मिसळपाव वर दोन चार धागे वाचून झाले आठ दहा कॉमेंट्स करून झाल्या अन एकदम आठवले बँकेत पैसे जमा झाले का ते बघायचं राहील. लगेच डबडीहाय बँकेच्या साईटवर गेलो लॉगिन केलं. पैसे परवाच जमा झाले होते. बॅलन्स दीड लाख रु दाखवत होता. सध्या या पैश्याचं खरेदी करायचं वै काही प्लॅन नव्हता. वर्षभरासाठी एफडी करायची आयडिया चांगली होती. व्याज मिळून पैसे थोडे वाढणारही होते.
कोरोनाच्या काळात डबडीहाय बँकेत पाऊल टाकायचं म्हंजे लैच डेंजर अनुभव असायचा. जवळच होती डबडीहायची शाखा, हायवेला. कोरोनाच्या काळात स्टाफ कमी. सॅनिटायझर फवारा मारून घ्यायचा, टेम्परेचर मोजून घ्यायचं आणि मगच आत जायला मिळायचं. पाच-सात पायऱ्या चढून जायला लागायच्या. तिथला सिक्युरिटी गार्ड स्वतःला मोठा राजा समजायला लागला होता. शाखे बाहेर १५-२० लोकं जमली की खूप गर्दी झाल्यासारखी वाटायची. ५-७ माणसे अंतर ठेऊन पायऱ्यांवर उभी राहायची, उरलेली उन्हात रस्त्यावर वर. तिथंच दुचाकी पार्क केलेल्या असायच्या. त्यांचा आत जाणाऱ्या रस्त्याच्या लोकांना त्रास व्हायचा. म्हातारी कोतारी कावायची. सिक्युरिटी गार्ड त्याचा माज दाखवत लोकांना लवकर आत सोडायचा नाही.
हे सगळं चित्र डोळ्यापुढं आलं अन शाखेत जाऊन एफडी काढायचा विचार रद्द करावा लागला. म्हटलं ऑन-लाईन एएफडी काढू. मग दुपारी फुरसतीच्या टाइममध्ये डबडीहायला लॉगिन केलं. एक लाखाची एफडी करून टाकली. पैसे बचत खात्यातून एफडी खात्याला ट्रान्सफर झाले. त्यासंबंधी एसएमएस देखील आले. ऑन-लाईन एफडी पावती तयार झाली, एफडीची सॉफ्टकॉपी इ-मेलने देखील आली. म्हटलं चार आठ दिवसांनी शाखेत गेलं की पावती घेऊ आपल्या रेकॉर्ड्ससाठी. डबडीहायचं एक वैशिष्ट्य होतं, एफडी मोडायची असेल तर शाखेत जाऊन एफडी पावतीवर लिहून अथवा वेगळा अर्ज करून एफडी मोडायला लागायची. इतर बँकांची मात्र ऑनलाईन मोडता येते. पैसे बचत खात्यात जमा होतात. दुसऱ्या बँकेत ऑनलाईन एफडी बिनधास्त करायचो, पण या बँकेबाबत जरा सावधच असायचो.
शनिवार रविवार उलटला, अन सोमवारी दुपारी मोबाईलवर डबडीहाय बँन्केचा एसएमएस येऊन थडकला :
" केवायसी अद्ययावत नसल्यामुळे तुमची ऑनलाईन एफडी रिजेक्ट झालेली आहे. ताबडतोब केवायसी अपडेट करा"
अन थोड्याच मिनिटांत रद्द झालेल्या एफडीची रक्कम बचत खात्यात जमा झाल्याचा एसेमेस ! च्यामारी, वैतागलोच ! केवायसी अपडेट नाही ही माहिती एफडी करायच्या आधीच द्यायची ना ! केले असते आधी केवायसी अपडेट अन मग केली असती एफडी. एफडी झाल्यानंतर, त्याची पावती ई-मेल ने पाठवल्या नंतर रद्द करतात म्हणजे काय ? जाब विचारला पाहिजे त्यांना.
