ब्रेन इन अ व्हॅट!
क्वांटम फिजिक्सशी किंवा आईनस्टाईनशी थोडा परिचय असेल तर “थॉट एक्स्पेरीमेंट” हा काय प्रकार आहे हे नव्याने सांगायची गरज नाही. किमान “स्क्रोडिंजरचे मांजर” तरी माहित असणारच. “थॉट एक्स्पेरीमेंट” म्हणजे कल्पनेची उत्तुंग भरारी. कित्येक गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात अनुभवता येत नाहीत त्याबद्दल “खयालोमे” विचार करायचा. अशा कल्पनेच्या भरारीतून आपल्याला सिद्धांतांचे पुष्टीकारण मिळू शकते. “थॉट एक्स्पेरीमेंट” हे फक्त विज्ञानापुरते मर्यादित नाहीत, तर त्यांचा तत्त्वज्ञानातही सढळ वापर केला गेला आहे. उदाहरणार्थ देकार्तचा राक्षस- Descartes Evil Demon. किंवा प्लाटोचा “गुहेतील कैदी” दृष्टांत! ह्यांचा आधुनिक अवतार आहे “ब्रेन इन अ व्हॅट!”
कल्पना करा कि एखाद्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाने (किंवा अतिप्रगत परग्रह वासियांनी) तुमचा मेंदू तुमच्या कवटीतून काढून फिश बाउल मध्ये ठेवला आहे. ह्या भांड्यात मेंदूचे पोषण करणारा द्रव आहे. तो मेंदूला जिवंत ठेवतो. ह्या मेंदूचा मज्जा रज्जुशी संबंध तुटला आहे. त्या ऐवजी मेंदू तारांच्या सहाय्याने सुपर संगणकाशी जोडला गेला आहे.
आपल्याला संवेदना कशा होतात? आपल्या ज्ञानेंद्रियांकडून मेंदूला विद्युत संदेश पाठवले जातात. आपण चुकून एखाद्या गरम भांड्याला बोटाने स्पर्श केला तर बसलेल्या चटक्याचे विद्युत संदेशांत रुपांतर होते आणि हा संदेश मज्जा तंतुतून मज्जारज्जुतून मेदुला पोहोचवला जातो. मेंदू तत्काळ हात बाजूला घेण्याचा संदेश हाताच्या बोटाच्या स्नायूंना देतो.
समजा आपण संगणकाकडून “चटक्याचा” संदेश ह्या व्हॅट मधल्या एकाकी मेंदूला दिला तर त्या मेंदूची अशी कल्पना होईल कि आपण शरीरातच आहोत. आणि रोजचे जीवन जगत आहोत. शास्त्रज्ञ अशा एकाकी मेंदूबरोबर काहीही खेळ खेळू शकतील.
समजा हा प्रयोग पुणे विद्यापिठातल्या न्युरोलोजीच्या प्रयोगशाळेत चालला आहे. पण मेंदूला वाटतंय कि आपण मित्रांबरोबर वैशालीत गप्पागोष्टी करत इडली वड्यावर ताव मारत आहोत. किंवा मुंबईत मरीन ड्राईववर मैत्रिणी बरोबर हवा खात आहोत. इथच थांबू नका. आपण चंद्रावर, मंगळ ग्रहावर आहोत.
मनुष्याच्या कल्पना शक्तीला अंत नाही.
हे वाचताना तुम्हाला एलओएल होत असणार, तुम्ही म्हणत असणार ह्याची आता सटकली आहे. मला कल्पना आहे. पण ही हसण्यावारी नेण्यासारखी गोष्ट नाहीये.
तत्त्वज्ञानातील हा हॉट टॉपिक सुरु झाला रेने देकार्त पासून. (René Descartes in 1641 in the Meditations on First Philosophy,) त्याचे म्हणणे होते कि आपल्याला पंचेंदिरीयांतून जे ज्ञान प्राप्त होते ते खरे आहे कि तो निव्वळ भ्रम आहे. त्यतून ते सुप्रसिद्ध वाक्य आले, ‘Cogito, ergo sum’ (‘I think, therefore I am’).
१९७३ मध्ये गिल्बर्ट हार्मन ह्याला आधुनिक स्वरून दिले.आणि १९८१ साली हिलरी पुटनामने त्याच्यावर अधिक काम केले. BIV म्हणजे ब्रेन इन अ व्हॅट चा कंसेप्ट ह्या दोघानीच पुढे आणला.
मग आपण BIV मध्ये आहोत कि नाही? हे कसे सिद्ध करायचे? ह्यावर बरीच तात्विक चर्चा झाली आहे. ती केवळ ज्यांनी त्या विषयाचा कसून अभ्यास केला आहे त्यांनाच समजावी अशी आहे. अजून डोक्याला शॉट लावून घेण्यात अर्थ नाही.
