महाराष्ट्र विधानसभा २०२४ निवडणुकीवर हा माझा शेवटचा लेख. विविध पक्षांची आजपर्यंतची कामगिरी, २०२४ लोकसभा निवडणुकीतील विविध पक्षांची कामगिरी, महाराष्ट्रातील मतदारांचा नेहमी दिसणारा कल यावर आधारीत काही आकडेमोड करून कोणत्या पक्षाला किती मते मिळण्याची शक्यता आहे व त्यानुसार किती जागा जिंकण्याची शक्यता आहे याचे अंदाज लिहीत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील मागील काही वर्षात निर्माण झालेली खिचडी व गुंतागुंत पाहता जागांचा अंदाज व्यक्त करणे खूप धाडसाचे आहे. मतांच्या टक्केवारीचे अंदाज बर्याच अंशी बरोबर येऊ शकतील, परंतु जागांचा अंदाज बर्याच प्रमाणात चुकू शकतो. तसे झाल्यास माझ्या प्रारूपाकडे नव्याने पहावे लागेल.
मत टक्केवारी
लोकसभा निवडणुकीत ६१.२९% मतदारांनी मत दिले होते. या विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी यापेक्षा कमी असेल असे वाटते. कदाचित ६०% किंवा ५८% पेक्षाही कमी असल्यास नवल वाटणार नाही.
एप्रिल-मे २०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मतांची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.
महाराष्ट्रातील एकूण दिलेली मते - ५ कोटी ७० लाख (मत टक्केवारी ६१.२९%)
काँग्रेस - १७.९२% (लढविलेल्या जागा - १७ + १ = १८ सांगली धरून)
उबाठा - १६.५२% (लढविलेल्या जागा - २१)
शप गट - १०,२७% (लढविलेल्या जागा - १०)
भाजप - २६.१८% (लढविलेल्या जागा - २८)
शिंदे गट - १२.९५% (लढविलेल्या जागा - १५)
अप गट - ४.४२% (लढविलेल्या जागा - ४ + १ = ५ जानकर धरून)
मविआ आघाडीत सर्वाधिक जागा उबाठाने लढविल्या होत्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते उबाठाला मिळाली आहेत. दुसरीकडे महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजपने लढविल्या, परंतु प्रति मतदारसंघात सर्वात कमी मते शिंदे गटाला मिळाली आहेत.
लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकार व पंतप्रधान निवडायचा असल्याने महाराष्ट्रात स्थानिक भाजप नेतृत्वाविरूद्ध काहिशी नाराजी असूनही महायुती व विशेषतः भाजपला काही प्रमाणात लाभ झाला होता. परंतु विधानसभा निवडणुकीत वेगळे मुद्दे असतात. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकार निवडायचे आहे. त्यामुळे मोदींच्या चेहर्याचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीत मिळणार नाही. महाराष्ट्रातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीचा इतिहास पाहिला तर साधारणपणे दोन्ही निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधीत पुढेमागे होतात. आधी लोकसभा निवडणूक होते व नंतर काही महिन्यातच विधानसभा निवडणूक होते (मार्च १९७७ मध्ये लोकसभा निवडणूक व जवळपास १ वर्षानंतर १९७८ मध्ये विधानसभा निवडणू़क झाली होती. मार्च १९९५ मध्ये विधानसभा निवडणूक व मे १९९६ मध्ये लोकसभा निवडणूक झाली होती. सप्टेंबर १९९९ मध्ये दोन्ही निवडणुका एकत्र झाल्या होत्या.). २००४ पासून मे महिन्यात लोकसभा निवडणूक व ऑक्टोबर मध्ये विधानसभा निवडणूक होते.