मंगळवारी केवायसीची सर्व कागदपत्रे, फोटो वै घेऊन पोहोचलो शाखेत. नेहमी प्रमाणे शाखे बाहेर पायऱ्यांवर १५-२० खातेदार. सिक्युरिटी गार्डचा रुबाब चालूच. अर्ध्या-पाऊण तासाने आत प्रवेश मिळाला. सिंगल विंडो फॅशनमुळे तिथं एकच पोरगेलासा भैया इसम माणूस वेगवेगळी कामं बघणारा. या काउंटरसाठीचे ५-७ खातेदार संपले मग माझा नंबर आला. फॉर्म भरले, सह्या केल्या, कागद पत्रे जोडली अन त्याला विचारले "कधी पर्यंत होईल ?" तो उत्तरला : "१५ दिन लगेंगे " हे ऐकून माझं डोकंच सटकलं, इतके दिवस का म्हणून त्याच्याशी वादावादी सुरु झाली. "स्टाफ कम हैं , केवायसी अपडेट मुंबई ब्रान्चमें होता हैं. सब पेपर अप्लिकेसनके साथ मुंबई जाते कुरियरसे . इ." हे ऐकून आता मात्र डोकं चिघळंलच. पुढं त्यानं असं "चलो, हटीयें, बहोत लोग हैं पीछे. मुझेसें क्यों झगड रहे हैं ? दोन नंबर काउंटरपे नयना मॅडमसे मिलीए " असं म्हणत जवळजवळ खास भैय्या टोनमध्ये हुसकावून लावलं.
नयना मॅडमच्या काउंटरला पोहोचलो. आधीच आवाज वाढला होता. ऑन-लाईन एफडी रिजेक्ट झाल्याबद्दल त्यांना शिव्या घातल्या. " असली कसली तुमची बँकेची सिस्टीम" म्हणून इज्जत काढली. " बँक "आपुलकीनं वागणारी माणसांची " होती तो पर्यंत अश्या अडचणी लगेच सोडवल्या जायच्या. माझ्यासारख्या वीसतीस वर्षे जुन्या खातेदाराला जर असा त्रास होत असेल तर नकोच मला ही बँक ! " माझ्याबाबतीत बँकेने मागे केलेले घोळाचा पाढा वाचला. नयना मॅडम सिनियर होत्या, मॅच्युअर अन कुल देखील. ब्रँच मॅनेजर क्वारंटाईन झाल्यामुळं मॅनेजरची जबाबदारी सांभाळत होत्या. त्यांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं "चूक झालीय अन तुम्हाला त्रास झाला बद्दल सॉरी. मी स्वतः यात लक्ष घालते."
अवस्थ होऊन घरी परतलो. दुसऱ्या दिवशी सकाळी दहालाच नयना मॅडमचा फोन आला. "सॉरी सर, तुम्हाला त्रास झाला त्याबद्दल. आता मी स्वतः फॉलोअप घेत आहे. २४ तासाच्या आत तुमची केवायसी पूर्ण होईल आणि तुम्हाला एफडी उघडता येईल"
दुपारी मी दुसऱ्या बँकेचा पर्याय निवडला आणि तिथे एफडी काढली.
पुढच्या दिवशी बँकेचा एसएमएस आला " तुमची केवायसी पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, तुम्ही पुढील व्यवहार करू शकता "
पुन्हा नयना मॅडमचा "केवायसी डन. आता तुम्ही एफडी करू शकता" असा फोन आला, पण मी " वैतागून दुसऱ्या बँकेत एफडी काढली" असे उत्तर दिले.
दोन तीन दिवस गेले अन बँकेची मेल आली " पॅरॉडिक केवायसी पडताळणी तातडीने करा, नाही तर आपणास देण्यात येणाऱ्या सेवांवर परिणाम होऊ शकतो "
आता मात्र माझं डोकंच हाललं.
तिरमिरीत बँकेला ई-मेलने पुढील प्रकारे कस्टमर कम्प्लेंट केली :
१) माझी केवायसी पडताळणी प्रलंबित आहे, आणि तातडीने पडताळणी करावी लागेल हे मला वेळेत का सांगितले गेले नाही ?
२) मला बँकेकडून कालावधिक केवायसी पडताळणी करा असा ई-मेल एफडी रिजेक्ट झाल्यानंतर प्राप्त झाला. ही विसंगती का ? केवायसी पडताळणी साठी फक्त ई-मेल का ? फोन अथवा ईमेल एसएमएस का आला नाही ? जर एखादा काही कारणाने ई-मेल वाचत नसेल त्याला केवायसी पडताळणीच्या तातडी संबधी कसे कळेल ?