विज्ञानकथा लेखकांची मात्र चंगळ झाली. ही कल्पना वापरून अनेक कथा लिहिल्या गेल्या. अनेक सिनेमे बनवले गेले. त्यांची यादी आपल्याला विकिवर मिळेल. (https://en.wikipedia.org/wiki/Brain_in_a_vat)
आपले कितीतरी आवडीचे सिनेमे ह्यात आहेत. ह्यात प्रमुख म्हणजे “द मॅट्रिक्स” ह्या सेरीज मधील तीन सिनेमे.
ह्या यादीतील मला आवडलेला म्हणजे “डोनोवान’स ब्रेन” ही कथा १९४२ साली लिहिण्यात आली. त्यावर आधारित एकूण तीन पिक्चर आले.
The Lady and the Monster (1944), Donovan's Brain (1953), and The Brain (1962). ह्या पैकी दोन The Lady and the Monster (1944), and The Brain आपण यू ट्युब वर बघू शकता. वेळ असेल तर अवश्य पहा.
प्रतिक्रिया
13 Aug 2024 - 10:56 pm | प्रसाद गोडबोले
अतिषय उत्तम लेख !
तुम्ही "युनिव्हर्स इजन्ट लोकली रीअल" हे २०२२ मधील फिजिक्स मधील नोबेल पारितोषिक विजेते संशोधन वाचले/ ऐकले असेलच ! मी ते समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे पण बुध्दीची आकलनाची मर्यादा आड येते :(
जमल्यास त्यावर देखील लेखन करावे ही नम्र विनंती !
13 Aug 2024 - 11:56 pm | भागो
प्रगो
मला पण ह्यात रुची आहे. माझ्या आवडीचा विषय आहे.
14 Aug 2024 - 5:22 am | कंजूस
नवीन
समजुन घ्यायचा प्रयत्न करत आहे..
14 Aug 2024 - 1:21 pm | Bhakti
मी असंच वायरिंगच पुस्तक वाचतेय पण जमिनीच्या खालच्या म्हणजे झाडांच्या आणि बुरशीच्या कनेक्शनच...त्यात प्रश्न विचारला आहे,झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो.तसचं VAT मधला मेंदू रेडिओ फ्रेक्वेन्सी वापरत संपर्कात राहत असणार?
असं उलट पुलट काहीतरी अचाट बोलायला मजा वाटते पण 😂
14 Aug 2024 - 1:49 pm | भागो
भक्ती तुम्ही मी वर उल्लेख केलेले "Donovan's Brain" हे पुस्तक मिलाले तर जरून वाचा. अर्थात हे १९४० मध्ये लिहिले आहे. किमान मी उल्लेख केलेले सिनेमे बघा. त्यातला शास्त्रज्ञ त्या मेंदूशी Morse code वापरून बोलतो. त्यानंतर त्या मेंदूची शक्ती एव्हढी वाढते कि तो मेंदू शास्त्रज्ञाला बाहेरच्या गावी देखील संपर्क करू शकतो.
बाकी आता झाडांच्या मुळाची थिअरी डीस्प्युटेबल झाली आहे.
14 Aug 2024 - 6:43 pm | कर्नलतपस्वी
झाडांनापण मेंदू असतो? पण तो दिसत नाही?पण तो विद्युत लहरी मूळांद्वारे पसरवतो.
स्वर्गीय नारायण धारप यांनी अशाच आशयाची एक भयकथा लिहीली आहे. नाव बहुतेक साठे आणि फायकस असे असावे.
14 Aug 2024 - 8:23 pm | Bhakti
ओहो काय भारी परिचय आहे.एकदम मला आवडणाऱ्या झाडां विषयावर ते पण ५० वर्षांपूर्वी धारप यांनी लिहिली आहे.धारपांचं अजूनही एकही पुस्तक वाचलं नव्हतं ,लगेच घेते हे पुस्तक.शुभस्य शीघ्रम! धन्यवाद कर्नलजी.
14 Aug 2024 - 8:42 pm | कर्नलतपस्वी
नारायण धारप यांच्या सर्व भयकथा रुपये तीन हजारात उपलब्ध आहेत.
समर्थ सिरीज खुपच भन्नाट.
लहानपणी नारायण धारप आणी बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तके जीव की प्राण होती.
समर्थ, काळापहाड वगैरे आमचे हिरो होते.
मस्त वाचून बघा. कदाचित प्राप्त परिस्थितीत तर्कसंगत न वाटल्यास मेंदू जार मधे (BIV) ठेवून वाचा.
14 Aug 2024 - 8:57 pm | कर्नलतपस्वी
काळी जोगीण,
दार उघड ना आई,
स्वप्नमोहीनी,
चंद्राची सावली
इ-साहित्य वरही काही मिळतील.
