दिवाळी अंक २०२२ - माझे बँकीय जीवन

सस्नेह's picture
सस्नेह in दिवाळी अंक
5 Nov 2022 - 4:43 pm

/* Global */
body {background-image:url(https://i.postimg.cc/Y06R0KZp/main-bg.png);color:#000;}
/* Typography */
h1, h2, h3, h4, h5, h6 {font-family: 'Tiro Devanagari Marathi', serif;font-weight:500;text-shadow: 1px 1px rgb(0,0,0,0.2);} h1 {font-size:30px;} h2 {font-size:24px;}h5{font-size:16px;}
.col-sm-9 p, .col-sm-9 li {font-family: 'Poppins', sans-serif; font-size:15px ! important;}
.samas { text-indent: 16px;}
.first-letter { font-size: 200%; font-weight:700; color: rgba(2,90,93,2); text-shadow: 1px 2px rgb(0,0,0,0.3); text-indent: 16px;}
/* System */

.navbar-fixed-top {background: radial-gradient(ellipse farthest-corner at left top, #FEDB37 0%, #FDB931 8%, #9f7928 30%, #8A6E2F 40%, transparent 80%), radial-gradient(ellipse farthest-corner at right bottom, #FFFFFF 0%, #FFFFAC 8%, #D1B464 25%, #5d4a1f 62.5%, #5d4a1f 100%);margin-bottom:36px;
border-bottom:1px solid #333;border-style: groove;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}

.row {margin-top: 16px;}
.col-sm-9{text-align:justify;padding:16px;background-color: #FEFEFA;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19)}
.node header {border-bottom: 1px solid #ff8000;}
.node-info, .node footer{padding:8px;border-left:4px solid #FF5F15;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.16) , 0 2px 4px 0 rgba(0,0,0,.12);}
.node footer ul.links li{border:1px solid rgba(0, 128, 128, .2);background-color:#fff}
.panel-default>.panel-heading{color:#111;background-color:#FEFEFA;border-color:#333;border-bottom-color:#008080;}.panel{background-color:#fff} .region-sidebar-second .block-menu ul.menu > li {
border-bottom: 1px solid rgba(0, 128, 128, .2);}
.jumbotron{display:none} .input-group{display:none!important}

.page-header{
padding-top:16px!important;
text-align:center;border:
background-color: #50C878;
color: #ffffff;
animation-name: mipa;
animation-duration: 8s;
animation-delay: 0s;
animation-timing-function:ease-in-out;
animation-iteration-count: infinite;}

@keyframes mipa {
from {background-color: #0F52BA;}
to {background-color: #FF5F15;}
}

.field-items img{max-width:100%;height:auto;}.author-type-posted,.field-items a:link{color:#004d4d}
.nav > li > a {font-size:16px;} .col-sm-3 a, .panel-body p, .panel-body li {font-size:16px;font-family: 'Noto Sans',sans-serif;}
.navbar-header .logo > img { border-radius: 50%;}
/* bottom borders */
.node header, .nav-tabs, .nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {border-bottom: 1px solid #008080;}
.nav-tabs > li.active > a, .nav-tabs > li.active > a:focus, .nav-tabs > li.active > a:hover {color: #000;cursor: default;background-color: #fff;border: 1px solid #008080;border-bottom-color: transparent;}
.col-sm-9 a, .col-sm-3 a, .nav > li > a {color: #004d4d;} .nav-tabs {margin-top:48px;}

.mi-image {max-width:100%;height:auto;margin-top:16px;margin-bottom:16px;box-shadow:0 2px 4px 0 rgba(0,0,0,.2) , 0 2px 5px 0 rgba(0,0,0,.19);}

आजकालच्या बँका म्हणजे संस्थानिकांपेक्षा वरचढ. हम करे सो कायदा. बँकेची पायरी चढताना मला नेहमीच छातीत धडधडते.
पण सांगायचे म्हणजे असेही दिवस होते, राजे हो, देवाशप्पथ! मी जेव्हा कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि घरून पाठवलेले पैसे मिळण्यासाठी ‘आपल्या’ महाराष्ट्र बँकेत नवीन खातं काढायला गेले, तेव्हा बँक मॅनेजरसह समस्त बँक स्टाफने माझे सहर्ष स्वागत केले, मला खुर्ची दिली, चहा ऑफर केला आणि चक्क माझ्या फॉर्म (मला विचारून) तिथल्या कर्मचाऱ्याने भरून दिला!