३) केवायसी पडताळणी तातडीने करणे गरजेचे आहे असे सांगितले गेले या तातडीची मुदत काय ? किती दिवस किंवा किती महिने ?
४) मला एफडी काढताना ऑन लाईन व्यवहार करत असतानाच केवायसी प्रलंबित असलेल्या बाबींची मला माहिती का दिली गेली नाही अथवा एफडी करण्यासाठी तिथेच रिजेक्शन का झाले नाही ? हे तिथे सिस्टममध्ये कळले असते तर ती प्रक्रिया पूर्ण करून एफडी काढली असती किंवा दुसऱ्या बँकेचा पर्याय शोधला असता.
५) केवायसी पडताळणी न केल्यास कोणते व्यवहार रोखले जातील? ("केवायसी प्रलंबित स्थिती" च्या काळात ) मी याच दरम्यान अनेक ऑनलाईन व्यवहार केले तेव्हा सिस्टमने मला प्रतिबंधित केले नाही. हा विरोधाभास का?
६) केवायसी पडताळणी करण्यासाठी कालावधी काय आहे ? (उदा. वाहन चालविण्याचा परवाना 1 महिन्यापूर्वी नूतनीकरण केला जाऊ शकतो किंवा वैधता तारीख कालबाह्य झाल्यानंतर 1 महिना)
७) केवायसी पडताळणी करण्यासाठीची एकंदरीत प्रणाली काय आहे ? पूर्वी मी शाखेत गेलो असताना मला केवायसी पडताळणी करायला सांगण्यात यायचे, पण कधी कोणतेही व्यवहार थांबण्यात आलेले नव्हते. या वेळीच असे का झाले ? यासाठी बँकेची सिस्टममध्ये अलर्ट, ई-मेल, एसएमएस अलर्ट, फोन इ फूफप्रूफ सिस्टम का नाही.
८) केवायसी पडताळणी करण्यासाठी मी शाखेत गेलो व काउंटरवर सर्व आवश्यक कागदपत्रे जमा केली. काउंटरवरील व्यक्तीने की केवायसी अद्ययावत औपचारिकता १० ते १५ दिवसांत केली जाईल. संबंधित अधिकारी तिनेही याची पुष्टी केली, केवासी साठी एवढा वेळ का लागावा ?
९) नंतर फोन करून संबंधित अधिकाऱ्याने संगितले की २४ तासाच्या आत तुमची केवायसी पूर्ण होईल. यावर विश्वास कसा ठेवावा ?
१०) माझ्या जुन्या खातेदाराला (वीस-तीस वर्षे जुना) जर असा क्लेशदायक अनुभव येत असेल काय म्हणणार.आपणासोबताचा बँकिंगचा अनुभव अनुभव अतिशय दुःखद होता हे सांगायला मला खेद वाटत आहे.
असा अनुभव इतर ग्राहकांना येऊ नये अशी मी प्रार्थना करतो.
चारपाच दिवसांनी बँकेचे असे गुळमुळीत ई-मेल उत्तर आले :
आपल्याला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.
आपली केवायसी पडताळणी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे.
केवायसी पडताळणी प्रक्रिया बँकिंगच्या नियमानुसार अनिवार्य आहे.
आपण ऑनलाईन लॉग इन करून अमुक अमुक मेनू मध्ये जाऊन तपासू शकता.
केवायसी पडताळणी आम्ही आपल्याला खाली माहिती माहिती देऊ इच्छितो :
१) कालावधिक केवायसी पडताळणीसाठी बँक ई-मेल आणि एसएमएस पाठवते.
२) केवायसीमुळे खाते गोठल्यास आपल्या खात्यात डेबिट व्यवहार करण्यास प्रतिबंधित केले जातात.
३) आपण ही प्रक्रिया ऑनलाईन खालील प्रमाणे करू शकता:
इंटरनेट बँकिंग (म्हणजेच तुमच्या खात्यावर लॉग इन> मेन मेनू> सेवेवर क्लिक करा
& विनंत्या> नवीन विनंती> खाती> इतर सेवा> सबमिट करा.
मी त्यांना ई-मेल करून सांगितले:
धन्यवाद.
आपण दिलेल्या उत्तराने मी पूर्णपणे समाधानी नाही.