15 Aug 2024 - 11:22 am | शैलेश लांजेकर
कुठे मिळतील? लिंक देऊ शकाल का? एखाद्या ठिकाणाला भेट देऊन विकत घ्यायची असतील तर पत्ता द्या.. कुणाला संपर्क करायचा असेल तर मोबाइल नंबर द्या...
15 Aug 2024 - 12:08 pm | भागो
https://bookvishwa.com/product/narayan-dharap-9-books/
नारायण धारप यांच्या दुर्मिळ झालेल्या आणि गाजलेल्या ९ कादंबऱ्या / कथासंग्रह आता पुन:प्रकाशित..
घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह उपलब्ध..
किंवा इथे
https://www.facebook.com/share/5kpsEGqZkVEmH4gk/?mibextid=oFDknk
14 Aug 2024 - 2:08 pm | Bhakti
बाकी आता झाडांच्या मुळाची थिअरी डीस्प्युटेबल झाली आहे. का? काही संदर्भ?
14 Aug 2024 - 2:20 pm | भागो
against
https://www.scientificamerican.com/article/do-trees-support-each-other-t...
and for
https://www.smithsonianmag.com/science-nature/the-whispering-trees-18096...
14 Aug 2024 - 3:09 pm | टर्मीनेटर
हा एक भन्नाट मानसशास्त्रीय प्रयोग आहे. आणि तो करण्यासाठी क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो 😀
मागे माझ्या 'नाईन इलेव्हन - Twin To-Worse' ह्या (पंच-दश वार्षिक योजनेतल्या) कादंबरीच्या पहिल्या भागात लिहिलेला एक परिच्छेद इथे परत उदघृत करतो...
सांगायचा मुद्दा काय तर ह्या गोष्टी उपजत असतात, त्यासाठी वरील गोष्टींचे ज्ञान असायची अजिबात गरज नसते!
बाकी हा छोटासा लेख आवडला म्हणुन हा प्रतिसाद प्रपंच. बाकी तुमच्या 'सो कॉल्ड' साय-फाय कथाही वाचत असतो आणि त्यातल्या खरोखर आवडलेल्या कथांवर प्रतिसादही देतो, पण रतीब घातल्या सारख्या (भंपक) कथांवर नकारात्मक प्रतिसाद देत नाही ही पोचही सकारात्मकरित्या घ्यावी हि विनंती 🙏
14 Aug 2024 - 4:46 pm | भागो
प्रथम आभार मानतो.
माझ्या गुरूने मला सांगितले होते, "दररोज काही ना काही तरी लिहित जा."
त्याचे काय आहे की कोंबडीला अंडे देण्यावाचून गत्यंतर नसते. पुढे त्य अंड्याचे आम्लेट होते कि करी होते ह्याची तिला काळजी नसते.
इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या लेखकाच्या मनाला अपराधी पण वाटत नाही.
माझ्या भंपक साय फाय कथा. प्लीज हा गोड साय फाय गैर समाज मनातून काढून टाकावा.
क्वांटम फिजिक्स किंवा आईनस्टाईन किंवा श्रोडींगरच्या मांजराच्या त्या भंपक प्रयोगाची माहिती असणे अजिबात गरजेचे नाही हे मी स्वानुभवावरून छातीठोकपणे सांगू शकतो >>> जाता जाता आपण आईनस्टाईन किंवा श्रोडींगरची टोपी उडवून एक टप्पल मारलीत. हे फार विनोदी होते. त्या भंपकांच्या पायाशी मला बसण्याचे अहो भाग्यं मला चुकून दिलेत. आभार.
भर्तृहरीचे एक वचन आहे. काल अपरिमित आहे पृथ्वीही अमर्याद आहे...
हा काटेरी प्रतिसाद खूप भावला.
बरच काही लिहिण्याचे मन करत होते. पण...
शेवटचे एक सांगतो. पण जाउदे.
कंट्रोल भागो कंट्रोल.
14 Aug 2024 - 4:52 pm | टर्मीनेटर
प्रांजळ प्रतिसाद आपल्याला काटेरी का वाटावा हे न उलगडलेले कोडे आहे… पण असो
14 Aug 2024 - 5:06 pm | भागो
मागे एकदा इथल्याच एका सिनिअर मेम्बराने मला सांगितले होते, "लेखन स्वांतसुखाय."
त्याची आत्ता प्रकर्शाने आठवण झाली.
काटेरी का वाटावा >>> माफ करा. भंपक म्हणायचे होते. चुकून काटेरी शब्द आला.
तिच्या आयला,च्यायला मायला ह्या शिव्या थोड्याच आहेत? ह्या तर आम्ही प्रत्येक वाक्यात वापरतो.
