा रबर नुसता थोडा ताणला तर चांगलंच असतं. पण फार ताणून तो फाटला तर त्यातून काय जन्माला येईल कोण जाणे.
9 Mar 2010 - 4:04 am | शुचि
दर्दी दिसता बरोब्बर शब्दाला दाद दिलीत ....... हा हा!!!
**********************************
To repeat what others have said, requires education, to challenge it, requires brains.- Mary Pettibone Poole
9 Mar 2010 - 4:59 am | चतुरंग
आहे, पण घसरली तर मात्र 'इरेजर' वापरावा लागेल असे दिसते! ;)
चतुरंग
9 Mar 2010 - 10:51 am | नितिन थत्ते
अहो खोडलब्बर म्हणा की !!!
नितिन थत्ते
9 Mar 2010 - 1:37 am | मिसळभोक्ता
ते आमाला काय इचारते ? त्या पावश्याला (आनि सामंजस्यपूर्न तात्याला) इचार ने ! ते समर्पित करतय ने ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
9 Mar 2010 - 1:41 am | शेखर
कुठल्या प्रकारची अनुभुती घ्यायची आहे त्यावर अवलंबुन आहे.
9 Mar 2010 - 1:53 am | टारझन
श्री शेखर .. आपल्याला स्वर्गानुभुती अपेक्षित आहे काय ? :)
9 Mar 2010 - 2:39 am | मेघवेडा
तसं असेल तर रबराचं काय काम नाय बा! ;)
-- रबरलेस!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
9 Mar 2010 - 9:58 am | मंगेशपावसकर
सदर "रबर" हा "रबरबेंड" आहे. कृपया गैरसमज करून घेऊ नये
9 Mar 2010 - 1:44 am | चतुरंग
तोवर मिभोकाकांनी रबरी ...आपलं .. नंबरी ..प्रतिसाद देऊन बाजी मारली होती! ;)
(इरेजर)चतुरंग
9 Mar 2010 - 8:06 am | विसोबा खेचर
जय हो...! :)
9 Mar 2010 - 9:38 am | आशिष सुर्वे
मंगेश राव..
येवा, 'मिपा' आपलाच आसा!!
तुमच्या झणझणीत मिसळीनंतरचा हा 'ताका'चा प्याला सगळी दुखणी निवळून गेला..
======================
कोकणी फणस
ता.क.:
मामलेदारची मिसळ आजकाल 'तितकी' तिखट राहिली नाही..
म्हणून मिसळीनंतर आम्हाला ताकाचीही गरज भासली नाही..
9 Mar 2010 - 10:58 am | सनविवि
=)) =)) =))
तुमच्या समर्पणाबद्दल धन्यवाद!!!
9 Mar 2010 - 1:10 pm | परिकथेतील राजकुमार
अ रे रे !!
टारकर्मी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
9 Mar 2010 - 4:04 pm | jaypal
"मी माझे काव्य,व्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे." या वाक्यातील काव्य आणि व्यंग या मधील ","(हे स्वलपविराम चिन्ह) दिसलच नाही आणि मी वाचुन गेलो.............
मी माझे काव्यव्यंग तसेच प्रसंग लेखन या पुढेही मिपावरच समर्पित करणार आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 1:21 pm | सागररसिक
:)
9 Mar 2010 - 7:13 pm | विकि
मला तर राजकीय पक्षांची व त्यांच्या नेत्याची आठवण झाली.भांड भांडायचे आणि नंतर समझोता कुठेतरी पाणी मुरतेय.
9 Mar 2010 - 11:36 pm | पक्या
धागा उडायच्या आत वादग्रस्त शब्द संपादित करा बरं. ;)
>>अनेक वाचकांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे वादाचा रबर हा ओढल्याने बळावतो ही नक्कीच खरी गोष्ट आहे.
ओढल्याने आणि बळावतो ह्या शब्दांमध्ये 'वाद' शब्द लिहायचा विसरला वाटते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !