माझ्याकडे प्रेस्टीजचा इलेक्ट्रिक कुकर आहे.. त्यात एकदा मी ढोकळा बनवला होता.. त्यासाठी त्यात खास जाळी दिलेली आहे.. त्यामुळे उकडीचे मोदक व्हायला काही हरकत नाही.. अर्थात उकड चांगली जमली असेल तरच ... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
राइस कूकर सॅन्यो, पॅनॉसॉनिक, झोजिरुशी इत्यादी कंपन्यांचे चांगले असतात. त्यात तांदूळ धुऊन एकास दीड, ते एकास पावणेदोन माप पाणी घालून चालू केले की साधारण १०-१२ मिनिटात भात तयार होतो. आधी धुऊन निथळत ठेवलेले बासमती तांदूळ एकास एक माप पाणी, थोडे मीठ अन लोणी घालून शिजवल्यास अगदी मोकळा बिर्यानी किंवा पुलावाजोगा जरासा कच्चा भात होतो.
काही मॉडेल्स ना टायमर असतो. सकाळी पाणी तांदूळ घालून सेट करून ठेवलं की संध्याकाळपर्यंत भात तयार.
भात शिजल्यावर काही मॉडेल्स कीप वॉर्म मोड मधे जातात. फार वेळ या मोड राहिल्याने भात खालून लागतो अन भांडं घासताना त्रास होतो.
काही जण राइसकूकरच्या भांड्यात एक वाटी पाणी घालून त्यात दुसर्या एका स्टीलच्या भांड्यात तांदूळ - पाणी घालून पण भात करतात. भात उरला तर ते स्टीलचं भांडं फ्रीझमधे सारता येतं अन घासायलाही सोपं पडतं.
बटाटे पण उकडता येतात म्हणे पण मी कधी केले नाहीत.
स्लो कूकर ला क्रॉक पॉट पण म्हणतात. यात छोले,राजमा सारखे प्रकार मंद आचेवर बराच वेळ शिजवता येतात. अमेरिकेत जास्त करुन मीट बॉल्स, स्टु, किंवा तत्सम प्रकारांसाठी वापरतात.
शिजायला वेळ घेणारे ( प्रेशर कूकर मधे शिजणारे ) प्रकार यात केल्यास चव छान लागते. इथल्या टीपिकल रेसिपीज असतात त्या जास्त करून वन डिश मील अशा असतात.
राइस कुकर मध्ये मी नारळी भात केला... भात १/२ वाटी, तूर डाळ १/४, घालून अर्धा शिजवून घेतला, मग खोबर्याची पावडर १/२ वाटी, साखर १/२ वाटी, काजू आणि १/२ सफरचन्द घालून शिजवला... खूप छान झाला होता...
मी एकदा राईस कुकर मधे वांगीभात केला ... वांगी ३०, भात ३४४४०३०० दाणे, तुरडाळ ३०००३००० दाणे , मग अमुलस्प्रे मिल्क पावडर १२ डब्बे , २० पाकिटं चहा पावडर , मग केळीची सालं-पपई बिया-आंब्याच्या कोया , टाकलं आणि ३ दिवस शिजवला .... (पाणी वगैरे वापरत नाय आपण )
खुप छाण झाला होता ... अजुन बाकी आहे येता का खायला ?
प्रतिक्रिया
4 Aug 2009 - 4:31 pm | वेताळ
ते वाचा व त्याबद्दल इथे लिहा.
वेताळ
4 Aug 2009 - 5:12 pm | चिरोटा
ते जगमोहन असले तरी नुसती माहिती मिळवण्यासाठी दोन कुकर विकत घेणे वेडेपणाचे ठरेल.