बऱ्याच मुद्द्यांविषयी स्पष्टीकरण दिलेले नाही.
माझे आणखी काही मुद्दे पुढील प्रमाणे:
१) बँकेने कालावधिक केवायसी पडताळणीसाठी पाठविलेला ई-मेल होता त्यात ऑनलाईन केवायसी पडताळणी विषयी चकार शब्दसुद्धा नाही. ऑनलाईन केवायसी पडताळणी विषयी ग्राहकांना योग्य ती माहिती व प्रशिक्षण दिले तर बँकेचा व खातेदारांचाही फायदा होऊ शकेल आणि शाखा कर्मचार्यांना डोकेदुखी कमी करेल. स्टेट बँकेत तेथील कर्मचारी वर्ग अशी मदत करतो.
२) मी पुढे जाऊन असे म्हणायचे धाडस करतो की : केवायसी पडताळणी ही बँक कर्मचाऱ्यांसाठी बँक कर्मचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांसाठी आणि खातेदारांसाठीही नॉन-व्हॅल्यू अॅडींग अॅक्टिव्हिटी आहे. कृपया माझ्या विधानाचे गंभीरपणे पुनरावलोकन करून ही प्रक्रिया रद्द करावी अथवा त्रास होणार नाही अश्या पद्धतीने
प्रक्रिया अधिक सुलभ करावी ही विनंती.
ह्या ई-मेल नंतर तीन दिवसांनी कस्टमर केअर विभागातून फोन आला. त्यात माझ्या मुद्दयांवर थातुरमातुर स्पष्टीकरण देण्यात आले.
मी हे स्पष्टीकरण ई-मेलने पाठवा असे सांगितल्यावर "हो पाठवतो" असे सांगितले गेले.
अर्थात ई-मेल आली नाही. सराईत झालेल्या यंत्रणा आपल्या सारख्या ग्राहकांना फाट्यावर मारतात याचा आणखी एक किस्सा अनुभवाच्या पोतडीत जमा झाला.
मित्रांनो, काय वाटते तुम्हाला माझ्या या अनुभवाबद्दल ?
तुम्हाला ही असा डोकेफोडडू अनुभव आलेला आहे काय ?
(प्रचि आंजावरून साभार )

वर्गीकरण
याद्या
40347
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
> तुम्हाला ही असा डोकेफोडडू
कुठल्याही बँकेत जायचे तर आधीच
In reply to > तुम्हाला ही असा डोकेफोडडू by साहना
सर्व्हरवर असली तर चांगलेच आहे
In reply to कुठल्याही बँकेत जायचे तर आधीच by चौथा कोनाडा
भारी किस्से
In reply to सर्व्हरवर असली तर चांगलेच आहे by साहना
भारी किस्से....
In reply to सर्व्हरवर असली तर चांगलेच आहे by साहना
असं होण्याचं कारण
बरोबर.
In reply to असं होण्याचं कारण by कंजूस
+१
In reply to बरोबर. by चौथा कोनाडा
हा ... हा ... हा !
In reply to +१ by सॅगी
खरंय
In reply to हा ... हा ... हा ! by चौथा कोनाडा
सगळं अजबच !
In reply to खरंय by सॅगी
मराठी स्टाफ असेल तरच, मी त्या बॅन्केत खाते उघडतो
खरंय.
In reply to मराठी स्टाफ असेल तरच, मी त्या बॅन्केत खाते उघडतो by मुक्त विहारि
इतर राज्यातले लोक त्यांच्याच
In reply to खरंय. by कंजूस
मु वी साहेब बँक ऑफ महाराष्ट्र
In reply to मराठी स्टाफ असेल तरच, मी त्या बॅन्केत खाते उघडतो by मुक्त विहारि
नावा सकट तक्रार करायची....
In reply to मु वी साहेब बँक ऑफ महाराष्ट्र by Ranapratap
राणाप्रतापसाहेब, माझ्याही
In reply to मु वी साहेब बँक ऑफ महाराष्ट्र by Ranapratap
केवायसी
अगदी उत्तम
In reply to केवायसी by दिगोचि
KYC updates दर ५ वर्षांचा नियम आहे.
In reply to केवायसी by दिगोचि
तुमच्या देशात अतिरेकी कमी
In reply to केवायसी by दिगोचि
@दिगोचि, खरंच ओळखी संदर्भात
In reply to केवायसी by दिगोचि
आमची बबडी बॅंक.