होय, माझ्या खडतर बँकीय जीवनाची सुरुवात मात्र अशी गोग्गोड आहे! हो, तेव्हा बँका नवनवीन निघत होत्या आणि खाती उघडण्यासाठी लोकांना मिन्नतीने राजी करावे लागत असे. आणि बचत खात्यालासुद्धा १२-१४ टक्के व्याज मिळत असे (आईशप्पथ!) त्या काळी एटीएम नावाचा जादूचा पेटारा पैसे देत नसे, तर क्याशीयरच्या खिडकीसमोर जावे लागे. तरीही मी जेव्हा जेव्हा पैसे काढण्यासाठी बँकेत जात असे, तेव्हा तेव्हा मला पैशांसाठी दोन मिनिटांपेक्षा कधीच जास्त वेळ थांबावे लागले असे आठवत नाही.

त्यानंतर नोकरी लागल्यावर पगार हातातच मिळत असल्याने बँकेची पायरी चढण्याची वेळ फारशी येत नसे. महिन्याला खर्च भागून पैसे शिल्लक राहिले की आईकडे ठेवायचे. मग भरपूर साठले की घरातल्या सर्वांसाठी काहीतरी खरेदी करायची, अशी पद्धत. तरीही पैसे बहुधा शिल्लक राहायचे. मग ते ओळखीच्या खाजगी कम सहकारी बँकेत ठेवून टाकायचे. सठी-सहामासी एखादीच चक्कर व्हायची बँकेत.

अशी काही वर्षे बँका आणि त्यांच्या कटकटीशिवाय सुखात काढल्यानंतर एक कुदिनी आमच्या कंपनीने फतवा काढला की आता दर महिन्याचा पगार बँकेतच जमा होणार. मध्यंतरीच्या काळात बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले होते. आता ‘आपल्या’ महाराष्ट्र बँकेला बराच भाव आला.

खाते उघडायला गेल्यावर पहिला झटका बसला. शिपायाने मला दहा-बारा फुटांची एक लाइन दाखवली - आणि सर्वात शेवटी उभे राहा म्हणून सांगितले. लायनीच्या सुरुवातीस जाऊन मी पुढे डोकावले, तर ती लाइन आतल्या खोलीत आणखी दहाबारा फूट पसरली आहे असे लक्षात आले. मग मी नमुना अर्ज घेतला आणि ऑफिसात परत आले. जागेवर बसून फॉर्म नीट भरला. त्यासाठी बऱ्याच अभ्यास आणि अर्धा तास खर्च झाला. मग त्याला आवश्यक ते सगळे कागदपत्र, फोटोबिटो जोडले आणि ऑफिसच्या शिपायाच्या हाती देऊन त्याला लायनीत उभे केले. मग सगळे सोपस्कार होऊन आठेक दिवसात रीतसर पासबुक मिळाले आणि खात्यात पगार चालू झाला!
पण मग नवीनच कटकट सुरू झाली, ती म्हणजे पैसे काढणे. प्रत्येक वेळी ही भलीमोठी लाइन.

९७-९८चा जमाना. अजून एटीएम कार्डे आली नव्हती.
आता शिपाईही कुरकुर करू लागला. मग एक शक्कल केली. ऑफिसचा कॅशियर कॅश घेऊन बँकेत निघाला की पासबुक आणि स्लिप त्याच्या स्वाधीन करायची. संध्याकाळी बसल्या जागी पैसे हातात. पण अध्येमध्ये कधी पैसे लागले, तर लायनीत उभे राहून पाय दुखावून घ्यावे लागे. बँकेतल्या इन मीन चार पाच खुर्च्या ज्येष्ठ नागरिकांनी पटकावलेल्या असत.

उभे राहिल्या राहिल्या केलेल्या निरीक्षणाअंती काही ठळक गोष्टी माझ्या ध्यानात आल्या.
१. पूर्वी तीनच असणाऱ्या बँकेतील खिडक्यांची संख्या वाढली आहे.
२. खिडकीमागे दिसणाऱ्या चेहऱ्यांच्या कपाळावरील आठ्याचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
३. खिडकीमागचे चेहरे कोणतीही भाषा बोलोत, खेकसल्या शिवाय काहीही बोलणे त्यांच्या इथिक्समध्ये बसत नाही.
४. बाहेरच्या माणसाने कोणताही प्रश्न विचारल्यानंतर खिडकीमागील चेहऱ्याचे पहिले उत्तर - "पलीकडच्या खिडकीत विचारा/ ४/५/३ नंबरला विचारा" हेच असते.
५. भांडल्याशिवाय खिडकीबाहेरच्या माणसाचे काम होत नाही.
६. खिडकी मागे अ-मराठी लोकांची संख्या वाढत आहे.