१९८०: लोकसभा - विरोधी पक्ष ९ आणि काँग्रेस ३९, विधानसभा - विरोधी पक्ष ८०, कॉंग्रेस १९२
१९८५: लोकसभा - विरोधी पक्ष ५ आणि काँग्रेस ४३, विधानसभा - विरोधी पक्ष १०४, कॉंग्रेस १६२
१९९०: लोकसभा - महायुती १४, जनता दल ५ आणि काँग्रेस २८, विधानसभा - महायुती ९४, जनता दल २५, कॉंग्रेस १४१
१९९५: विधानसभा - महायुती १३८ आणि काँग्रेस ८०, १९९६ लोकसभा - महायुती ३३, कॉंग्रेस १५
१९९९: लोकसभा - महायुती २७ आणि काँग्रेस २१, विधानसभा - महायुती १२५, कॉंग्रेस १३३
२००४: लोकसभा - महायुती २५ आणि काँग्रेस आघाडी २३, विधानसभा - महायुती ११६, कॉंग्रेस आघाडी १४०
२००९: लोकसभा - महायुती २० आणि काँग्रेस आघाडी २५, विधानसभा - महायुती ९०, कॉंग्रेस आघाडी १४४
२०१४: लोकसभा - महायुती ४२ आणि काँग्रेस आघाडी ६, विधानसभा - महायुती १८६, कॉंग्रेस आघाडी ८३
२०१९: लोकसभा - महायुती ४१ आणि काँग्रेस आघाडी ५, विधानसभा - महायुती १६१, कॉंग्रेस आघाडी ९८
साधारणपणे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत जो कल दिसतो, तोच कल बराचसा विधानसभा निवडणुकीत पुनरावृत्तीत होतो. लोकसभा निवडणुकीत मोठ्या गटाला जितक्या जागा मिळतात, त्या विधानसभा निवडणुकीत काही प्रमाणात कमी होतात परंतु मतदारांचा कल बर्याच प्रमाणात तसाच राहतो.
_________________________________________________________________________
या पार्श्वभूमीवर २०२४ विधानसभा निवडणुकीत साधारणपणे खालीलप्रमाणे परिस्थिती असू शकते.
काँग्रेस
काँग्रेस १०१ जागा लढवित आहे. काँग्रेस अंदाजे १८% मते व ६०-७० जागा मिळवेल.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ८७ जागा लढवून अंदाजे १५% मते व ५०-६० जागा मिळवेल.
ऊबाठा गट
शिवसेना १९८९ पासून (२०१४ चा अपवाद वगळता) विधानसभा निवडणूक युतीत लढत आहे. परंतु शिवसेनने जिंकलेल्या एकूण जागांचे लढवित असलेल्या एकूण जागांशी प्रमाण (म्हणजे स्ट्राईक रेट) खूप कमी आहे.
१९९० - लढविलेल्या एकूण जागा १८३, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २८.४१
१९९५ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ७३, विजयाचे प्रमाण = ४२.६९
१९९९ - लढविलेल्या एकूण जागा १७१, जिंकलेल्या जागा ६९, विजयाचे प्रमाण = ४०.३५
२००४ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ६२, विजयाचे प्रमाण = ३६.६८
२००९ - लढविलेल्या एकूण जागा १६९, जिंकलेल्या जागा ५२, विजयाचे प्रमाण = २६.०३
२०१४ - लढविलेल्या एकूण जागा २८६, जिंकलेल्या जागा ६३, विजयाचे प्रमाण = २२.०२
२०१९ - लढविलेल्या एकूण जागा १२४, जिंकलेल्या जागा ५६, विजयाचे प्रमाण = ४५.१६
शिवसेनेचा सर्वाधिक स्ट्राईक रेट २०१९ मघ्ये ४५.१६ होता जेव्हा शिवसेना युतीत निवडणू़क लढली होती व सर्वात कमी स्ट्राईक रेट २०१४ मध्ये २२.०२ होता जेव्हा शिवसेना स्वबळावर लढली होती.
आता शिवसेनेचे तुकडे पडले आहेत. २००९ मध्ये राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर शिवसेनेचा स्ट्राईक रेट फक्त २६.०३ होता. उबाठा सेना पुन्हा एकदा युतीत आहे व फक्त ९६ जागांवर लढत आहे. अश्या परिस्थितीत उबाठा सेनेला ४० पेक्षा जास्त जागा मिळणे अवघड वाटते. प्रत्यक्षात शिंदे सेनाला मूळ सेनेची जाणार असलेली मते लक्षात घेतली तर उबाठा सेना अंदाजे १२% मते घेऊन २०-३० जागा मिळवेल.
म्हणजे मविआ एकत्रित ४५% मते व १३०--१६० जागा मिळवेल.
____________________________________________________________________
भाजप
भाजपने २०१४ मध्ये स्वबळावर २५२ जागा लढवून २८.५०% मते मिळवून १२२ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये शिवसेनेशी युती करून भाजपने १६४ ( भाजप १४६ + मित्रपक्ष १८ कमळ चिन्हावर) जागा लढवून २५.७५% मते मिळवून १०३ जागा जिंकल्या आणि सत्ता गमावली. २०२४ मध्ये भाजप १४८ जागांवर लढत आहे. आता मोदींचा चेहरा नाही. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही हिंदुत्व हा मुद्दा अजिबात नाही (लव जिहाद, बटेंगे तो कटंगे, बांगलादेशातील हिंदूंना मारपीट, अयोध्येतील श्रीराम मंदीर अश्या मुद्द्यांचा मतदारांवर शून्य प्रभाव पडेल). इतर सर्व पक्षांप्रमाणे भाजपचा प्रचारही दिशाहीन व निष्प्रभ आहे.