सहमत
In reply to आमची बबडी बॅंक. by मराठी_माणूस
सर्वच्या सर्व बँकांत असलाच
हा .... हा ..... हा .....
In reply to सर्वच्या सर्व बँकांत असलाच by सुबोध खरे
+१११
मस्त.
काय करणार प्राडॉसाहेब, आपण
In reply to मस्त. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अश्या गोष्टींवर काथ्याकुट
In reply to काय करणार प्राडॉसाहेब, आपण by चौथा कोनाडा
ओनलाइन हे नावालाच आहे का?
मला असं कळलं-
कंजूस साहेब,
In reply to मला असं कळलं- by कंजूस
काही गोष्टी प्रत्यक्ष करत होते.
In reply to कंजूस साहेब, by चौथा कोनाडा
हो, बरोबर. आजच्या माहिती चोरी
In reply to काही गोष्टी प्रत्यक्ष करत होते. by कंजूस
गोव्यांत एक सुंदर म्हण आहे.
बरोबर
In reply to गोव्यांत एक सुंदर म्हण आहे. by साहना
रोचक
आयसीआयसीआय बाबत सहमत.
In reply to रोचक by प्रचेतस
सहमत. ICICI बँक कस्टमर
In reply to आयसीआयसीआय बाबत सहमत. by शाम भागवत
IDBI सुद्धा ओके ओके आहे.(?)
In reply to सहमत. ICICI बँक कस्टमर by बाप्पू
माझे IDBI मध्ये 9
In reply to IDBI सुद्धा ओके ओके आहे.(?) by Nitin Palkar
ह्या बॅन्का बहुदा खाजगी असाव्यात ...
In reply to माझे IDBI मध्ये 9 by बाप्पू
छानच बाप्पू !
In reply to माझे IDBI मध्ये 9 by बाप्पू
रिजव बँकेनंतर डबडीआइ होती.
In reply to माझे IDBI मध्ये 9 by बाप्पू
सहमत. ICICI बँक कस्टमर
In reply to आयसीआयसीआय बाबत सहमत. by शाम भागवत
एचडीएफसी, आयसीआयसीआय यांचा
In reply to रोचक by प्रचेतस
बँक खाते ओपन करताना सर्व पुरावे घेतले जातात च
एक बॅन्क पण नियम वेगळे ....
खरं सांगायचं तर बँक बरोबर
In reply to एक बॅन्क पण नियम वेगळे .... by मुक्त विहारि
+१
In reply to खरं सांगायचं तर बँक बरोबर by पिनाक
माझ्या मते काही अत्यंत
हो. आधार कार्ड मुळे kyc
In reply to माझ्या मते काही अत्यंत by पिनाक
ती एक अतिशय विचारपूर्वक ठरवली
In reply to माझ्या मते काही अत्यंत by पिनाक
हो आधार मुळे माझी e-KYC विना
In reply to माझ्या मते काही अत्यंत by पिनाक
स्लो असण्याचं कारण
In reply to माझ्या मते काही अत्यंत by पिनाक
फारच त्रास झाला डबडीआयचा तुम्हाला.
बरोबर. ही आणी एचडीएफसी
In reply to फारच त्रास झाला डबडीआयचा तुम्हाला. by बबन ताम्बे
आयसीआयसीआय चे सगळं संगणीकरण
अगदी ....... !
In reply to आयसीआयसीआय चे सगळं संगणीकरण by शाम भागवत
मला वाटते हा प्रश्न आता
In reply to अगदी ....... ! by चौथा कोनाडा
अतिशय समर्पक विश्लेषण !
In reply to मला वाटते हा प्रश्न आता by शाम भागवत
आता तो लागू झालाय एवढेच.
In reply to मला वाटते हा प्रश्न आता by शाम भागवत
त्यांचं कर्म म्हणायचं !
In reply to आता तो लागू झालाय एवढेच. by मराठी_माणूस
ज्यांनी अशांना वेसण घालायची
In reply to त्यांचं कर्म म्हणायचं ! by चौथा कोनाडा
अगदी !
In reply to ज्यांनी अशांना वेसण घालायची by मराठी_माणूस
मिन्टोंके कामको घन्टे कायकू?
संपूर्ण सहमत.
