मिपाची दुसरी पिढी

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
8 Aug 2009 - 9:56 am

ठाणे कट्ट्यावर मी दोन प्रश्न उपस्थित केले होते.
त्यातील दुसर्‍या प्रश्नाचा उहापोह पुन्हा केव्हा तरी.

"काय हो, चिरंजीव आज काल तुमची भरपुर काळजी घेतात."
म्हणजे काय?
मला सांगत होता," तुला उशीर होणार असेल तर बाबांसाठी काहीतरी खायला काढुन ठेव. ह्या आधी असा कधी बोलत नव्हता"
हॅहॅहॅहॅ
"हसताय काय, हा काय प्रकार आहे ते सांगा बघु"
हलकट आणि नीच दुसरे काय. आता ग्रॅज्युएशन पुर्ण होतय ना. बापाने पुढच्या शिक्षणाकरता लागाणारा पैसा पुरवताना हात आखडता घेउ नये म्हणुन मस्का पॉलिश. आणि हे तु मला सांगणार ह्याची खात्री. मला कॅथरीन झीटा जोन्स आवडते. ह्याची आवड पण तीच ह्यावरुन काय ते ओळख.
तसे मिपावरच्या मित्रंमंडळापैकीची दुसर्‍या पिढीची थोडीफार ओळख खालीलप्रमाणे.
बिकाची छोटी त्याची अख्खी फॅमीली आपल्या छोट्या करंगळीवर फिरवते.
रामादासपुत्र दिसायला एकदम भोळा. ह्याने ३र्‍या बाकावर बसुन केलेल्या कुचाळक्याचे भाडे सहाव्या बेंचवर बसलेला कुणीतरी गरीब बिचारा भरतो.
ब्रिटीश चा रेतीबंदराचा धंदा सांभाळायला वयाच्या दहाव्या वर्षी पुर्ण तयार कं?
रंगाशेठचा छोट्या पुढचे प्रश्न अँटिसिपेट करण्यात हुशार.
सहजराव, मुसुशेठ, रंगाशेठ, प्राजुतै, सायली तै ह्यांच्या मुलांचे फक्त फोटोच बघितले आहेत. पण एक नक्की सांगु शकतो. ही मंडळी आपल्या पालकांच्या दोन पाउल नक्की पुढे जाणार.
आता राहीला प्रश्न मिपावरच्या बॅचलर मंडळींचा.
ह्यांचा सरदार तात्या.
कट्ट्यावर त्यांनाच प्रश्न विचारला.
काय तात्या कधी मुहुर्त धरताय?
मुडमधे होते तात्या
"चाल्लाय विचार, ठरले की कळवतो"
सर्व मंडळीनी प्रश्न उचलुन धरल्यावर मात्र सावध झाले.
"नक्की नाही" चा पवित्रा घेतला.
आता समजा हां. तात्याने लग्न केले. निसर्गनियमानुसार दुसरी पिढी तयार होणारच. आणि समजा मुलगा झाला तर तो कसा असेल?
मला काय वाटते ते सांगतो.
समजा संध्याकाळी त्यांच्या घरी पोचलो. तर हा पट्ठा काय करेल.?
पहील्याशूट पायात काय घातले ते बघेल.
पादत्राणे कुठे ठेवायला पाहीजेत ह्यावर संवाद होइल.
जाताना त्या घातल्यात की नाहीत ह्याचे सुक्ष्म निरिक्षण होईल.
वयात आल्यावर बापाला सांगेल, "कसले निफ्टी कॉल विकत बसताय बाबा. त्या पेक्षा मायनॉरीटी स्टेक्स विकत घेउ"
आता इतर बॅचलर्स बद्दल 'टाईम मशिन' मधे बसुन तुम्हीच यात्रा करा आणि सांगा तुम्हाला काय काय दिसले ते?
काही नावे.
परा
टारझन
अवलिया
छोटा डॉन
आनंदयात्री
इनोबा म्हणे
निखील देशपांडे
ब्रिटीश टींग्या
राजे
आणि इतर तुम्हाला परिचीत असलेले.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

दशानन's picture

8 Aug 2009 - 10:03 am | दशानन

हॅ हॅ हॅ !

कालच आमच्या येणा-या नवीन पिढी बद्दल बोलणी झाली आहेत... इच्छूक मंडळींनी धम्या, निख्या व माझी खव चाचपून पहावी ;)

=))

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

विनायक प्रभू's picture

8 Aug 2009 - 10:15 am | विनायक प्रभू

ह्यांची दुसरी पिढी येणार्‍या पाहुण्यांचे संस्कृत मधे स्वागत करेल

निखिल देशपांडे's picture

8 Aug 2009 - 10:21 am | निखिल देशपांडे

राजेची पुढची पिढी बहुतेक सारखी पळतच असेल....
समजा राजेचा घरी जर तुम्ही गेलात तर त्याचा मुलगा/मुलगी तुमचा जवळ येवुन म्हणेल काका एक जोक सांगतो
"एक सरदार्जी असतो... त्याला ना दोन मुली असतात"

तुम्ही वाट बघाल पुढचे कधी सांगाल आणी हा हळुच म्हणेल
"क्रमशः"

निखिल
================================

विजुभाऊ's picture

8 Aug 2009 - 3:48 pm | विजुभाऊ

तुम्ही वाट बघाल पुढचे कधी सांगाल आणी हा हळुच म्हणेल
"क्रमशः"

ठ्यॉ............=))
आता काहिंची वर्णने अशी......
ओळखा कोण असेल?
काही मुले खुर्चीत डोके आणि टेबलावर पाय ठेऊन ठ्यॉ...असे म्हणत झोपतील. उठवल्यानन्तर चहा/दूध फक्त कळफलकावरच सांडतील. कुठे काही लागले खुपले तर बाबा मी फुटलो असे म्हणतील
काही बोब्देबोल्तील अणि प्र्श्न विच्रतिल. कै ते न्का विच्रु
काही बोलताना प्रयासातील प्रद्युम्न आणि अर्थंतंत्रतील विचित्रकुट असे प्रॅक्टीस करत बोलतील

पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे

टारझन's picture

8 Aug 2009 - 4:53 pm | टारझन

ख्या ख्या ख्या !!
बोळा तुंबलेले बॅचलर्स इण्क्लुड न केल्याबद्दल मास्तरचा णिशेध !!

बाकी यु नो .. करियर न ऑल .. आय जस्ट डोण्ट थिंक अबाऊट किड्स ... (आहो हे माझं नाही.. कालंच कोणतरी सलेब्रेटी झुम टिव्हीवर टॅवटेव करत होती )

बाकी ... पोरगा कसा निघेल हे कोणीच सांगु शकत नाही ... आयबाप बी .. म्हणूनच की काय बरेच आयबाप प्वॉराच्या नावावर संपत्ती करून देतात न देशोधडीला लागतात ...

आणि ..

सहजराव, मुसुशेठ, रंगाशेठ, प्राजुतै, सायली तै ह्यांच्या मुलांचे फक्त फोटोच बघितले आहेत. पण एक नक्की सांगु शकतो. ही मंडळी आपल्या पालकांच्या दोन पाउल नक्की पुढे जाणार.

म्हणजे बाकीच्यांची पोरं मतिमंद का मास्तर ? ह्याचा अर्थ काय ? काळच वेगवान झालाय ? सगळ्यांचीच पोरं दोन चार पावलं पुढेच चालणार की ? कंडिशन : तारे जमीन पर नाहीत !!

असो ... तात्याच्या पोराबद्दल जास्त लिहीता आले असते :)

-टारझन