14 Aug 2024 - 5:17 pm | टर्मीनेटर
तेच तर म्हणतो… फालतू (स्वांतसुखाय लेखन) वाचले की लोकलज्जेस्तव तोंडात बसलेल्या भकारार्थी मकारार्थी शिव्या प्रतिसादात लिहिण्यापासून स्वत:ला कसे परावृत्त करतो ते माझे मला माहित… असो 😀
14 Aug 2024 - 5:34 pm | भागो
आहा! मी सांगतो काय करायचे ते तुमच्या खिशातून तर पैसे जात नाहीत ना. मग दुर्लक्ष करायचे. सगळा मामला फुक्कटचाच मग एव्हढा तळतळाट कशापायी?
दुर्लक्ष करायला जमत नसेल तर. "मिडास राजाला गाढवाचे कान" म्हणून एक गोष्ट आहे. त्यातल्या न्हाव्या सारखे करायचे.
14 Aug 2024 - 5:47 pm | टर्मीनेटर
Lol… हा उपाय ऐकण्या साठीच माझे कान आतुरलेले होते 😀
क्रृपया वरचे प्रतिसाद ‘बिटवीन द लाईन्स’ सकट पून्हा वाचावे आणि काही नाहीच कळले तर सरळ ‘पोगो’ बघावे… अजून काय 😀
14 Aug 2024 - 5:44 pm | कर्नलतपस्वी
इथे येऊन वाचण्यासाठी वाचकाला दमडी पण मोजावी लागत नाही.
कोणी सांगीतलं दमडी पण मोजावी लागत नाही? साहेबांचा वाक्प्रचार आहे ना तो,Time is money,तो घालावा लागतो ना. म्हणजे एकुण काय.... दमडी मोजाव्याच लागतात पण स्वरूप वेगळे.
कल्पना आणी विलास यांचा भांगडा सतत चालुच असतो.
बाकी सर्व गोष्टी समजल्याच पाहिजेत असा माझा अट्टाहास नसतो.
एखादी गोष्ट आवडली, समजली तर विस्तृत प्रतिसाद जरूर देतो.
14 Aug 2024 - 6:01 pm | भागो
ओके सर.
Time is money, हे खरे आहे पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की!
तुम्ही येऊन लय तोडलीत हे एक बरे केलेत, नाहीतर वाद संवाद चालतच राहिला असता.
कुणीतरी माघार घ्यायलाच पाहिजे. मीच घेतो.
14 Aug 2024 - 6:18 pm | टर्मीनेटर
चूकताय भागो…भागो भंपक आहे असे मी कूठेही म्हंटलेले नाही, पण तूमच्या काही कथा निव्वळ भंपक असतात असा एक मिपा वाचक म्हणून माझा दावा आहे ( मग बाकी कोणी कितीही मोठा असो, किंवा स्वतःला मोठा समजो, आय डोंट केअर 😀) .
14 Aug 2024 - 6:36 pm | कर्नलतपस्वी
की हा जो काही कल्पनाविलास आहे तो सर्व अंतरजालावरून जसाच्या तसा तुम्हीं उचलला आहे.
-खेळीया शब्दांचा
जार मधे मेंदू ही वेड्या शास्त्रज्ञांची (भविष्यात बघणारे,सामान्य माणसांना अकल्पनीय )कल्पना आहे. त्याचे पुष्टीकरण झाले नाही.
अंतरजालावर शोध घेताना वरील माहीती कळाली. एके जागी तर हे लिहीले आहे.
अनेक विज्ञान कल्पित कथांनंतर, परिस्थितीमध्ये एका वेड्या वैज्ञानिकाचा समावेश आहे जो एखाद्या व्यक्तीचा मेंदू शरीरातून काढून टाकू शकतो, जीवन टिकवून ठेवणाऱ्या द्रवाच्या व्हॅटमध्ये तो निलंबित करू शकतो आणि त्याचे न्यूरॉन्स एका सुपरकॉम्प्युटरशी वायरद्वारे जोडू शकतो जे त्याला समान विद्युत आवेग प्रदान करेल. ज्यांना मेंदू सामान्यतः प्राप्त करतो. [ २ ] अशा कथांनुसार, संगणक नंतर वास्तविकतेचे अनुकरण करत असेल (मेंदूच्या स्वतःच्या आउटपुटला योग्य प्रतिसादांसह) आणि "विस्फारित" मेंदूला पूर्णपणे सामान्य जाणीव अनुभव येत राहील, जसे की मूर्त मेंदू असलेल्या व्यक्तीचे अनुभव. , या वास्तविक जगातील वस्तू किंवा घटनांशी संबंधित नसताना. पुतनाम यांच्या मते , "ब्रेन-इन-ए-व्हॅट" (बीआयव्ही) हा विचार एकतर खोटा किंवा निरर्थक आहे.
सुरवातीलाच जर डिस्क्लेमर डकवले असते तर वाचकांचा दृष्टीकोन बदलला असता.
(सामान्यशास्त्र विषयात पस्तीस गुण मिळवून पहील्या फटक्यात मॅट्रिक उत्तीर्ण झालेला - आघाव वाचक)
14 Aug 2024 - 6:39 pm | कर्नलतपस्वी
कुणी सहमत असेल किवां नसेल पण मला तरी असेच वाटते.