भाजपला साधारणपणे २२-२३% मते मिळतील व ५०--६० च्या आसपास जागा मिळतील.
शिंदे गट
शिंदे गट ८५ जागा लढवित आहे. शिंदेंची प्रतिमा बरीच उजळली आहे. परंतु शिंदेंनी सुद्धा बरेच चिकीचे उमेदवार दिले आहेत. नेत्याची मान्यता पक्षाच्या मान्यतेपेक्षा कायमच जास्त असते. मोदींची लोकप्रियता बहुतेक वेळा ६०% किंवा अधिक असते, परंतु भाजप किंवा रालोआला ४४% हून जास्त मते मिळाली नाही.
शिंदे गटाला साधारणपणे १२% मते व २०-२५ जागा मिळतील.
अजित पवार गट
अप गट ५१ जागा लढवून साधारणपणे ७% मते व १०-१५ जागा मिळवेल.
म्हणजे महायुती एकत्रित ४१-४२% मते व ८०-१०० जागा मिळवेल.
===================================================
बहुतेक सर्व वृत्तवाहिन्यांनी मतदानपूर्व सर्वेक्षण करणे टाळले आहे कारण सद्यस्थितीत प्रचंड खिचडी झालेल्या राजकीय वातावरणात कोण किती जागा जिंकेल याचा अंदाज काढणे खूपच अवघड आहे आणि दुसरं कारण म्हणजे हरयाना निवडणुकीचे सर्व वाहिन्यांचे सर्व अंदाज पूर्ण चुकले होते. तरीसुद्धा अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करतोय. मी अंदाज व्यक्त केलेली मतांची टक्केवारी बरोबर असण्याची बरीच शक्यता वाटतेय, पण जागांचा अंदाज बर्यापैकी चुकू शकतो.
____________________________________________________________________________________
मनसे १५० जागा लढवित आहे. मनसे २-३% टक्के मते व ३-४ जागा जिंकू शकते.
________________________________________________________________
इतर काही अंदाज -
- मनसे, शेकाप, सप, एमआयएम, वंचित, बच्चू कडूचा पक्ष, जनसुराज्य असे चिल्लर पक्ष एकत्रित १५-२० जागा व अपक्ष १५-२० जागा जिंकतील.
- सर्व पक्षांमधील सर्वात मोठ्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल.
- कॉंग्रेस सर्वात मोठा पक्ष असण्याची शक्यता आहे. त्याखालोखाल भाजप किंवा शप गट, त्याखालोखाल शिंदे गट, नंतर उबाठा आणि शेवटी सहाव्या क्रमांकावर अप गट असेल.
- कोणत्याही एका पक्षाला तीन अंकी जागा मिळणार नाहीत. कोणत्याही २ पक्षांना एकत्रित १४५ जागा मिळणार नाहीत. सरकार बनविण्यासाठी ३ किंवा अधिक पक्षांना एकत्र यावे लागेल, यातून एखादी नवीन खिचडी निर्माण होण्याची शक्यता आहे.
- मविआ सत्तेवर आल्यास वर्षा गायकवाड किंवा प्रणिती शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता किंवा कदाचित यशोमती ठाकूर असतील.
- महायुती सत्तेवर आल्यास एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार
- उद्धव ठाकरे व फडणवीस मुख्यमंत्री होण्याची शक्यता नाही
- महायुती सत्तेत न आल्यास महाराष्ट्र भाजपत नेतृत्वबदल होण्याची दाट शक्यता. विधानसभा निवडणुकीत पराभव होऊन सत्तेत न येणे हे महाराष्ट्र भाजपसाठी व महाराष्ट्रासाठी इष्टापत्ती ठरेल.
- मविआ सत्तेवर येण्याची शक्यता
- कोणत्याही आघाडीला स्पष्ट बहुमत न मिळाल्यास निकालापश्चात काँग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व शिंदे गट ही नवीन आघाडी निर्माण होण्याची शक्यता. अश्या परिस्थितीत उबाठा पुन्हा एकदा भाजपशी जुळवून घेण्याची शक्यता.
- विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार काकांकडे परत जाण्याची शक्यता
- जे केंद्र सरकार किंवा राज्य सरकार राखीव जागा वाढविते, ते सरकार नंतर लगेचच्या निवडणुकीत सत्तेत परतत नाही हे १९९१ पासून अनेकदा दिसले आहे.
