चित्रपट समीक्षा -- The Man from Earth (2007)

श्रीगणेशा's picture
श्रीगणेशा in जनातलं, मनातलं
26 Mar 2023 - 2:58 pm

आपल्या मिपावरीलच एका धाग्यात "The Man from Earth" या चित्रपटाबद्दल वाचलं. मिपाकरांना आवडला, म्हणजे चित्रपट चांगला असणारच, याची खात्री होती. पण हल्ली सवयीप्रमाणे, चित्रपट पाहताना अपेक्षा तशा बाजूलाच ठेवलेल्या असतात. उगीच नंतर वेळ वाया गेल्याची खंत राहत नाही.

विषयांतर होईल कदाचित -- पण खरं तर "पठाण" हा चित्रपट अगदी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये पाहूनही, काहीतरी प्रायश्चित्त घ्यावं असं वाटलं :-) आणि म्हणून एखाद्या चित्रपटाकडून असलेल्या किमान अपेक्षाही बाजूला ठेवून, लेखात चर्चीलेला चित्रपट पाहायला घेतला.

----

सुरुवातीला काही मिनिटे काहीच अंदाज आला नाही. उत्सुकता मात्र होती. पण जेव्हा चित्रपटातील मुख्य पात्र, इतिहासाचा एक प्राध्यापक, निरोप द्यायला घरी जमलेल्या त्याच्या प्राध्यापक सहकाऱ्यांना सांगतो, की तो स्वतः हजारो वर्षांपासून पृथ्वीवर वावरत आहे, तेव्हा मात्र चित्रपटातील इतर पात्रांप्रमाणे आपण सुद्धा त्या कथेत हळू हळू गुंतत जातो. कथेतील पात्रे, मुख्य पात्राला अनेक प्रश्न विचारतात. खरं तर, आपल्याही मनात नेमके तेच प्रश्न असतात. मुख्य पात्राने अगदी शांतपणे, विचार करून दिलेल्या उत्तरांतून अजून चर्चा होते, नवीन प्रश्न तयार होतात, संवाद तसाच सुरू राहतो. चित्रपटाची कथा, संवाद आपल्याला तात्विक पातळीवर जाऊन विचार करायला भाग पाडतात. मानवाचा आजपर्यंतचा प्रवास, इतिहास-भूगोल, कला-विज्ञान, आस्तिकता-नास्तिकता, श्रद्धा-विश्वास, जन्म-मृत्यू, नाती-गोती, आशा-निराशा, अशा अनेक गोष्टी आपल्या मनाच्या अथांग पटलावर तरंगत्या सोडून, चित्रपट आपला निरोप घेतो!

----

विचार करायला लावणारा; अगदी वेगळ्या पठडीतला; मेंदूला थोडासा त्रास देऊन, एकाग्रतेने, विचार करता करता, एकदा तरी पाहावा असा चित्रपट!
YouTube link (८३ मिनिटे) -- https://youtu.be/G5Fjr658CQs -- The Man from Earth (2007)

----

चित्रपटसमीक्षा

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Mar 2023 - 3:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

"पठाण" हा चित्रपट अगदी फास्ट फॉरवर्ड मोडमध्ये..... सकाळी बघायला सुरुवात केली आणि पुन्हा ठेवून दिला.
कंटेनरवरील फायटींग पर्यंत आलोय आता पुढे काही झेपेल, असे काही वाटत नाही.

बाकी थोडक्यातल्या ष्टोरीवरुन'द मॅन फ्रॉम अर्थ' पाहणे आले. धन्स.
अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा.

-दिलीप बिरुटे

तर्कवादी's picture

30 Mar 2023 - 12:02 am | तर्कवादी

नक्की आवडेल,

अजून या शिवाय काही, अडकले सुटले या टाईपचे सिनेमे असतील तर सुचवा.