त्यामुळेच आपले खालील विधान अप्रासंगीक वाटते.
पण वाचायची सक्तीही नाही. भागो भंपक आहे असे एकदा ठरवल्यावर लॉंग जंप मारून पुढे जायचा विकल्प आहेच की!
14 Aug 2024 - 6:49 pm | टर्मीनेटर
सहेब ते तेच तर करत नाहीत, म्हणून तर त्यांच्या कथांना भंपक म्हणावे लागते…
असो… त्यांनी मिपा सोडण्याचा जाहिर केलेला निर्णय विचाराधीन आहे, बघूयात बहूमक काय म्हणते… माझ्या वैयक्तीक मते ते इथे रहावेत असे वाटते!
14 Aug 2024 - 6:56 pm | कर्नलतपस्वी
माझे सुद्धा.
क्लिष्ट विषय सोपे व मनोरंजक करून लिहीण्याची यांची हातोटी आहे. एक वेगळाच फ्लेवर.....
@भागो, फार झाले तर काही दिवस कुंपणावर बसा.
14 Aug 2024 - 6:52 pm | कर्नलतपस्वी
एव्हढे सर्व म्हणल्यावर, मी म्हणेन लिहीत रहा. आपले लिखाण भावते.
14 Aug 2024 - 7:09 pm | टर्मीनेटर
त्यांनी जरूर लिहावे, वाचायला आवडेल! पण दोन (मोठ्या) भागांमध्ये किमान एक आठवंड्याचे अंतर असावे हे तत्व पाळले जावे.
14 Aug 2024 - 7:43 pm | भागो
(अवांतर0
नेटवरूनच.
संपादक मंडळींचा रोष पत्करून हे लिहित आहे,
गुरुवर्य बाघा महाराजांनी म्हटले आहे ते खरेच आहे, "शेठली, जिसकी जैसी सोच!"
अनेक सुप्रसिद्ध लेखकांच्या ज्या लिखाणाला संपादकांनी कचऱ्याची टोपली दाखवली होती,
ती पुढे जाऊन वाचकांनी डोक्यावर घेतली. अश्या काही कादंबऱ्या तर अभिजात म्हणून
गणल्या गेल्या.
उदा. "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या
लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरीला हात लावायला कोणी "संपादक" तयार नव्हता. लेखक
आणि त्याचा एजंट निराश झाले होते. शेवटी मोटारगाड्यांची रिपेअर मॅन्युअल छापणाऱ्या
--Chilton Publishing --प्रकाशकाने ही कथा प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. त्या आधी
२३ "संपादकांनी" ही कथा नाकारली होती आणि trash केली होती. आज पर्यंत ह्या
पुस्तकाच्या २० मिलिअन प्रती खपल्या आहेत! बारा भाषेत ही कथा भाषांतरित झाली आहे.
शनी ग्रहाच्या टायटन नामक उपग्रहाच्या काही भागांना ह्या कथेतल्या कल्पित ग्रहाच्या
भागांची नवे दिली गेली आहेत.
"हॅरी पॉटर" J.K Rowling ही बारा "संपादकांनी" नाकारली होती. अखेरीस "ब्लूम्सबरी" च्या
संपादकाच्या आठ वर्षाच्या मुलीच्या आग्रहाखातीर ह्या कथेच्या पहिल्या भागाचे प्रकाशन
झाले. आता आपण असे म्हणू शकतो की आठ वर्षाची मुलगी, तिला काय अभिजात
साहित्याची जाण?
Joanne Harrisच्या Chocolat ची अशीच गोष्ट आहे. ही कथा इतक्या वेळा रिजेक्ट
झाली की त्या पत्राची एकावर एक रचून लेखिकेने एक शिल्प तयार केले.
James Joyceची Ulysses, ची ही हीच कहाणी आहे. ह्या कथेच्या पहिल्या आवृत्तीची
एक प्रत काही वर्षांपूर्वी £275,000 ला विकली गेली.
आता हा घ्या टी एस इलिअट-- जेव्हा ते फेबर आणि फेबर प्रकाशनाचा "संपादक" होता.
"संपादक" झाल्यामुळे त्याचे विचार बदलले. ह्यांनीच जॉर्ज ऑर्वेलचे "अनिमल फार्म" नाकारले
होते. जोसेफ हेलरचे कॅच-22 असेच कुणा अहंमन्य संपादकाने झादाकारले होते. आणि John
le Carréची पहिली वहिली हेर कथा "The Spy Who Came in from the Cold" एका
प्रकाशकाने दुसऱ्याला पाठवली, ".... ह्या लेखकात काही दम नाही. असा रिमार्क टाकून."
