मानवी कामजीवन. प्रश्न आणि उत्तर

राहुल's picture
राहुल in जनातलं, मनातलं
24 Sep 2022 - 7:35 am

या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत.

-मिपा व्यवस्थापन

स्त्रीसाठी सेक्स डॉल असते का ?

पुरुषाला स्त्री सेक्स डॉल असते. यात हुबेहूब रबरी स्त्री असते, जिच्याशी सेक्स करता येतो. तसेच हुबेहूब पुरूष रबरी पुतळा असतो ज्यात ताठरता असलेले लिंग/डिल्डो असतो. योनिमार्गात प्रवेशित करून स्त्री 'विमन ऑन टॉप' या आसनात सेक्स करू शकते. हे डॉल २०० किलो पर्यंत वजन सहन करू शकते. योनिमार्गात प्रवेशित करताना रबर असल्याने लुब्रिकेशन (वंगण) लावावे लागते किंवा स्त्री योनिमार्गात स्त्राव आला असेल तर ते चांगलेच. ज्यांना बाहेर सेक्स करणे काहीवेळा जमत नाही, आजाराची भिती असते अशांना हे सेक्स डॉल फायद्याचे ठरते. तसेच फक्त ताठर लिंगाकार असलेला अर्धा पुतळा पण उपलब्ध असतो.

स्त्रीला संभोगक्रिया वेदनादायक होऊ शकते तसेच पुरुषालाही वेदना होतात का ?

पुरुषाला देखील संभोगक्रिया वेदनादायक होऊ शकते, त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.

१. शिश्नमुंडावरील त्वचा मागे सारून तेथे साठलेला मला (स्मेग्मा) अंघोळीच्या वेळी धुतला नसेल तर तेथे जंतुसंसर्ग होऊ शकतो. मग संभोगावेळी वेदना होतात.

२. काही पुरुषांचे शिश्नमुंड हे जास्त संवेदनशील असते. त्यामुळे त्याचा कपड्याला जरी स्पर्श झाला तरी वेदना होतात.

३. स्त्रीच्या योनीमार्गात संततीप्रतिबंधक जेली वा गोळ्या ठेवल्या असतील तर काही जणांना त्याची एलर्जी येऊन शिश्नमुंडाला सूज येते व वेदना होतात.

४. स्त्रीच्या योनीत जर जंतुसंसर्ग झाला असेल तर संभोगावेळी पुरुषाला वेदना होतात.

५. पौरुषग्रंथीची वाढ अथवा कर्करोग यातही वीर्यपतनावेळी पुरुषाला वेदना होतात.

वेदनादायक संभोग होत असल्यास वरीलप्रमाणे त्याची कारणे शोधून योग्य उपचार केल्यास या तक्रारी बंद व कमी होतात.

सेक्ससाठी लिगांची सुंता केलेली चांगली असते का ?

लिंगावर त्वचेचे आवरण असते. ते दररोज मागे-पुढे सहजपणे करता येते, काहींना ते मागे करणेच अशक्य होते किंवा लिंगाचा पुढील भाग पूर्ण त्वचेने झाकला गेला असेल तर सर्कमसिजन (सुंता) करतात. काहींना मलम लावून मागे-पुढे करून तेथील त्वचा सहज सरकवता येते. अशा वेळी सुंताची गरज नसते. पण खास सेक्ससाठी सुंता केल्यावर फायदा होतो असे काही नाही. याचा स्टॅमिना, वीर्यपतन यावर काही फायदा नसतो.


भारतातील स्त्री मुखमैथुन करते का ? ते चांगले असते का ? काही स्त्रियांना, मुलींना ते का आवडत नाही ?

हो करते ! त्याचे प्रमाण वाढत चालले आहे. मुखमैथुन करणे गैर नाही. त्याचे लैंगिक सुख देताना फायदे आहेतच. दोघांच्या इच्छेने होत असेल तर उत्तम. आजकाल कामूक चित्रपट बघून लोकांना मुखमैथुन, विविध सेक्स पोजिशन याविषयी माहिती मिळत चाललीये. याचा अर्थ कामूक चित्रपटातील सर्व सीन बरोबरच असतात असे नाही. आवड-निवड वेगवेगळया असतात. मुखमैथुन चांगले असले, तरी प्रत्येकाला ते आवडेलच असे नाही. गैरसमज असेल तर डॉक्टरकडून योग्य, सत्य, माहिती समजून घ्यावी. त्यातून बदल झाला तर ठीक, अन्यथा एखाद्याला आवड नसणे हे देखील नॉर्मल आहे.

पेनाइल इंप्लांट काय आहे कुणाला वापरतात ?

