२००७ – त्यांनी समझौता एक्सप्रेसमध्ये बॉम्बस्फोट करून ६८ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०११ – त्यांनी मुंबईत बॉम्बस्फोट करून २६ लोक मारले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१३ – त्यांनी हैदराबादमध्ये १८ जण उडवले,
आम्ही कडिनिंदा केली आणि निर्बंध लादले!
२०१४ – वाघा बॉर्डरवर ६० लोक घायाळ,
आम्ही पुन्हा तीच कडिनिंदा, तीच निर्बंधांची पीपानी वाजवली.
२०१५ – गुरदासपूर, ७ ठार,
पुन्हा 'खेद व्यक्त', आणि निर्बंधांची पीपानी !
२०१६ – पठाणकोटमध्ये ७ जवान गेले,
कडिनिंदा नी निर्बंध….
२०१६ – उरीत १९ जवान मारले,
सर्जिकल स्ट्राईक केली, पण पुन्हा शांततेचे गीत गायले!
२०१९ – पुलवामा, ४० शहीद,
आम्ही MFN दर्जा काढला, पण व्यापार थांबवला नाही!
२०२४ – रेसी यात्रेवर हल्ला, ९ गेले,
काय कठोर शिक्षा आम्ही केली?
२०२५ – पहलगाम यात्रेवर २६ मरण पावले,
आम्ही त्यांचे ट्विटर अकाउंट बंद केले.
पुढेही हल्ले होत राहतील,
आम्ही 'कडिनिंदा' करीत राहू,
निर्बंध लादत, फाईल ढकलत,
TV debate मध्ये तावातावाने ओरडत राहू…
पण..
कधी माझ्या मायभूमीला
एक 'खरा' मुलगा मिळेल?
जो फक्त घोषणांनी नव्हे,
तर रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा सूड घेईल?
कधी जन्मेल पुन्हा एक इंदिरा?
जी ‘सर्जिकल’ नव्हे, ‘भौगोलिक’ स्ट्राईक करेल?
जी पाकिस्तानात घुसून,
जगाला दाखवेल की "भारत फक्त सहन करत नाही!"
कधी होणार माझी मान ताठ?
कधी मी गर्वाने सांगणार?
"हो, मी भारतीय आहे नी आम्ही सूड घेतला.”
कधी माझ्या शहीदांच्या घरच्यांना
श्रद्धांजली ऐवजी न्याय मिळेल?
कधी घडेल शब्दांऐवजी कृती?
प्रतिक्रिया
29 Apr 2025 - 9:35 pm | प्रसाद गोडबोले
बूंद से गई वो हौद से नहीं आती।
तुम्ही 2029 पर्यंत मिसळपाववर सर्वत्र घाण करत फिरणार आहात अशी जी स्पष्टोक्ती दिली आहे त्यानंतर असे हजारो लेखन धागे प्रकाशित केले तरी काहीही उपयोग होणार नाहीये आता.
2029 निवडणूक निकालानंतर बोलू :=))))
29 Apr 2025 - 11:19 pm | चामुंडराय
कडीनिंदा हा हिंदी शब्द आहे ना? की माझंच काही चुकतंय?
मराठी प्रेमी आबा ह्यांनी "तीव्र निषेध" न म्हणता "कडीनिंदा" असा शब्दप्रयोग केल्याने आश्चर्य वाटले.
30 Apr 2025 - 3:08 pm | अमरेंद्र बाहुबली
भाजपेयींचा आवडता शब्द आहे, त्यांची मजल कडिनिंदा पर्यंतच!
30 Apr 2025 - 2:50 am | कर्नलतपस्वी
आवडली.
अबाच्यां देशभक्तीला राजकीय वास
अबांना कमळाबांईचा खुपच त्रास
जरा वळून बघा म्हणतो,जरा इतीहास,
चाळून बघा म्हणतो.