एकदम "No nonsense" चित्रपट. सध्याच्या पद्धतीप्रमाणे असलेला मसाला नाही, उगाचच चटपटीत - नाट्यमत संवाद , कर्कश पार्श्वसंगीत , नायिकेची (इथे नायक असा कुणी नाहीच) नाट्यमय एन्ट्री, ओढून ताणून भावूक दृष्य, असलं काहीच नसलेला साधा सरळ , वास्तववादी चित्रपट.. (zee5)

थोडा वेगळा भावूक चित्रपट बघायचा असेल तर Salt bridge बघू शकता. मी Jiocinema वर बघितला होता. पण आता तो तिथे बहुधा नहीये shemaroome वर मिळेल. अगदी जबरदस्त आहे असं मी म्हणत नाही पण "No nonsense" तरी नक्कीच. मला तरी आवडला ... आणि यातील दोन गाण्यांच्या मी अक्षरशः प्रेमात पडलोय (खाली दुवे देत आहे)

https://youtu.be/jpponOTaNJQ

https://youtu.be/UF2W5fJBoOY

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Mar 2023 - 9:33 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Salt bridge गाण्यांमुळे उत्सुकता चाळवली, नक्की बघतो. धन्स.
नुकताच 'द पूल' बघीतला. मस्तय. अडकले-सुटले.

-दिलीप बिरुटे

चांदणे संदीप's picture

27 Mar 2023 - 6:03 pm | चांदणे संदीप

खूप आशेने उघडलेला धागा. एवढ्या चांगल्या कलाकृतीबद्दल इतके त्रोटक लिखाण?

सं - दी - प

श्रीगणेशा's picture

27 Mar 2023 - 9:19 pm | श्रीगणेशा

कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते. त्यामुळे थोडक्यात ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही, एवढ्या चांगल्या चित्रपटाबद्दल अजून लिहिता आले असते, हे मान्य.
सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.

कथेतील बारकावे इथे लिहिले तर चित्रपट पाहताना उत्सुकता कमी होऊ शकते.

On the contrary, बारकावे लिहून आणि वाचून उत्सुकता आणखी वाढू शकते.
(अर्थात बारकावे म्हणजे तलाश मधील करीना आणि कहानी मधील विद्या बालन यांचे डिटेल्स सांगणे नव्हे. पण हे कोणत्याही सस्पेन्स असलेल्या चित्रपटाविषयी लागू होईल. इतर चित्रपटाबाबतीत विस्ताराने वाचल्यावर तो बघताना जास्त आनंद मिळू शकतोच)

चांदणे संदीप's picture

28 Mar 2023 - 12:34 pm | चांदणे संदीप

सध्या याच चित्रपटाचा दुसरा भाग पाहत आहे.

दुसरा भाग कुणाला रेकमेंड करण्याइतका नाही आवडला. कुणाला आवडूही शकतो.
मला एक नेहमीच वाटत राहिले आहे ते म्हणजे, या चित्रपटाच्या पहिल्या भागाचा भव्य दिव्य रिमेक होऊ शकतो. तंत्रज्ञानाचा वापर करून १४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन प्रेक्षकांना अजून एक दृक-श्राव्य मनोरंजनाची मोठी मेजवानी मिळू शकते.

सं - दी - प

श्रीगणेशा's picture

9 Apr 2023 - 10:22 am | श्रीगणेशा

दुसरा भाग २०१७ मधे, म्हणजे पहिला भाग आल्यानंतर दहा वर्षांनी आला. पण ती कथा, पहिल्या भागानंतर उंचावलेल्या अपेक्षांच्या जवळपासही पोहोचत नाही. दुसऱ्या भागाचा शेवट थोडासा गूढ ठेवला आहे, कदाचित तिसऱ्या भागाच्या तयारीसाठी.

१४,००० वर्षातले काही ठळक प्रसंग जे चित्रपटात चर्चेत आलेले आहेत त्यांना दृश्य स्वरूप देऊन...

कथा लेखकाला नेमकं असं सादरीकरण आणि पटकथेत कोणताही बदल नको होता:
https://manfromearth.com/mfe/

हॉलिवूड मधील काही चित्रपट अक्षरशः मास्टरपीस आहेत, कधी कधी खूप कौतुक आणि आश्चर्य वाटत कि साला इतक्या बारकाव्यांसकट कसे काय इतक्या सहज ती लोक एखादी कलाकृती सादर करतात ?

असो,
The Revenant/ The Shawshank Redemption / Inception / The Dark Knight / Dunkirk / Joker / cast away / The Terminal / No Escape / The Godfather / The Exorcist / The Lord of the Rings: पूर्ण सिरीज / ३००
हे आणि अजून अगणित मास्टरपीस आहेत जे कितीही वेळा आपण पाहू शकतो.