* १९९० - वि. प्र. सिंगांनी मंडल आयोगाच्या अहवालानुसार २७% राखीव जागा इतर मागासवर्गीयांना दिल्या पण १९९१ लोकसभा निवडणूक हरले.
* १९९३ - जयललिताने तामिळ्लनाडूत राखीव जागांचे प्रमाण ६९% पर्यंत वाढविले, पण १९९६ विधानसभा निवडणूक हरली.
* १९९३ - शरद पवारांनी अनेक नवीण जातींचा इतर मागासवर्गीयांमध्ये समावेश केला, पण १९९५ विधानसभा निवडणूक हरले.
* २००३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी चक्क ब्राह्मणांना राखीव जागा दिल्या, पण २००३ विधानसभा निवडणूक हरले.
* २००८ - राजस्थान मुख्यमंत्री वसुंधरां राजेंनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २००८ विधानसभा निवडणूक हरल्या.
* २०१३ - राजस्थान मुख्यमंत्री गेहलोतांनी गुज्जरांना राखीव जागा दिल्या, पण २०१३ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१३ - मनमोहन सिंगांनी जाटांचा समावेश इतर मागासवर्गीयांमध्ये केला, पण २०१४ लोकसभा निवडणूक हरले.
*२०१४ - पृथ्वीराज चव्हाणांनी मराठ्यांना १६% व मुस्लिमांना ५% राखीव जागा दिल्या, पण २०१४ विधानसभा निवडणूक हरले.
*२०१९ -- फडणवीसांनी मराठ्यांना १६% राखीव जागा दिल्या, पण २०१९ विधानसभा निवडणूकीत सत्तेत परतले नाहीत.
आता २०२४ मध्ये शिंदेंनी मराठ्यांना १०% राखीव जागा दिल्या आहेत. वरील कलानुसार विधानसभा निवडणूकीनंतर ते सत्तेत परततील का हे २३ नोव्हेंबरला समजेलच.
- पुण्यातील सर्व ८ मतदारसंघ भाजपने स्वबळावर २०१४ विधानसभा निवडणुकीत जिंकले होते. २०१९ मध्ये शिवसेनेबरोबर युती असूनही यतील हडपसर व वडगाव शेरी हे मतदारसंघ भाजप हरला होता. आता हे २ मतदारसंघ भाजपने अजित पवार गटाला दिले आहेत. उर्वरीत सर्व ६ मतदारसंघांपैकी पर्वती, कसबा, खडकवासला, कँटोंमेंट व शिवाजीनगर मध्ये खूओ चुरशीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. कोथरूडही धोक्यात होता. परण्तु चंपाने धूर्तपणे कोथरूडमधील प्रतिस्पर्धी मेधा कुलकर्णी व मुरलीधर मोहोळ यांना वाटेतून दूर केले व बंडखोर अमोल बालवडकरांना बसविण्यात आले. त्यात भर म्हणून तिरंगी लढत निर्माण झाली (चंपा, उबाठाचे मोकाटे व मनसेचे किशोर शिंदे) ज्याचा लाभ भाजपलाच मिळण्याची शक्यता आहे. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत बापटांना कोथरूडमध्ये १ लाख मतांची आघाडी होती. परंतु विधानसभा निवडणूकीत कोंग्रेस, राष्ट्रवादी व मनसेचे संयुक्त उमेदवार किशोर शिंदे यांनी चांगली लढत देऊन ८०,००० मते मिळविल्याने चंपा फक्त २५,००० मतांनी जिंकले. पण आता ३ उमेदवार असल्याने भाजपला काळजी नाही. २०१४ मध्ये ८ पैकी ८ व २०१९ मध्ये ८ पैकी ६ जागा भाजपने जिंकल्या होत्या. आता भाजप ६ व अप गट २ जागा लढवित आहे. २०२४ मध्ये भाजप व अप गट एकत्रित ६ पेक्षा कमी जागा जिंकेल असा अंदाज आहे.
__________________________________________________________
इच्छा यादी
खालील निकाल लागावे अशी मनोमन इच्छा आहे. यातील किती इच्छा पूर्ण होतील ते २३ नोव्हेंबरला समजेलच.
- कोणत्याही आघाडीला बहुमत मिळू नये व सरकार बनविता येऊ नये.
- महाराष्ट्रात पुढील १० वर्षे राष्ट्रपती राजवट असावी.
- भाजप व उबाठा गटाला शून्य जागा मिळाव्या.
- कोणीही ठाकरे, राणे व बारामतीकर विधानसभेत नसावा.