इतके असले, तरी आम्ही खातेदार लोक्स सबुरी वाढवून या सगळ्याशी चांगल्यापैकी जमवून घेत होतो.
मग एक दिवशी केवायसी नामक डोकेदुखी हर एक बँकेत सुरू झाली. फोन करकरून या लोकांनी डोके भंजाळून सोडले. वैतागून एक दिवशी आवश्यक त्या कागदांच्या झेरॉक्सवर कोंबडे मारून, जिथे खाती आहेत त्या सगळ्या बँकेत जमा करून आले. हुश्श म्हणून जरा निवांत बसते न बसते तोवर चार दिवसांनी पुनः फोन.
"मॅडम, तुमचे केवायसी द्या."
"अहो, परवाच दिले की!" मी गयावया करत.
"कुणाकडे दिले तुम्ही? इथे जमा दिसत नाही."
झक मारत पुनः बँकेत गेले. खिडकीच्या मागे आज वेगळाच चेहरा. त्या बालिकेने हातभर उंचीचे चार-पाच कागदांचे गठ्ठे बळेच खालीवर केले, पण माझे कागद काही मिळाले नाहीत.
मला संशय की हिने नीट बघितले की नाही, म्हणून मी म्हटले की "मी पाहू का?"
त्यावर ती फणकाऱ्याने उत्तरली, "हे कागद कॉन्फिडेन्शियल असतात हो!"
झाले! पुन्हा दुसऱ्या दिवशी सगळे कागद घेऊन वरात बँकेत.
या वेळी मी हुशारीने म्हटले, "मॅडम, मला पोच द्या या कागदांची."
"पोच देण्याची प्रोसीजर नाही." मान वरती न करता ठसक्यात उत्तर.
"पण मग तुम्ही पुनः हरवले तर?"
त्यावर तिने सगळे कागद माझ्या हातात दिले आणि म्हणाली, "तुम्ही असं करा, हे सगळे कागद मॅनेजरसाहेबांकडेच द्या. ते देतील तुम्हाला पोच." पुनः तोच फणकारा. शिवाय मान अश्शी इकडून तिकडे झटकली ते वेगळेच.
मग मॅनेजरच्या केबिनीत गेले, तर त्यांच्यासमोर मासळी बाजारच लागलेला. कुणाचे काय तर कुणाचे काय. सगळ्यांना वाटेला लावून झाल्यावर अखेरीस अर्ध्या तासाने माझ्या नंबर आला. मग माझी कैफियत ऐकून घेतल्यावर मॅनेजरनी स्वत:च कागद ताब्यात घेतले, पोच कागदावर कोंबडा उठवला आणि शिपायाला शिक्का मारून द्यायला सांगितले.

मॅनेजरकडे नेहमी इतकी गर्दी कशी काय असते? याचे रहस्य मला आता समजले. खिडकीवाले आपले काम चोख करत असते, तर बिचाऱ्या मॅनेजरला जरा श्वास घ्यायला तरी सवड मिळू शकली असती.

एकूणच बँका म्हणजे एक मोठे फुरसतीचे काम आहे, एम्प्लॉयी आणि कस्टमर दोघांसाठीसुद्धा, हे माझ्या डोक्यात आता फिट्ट झाले आहे.
आता अलीकडे एटीएम कार्डे हातात आल्यामुळे बँकवाल्यांचे श्रीमुख बघायच्या वेळा कमी येतात. पण आता रिटायरमेंटनंतर बँकांवर अवलंबणे वाढले. अर्थात वेळ भरपूर असल्यामुळे मी स्वत:च्या डोक्याला टेन्शन देण्यापेक्षा बँकवाल्यांची डोकी खाते आणि आजवरच्या सगळ्या छळवादाचा सूड उगवत बसते.
त्यातून आणि मी भरपूर अभ्यासाअंती माझी एक मोडस ऑपरेंडी विकसित केली आहे.

मी एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय या नाव मोठेवाल्या बँकांना कटाप करून लहान लहान सहकारी बँकांना पकडले आहे. त्यामुळे सर्व्हिस बऱ्यापैकी मिळते आणि आपला भावही राहतो. कित्येक वेळा प्रत्यक्ष न जाता फोनवर कामे होतात, जी नाव मोठे वलय बँकांतून नाही होत. शिवाय एकीवर विसंबून न राहता दोघी-तिघी हाताशी ठेवाव्यात. .... बँका हो!