In reply to मिन्टोंके कामको घन्टे कायकू? by चेतन सुभाष गुगळे
झटपट चेकिंग?
In reply to मिन्टोंके कामको घन्टे कायकू? by चेतन सुभाष गुगळे
ही देखील गंभीर समस्या आहे.
In reply to झटपट चेकिंग? by कंजूस
The pattern of loops and
In reply to ही देखील गंभीर समस्या आहे. by चौथा कोनाडा
माहितीपुर्ण !
In reply to The pattern of loops and by सुबोध खरे
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या
In reply to माहितीपुर्ण ! by चौथा कोनाडा
रेटिनल स्कॅन
In reply to ही देखील गंभीर समस्या आहे. by चौथा कोनाडा
व्वा, छानच !
In reply to रेटिनल स्कॅन by निनाद
थंब स्कॅनिंगला पर्याय
In reply to झटपट चेकिंग? by कंजूस
+१
In reply to थंब स्कॅनिंगला पर्याय by चेतन सुभाष गुगळे
के वाय सी अर्थात - नो यूवर
गुगळे साहेब बर्याच दिवसांनी
खरंय !
In reply to गुगळे साहेब बर्याच दिवसांनी by कानडाऊ योगेशु
नुकताच आलेला बँकानुभव.
एच डी एफ सी बँकैची सेवा पण
In reply to नुकताच आलेला बँकानुभव. by कानडाऊ योगेशु
+१
In reply to एच डी एफ सी बँकैची सेवा पण by सुबोध खरे
HDFC होम लोन चे पार्ट पेमेंट
In reply to नुकताच आलेला बँकानुभव. by कानडाऊ योगेशु
टॅक्टीज ....
In reply to HDFC होम लोन चे पार्ट पेमेंट by शलभ
माझे एस बी आय चे डेबिट कार्ड
In reply to नुकताच आलेला बँकानुभव. by कानडाऊ योगेशु
@कानडाऊ योगेशु,
In reply to नुकताच आलेला बँकानुभव. by कानडाऊ योगेशु
असे उगाचच नाडायला काय कारण
In reply to @कानडाऊ योगेशु, by चौथा कोनाडा
असे उगाचच नाडायला काय कारण असावे ब्रे?
In reply to असे उगाचच नाडायला काय कारण by कानडाऊ योगेशु
असे उगाचच नाडायला काय कारण असावे ब्रे?कर्मचार्यांमध्ये सुसंवाद नसावा. "डिलीव्हरी रीटर्नड" वाली कार्डं त्या ड्रॉवरमध्ये ठेवत असावेत, आणि त्याला त्यात सापडले असावे (आणि त्याची एन्ट्री सिस्टीमम्ध्ये झाली नसावी) ...... आणि क्रेडिट कार्डवाल्याला पतली गली से परत पाठवून दिले हे भारीच झाले ! संदर्भ धाग्यातील "प्रातःस्मरणीयच" अनुभव खरंच त्रासदायक आहे. मी चेन्नईला असताना घरमालकाने किरकोळ कारणावरून फोनवर मला शिविगाळ केली (दारू प्यायलेला होता तो. आणि गंमत म्हणजे पोलिस खात्यात होता) , इतर वेळा माझ्याशी छान गप्पा मारायचा, बोलता-बोलता माझं कौतुकही करायचा) त्याच्या मुलीने मध्यस्ती करून फोन त्याच्या कडून काढून घेतला आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला सांगितले. मला ही हा त्रासदायक अनुभव आठवत असतो !इथे मिपावर बँकेत काम करणारे
१) सरकारी बँका, खासकरुन SBI
In reply to इथे मिपावर बँकेत काम करणारे by मराठी_माणूस
कामाचे प्रेशर असणे, काम सोपे
In reply to १) सरकारी बँका, खासकरुन SBI by Ujjwal
शेवटी ती पण माणसेच असतात .....
In reply to इथे मिपावर बँकेत काम करणारे by मराठी_माणूस
हायफाय ते निरक्षर अडाणी अश्या
In reply to इथे मिपावर बँकेत काम करणारे by मराठी_माणूस
सुरेख निरिक्षण . आज काल अनेक
खाते उघडतांना , पत्त्यासाठी
घर बदलल्यावर पत्ता
In reply to खाते उघडतांना , पत्त्यासाठी by मराठी_माणूस