- आव्हाड, नबाब मलिक पिता-पुत्री, पटोले, भास्कर जाधव, सर्व मुस्लिम उमेदवार, कडू, संजय राठोड, भ्रष्टाचाराचे आरोप झालेले सर्वजण इ. पराभूत व्हावे.
प्रतिक्रिया
26 Nov 2024 - 11:08 pm | शाम भागवत
सरकारी कारभारात आपोआप वगैरे काही नसतं. निवडणूक संहितेत तर नक्कीच नाही. जर त्याने मतदान करावयाचे नाकारले तर तशी नोंद वगैरे करून मग ते मत कॅन्सल वगैरे केले जात असणार. कामकाजात अडथळा किंवा तत्सम एफआयआर वगैरे दाखल करतात का ते माहीत नाही.
26 Nov 2024 - 4:02 pm | अमरेंद्र बाहुबली
मतदान यंत्रेही गुजरात मधूनच मागवलेत, ह्यामुळे संशय आणखी बळावतो. जसं काय गुजरात सोडलं तर भारतात इतर राज्यात लोक अश्मयुगीन जीवन जगताहेत. सगळं व्यवस्थित मॅनेज करुन “महाराष्ट्र धुतलाय.” सगळीकडूनच ईव्हीएमच्या वाईट बातम्या येताहेत.
भारतात लोकशाही टिकवायची असेल तर निवडणूक आयोगाला भाजपच्या ताब्यातून काढून स्वायत्तता द्यायला हवी.
26 Nov 2024 - 4:11 pm | अमरेंद्र बाहुबली
मुख्यमंत्रीपदावरून भाजप नी शिंदेसेनेत जुंपली आहे. खरं तर निवडणुका एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्याने लढल्या गेल्या, फडणवीसांनी मतदानाआधीच जाहीर केले होते की ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही. तरीही अचानक पलटी मारून भाजप फडणविसाना पुढे कराताहेत. पाहूयात काय होते ते, भाजप पक्ष नीतीमत्ता पाळतो की शिंदेनाही ठाकरेंना मिळाला तसा धोका मिळतो. नाहीतरी शिंदेंचा उपयोग भाजपसाठी संपलाय.
26 Nov 2024 - 5:50 pm | चावटमेला
भाजप त्यांच्या परंपरेप्रमाणे विश्वासघात करणार हे नक्की
26 Nov 2024 - 5:57 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
शिंदेनाही कळूदे. ठाकरेंसोबत काय झाले ते.
26 Nov 2024 - 6:42 pm | गवि
सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळली:म्हणाले - जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले तर गडबड!
https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/supreme-c...
26 Nov 2024 - 9:04 pm | धर्मराजमुटके
या असल्या बातम्यांच्या लिंका डकवून काही उपयोग नसतो. असे आरोप करणार्यांवर त्याचा काही परीणाम होत नसतो. आरोप पुराव्यानिशी सिद्ध झाल्यास ज्याने घोटाळा केला त्याला शिक्षा आणि जर आरोप सिद्ध करता आला नाही तर आरोप करणार्यास शिक्षा असे काही नियोजन केले तरच काहीतरी होऊ शकेल.
शरद पवार इतके वर्ष राजकारणात राहिले. काल त्यांना मुलाखतीत ईव्हीएम बद्दल विचारले तर त्यांनी नरो वा कुंजरो वा भुमिका घेतली. माहिती घेऊन सांगतो म्हणाले. आता कुठून माहिती घेणार हे त्यांनाच ठाऊक.
26 Nov 2024 - 7:20 pm | आग्या१९९०
एखाद्या विषयात अपेक्षेपेक्षा कमी मार्क मिळाले तर विद्यार्थी रिचेकसाठी पाठवताना बाकीच्या विषयात चांगले मार्क मिळाले तेसुध्दा रिचेकसाठी पाठवतो का?
26 Nov 2024 - 8:00 pm | अमरेंद्र बाहुबली
+१
26 Nov 2024 - 9:37 pm | जेपी
200
26 Nov 2024 - 11:17 pm | शाम भागवत
“चला. धाग्याचे प्रयोजन संपले “
असे गुरूजींनी जाहीर करताच
धागा आणखीनच जोरातच पळायला लागला.
😀
27 Nov 2024 - 10:14 am | श्रीगुरुजी
खरंच की
27 Nov 2024 - 6:13 am | वामन देशमुख
मननीय माहिती
हिंदुत्ववादी मतांची त्सुनामी, वारकरी, कीर्तनकार, भजनी मंडळे इ.