ब्रँच मॅनेजर बदलला की पहिले त्याची ओळख करून तासभर तरी गुऱ्हाळ लावून बसायचे. मग इत:उपर काहीही बारीकसारीक काम असले की थेट मॅनेजरकडे जाऊन बसायचे. दोन-चार मिनिटे इकडचे तिकडचे बोलणे झाले की मग आपले काम, मग ते चेक भरणे असो, की फॉर्म भरणे, हळूच टेबलवर ठेवायचे आणि ‘जरा गाइड करता का साहेब?’ असे म्हणायचे. मग साहेब चेकची स्लिप काढून देतात किंवा बिझी नसतील तर स्वत:च भरतात किंवा संबंधित बँक कर्मचाऱ्याला बोलावून फॉर्म भरायला सांगतात. मी बसून डिक्टेट करते. एखादा मॅनेजर खडूस लागला तर काही दिवस दुसरी बँक पकडायची. पण तशी वेळ सहसा येत नाही.

अलीकडे UPI सुविधेमुळेहि बँकांचे तोंड बघणे टाळता येऊ लागले आहे.
परवा एक चेक खात्यात भरायचा होता, म्हणून बँकेत गेले. चेक भरायचे मशीन मला कायम नाठाळ हटवादी कारट्यासारखे वाटते. त्याची बटणे आणि स्क्रीन यांची कायमची फारकत झालेली असते. चुकून दोघांचे जमलेच, तर १५ अंकी अकाउंट नंबरमधला पंधरावा अंक अडकून बसतो. तोही प्रसन्न झाला तर डिस्प्ले राम म्हणतो. तस्मात, मी चेकबरोबर इमानेइतबारे स्लिप भरून काउंटरला देते. सहसा काही वांधा येत नाही. पण त्या दिवशी खिडकी मागची टिकली लैच कावली होती कामाने. म्हणाली,
"ओ काकू, तिकडे मशीन आहे ना चेक भरायचं. का उगा आमची कामं वाढवता?"
"ते मशीन चालेना वाटतं सरळ. काय कळेना कुठे काय लिहायचंय." मी चाचपडत बोलले.
"तुम्हाला येतंय ना ऑपरेट करायला? सुशिक्षित दिसता की!" टिकलीचा माझ्यावर बाण.
".. .." मी दोन मिनिटे दम खाऊन तिची हजेरी कुठल्या शब्दांत घ्यावी याचा विचार केला.
इतक्यात तीच कुत्सितपणे वदली, "दाखवू का तुम्हाला एकदा मी? मशीनला चेक कसा भरायचा ते?"
मी लगेच शब्द उचललाच तिचा. "हो, हो, दाखवा की! चला.."
तिने दोन मिनिटांत टेबलवरचे हातातले काम आवरले आणि उत्साहाने आणि विजयी मुद्रेने मशीनकडे कूच केले. मी तिच्यामागून.
आमच्यामागून चार-पाच बघे उत्सुकतेने. मशीनजवळ जाईपर्यंत ८-१० जण आमच्याभोवती गोळा झाले.
‘मॅडम, हा घ्या अकाउंट नंबर." मी तिच्या हातात पासबुक दिले.
"द्या. नीट बघा हं आता.." तिने काळजीपूर्वक पंधरा आकडे मशीनमध्ये टाइपले आणि तेवढ्यात डिस्प्लेने राम म्हटला.
"अरे!"
मग जरा खाटखुट केल्यावर डिस्प्ले परत आला.
पुन्हा पंधरा आकडे. आता डिस्प्ले जिवंत राहिला, पण पंधरापैकी अकराच अंक दिसू लागले.
मॅडमनी बरेच खाटखुट केले, तरी आणखी चार अंक काही दर्शन देईनात .
मग बघ्यांमधला एकजण बोलला, "मॅडम, ते ट्रान्झॅक्शन कॅन्सल करा आणि परत करा."
मॅडमना काही ते कॅन्सल करायला जमेना.
मग मघाचा मेंबर उत्साहाने पुढे झाला आणि त्याने भराभरा काही बटणे दाबली. पुन्हा स्क्रीन कोरा झाला. आता बघ्यांची संख्या आणखी वाढली.