हर्मन मेल्वील च्या मॉबी डिक चे नकारपत्र तर प्रसिद्ध आहे. संपादक लेखकाला लिहितो की
"ह्या कथेत देवमाशाची गरज आहे काय?"
तर माझ्या लेखक मित्रांनो तुमची कथा जरी कचऱ्याच्या डिजिटल टोपलीत गेली तरी
निराश होऊ नका.
काही असो मी माझी कथा पाठवणार आहेच. संपादक प्रसिद्ध करोत वा नाकारोत, वाचक
वाचोत वा न वाचोत. कारण डॉ. सर भवभूती ह्यांनी म्हटले आहेच की
ये नाम केचिदिह नः प्रथयन्त्यवज्ञां
जानन्ति ते किमपि तान्प्रति नैष यत्नः ।
उत्पत्स्यते तु मम कोऽपि समानधर्मा
कालो ह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी ॥
14 Aug 2024 - 8:15 pm | Bhakti
कॉलिंग कॉमी,
. "ड्युन" ही कादंबरी! विज्ञान कथांचा राजा म्हणून जाणली जाते. फ्रॅंक हर्बर्ट ह्या
लेखाच्या 215,000.शब्दांच्या ह्या कादंबरी
कॉमी ही साय फाय किंवा विज्ञान कथा नाहीये ना पण,असं तुम्ही कुठेतरी लिहिलं होतं ना? नक्की काय आहे ही? तिसरा भाग न पाहिल्याने माझं अजून काही ठाम मत नाहीये.
(ड्युन सिनेमाचे दोन्ही भाग पाहिलेली साय-फाय सिनेमा फॅन ;))
14 Aug 2024 - 8:48 pm | टर्मीनेटर
कोणासाठी लिहिलंय हे? 😀
14 Aug 2024 - 7:55 pm | भागो
एकूण असा प्रॉब्लेम आहे तर!
पण इथेच एका फर्मान आली ने उगीच straw-man गिरी करून मला देहदंडाची सजा सुनावली होती. म्हणून मी इथून जाण उचित असा विचार करून मालकांना खरड लिहिली होती कानाच्याही विरुद्ध तक्रार न करता माझे सदस्यत्व रद्द करावे अशी विनंती केली होती. त्याला आता दोन दिवस झाले असावेत. ठीक आहे. आपण जी शिक्षा सुनावणार ती मानायलाच पाहिजे.
इत्यलम||
14 Aug 2024 - 8:02 pm | गवि
अहो तुम्ही लिखाणावर लक्ष केंद्रित करा. किती विचलित होताय. टीका झाली तसे चांगले अभिप्राय देखील आले ना? मग कोण शिक्षा सुनवते आहे की जी मानायला पाहिजे वगैरे?
तुम्हाला इथे येणाऱ्या काही प्रतिसादांतून तरी आनंद मिळत असेल तर लिहीत रहा. टीका झाली की सर्वच शून्य असे नसते.
14 Aug 2024 - 9:45 pm | भागो
आभार गवि.
हो आत्ता पर्यंत सगळे चांगलेच प्रतिसाद मिळत आले. त्याबद्दल मी मिपाचा ॠणी राहीन. आज मात्र एकदम पारडे फिरले. का? कल्पना नाही.
माझी भूमिका विषद करायची ईच्छा मेली.
पण माझ्या विषयी दोन शब्द.
१)महाराष्ट्राचा भुसावळ, खापरखेडा,कोराडी आणि भारतातल्या अनेक औष्णिक विद्युत प्रकालापांचे सिस्टीम डिझाईन मी केले आहे . मी 600MWचे सिंगल युनिट कोल्ड स्टेट मधून फुल लोड आणू शकतो.
२)आयुका पुणे ने मागे विज्ञानकथा स्पर्धा आयोजित केली होती. त्यात माझी "समांतर विश्वात पक्की" ही कथा यशस्वी झाली. आता आयुका म्हणजे? असे नका विचारू.
आणि आज इथे माझे "inquisition" झाले.
लिहीत राहीन दत्ताजी प्रमाणे "आयडी सलामत तो कथा पचास.'
14 Aug 2024 - 10:50 pm | नठ्यारा
कोळसा औष्मिक विद्युन्निर्मिती ( कोल बेस्ड थर्मल पॉवर स्टेशन ) बद्दल कुतूहल आहे. काय संरचना केलीत? बंब, नियंत्रक की आजून काही? एखादा लेख लिहाच.
-नाठाळ नठ्या
14 Aug 2024 - 11:29 pm | भागो
प्लांट ऑपरेशन आणि इलेक्ट्रिकल सिस्टीम, प्लांट कंट्रोल.
लिहिण्यासारखे खूप आहे सर. खास तुमच्यासाठी लिहीन.
लाईटनिंग स्ट्राईक ओंन ट्रान्स्मिशन लाईन्स माझा स्पेशल इंटरेस्ट. आता सगळे विसरण्यात जम्म. पण पुस्तके अजून ठेवली आहेत. ५००० रु ची पुस्त्स्क १० रुपये किलो भावाने विकता नाही येत.
