खरवस

मितालि's picture
मितालि in पाककृती
1 Aug 2009 - 1:24 pm

गाय/ म्हैशीच्या चीकापासुन ख्ररे तर हा खरवस बनवला जातो. पण हा त्याला पर्यायी म्हणा किंवा त्यासारखा पदार्थ.. कोकणी पद्धतीची पाककृती देत आहे.
पाव लीटर साध्या थंड दुधात एक अंडं फेटुन घाला. १/२ चमचा जीरे , १/२ वाटी ओले खोबरे रवाळ वाटुन घ्या. थोडा गुळ किसुन घ्या. हे सगळ दुधात नीट मिसळुन घ्या.
गुळाचे खडे रहाता नये, चवीला अतिगोड असता नये. हे मिश्रण कुकर मधे / ढोकळ्या प्रमाणे वाफवुन घ्या. नीट जुळला तर छान वडया पडतात.
हा खरवस कोकणातील लोकाना अतिप्रिय आहे.

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

1 Aug 2009 - 1:51 pm | पर्नल नेने मराठे

मस्तच ..................
अन्ड्याला ओप्शन आहे का कहि :-?
मी शाकाहारी आहे ..
चुचु

विंजिनेर's picture

1 Aug 2009 - 2:51 pm | विंजिनेर

हा खरवस कोकणातील लोकाना अतिप्रिय आहे

चित्तपावन कोकणे अंडी कधीपासून खायला लागले बुवा? अब्रम्हण्यम्!
('सर्वा'हारी ) विंजिनेर
बाकी, खर्‍या खरवसाला पर्याय नाही.... (अर्थात हे वैयक्तिक मत)

मितालि's picture

1 Aug 2009 - 3:56 pm | मितालि

कोकणात फक्त चित्तपावन राह्त नाहीत..
हो खर्‍या खरवसाला पर्याय नाही. पण तो कुठे मिळतो एवढ्या सहज..

विसोबा खेचर's picture

1 Aug 2009 - 3:40 pm | विसोबा खेचर

खल्लास...!

तात्या.

पांथस्थ's picture

1 Aug 2009 - 9:43 pm | पांथस्थ

पुण्यामधे लक्ष्मी पथावर जनसेवा मधे खरवस हमखास मिळतो.

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

पक्या's picture

1 Aug 2009 - 11:51 pm | पक्या

>>पुण्यामधे लक्ष्मी पथावर जनसेवा मधे खरवस हमखास मिळतो
पण तो तरी अस्सल असेल कशावरून?

शैलेन्द्र's picture

2 Aug 2009 - 9:43 am | शैलेन्द्र

जनसेवाचा खरवस दुधाचा असतो, चीकाचा नाही.

पांथस्थ's picture

9 Aug 2009 - 9:04 am | पांथस्थ

तरी पण चांगला लागतो :)

- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर

आशिष सुर्वे's picture

2 Aug 2009 - 1:05 am | आशिष सुर्वे

खरवस.. नाव घेताच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या..

तेव्हा गावच्या घरी आणि एकंदर आमच्या वाडीत बर्‍यापेकी गुरे होती.. उन्हाळी सुट्टीत गावी जाणे होत असे तेव्हा कोणाकडे नुकतेच वासरु जन्माला आले असेल तर आम्हा मुंबईकरांच्या (चाकरमान्यांच्या) घरी प्रेमाने हमखास खरवसाचा द्रोण यायचा.

त्या प्रेमाची ओल आज डोळ्यात दाटून आली.

'मितालि' ताई, धन्यवाद.. आठवणींचा 'कोलाज' डोळ्यांसमोर उघडल्याबद्दल!

*श्रावण संपताच पाककृती करणार आहे!!

मस्त मजा माडी!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

प्रकाश घाटपांडे's picture

9 Aug 2009 - 9:19 am | प्रकाश घाटपांडे

आमच्याकडे शेतात म्हशी कमी व गायी जास्त होत्या. त्यामुळे भरपुर खर्वस खायला मिळायचा. मला म्हशीचा खर्वस जास्त आवडायचा. कारण तो जास्त घट्ट व पांढरा असायचा. सुरवातीच्या दोन दिवसात चिक घट्ट असल्याने एकदम मस्त वडी व्हायची. नंतर पातळ व्हायला लागायचा. नंतर जर्सी गाय आल्यावर 'हल्ली काय खर्वस पुर्वीसारखा राहिला नाही ब्वॉ' हे वाक्य असायचे.
(नॉस्टॅल्जिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.