मॅडम पुन्हा सरसावल्या. पंधरा अंक सावकाश टाइप करून झाल्यावर त्यांनी घाबऱ्या घाबऱ्या डिस्प्लेकडे पाहिले. दिसले, पंधरा अंक सगळेच्या सगळे दिसत होते.
हुश्श म्हणून मॅडमनी पुढचा तपशील टायपायला घेतला. चेकची रक्कम बरोबर पडली. पण चेक नंबरच्या वेळी परत मशीनने हटवादीपणा दाखवला. ८ हा अंक टाइपच होईना. पाच वेळा दाबल्यानंतर तो एकदाचा टाइप झाला. पण आता शेवटाला एकूण चार ८ दिसू लागले.
मी निरागस आणि निवांतपणे बाजूला उभी राहून पहात होते.
मॅडम हैराण झाल्या. त्यांनी पुन्हा मदतीच्या अपेक्षेने मघाच्या उत्साही उमेदवाराकडे पाहिले. तो एव्हाना मोबाइलवर बोलण्यात गर्क झाला होता. मग आणखी एकाला आमची दया आली. त्याने पुढे होऊन पुन्हा ट्रान्झॅक्शन कॅन्सल करून दिले.
मी म्हणाले, "जाऊ द्या राहू द्या मॅडम, आपण तिकडेच भरू चेक."
पण मॅडम आता ईर्ष्येवर उतरल्या.
"थांबा हो, मी शिकवते ना, देते ना करून तुम्हाला.."
"ओके" मी परत हाताची घडी तोंडावर बोट.
पुन्हा सगळे अंक नीट बघून टाइप केले गेले. आता फक्त ब्रँच नंबर टाकायचा राहिला. एव्हाना वीस मिनिटे होऊन गेली होती. ब्रँच नंबर टाइप करायचा नसून सिलेक्ट करायचं होता, असे मॅडमच्या लक्षात आले. पण माझे खाते ज्या ब्रँचमध्ये होते, त्याचा कोडच तिथे पर्यायात दिसेना.
मॅडम घामाघूम झाल्या. त्यांनी बघ्यांवरून एक दीनवाणी नजर फिरवली. लाइन खोळंबली होती. सगळे बेचैनपणे मॅडमचे कधी आटोपतेय वाट पहात होते.
मग मॅडमनी आतल्या कुणाला तरी फोन लावला. पाच मिनिटांच्या चर्चेनंतर निष्पन्न झाले की सॉफ्टवेअरचे व्हर्जन बरोबरच होते. फोनवाल्याने मॅडमना ट्रान्झॅक्शन कॅन्सल करायचा सल्ला दिल्यावर मात्र मॅडम घामाघूम झाल्या.
मग मी म्हटले, "जाऊ द्या हो मॅडम, आत्तापुरतं चेक घ्या काउंटरला. आपण पुढच्या वेळी आणखी नीट अभ्यास करून येऊ. ओके?"
जमलेल्या बघ्या लोकांमध्ये खसखस पिकली!
इतक्यात शिपाई आलाच मॅडमना बोलवायला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन मॅडम पळाल्या काउंटरला अन मी त्यांच्या मागे. अखेर चेक काउंटरच्या पलीकडे गेला नि मी गालात हसत बाहेर पडले.

आताशा मी या बँकवाल्यांना मुळीच घाबरत नाही. त्यांची शेंडी मला पक्की सापडली आहे!!

प्रतिक्रिया

ॲबसेंट माइंडेड प्रोफेसर's picture

7 Nov 2022 - 7:40 am | ॲबसेंट माइंडेड ...

छान लिहिलय. सरकारी बॅन्केत जाणे नको वाटते.

१००१ गोष्टी इथेच घडतात. परदेशी जायला नको.
------
चेक पेटीत चेक टाका ही सोय सर्वात चांगली आहे. कधीही टाकता येतो.
पण ते युपिआई पेमेंटच्या नोंदी झाल्या की बँक पासबुक भरायला टाळाटाळ करतात आणि लोक वॉलेट वापरत नाहीत.

सस्नेह's picture

16 Nov 2022 - 2:16 pm | सस्नेह

कंकाका, या लोकांनी मशीन आल्यानंतर चेक ड्रॉप बॉक्स च काढून टाकला. नाहीतर त्यातच टाकला असता.

आवडला...

