'अवलिया गेला "ह्या लेखावर सर्जरी झाली. १२ तासानंतर ५१ प्रतिसादानंतर. तो लवकर उडाला नाही ह्याचे मला आश्चर्य वाटले.
मिभोभौ नी आपली ' अधिक माहीती साठी प्रभु मास्तरला भेटा' ही सिग्नेचर सुरु केल्यापासुन माझ्या व्य. नी वर ताण वाढला आहे. (विनंती नंतर आता ही सिग्नेचर मागे घेतली आहे) अर्थात आधी पण तसे येत होते. तसाच एक व्य. नी. आला होता.फोन नंबर ची विचारणा झाली. वाचनमात्र सद्स्यानी रात्री ९ वाजता फोन केला.
"सर, मदत हवी होती"
बोला
" विचित्र समस्या आहे"
बोला
"कसे सांगु कळत नाही"
आता बोलणार का फोन ठेउ.
"मला ना ऑफिसला गेल्यावर विचित्र भास होतात."
कसले?
"माझ्या अपरोक्ष माझ्या घरी बायकोचा मित्र येतो असे वाटते"
बर मग?
"मग पुढची चित्रे दिसतात"
आणखी काय?
"मग मी आत्महत्या केली आहे असे चित्र डोळ्यासमोर उभे राहाते. यात्रा दिसते. बाकी सर्व रडत आहेत पण बायको आणि तिचा मित्र रडण्याचे नाटक करत आहेत असे दिसते."
अहो, मी सायकिअॅट्रीस्ट नाही. तुम्ही चांगल्या डॉक्टर ला दाखवा.
"मला वाटले तुम्ही मदत कराल. मला माहीत आहे की माझी बायको तशी नाही. पण तरी सुद्धा..."
असे वाटणारे तुम्ही एकटेच नाही.
"सर, बघा ना काही जमते का?ह्या सर्व प्रकाराला एक कारण असावे असे मला वाटते. सांगु का?"
नको. मला माहीत आहे. नेहेमीची ठराविक कारणे असतात. बघतो काही सुचले तर.
_________________________________________________________________नाना चेंगट ह्या आय डी च्या खव मधे पाठमोरा मुलगा आणि 'तो बोलवतोय' असे काहीतरी बघितल्यावर एका सदस्याचा मला व्य. नी आला होता.
"बघा हो सर, नानाला 'अर्ली डेथ सींड्रोम' आहे का?"
नाना? आणि सिंड्रोम? हॅ, कै च्या कै
तुम्हीच विचारा की?मी म्हणालो
"नको. भडकेल. तुम्ही विचारा."
बर
मी विचारले.
"मी कमीत कमी १०० वर्ष जगणार आहे. रीटायर झाल्यावर वाराणसी घाटावर पुरोहीतगीरी करणार आहे. तुम्हाला असिस्टंट म्हणुन यायचे आहे का? एक जागा रिकामी आहे. " अवलिया म्हणाला आणि सिंड्रोम माझ्या सकट ड्रोम मधे गेला.
वरील केस मधे असाच काही तरी प्रकार असणार असे मला वाटले.
म्हटले अवलिया ला विश्वासात घेउ.
तो चागल्या कामाकरता मागे हटणार नाही हे मला माहीत होते.(सावल्याच्या झळा)
अगदी पोस्ट चा नायक केला तरी.
आणि लेख टाकला.
एवढीच इच्छा होती की लेख पटकन उडू नये.
कारण अवलिया ला मानणारी बरीच मंडळी मिपावर आहेत.
त्यांचा गोंधळ उडाला.
काही फोन आले.
त्यांना अर्ध सत्य सांगितले.( त्या वेळेस पुर्ण सत्य सांगणे शक्य नव्हते)
शेवटी एकदाचा त्या सद्स्याने लेख उडायच्या आत वाचला.
तसा व्य. नी आला.