कुणी पेरल्या बाभळी कोण वेचतयं काटे
कैच्या कै कवीता पाडायला XX का नाही वाटे
उघडा डोळे बघा निट्ट, करून सवरून निगरगट्ट
सरदाराने जीव तोडून सांगीतलं,पण नाही कळालं
तौंड उघडायला लावू नका,बात निकलेगी तो दुर तलक जागेयी
ढुंXची लंगोटी उतर जायेगी. अच्छा है....
बंद मुठ्ठी लाख की,खुल गयी तो......
30 Apr 2025 - 9:14 am | मुक्त विहारि
त्याचेच परिणाम आपण सगळे भोगत आहोत...
अर्थात्,
त्यांनी अद्याप धड, पंचतंत्र पण वाचलेले नाही, त्यांना हे सगळे काय कळणार?
30 Apr 2025 - 3:10 pm | अमरेंद्र बाहुबली
उघडा बंद मुठ्ठी हौद्या चर्चा! काय खरे काय खोटे कळूद्या!
कळूद्या भाजपेयी खरे देशप्रेमी की फक्त इंदिरा एकटी?
30 Apr 2025 - 8:23 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हे राम....! आता आपण सैन्याला पूर्ण अधिकार दिले आहेत. राहिलं शब्दाऐवजी कृतीचा भाग तर, आपण पाकिस्तानातील सोळा पाकिस्तानी यूट्यूब चॅनलवर बंदी घातली आहे.
तसेच, आपल्या देशातील उत्तर प्रदेशातील लोकप्रिय असलेले '४ पीएम' या यूट्यूब चॅनलवरही सुरक्षेचे कारण देत बंदी घातली आहे, या ट्यूब वाहिनीवर पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारला त्यांनी धारेवर धरत थेट मोदी-शहांना लक्ष्य केले होते.
अजुन कवीला काय कार्यवाही अपेक्षित आहे ? अवघड हे राव.
-दिलीप बिरुटे
30 Apr 2025 - 3:11 pm | अमरेंद्र बाहुबली
एवढेच करू शकतो आपण युट्यूब चॅनल ला बंदी याव नी त्याव! म्हणून म्हटले आहे., कधी मिळणार मायभूमीला “खरा” पुत्र? जो पाकिस्तानला दणका देईल?
1 May 2025 - 6:27 pm | कर्नलतपस्वी
कवीने आगोदरच स्पष्ट म्हणले आहे, "An Eye for Eye",
स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुनर्विलोकन केल्यास लक्षात येईल की कुलंगी कुत्र्या सारखे वारंवार अंगावर धाऊन येतयं,नुसतेच हाड म्हणून भागणार नाही. पेकाटात लाथ घालून कंबरडेच मोडले पाहीजे.
संपूर्ण परिस्थितीचे भान ठेवून व होणारे दूरगामी परिणाम लक्षात घेऊन प्रतिसाद दिला आहे.
30 Apr 2025 - 9:24 am | मुक्त विहारि
तुम्हाला राग येणे साहजिकच आहे...
कारण हे लचांड आपल्याच, लाडक्या परमपूज्य गांधी आणि नेहरू यांनी, भारतावर लादले आहे....
आता तर तुम्हाला हे सहन पण होत नाही आणि सांगता पण येत नाही...
असो,
बाकी कविता आवडली.
आता एखादी कविता राजस्थान स्कँडल किंवा ह्याच महिन्यात उघडकीस आलेल्या भोपाळ स्कँडल वर पण येऊ द्या. भारतातील स्त्रियांच्या अब्रूचे कसे धिंडवडे काढल्या गेले, ते पण सांगा....
1 May 2025 - 9:17 pm | श्रीरंग_जोशी
२०१३ आधीची बरीच वर्षे भारतातल्या विविध ठिकाणी बॉम्बस्फोट घडवणर्या दहशतवाद्यांच्या भटकळ मोड्युलला २०१३ पर्यंत पूर्णपणे नेस्तनाबूत केले गेले. त्या काळात केंद्रिय गृहमंत्री होते पी चिदंबरम अन सुशिल कुमार शिंदे.
1 May 2025 - 9:43 pm | अमरेंद्र बाहुबली
पण पाकिस्तानला काय धडा शिकवला?