पुरुषाला नपुंसकता असेल आणि औषधी उपचाराने फरक पडत नसेल, तर शेवटचा पर्याय पेनाइल इंप्लांट असतो. हे काम माइक्रोसर्जन, मूत्ररोगतज्ञ डॉक्टर्स करतात. ही शस्त्रक्रिया असून थोडी खर्चिक आहे. सेमी रिजिड, इण्फ्लटेबल, टू /थ्री सिलेंडर इंप्लांट असे त्याचे प्रकार आहेत. प्रत्येकाचे फायदे तोटे आहेतच. काही वेळा शस्त्रक्रियेनंतर लिंग आकार थोडा लहान होतो. शस्त्रक्रियेनंतर काही केसमध्ये जंतूसंसर्ग, सिलेंडर फुटणे असेही घडते. पुरुष आणि त्याच्या साथीदाराने या सर्व बाबी लक्षात घेऊन निर्णय घ्यावा. तसेच प्रत्येक ५ वर्षाने हे इंप्लाट बदलावे, असेही काही डॉक्टर्सचे मत आहे.

समलैंगिक व्यक्तीचे समलैंगिक आकर्षण भविष्यात कमी होऊ शकते का?

समलैंगिक, विरुद्धलिंगी आकर्षण असलेल्या जोडप्यात सेक्स इच्छा भविष्यात कमी अधिक होऊ शकते. पण समलिंगी आकर्षण पूर्ण थांबून विरुद्धलिंगी होईलच हे सांगता येत नाही, कारण असे समलिंगी असलेल्या पुरुषाने स्त्रीशी विवाह केला तर तो विरुद्ध लिंगी न होता समलिंगीच राहिला आहे अश्या केसेस जास्त आहेत. अगदी समलिंगी आणि विरुद्धलिंगी आकर्षण असल्यामध्ये bisexual दिसून येतात, काही पुढे कायम तसेच राहते तर काही केस मध्ये तात्पुरते bisexual राहतात. सगळे नॉर्मल असते. इच्छा कमी असणे ही समस्या समलिंगी मध्येही असते, फक्त विरुध्द लिंगी आकर्षण असलेल्या लोकांना लैंगिक समस्या असतात असे नाही.

सावधान

◼लिंगवर्धक यंत्र, हस्तमैथुन-स्वप्नदोष-स्तन आकार यांवर असणाऱ्या बऱ्याच जाहिराती खोट्या असतात. त्यावर तरुण-तरुणी तसेच वृद्ध देखील फिदा होतात. सध्या तर शिकलेले डॉक्टर देखील हेच खोटे रेटून बोलत आहेत आणि लोकांना फसवत आहेत. याला काही औषधी कंपन्या हातभार लावत आहेत. नपुंसकतेवर उपचार करताना एखादी पावडर तीन-सहा महिने घ्यायला लावतात आणि लोकांचे पैसे वाया घालवतात. त्या पावडरचा काहीही उपयोग होत नाही. हे सगळे घडते कारण लोकांना मानवी लैंगिक जीवनाविषयी चुकीची आणि अर्धवट माहिती आहे. लोकांकडून निरर्थक गोष्टींमध्ये पैसे खर्च केले जातात, पण लैंगिक जीवनाविषयी माहिती मात्र घेतली जात नाही.

◼पुरुषांकडून स्त्रीला अजून भोगवस्तू समजली जाते. तिची काही इच्छा असते, तिलाही काही समस्या असते, याचा अजून कित्येकांना पत्ता नाही.

◼समाज ऑनलाईन उपचाराला प्राधान्य देतो, ही सर्वात धोक्याची बाब आहे. यामुळे फसवणुकीचे प्रमाण वाढीस लागले आहे. जिथे तपासणी आवश्यक आहे, तिथे घरात बसून उपचाराची अपेक्षा करणे वेडेपणाचे ठरते. काही वेबसाईटस् लोकांना ऑनलाईन सल्ला देत असतात, त्यात देखील सर्व डॉक्टर्स खरे आहेत का, याची खात्री करून घेतलेली नसते असे दिसून आले आहे. त्यामुळे लोकांना फार सजग व्हावे लागेल. पण त्यांच्या हे लवकर लक्षात येत नाही, कारण घरबसल्या सगळे तुरंत मिळते, एवढेच त्यांच्या डोक्यात बसलेले आहे. त्याची विश्वासार्हता मात्र बघितली जात नाही.

लैंगिक शिक्षण, विवाहपूर्व मार्गदर्शन हे सर्वांनी सक्तीने घेतले, तर अशा अडचणी येणार नाहीत, हे नक्की.

- डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)


या महत्वाच्या विषयावर एकाच वेळी अनेक धागे होऊ नयेत म्हणून अन्य धाग्यातला मजकूर मूळ धाग्यात समाविष्ट करुन दुसरा धागा अप्रकाशित करत आहोत.
-मिपा व्यवस्थापन

आरोग्यसल्ला

प्रतिक्रिया

माझे लग्न झाले आहे. पत्नीशी सेक्स करून देखील माझे मन भरत नाही. मी हस्तमैथुन करतो. ही सवय कशी घालवू ?