27 Nov 2024 - 6:26 am | वामन देशमुख
लिंक दुरुस्ती!
मननीय माहिती
हिंदुत्ववादी मतांची त्सुनामी, वारकरी, कीर्तनकार, भजनी मंडळे इ.
27 Nov 2024 - 9:59 am | टीपीके
मनुवादी कुठचे. आमचे सरकार आले की पहिल्यांदा ते राम मंदिर तोडणार, मग बाकीची मंदिरे. मग तिथे आमच्या श्री श्री काकांचे, श्री श्री उबठा, श्री श्री श्री श्री श्री राऊत यांचे मंदिर बांधणार. मग हिंदूंचा शिक्षणाचा अधिकार काढून टाकणार. सगळ्यांना गुलाम करून टाकणार. आठवतंय ना 30-40 वर्षांपूर्वीचा स्वर्गीय भारत, आम्ही तो परत आणणार. तुमची लायकी गुलामीची आहे आणि तुम्ही गुलामच राहणार. मार्क्स, इस्लाम यांनी आम्हाला शिकवले आहे समतेच्या गप्पा करून गुलामी कशी आणायची
तुम्ही गुलाम आहात आणि गुलाम राहणारच
27 Nov 2024 - 10:19 am | अमरेंद्र बाहुबली
खो खो खो.
27 Nov 2024 - 11:58 am | अमरेंद्र बाहुबली
निवडणूक शिंदेच्या चेहऱ्यावर युतीने लढवली होती, आता शिंदेना मुख्यमंत्रिपद दिले जात नाहीये. शिंदेंचा वापर केला गेलाय असे वाटतेआहे. शिंदे काय करतील हे पाहणे मजेशीर असेल.
27 Nov 2024 - 1:49 pm | शाम भागवत
काहीही.
शिंदेंना मुंबई महानगरपालिका दिली की झालं. नाहीतरी ती उबाठांनी दिलेली होतीच की. पण नाही. आता भोगताहेत.
भाजपापेक्षा इतरांनाच भाजपाची फार काळजी बॉ.😁
लोकं लै हुषार व्हायला लागली आहेत.
काही झालं तरी अकेला देवेंद्र बऱ्याच जणांना महाराष्ट्रांत नकोय.
म्हणून त्यासाठी लावताहेत फिल्डिंग.
तीही दुसऱ्याच्या घरच्या मैदानावर.
🤣
जोपर्यंत पवारसाहेब राजकारणातून निवृत्त होत नाहीत. तोपर्यंत देवेद्रजीचा मेन पार्ट राहणारच. आतातर मुमं.
नाझी भस्मासुराचा उदयास्त वाचताय ना?
त्यातले नॉमर्डी प्रकरण वाचा. सैन्य जिंकत असताना गोअरिंगचं ऐकून जर्मन सैन्याने ब्रिटीश सैन्याचा पाठलाग थांबवला. गोअरिंगनी विमान हल्ले केले. ३ लाखाचं सैन्य कैद व्हायच्या ऐवजी निसटून जायला मदत झाली. जिंकलेले जर्मन हारले. सगळ्यात चांगलं असलेलं ब्रिटीश सैन्य वाचले.
तुम्हाला खरचं असं वाटतं की विरोधकांना परत उभे राहण्यासाठी फडणवीसांना महाराष्ट्र सोडायला सांगतील? तुम्हाला खरचं असं वाटतं की मोदी, शहा, फडणवीस वगैरेंपेक्षा तुम्ही हुषार आहात? अहो, म्युनसिपालटीत उंदीर मारण्याचे काम करणाऱ्या माझ्यासारख्यांना एवढे कळतंय, तर त्यांना केवढं कळत असेल ?
असो.
27 Nov 2024 - 2:08 pm | शाम भागवत
अफझलखानाचा वध झाल्यावर शिवाजी महाराजांनी क्षणाचीही उसंत न घेता कोल्हापूरपर्यंत प्रदेश काबीज केला. विजापूरकरांना उसंत मिळवून दिली नाही. आनंदउत्साहात आता वेळ घालवून चालणार नाही. समोर पवार साहेब आहेत. त्यांनी कामाला सुरवातही केलेली असेल हे न समजण्याइतके फडणवीस कच्या गुरूचे चेले नाहीत. मोदींचे चेले आहेत ते.
मुख्य म्हणजे त्यांनी नक्कीच शिवचरित्र माहीत करून घेतल असेल. कोणाकडून माहीत नाही. पण जर त्यांनी निनाद बेडेकरांचे ऐकून शिवचरित्र स्मृतीत साठवलं असेल तर त्यांना कोणी महाराष्ट्रात हरवू शकेल असे वाटत नाही.