आपण मेल्यानंतर आपल्याबद्दल नेमके कोण काय बोलतील हा प्रश्न खुप जणाना छळतो.
त्या वरचा उतारा 'आपुले मरण पाहीले म्या डोळा' चा रीअॅलीटी शो होता तो लेख.
दोन दिवसानी फोन आला. भास थांबले होते.
एकमेकांशी नेमका काय संबध आहे ते ऩक्की मला पण सांगता येणार नाही पण आता बायकोबद्दलचा 'हु इज इट' (मायकेल़ जॅकसन चे सुप्रसिद्ध गाणे) सिंड्रोम पण दुर झाला आहे त्या सदस्याचा.
जाता जाता: हा लेख लिहीताना सदस्याची 'पुर्व परवानगी' घेतली आहे. त्याचा 'मास्तर लिहाच 'असा आग्रह झाल्यानंतर च पोस्ट केला आहे.
ता़. क. : 'अवलिया गेला'शिर्षकामधे कंसात दचकु नका ही ओळ टाकायला विसरलो ही माझी चुक मी मान्य करतो आणि त्या लेखाच्या शिर्षकाने ज्याना मानसिक त्रास झाला त्यांची मनापासुन माफी मागतो.
प्रतिक्रिया
14 Jul 2009 - 10:11 am | सहज
३१ वाचने प्रतिसाद ०
प्रभुसर तुमच्या लेखाला लोक प्रतिसाद द्यायला बिचकू का लागले आहेत?
ता़. क. : 'अवलिया गेला'शिर्षकामधे कंसात दचकु नका ही ओळ टाकायला विसरलो ही माझी चुक मी मान्य करतो आणि त्या लेखाच्या शिर्षकाने ज्याना मानसिक त्रास झाला त्यांची मनापासुन माफी मागतो.
हे योग्य केलेत. माफी स्वीकारली आहे.
अजुन कुठल्या माफी बाकी आहेत का? :-)
वरचा लेख फारसे समजले नाही पण कोणाचा तरी खराखुरा फायदा झाला आनंद आहे. अभिनंदन.
14 Jul 2009 - 10:13 am | टुकुल
मास्तर.. मला थोडी अक्कल आहे आणी मराठी भाषा येते याचा बराच दिवस भास होत होता, तुमचे रोजचे लेख वाचुन आता तो कमी कमी होत आहे.. भाषेवरचा आत्मविश्वास पण कमी होत आहे.. पामराला कळेल अशी भाषा वापरुन मदत करा की...
(मदतीसाठी व्य. नी करु का).. ह. घ्या.
--टुकुल.
14 Jul 2009 - 1:49 pm | नितिन थत्ते
>>मला थोडी अक्कल आहे आणी मराठी भाषा येते याचा बराच दिवस भास होत होता.
अरे वा, तुम्हाला पण भास होतात तर. तुमचीच तर गोष्ट लिहिली नाही ना मास्तरांनी? :)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
14 Jul 2009 - 10:19 am | विनायक प्रभू
हा लेख मला ओळखणार्यांकरता आहे ही ओळ टाकायचे विसरलो.
उगाच डोक्याला शॉट नको.
14 Jul 2009 - 10:25 am | टुकुल
=)) =)) =))
एवढीच ओळ स्पष्ट कळाली... बाकी तुम्ही बर्याच लोकांची मदत करत आहात हे नक्की आणी त्याबद्द्ल आभिनंदन..
--टुकुल.
14 Jul 2009 - 10:29 am | Nile
लेख बर्यापैकी आठवत आहे त्यामुळे मलाही काही संबध आहे असे वाटत नाही.
आता तुम्ही असे म्हणल्यावर या लेखाचा अन त्या लेखाचा संबध आहे असेही तुम्हाला वाटते का नाही हे मला पण नक्की सांगता येणार नाही.