Morphy Richards eletric cooker ची माहिती इकडे-
http://www.morphyrichardsindia.com/pc-29-11-electric-cookers.aspx
Slow cooker रेसिपिज ची चक्क साइटच आहे-
http://www.slowcookerrecipes.org.uk/slow_cooker_manuals.htm
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 Aug 2009 - 4:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
या कुकरांमधे उकडीचे मोदक बनतात का हो? ;-)
अदिती
4 Aug 2009 - 6:31 pm | मस्त कलंदर
माझ्याकडे प्रेस्टीजचा इलेक्ट्रिक कुकर आहे.. त्यात एकदा मी ढोकळा बनवला होता.. त्यासाठी त्यात खास जाळी दिलेली आहे.. त्यामुळे उकडीचे मोदक व्हायला काही हरकत नाही.. अर्थात उकड चांगली जमली असेल तरच ... :)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
8 Aug 2009 - 2:38 am | शोनू
राइस कूकर सॅन्यो, पॅनॉसॉनिक, झोजिरुशी इत्यादी कंपन्यांचे चांगले असतात. त्यात तांदूळ धुऊन एकास दीड, ते एकास पावणेदोन माप पाणी घालून चालू केले की साधारण १०-१२ मिनिटात भात तयार होतो. आधी धुऊन निथळत ठेवलेले बासमती तांदूळ एकास एक माप पाणी, थोडे मीठ अन लोणी घालून शिजवल्यास अगदी मोकळा बिर्यानी किंवा पुलावाजोगा जरासा कच्चा भात होतो.
काही मॉडेल्स ना टायमर असतो. सकाळी पाणी तांदूळ घालून सेट करून ठेवलं की संध्याकाळपर्यंत भात तयार.
भात शिजल्यावर काही मॉडेल्स कीप वॉर्म मोड मधे जातात. फार वेळ या मोड राहिल्याने भात खालून लागतो अन भांडं घासताना त्रास होतो.
काही जण राइसकूकरच्या भांड्यात एक वाटी पाणी घालून त्यात दुसर्या एका स्टीलच्या भांड्यात तांदूळ - पाणी घालून पण भात करतात. भात उरला तर ते स्टीलचं भांडं फ्रीझमधे सारता येतं अन घासायलाही सोपं पडतं.
बटाटे पण उकडता येतात म्हणे पण मी कधी केले नाहीत.
स्लो कूकर ला क्रॉक पॉट पण म्हणतात. यात छोले,राजमा सारखे प्रकार मंद आचेवर बराच वेळ शिजवता येतात. अमेरिकेत जास्त करुन मीट बॉल्स, स्टु, किंवा तत्सम प्रकारांसाठी वापरतात.
शिजायला वेळ घेणारे ( प्रेशर कूकर मधे शिजणारे ) प्रकार यात केल्यास चव छान लागते. इथल्या टीपिकल रेसिपीज असतात त्या जास्त करून वन डिश मील अशा असतात.
8 Aug 2009 - 11:52 am | JAGOMOHANPYARE
राइस कुकर मध्ये मी नारळी भात केला... भात १/२ वाटी, तूर डाळ १/४, घालून अर्धा शिजवून घेतला, मग खोबर्याची पावडर १/२ वाटी, साखर १/२ वाटी, काजू आणि १/२ सफरचन्द घालून शिजवला... खूप छान झाला होता...
8 Aug 2009 - 12:04 pm | टारझन
मी एकदा राईस कुकर मधे वांगीभात केला ... वांगी ३०, भात ३४४४०३०० दाणे, तुरडाळ ३०००३००० दाणे , मग अमुलस्प्रे मिल्क पावडर १२ डब्बे , २० पाकिटं चहा पावडर , मग केळीची सालं-पपई बिया-आंब्याच्या कोया , टाकलं आणि ३ दिवस शिजवला .... (पाणी वगैरे वापरत नाय आपण )
खुप छाण झाला होता ... अजुन बाकी आहे येता का खायला ?
-(बल्लवसम्राट) टारभिम
8 Aug 2009 - 12:11 pm | Nile
बीस्सी-ब्याळी भात केला होता. रेडीमीक्स आणलं होतं त्यामुळे ब्येस झाला होता. :) कधीही (रेडीमीक्स घेउन) या करुन खाउ घालतो. ;)
-(पुणेकर)