कर्नलतपस्वी's picture

8 Nov 2022 - 6:36 pm | कर्नलतपस्वी

आता विसाव्याचे दिलं

क्रेडिट कार्ड एक चांगली सोय झालीयं. ऑनलाईन ने लाईनीत उभे रहाणे बंद झालयं.

वर्षात एकदाच हॅलोविन डे साठी बँकेत जातो. "जींदा हू मै" बोलके आता हू.

बहुतेक बँकेत काम कमी झाल्यामुळेच स्टाफ दुखी आहे असे वाटते.

ऑनलाईन व्यवहारांमुळे बँकेत जाने तसे कमीच आहे. परंतु मागे एस बी आइ बँकेत खाते उघडायचा योग आला. अजुनही ग्राहकाला २/३ ठिकाणी फिरवल्या शिवाय त्यांना काम करता येत नाही असेच दिसते ..

एसबीआयचा अनुभव खूपच वाईट आहे. तिथे खाते नसताना पीपीएफ अकाऊंट काढले होते, दर वेळी पैसे भरताना खास सुट्टी घेऊन जावे लागत असे, नेफ्टने पैसे ट्रान्सफर करणे खूप उशिरा सुरु झाले. पैसे भरायचा फॉर्म घेणे, तो भरुन देण्याच्या काउंटरसमोर एक लाईन, पासबुक तिथे अपडेट होत नसे, ते करण्यासाठी वेगळ्या काऊंटरवर अजून एक लाईन, काऊंटरवाल्यांचा खास सरकारी वेळकाढूपणा. दोन तीन तास मोडायचे त्यात. त्यामुळे पीपीएफ मॅच्युअर झाल्यावर एक्स्टेंड न करता लगेचच बंद करुन टाकलं. सुदैवाने मॅच्युरिटी अमाउंट मिळण्याचे काम खूपच लवकर आणि तत्परतेने झाले.
अ‍ॅक्सिस आणि आयसीआयची बॅन्केतही अकाऊंट आहेत पण सर्वच काही ऑनलाइन अगदी सुलभतेने होत असल्याने त्यांची पायरी चढायची कधी वेळच आली नाही. अपवाद तो फक्त नोटाबंदीच्या काळचा. घरी शिल्लक असलेल्या ५०० रूच्य जुन्या नोटा जमा करण्याचे काम प्रायोरिटी कस्टमर असल्याने तत्परतेने झाले.

सस्नेह's picture

9 Nov 2022 - 11:55 am | सस्नेह

SBI बद्दल १०१ टक्के सहमत. बहुतेक सर्वांचा SBI चा असाच आहे अनुभव. अत्यंत माजोरडे लोक.

SBI च नाही, जवळपास सगळ्याच सरकारी बँकांमध्ये कमी-अधिक फरकाने हा माजोरडेपणाचा अनुभव सारखाच असायचा. थँक्स टू 'नेट-बँकींग', 'फोन-बँकींग', 'यु.पी.आय', 'डेबिट्/क्रेडीट कार्ड्स'. ह्या सेवा-सुविधांमुळे आता बँकेत पाय ठेवायची वेळ सहसा येतच नाही!

ज्ञानोबाचे पैजार's picture

16 Nov 2022 - 3:10 pm | ज्ञानोबाचे पैजार

माजोरडेपणाच्या बाबतीत खाजगी बँकाही कमी नाहीत, उलट खाजगी बँकेत गेले की इन्शुरनस पॉलिसी किंवा अजून कुठले तरी प्रॉडक्ट गळ्यात मारण्या करता त्यांचा लोचट पणा सुरु होतो. एका छबकडीने तर चारचौघात "सर आपको इनव्हेस्टमेंट कैसे करते है समझताही नही" अशा शब्दात माझा पाणउतारा केला होता. (नंतर तिने किमान ५० वेळा माझी माफी मागितली ही गोष्ट निराळी)

तर सांगायची गोष्ट अशी की बँकिंग कार्यपध्दतीच्या (प्रोसीजरच्या) बाबतीत स्टेट बँक सर्वात पुढे आहे. त्यांच्या इतकी चांगली कार्यपध्दत इतर कोणत्याही बॅकेकडे नाही. खाजगी बँकात तर कार्यपध्दतीबबत बाबतीत आनंदच असतो आणि सहकारी बॅकात मॅनेजर स्वतःच त्या फाट्यावर मारताना दिसतात. जितकी चांगली कार्यपध्दती तेव्हढे आपले पैसे जास्त सुरक्षीत असे मानायला हरकत नाही.