15 Aug 2024 - 1:32 am | नठ्यारा
भागो,
माझ्यासाठी लिहाल हे वाचून आनंद झाला. तन्निमित्त धन्यवाद. जगाला कळू द्या तुमच्या लेखात कितीही कल्पनाविलास असला तरी तुम्ही स्वत: वस्तुस्थितीशी व्यवस्थितपणे परिचित आहात.
आ.न.,
-ना.न.
14 Aug 2024 - 11:21 pm | टर्मीनेटर
????
कोणी केले बुवा? आणि जर तुम्ही म्हणता तसे झाले असल्यास त्यात तुमचा स्वता:चा सहभाग किती होता त्याचे पुनर्वालोकन करावे हि विनंती!
15 Aug 2024 - 8:53 am | कंजूस
येऊ द्या.
मी या विज निर्मिती आणि वितरण विषय जाणण्यास उत्सुक आहे. लेख अवश्य टाका. तांत्रिक/ तंत्रज्ञान लेख मला आवडतात. मी घरातले वायरिंग, बोर्ड इत्यादी करू शकतो आणि करतो. हाई व्होल्टेज ट्रान्समिशन चांगला विषय आहे. कुणी मराठीत लिहिले तर स्वागतच.
प्रतिसाद येतात तेव्हा कोण काय म्हणतात काय विचार करतात हे कळते. न लिहिल्याने हे कळत नाही. टाचणी डोक्याकडून धरायची टोकाकडून धरल्यास टोचते.
माध्यमांचा पूर्ण वापर करा.
मालकांनी संस्थळ चालू ठेवले आहे निरपेक्ष. आज आपण काही शोधायला गेलो इंटरनेट माध्यमातून तर अगणित माहिती समोर येते ती इंग्रजीत. मराठीसाठी हीच जागा.
माझ्या समाधानासाठी मी लिहितो असं म्हणण्यापेक्षा मी असा विचार करतो की आज माझ्या डायरीत मी काही लिहिले आहे ते माझ्याकडेच राहील. पण इथले लेखन दूरवर पोहोचेल शिवाय पुढच्या पिढीतही पोहोचेल.
15 Aug 2024 - 9:26 am | भागो
आभार.
आपल्याकडे शास्त्रज्ञ क्वचितच सामान्य जणांसाठी लिहितात. मला माहित असलेले अपवाद डॉ.नारळीकर , डॉ बाळ फोंडके, आशिष महाबळ. अजूनही असतील. पण एकूण हाताच्या बोटावर मोजण्या इतपतच.
महाराष्ट्र की जनसंख्या सन २०११ में ११,२३,७२,९७२ थी, विश्व में सिर्फ़ ग्यारह ऐसे देश हैं जिनकी जनसंख्या महाराष्ट्र से ज़्यादा है। इस राज्य का निर्माण १ . आंतर जालावरून बरका.
जर्मनी, फ्रांस, इंग्लंड यांची लोकसंख्या पहा.
ते देश कुठे आहेत? आणि आपली मायमराठी.
असे का बरे?
कालच्या घमासानमध्ये याची उत्तरे दडलेली आहेत .
आता केव्हा लिहीन काय माहित.
15 Aug 2024 - 10:32 am | कंजूस
खरंय.
पण अगदी शास्त्रज्ञांनीच लिहावं असं काही नाही. तिथे काम करणारेही लिहू शकतात. कारण सामान्य लोकांना किंवा त्या क्षेत्रातील नसलेल्यांनाही जाणून घ्यायचं असतं काम कसं चालतं. ऐसी अक्षरेवर एक आयडी होता. रेल्वेतून कोळशाच्या वाफेच्या एंजिनांचा आणि नंतर डिझेल, इलेक्ट्रिकचा अनुभव असलेला. त्यांनी एक लेख लिहिला आणि नंतर काही लिहिले नाही.
14 Aug 2024 - 8:42 pm | मिसळपाव
हात - पाय कापावा लागल्यानंतर अशा लोकाना तो, आता नसलेला, हात/पाय दुखतोय/ जळजळतोय असा भास होतो. बर्याच जणाना होतो. भास म्हणतोय कारण तो अवयव तर नाहीये पण त्या लोकाना मात्र वेडंपिसं करणारा अनुभव असतो तो.
15 Aug 2024 - 10:38 am | कंजूस
पेनचा अनुभव दातांची कवळी लावणाऱ्यांनाही येतो. चिंच खाताना खोटे दातही शिवशिवतात.
एक रशियन सैनिक वैमानिक विमान अपघातात पाय गमावून बसल्यावर नोकरीतून डच्चू मिळतो. तो खोटे पाय लावून नाच शिकायला जातो . पेनचा अनुभव घेत शिकतो आणि नंतर एकदा युद्धात यशस्वीपणे विमानही चालवतो ही रशियन कथा आठवली.