असो, त्या वाचनमात्राचे भास सुटले, प्रश्न मिटला. तुमच्या 'नक्की सांगता न येणार्या' समुपदेशनाचे कुतुहल आहे. एवढेच म्हणतो.
14 Jul 2009 - 10:32 am | विनायक प्रभू
दोन लेखातील संबंधाबद्दल नाही.
दोन प्रॉब्लेम मधील संबंधाबद्दल बोललो आहे.
च्या मारी मास्तर आत शिकवणी घे मराठी लिखाणाची.
14 Jul 2009 - 11:04 am | अवलिया
सर्जरी २ कधी?
--अवलिया
=============================
सत्य आणि भास यात फरक काय? भासातले सत्य भास असु शकते. भासातला भास हा सत्य असु शकतो. सत्यातल्या भासात सत्य असु शकते. सत्यातले सत्य भास असु शकते. तेव्हा सत्य आणि भास हे भास आणि सत्य पण होवु शकतात.
14 Jul 2009 - 1:37 pm | हवालदार
टारझणचा सल्ला बराच मणावर घेतलेला दिसतोय मास्तराणी.
हवालदार
14 Jul 2009 - 2:10 pm | टारझन
आयला .. हवालदाराचा ट्रॅक रेकॉर्ड पहाता अशी ऐन टायमाला गस्त घालणे आमच्या कन्या राशीला अंमळ ट्रिगर करून राहिलंय !!
असो ..
(इण्स्पेक्टर) टारेश जाधव
हिणकसवाडी पोलिस स्टेषण
14 Jul 2009 - 3:38 pm | परिकथेतील राजकुमार
हा खुलासा लिहुन "निदान एका लेखात का होईना पण नान्या मेला" हे जे सुख आम्हाला लाभले होते ते तुम्ही हिरावुन घेतले आहेत.
तुमचा जाहिर निषेध !!
आणि हो "बघा हो सर, नानाला 'अर्ली डेथ सींड्रोम' आहे का?" हि ओळ काळजाला हेलावुन गेली.
गुर्जी हिरवा गुर्जी बरवा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य
14 Jul 2009 - 7:44 pm | रेवती
दोन प्रसंगामधील साधर्म्य कळले नाही.
सावल्यांच्या झळामधील आई व मुलाच्या नातेसंबंध, पुर्वायुष्याचे वर्णन वाचतानाच आमचा जीव गेला होता. वरच्या केसमध्ये ..........
जाउ दे! काय ते समजले नाही एवढे खरे.
'अवलिया गेला' ची माफी आम्ही काय करणार? त्यावेळी वाईट्ट धक्का बसला होता. हळूहळू आम्ही ते विसरून जाऊ, निदान आठवण करून देवू नका. अवलियाना १०० वर्षे आयुष्य मिळो ही इच्छा!
रेवती
14 Jul 2009 - 9:23 pm | धमाल मुलगा
प्रभुबाबाचं क्रिप्टीक कळतंय कळतंय असं म्हणेस्तोवर रप्पकन एखादा गुगली पडतो आणी आपल्याला काहीतरी कळलंय अश्या खुळ्या कल्पनेत आपण रममाण होऊन बसतो....
शेवटी प्रभुबाबाला अश्या सर्जर्या टाकून आमच्यासारख्यांचे डोळे उघडावे लागतात तर!
जय प्रभुबाबा....जय क्रिप्टीकदेवा!
अवांतरः तरीही "नाना गेला" अश्या अर्थाचा लेख असा येणंदेखील का कोण जाणॅ पण नाही बॉ झेपलं मज पामराला.
----------------------------------------------------------------------------------------
::::
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी रे स्वाक्षरी || सच्चिदानंद! सच्चिदानंद!!
15 Jul 2009 - 12:28 am | बिपिन कार्यकर्ते
हम्म्म्म!!!
बिपिन कार्यकर्ते
15 Jul 2009 - 12:42 am | धनंजय
हम्म्म्म!!!