बॅका वेळकाढू असतात हे खरे आहे, पण बँकेत होणारे खातेदाराचे कोणतेही काम हे महत्वाचे आणि विश्वासाने करण्याजोगेच असते. असे कोणतेही काम करण्यात जोखिम फारच जास्त असते आणि म्हणुनच त्यांना वेळकाढूपणा बद्दल क्षमा करण्यास हरकत नाही. उगाच दोन मिनिटात शॉपिंग आणि अर्ध्या मिनिटात बिलींग सारख्या अस्थापनांची तुलना बँकिंग सेवेशी होउन बँकांना हिणवू नये.

पैजारबुवा,

सरिता बांदेकर's picture

9 Nov 2022 - 2:27 pm | सरिता बांदेकर

छान लिहीलं आहे.

सुखी's picture

13 Nov 2022 - 1:56 pm | सुखी

मस्त खुसखुशीत लेख

लॉरी टांगटूंगकर's picture

13 Nov 2022 - 4:40 pm | लॉरी टांगटूंगकर

बेस्ट, लेख आवडला

फारएन्ड's picture

14 Nov 2022 - 6:12 am | फारएन्ड

खुसखुशीत लिहीले आहे :)

मध्यंतरी कॉसमॉस बँकेत फार रक्कम काढायची नसूनही आणि तेथे फारशी गर्दी नसूनही बराच काळ थांबावे लागले होते हे आठवते.

सौंदाळा's picture

14 Nov 2022 - 11:09 am | सौंदाळा

छान लेख.
एसबीआय चा माझा अनुभव (२ गृहकर्जे, १ बचत, १ पीपीएफ खाते, १ टर्म पॉलिसी) मागील १४ वर्षांपासून खूपच चांगला आहे. माझे कोणीही जवळचे, लांबचे नातेवाईक, मित्रमंडळी एसबीआय मधे नाहीत. कदाचित गेल्या जन्मी मी काहीतरी पुण्य केले असावे.
पण महाराष्ट्र, सिंडीकेट (आता कॅनरा) या बँकांचा कायम वाईट अनुभव आहे.
पूर्वी एटीएम कार्ड नविन आले तेव्हा पैसे कधीपण काढायची चंगळ झाली नंतर त्याचे वार्षिक चार्जेस आले नंतर त्यात पण महिन्याला ठराविक ट्रांझॅक्षनचे लिमिट आणि मूर्खपणा म्हणजे मी एकदा एटीम कार्ड घातले आणी पैसे आलेच नाहीत तरी एक ट्रांझॅक्षन झाले हा निव्वळ मूर्खपणा आहे. क्रिकेटमधे गोलंदाजाचा उसळता चेंडू नॉ-बॉल द्यायचा आणि त्याला षटकातील उसळता चेंडू टाकायचा एक चान्स काढून घ्यायचा तसलाच प्रकार.
वडीलांच्या लाईफ सर्टीफिकेटसाठी बँकेत जायला मात्र नको वाटायचे, भयंकर मोठी रांग आणि त्यात सगळेच वृध्द. मागील ३ वर्षांपासून ते पण बंद केले आहे. जवळच्या नागरी सुविधा केंद्रात ५ मिनिटात आणि १०० रुपयात काम होते.
आता मुदत ठेवी पण ऑनलाईन काढता येतात. युपीआयमुळे तर काम खूपच सोपे झाले आहे. भविष्यात त्याच्यावर काही कर लागले नाहीत म्हणजे मिळवली.
आताची मोबाईल बँकींग करणारी पिढी जेव्हा म्हातारी होईल तेव्हा कदाचित गोष्टी अजूनच सोप्या झालेल्या असतील.

विवेकपटाईत's picture

14 Nov 2022 - 12:03 pm | विवेकपटाईत

लेख आवडला. माझा बँक ऑफ बडोदा जनाकपुरीचा अनुभव उत्तम आहे. जीवन प्रमाणपत्राच्या फॉर्म वर फक्त सही करून आलो. बाकी काउंटर क्लर्कने (स्त्री) स्वत: भरून टाकला होता. कधीच जास्ती वेळ लागला नाही. बाकी पासबुक भरण्याची गराज आजकाल गरज वाटतं नाही.

चौथा कोनाडा's picture

14 Nov 2022 - 12:43 pm | चौथा कोनाडा

मस्त... खुसखुशीत... फर्मास..... मजा आली वाचताना.