15 Aug 2024 - 10:48 am | गवि
अवयव कापला किंवा काढला तरच हा अनुभव येतो असे नव्हे तर पूर्ण शंभर टक्के लोकल ॲनेस्थेशिया एका पूर्ण हाताला / पायाला मुळापासून दिलेला असला तरी हा अनुभव येऊ शकतो. आणि ती भूल दीर्घकाळ (दिवस दोन दिवस) टिकेल अशी असला की हे फँटम लिम्ब अधिकच जास्त वेळ त्रास देऊ शकते.
म्हणजे हात पोटावर आहे असे भासणे, तिथे पंजाला खाज येते आहे असे भासणे, कोणी हात धरून ठेवला आहे असे उबदार फिलिंग, हात उचलला आहे आणि हवेतच धरून ठेवला आहे असे वाटणे (आणि रग लागली तरी प्रत्यक्षात तो खाली घेता येत नाहीये) असे अनेक प्रकार होऊ शकतात. हे सर्व केवळे मेंदूत प्रत्यक्षात हात भलतीकडेच कुठेतरी असतो. म्हणजे सर्जरी साठी आडवा ताणून बांधून ठेवलेला किंवा बेडवर. वळून हाताकडे पाहिले की तो असा पूर्ण वेगळाच कुठेतरी असलेला बघून धडकीच भरते..
15 Aug 2024 - 12:02 pm | भागो
हा प्रकार मी प्रथम आर्थर हेलीच्या "final diagnosis" ह्या कथेत वाचल्याचे आठवले.. रोग्याचा पाय कापायचे शल्यकर्म झाल्यावर रोगी शुद्धीवर येतो. आणि त्याच्या कापलेल्या पायाला खाज सुटते. (म्हणजे अशी त्याला फीलिंग येते म्हणा ) मग डॉक्टर त्याचा पाय जिथे ठेवला असतो तिथे जाऊन पायाला खाजवतो तेव्हा रोग्याचे समाधान होते.
कुणाला आठवत असेल तर पुष्टी करा.
15 Aug 2024 - 8:17 pm | मिसळपाव
असा अनुभव तात्पुरता पण येऊ शकतो माहीती नव्हतं. म्हणजे मेंदूला "आत्तापर्यंत असलेला शरीराचा भाग आता सापडत नाहीये" हा प्रकार त्रासदायक असतो.
पुढची पायरी - आपण हाता-पायाबद्दल, बाह्य अवयवांबद्दल बोलतोय. दुखतोय / जळजळतोय / खाज सुटल्येय / रग लागल्येय अशा भावना ज्यांच्याबद्दल असतात त्याबद्दल. कॅन्सरग्रस्त किडनी काढून टाकल्येय, गर्भाशय काढून टाकलंय अशा स्वरूपाच्या शस्त्रक्रिया केल्यावर पण ब्रेनला त्यांची उणीव जाणवत असेल का?
15 Aug 2024 - 10:56 am | टर्मीनेटर
ऑ... ऐकावे ते नवलंच!
14 Aug 2024 - 8:44 pm | कंजूस
वाचतोय.
14 Aug 2024 - 10:12 pm | कर्नलतपस्वी
आज मात्र एकदम पारडे फिरले. का? कल्पना नाही.
आयडी सलामत तो कथा पचास.'
ये हुई ना बात
14 Aug 2024 - 10:44 pm | भागो
आता चेक केले तर तो "आयडी" खारीज झाला आहे.
दर है पर अंधेर नही है.
15 Aug 2024 - 7:24 am | कर्नलतपस्वी
?
15 Aug 2024 - 7:30 am | कर्नलतपस्वी
इनक्वीझिशन, देहदंड असे जडव्यागळ शब्द वापरलेत म्हणून म्हणतो.
बाकी तुम्ही क्वांटम फिजिक्स, सिस्टीम डिझाईन तत्सम आशा कठीण विषयावर लिहीलेत तर सर्व सामान्य माझ्या सारखे अल्पमती वाचक काही शंका कुशंका काढणारच. ते मनाला लावून घेऊ नका.
15 Aug 2024 - 1:45 pm | कंजूस
आता मोठा मेंदू {माणसाचा} वाडग्यात इतकी प्रगती झाली आहे. विज्ञानात किंवा साहित्यात.
शंभर वर्षांनी डासाचा मेंदू टाचणीच्या डोक्यावर ठेवून त्यांच्याशी बोलतील.
15 Aug 2024 - 7:23 pm | नठ्यारा
कंजूसकाका,
हेच म्हणतो. मराठीतून लिहिलेलं सुकर वाटतं व आवडतं. जरी इंग्रजी समजायचा वांधा नसला तरीही.
आ.न.,
-ना.न.