27 Nov 2024 - 2:10 pm | अमरेंद्र बाहुबली
एकदा का ईव्हीएम घोटाळा करता आला की “ते” हुषारच ठरतात.
27 Nov 2024 - 2:42 pm | शाम भागवत
:)
27 Nov 2024 - 2:52 pm | शाम भागवत
तुमचे असे प्रतिसाद आले की बरे वाटते. असं वाटतं की पालिका निवडणुकां आत्ताच जिंकून झाल्याहेत. फक्त निवडणुका लागल्या की झालं.
देव करो आणि तुमच्यासारखेच विचार मविआचे असोत.
_/\_
27 Nov 2024 - 12:21 pm | अनन्त अवधुत
त्या ईव्हीम च्या नावाने चाललाय. पण अजुन एकही तक्रार व्हीव्हीपॅट्च्या नावाने ऐकायला आली नाही. म्हणजे मशिन बरोबर आहे.
27 Nov 2024 - 1:57 pm | शाम भागवत
मशिनच्या सगळ्या तोंडी तक्रारी हरियानाच्या निवडणुक निकालानंतर मिडियामधे करून झाल्या आहेत.
पण त्यानंतर त्याबाबत काही पुरावे दिले का? नाही
कोणी कोर्टात गेलं का? नाही
कोणी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार केली का? नाही
निदान मिडियासमोर पुरावे पुरावे असं म्हणून संजय राऊतांसारखे कागद तरी फडफडाचे ना. तसं काही केलं का? नाही
काहीच कोणी करत नाहीये.
27 Nov 2024 - 2:26 pm | श्रीगुरुजी
मुंबई, ठाणे, नवी मुंबई व कल्याण-डोंबिवली महापालिका जिंकण्यासाठी शिंदेंची मदत लागू शकते. या महापालिका निवडणुका होईपर्यंत तरी भाजपने शिंदेंना दुखावू नये. अन्यथा उबाठा, शप राष्ट्रवादी परत उरावर बसेल.
अर्थात हे माझे व्यक्तिगत मत आहे. इतरांनी सहमत होण्याची सक्ती नाही.
27 Nov 2024 - 2:35 pm | अमरेंद्र बाहुबली
मुंबई पालिकेत शिंदेंचे जास्त अस्तित्व नाही. तिथे ठाकरेंचेच प्राबल्य आहे. नवी मुंबई राष्ट्रवादीच्या गणेश नाईकांच्या सॉरी बीजेपीच्या (हे खरच टाईप करताना विसरलो होतो) हातात आहे. राहता राहिला प्रश्न फक्त ठाणे पालिकेसाठी शिंदेना परत मामू बनवले तर मग मज्जाच मज्जा. :)
27 Nov 2024 - 3:42 pm | स्वरुपसुमित
मि तोच विचार करत होतो
बार्गे निन्ग पावर कोणती
27 Nov 2024 - 2:33 pm | श्रीगुरुजी
उबाठा गट व शप गट पूर्ण संपायला हवे. कोणत्याही परिस्थितीत त्यांना पुनरूज्जिवित होण्याची एकही संधी मिळू नये. मुंबई महापालिका ही उबाठा गटाची शेवटची आशा आहे. ती मिळाली तर उबाठा गटाला प्राणवायू मिळून परत उपद्रव सुरू होईल. ठाणे महानगरपालिकेत उबाठा व आव्हाड एकत्र येऊन महापालिका काबीज करू शकतील. त्यासाठी भाजपला शिंदे हवेच.
27 Nov 2024 - 2:37 pm | अमरेंद्र बाहुबली
विरोधी पक्ष काही संपत नसतो, स्पेस ही निर्माण होतच असते. त्यातच भाजपचे गुजरात नी अदानी धार्जिणे धोरणं पाहिले तर मुंबईत मराठी माणूस आणी मराठी भाषा संपेल. शिवसेना ही हवीच. ह्याला मराठी अस्मिता म्हणा वा उपद्रव.
27 Nov 2024 - 2:44 pm | शाम भागवत
ते सगळं तुम्हाला आंदण देतो असं शिंदेंना सांगायचं. की मग शिंदेंना भाजपाची गरज लागेल. बदल्यात मुमं भाजपाचा.
27 Nov 2024 - 2:50 pm | शाम भागवत
म्हणजे त्यातही भाजपा जागा लढवेलच. जागा वगैरे काही सोडायच्या नाहीत. फक्त आंदण म्हणजे बाहेरून पाठींबा द्यायचा.