टिकली मॅडमचा किस्सा तर अतरंगीच .. "येडा होके पेडा खाना" याने काम करून घ्यावे लागते.. तसाच किस्सा !

मी लिहिलेला असाच एक अनुभव -
केवायसी, एक बँकानुभव :
https://www.misalpav.com/node/48147

श्वेता व्यास's picture

14 Nov 2022 - 2:53 pm | श्वेता व्यास

मस्त लेख आहे.
टिकली मॅडमचा किस्सा आवडला. तुमच्या जागी मी असते तर ते मशीन हटकून मॅडमसमोर नीट चाललं असतं. :)
बाकी माझा SBI चा अनुभव आतापर्यंत चांगला आहे. कदाचित नेटबँकिंग, UPI या गोष्टींमुळे हल्ली बँकेत जावंच लागत नाही म्हणून असेल.

श्रीगुरुजी's picture

15 Nov 2022 - 12:06 am | श्रीगुरुजी

अगदी खरे लिहिले आहे. स्टेट बँक, महाराष्ट्र बँक अश्या संस्थानातील कर्मचाऱ्यांची चीड येते. समोर ४० जण रांगेत उभे असताना लंच अवर नावाखाली खुर्चीत मानेमागे हात घेऊन ३५ मिनिटे निवांत आराम करणाऱ्या जनता बँकेच्या कर्मचाऱ्याने अतिशय संताप आणला होता.

या तुलनेत परदेशात बँकांची सेवा अत्यंत ग्राहकाभिमुख व तत्पर आहे. लंच अवर असा वेगळा वेळच ठेवलेला नसतो. खिडकीवरचा कर्मचारी व्यग्र असेल तर व्यवस्थापक स्वतः तचमचे कखम करून देतो.

BOI मध्ये माझी एक रक्कम अडकून पडलीय,पण बँकमध्ये जायचं म्हणजे अंगावर काटा येतो.तो BOI गिल्ट येईल म्हणून लेख उघडतच नव्हते.SBI सोडता बाकी बँकांचा अनुभव चांगला आहे.
खुप छान लेख आहे, खुसखुशीत अगदी!

चौथा कोनाडा's picture

16 Nov 2022 - 7:19 pm | चौथा कोनाडा

((( बँकमध्ये जायचं म्हणजे अंगावर काटा येतो.तो BOI गिल्ट येईल म्हणून लेख उघडतच नव्हते.)))

हा... हा... हा....

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 Nov 2022 - 2:54 pm | राजेंद्र मेहेंदळे

सगळे किस्से खुसखुशीत जमले अहेत. सरकारी बँका आणि विशेष्तः महाराष्ट्र बँक आणि एस बी आयच्या अनुभवाबाबत सहमत. एक नंबर माजोरडे लोक्स. मागे चारचाकी घेताना डीलरने एस बी आय चे कर्ज काढुन दिले(एजंट द्वारे). ३ वर्षाचे कर्ज २ वर्षात फेडु म्हणुन एस बी आय कडे गेलो तर २-३ चकरा माराव्या लागल्याच, वर काउंटरपलीकडची टिकली म्हणते वट्ट ५७२ रुपये रोखीने भरा. मी विचारले का? तर म्हणे तुम्ही लवकर कर्ज फेड करताय म्हणुन. हे नवीनच. म्हणजे करोडो बुडविणार्‍या मल्ल्याला ढील द्यायचा आणि आमच्यासारख्याला ५७२ रुपये तेही रोखीने भरले तरच पुढचे काम होणार. काय करणार? अडला हरी.....

नशिबाने आय सी आय सी आय / एच डी एफ सी मध्ये अकाऊंट काढल्यापासुन सहसा बँकेत गेलोच नाहिये. पासबूक हा प्रकार कधीच वापरलेला नाही(अपवाद फक्त आई किवा बायकोचे अकाउंट किवा पी पी एफ चे पास बूक भरणे). चेक लिहिणे सुद्धा कमीत कमी वेळा ,त्यापेक्षा नेट बँकिंग/क्रेडीट कार्ड आणि आता तर यु पी आय वापरतो. सगळी बिल ऑनलाईन भरतो. पहिले महिन्याकाठी ४-५ वेळा तर आताशा एखाद वेळा ए टी एम चे तोंड बघावे लागते. महाराष्ट्र बँकेचे पी पी एफ केवळ ह्याच कटकटीने बंद केले आणि एच डी एफ सी मधे ऑनलाईन उघडले. पोष्टाशी कधीच संबंध आला नाही. इत्यलम.