हे उबाठा साठी केलंय. उबाठा पेक्षा शिंदे कितीतरी पटीने भरवशाचा माणूस आहे.
राज्य व केंद्र सरकारचा पैसा मुंबई, ठाणे विकासासाठी द्यायला काहीच अडचण नाही.
पण मला वाटते ते बघतील सगळं. किंवा सगळ्या योजना शिजून तयार असतील. पदार्थ थंड होण्याची वाट पहात असतील.
27 Nov 2024 - 2:44 pm | श्रीगुरुजी
महाराष्ट्राच्या हितासाठी शप गट व उबाठा गट या दोन्ही गटांचा संपूर्ण नायनाट होणे आवश्यक आहे.
27 Nov 2024 - 2:52 pm | अमरेंद्र बाहुबली
शप गट नी शिवसेना ह्यांचा नायनाट झाला तर महाराष्ट्रापेक्षा गुजरातचा जास्त फायदा होईल. नी मुंबई केंद्रशासित किंवा गुजरातला जोडायचा प्रयत्न जोर धरेल.
27 Nov 2024 - 3:26 pm | शाम भागवत
https://youtu.be/cupfREUO0Mk?si=SkuOuSe1DC4uoWUB
27 Nov 2024 - 3:37 pm | अमरेंद्र बाहुबली
देव पाण्यात बुडवून बसले आहात का? :)
27 Nov 2024 - 4:04 pm | शाम भागवत
हॅट.
असल्या फालतू गोष्टींसाठी असलं काही करत नाही.
मोदी काय किंवा फडणवीस काय, त्याच्या विरोधकांच्या नाकर्तेपणामुळे जिंकत असतात.
देव कशाला पाहिजेत.
तुम्ही तुमची लढण्याची पध्दत बदलू नका. भाजपाला जिंकायला तेवढं पुरेसं आहे.
:)
27 Nov 2024 - 4:14 pm | अमरेंद्र बाहुबली
जिथे तिथे जाणून बुजून फडणवीस नाव पुढे करताय. :) बिपी चेक करत रहा.
27 Nov 2024 - 5:01 pm | शाम भागवत
फडणवीस नाव घेतलं की धागा पळत राहतो.
:)
27 Nov 2024 - 5:35 pm | स्वरुपसुमित
आधी काही पण झाले कि पवार साहेब
27 Nov 2024 - 4:15 pm | स्वरुपसुमित
Maharashtra CM Post : एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत म्हणून शिवसैनिकांचं विठ्ठलाला साकडं, तर पुण्यात देवेंद्र फडणवीसांसाठी देव पाण्यात
https://www.loksatta.com/elections/maharashtra-cm-post-news-prayers-by-s...
27 Nov 2024 - 4:32 pm | अमरेंद्र बाहुबली
विनोद तावडे नवे मुख्यमंत्री घोषीत.
27 Nov 2024 - 4:42 pm | शाम भागवत
:)
27 Nov 2024 - 5:30 pm | अमरेंद्र बाहुबली
ठाकरे असते तर झुकले नसते. स्वाभिमानी ठाकरे!
27 Nov 2024 - 5:49 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रकल्प गुजरातला जायला सुरुवात झाली आहे.
प्रकल्प गुजरातला गेले तरी चालतील ऑन हिंदुत्व महत्वाचे. जय श्रीराम. जय योगी.
https://saamtv.esakal.com/maharashtra/another-proposed-refinery-on-its-w...
27 Nov 2024 - 6:12 pm | अमरेंद्र बाहुबली
जय जय गुजरात माझा!गर्जा गुजरात माझ!
27 Nov 2024 - 6:07 pm | अमरेंद्र बाहुबली
दिल्लीचेही तख्त राखायचा महाराष्ट्र माझा :)
27 Nov 2024 - 6:07 pm | अमरेंद्र बाहुबली
ईडी पुढे झुकला महाराष्ट्र. :)
27 Nov 2024 - 6:15 pm | अमरेंद्र बाहुबली
इव्हिएमवर निवडणूक आयोगाने उत्तरदेणे अपेक्षित असताना भाजप नेते का देताहेत??
28 Nov 2024 - 11:49 pm | dadabhau
लै बेक्कार मज्जा येतेय हे प्रतिसाद वाचायला....एका माणसाची अगदी ठ्ठ्ठास्स्सून ठसठस होतेय...मज्जा वाटतेय....
29 Nov 2024 - 12:23 am | अमरेंद्र बाहुबली
अख्ख्या महाराष्ट्राचीच. तुम्हा गुजरातीना आनंद होणारच. :)