जोडीदारामधे सतत सेक्स भूक सारखीच असते असे नाही. एकाला जास्त असेल, एकाला कमी असेल. पुरुष विवाहित असेल तर हस्तमैथुन करत नसतात असे नाही. त्यामुळे त्यात काही गैर नाही. पुढचा पार्टनर तयार नाही, उपलब्ध नाही, वेगवेगळी लैंगिक आवड, भूक असेल तर हस्तमैथुन करणे नॉर्मल आहे. साहजिकच ही सवय नाही आणि वाईटही नाही. इतर काही मानसिक आजारात लैंगिक क्रिया केल्या की बरे वाटते म्हणूनही हस्तमैथुन केले जाते. मूळ कारण शोधून काढण्यासाठी योग्य डॉक्टरचा सल्ला घ्यावा.

रोज सेक्स आणि बॉडी वाढवण्यासाठी व्यायाम ह्या दोन्ही क्रिया एकाच वेळी झाल्या तर काय होईल ? मसल ग्रोथ कमी होईल की होणारच नाही ? अंगातली ताकद कमी होऊन चक्कर येणे असे काही होईल का?

मुळात सेक्स करणे हा हृदय, फुप्फुस यांसाठी चांगला व्यायाम आहे. हे केल्याने शरीरातील ताकद कमी होत नाही. वीर्यनाश झाल्याने ताकद जाते, ही अंधश्रद्धा समाजात खूप पसरली आहे. त्यामुळे पुरुष घाबरतात. पुरुषाच्या कंबरेला चांगला फायदा होतो. विविध आसन केल्याने वेगवेगळ्या मसल्सला फायदा होतो. सेक्स करताना जवळपास सर्व मसल वापरले जातात.

गुदमैथुन केल्याने गर्भधारणा होते का ?

स्त्रीमध्ये योनी, योनीमार्ग आणि गर्भाशय असे अवयव असतात. सेक्स केल्यावर वीर्य योनिमार्गातून आत जाते आणि स्त्रीबीजांडासोबत संयोग होऊन स्त्री गरोदर होते. गर्भाशयामध्ये बाळ वाढते. वीर्याला गुदमैथुनातून गर्भाशयात जाण्यासाठी कोणताही मार्ग नसतो. त्यामुळे गर्भधारणा होणे शक्य नाही. तसेच, गुदमैथुन हे कंडोम न वापरता आणि पुढील व्यक्तीची इच्छा असल्याशिवाय अजिबात करू नये.

विना अपत्य जोडप्यांना कामजीवन अनुभवता येते का?

संप्रेरके नॉर्मल असतील आणि आपण पालक होऊ शकत नाही, हे फार मनावर घेतले नसेल, तर अशी जोडपे देखील सेक्स लाइफ चांगले अनुभवू शकतात. पण नातेवाईकांचा, समाजाचा दबाव आणि संप्रेरकांमधील दोष यामुळे दोघांमधे वासना कमी होणे, नपुंसकता, वीर्यपतन न होणे, सेक्स करताना दडपण येणे अशा समस्या येतात. हे तज्ञ डॉक्टर्सना भेटून व्यवस्थित करता येते. या देशात स्वतःसाठी जगण्यापेक्षा 'लोक काय म्हणतील' याचा दबाब घेऊन जगणारे लोक जास्त आहेत. याच आधारावर अम्मा, बापू, पप्पू, ज्योतिषी हे बरोबर लोकांना फसवतात. त्यांच्यापासून सावध व्हावे. निव्वळ आईबाप होऊ शकत नाही, हा आयुष्याचा एकच महत्वाचा भाग असू शकत नाही.

स्त्रीला लैंगिक समस्या असताना लग्न करत असेल तर ती फसवणूकच झाली का ?

कायदा काय म्हणतो माहिती नाही, पण लैंगिक इच्छा बिलकुल नसणे, समलिंगी असणे हे कारण असताना लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. तसेच काही मनोविकृती आहेत, गर्भाशयात गंभीर आजार असणे हे सत्य लपवून लग्न करणे ही फसवणूक म्हणता येईल. पुरुषांची समस्या लगेच लक्षात येते. कारण ताठरता येणे न येणे हे दिसून येते. तसे स्त्रीमधे दिसून येत नाही. त्यामुळे पुरुषाला ही लैंगिक समस्येबद्दलची फसवणूक लवकर लक्षात येत नाही.

प्राण्यांचे काही अवयव खाऊन सेक्स पॉवर वाढते का?

सेक्स पॉवर, स्टॅमिना याची प्रत्येकाची व्याख्या वेगवेगळी आहे. ताठरता जास्त काळ टिकणे, वीर्यमात्रा जास्त असणे, पुन्हा पुन्हा सेक्स करत राहणे याला सेक्स पॉवर जास्त असणे असे समजतात. शारीरिक, मानसिक स्वास्थ्य, लैंगिक जीवन विषयक शास्त्रीय माहिती दोघांनाही असणे आणि सेक्स करण्यासाठी असणारा अपेक्षित वेळ, जागा असणे हे महत्त्वाचे असते. प्राण्यांचे अवयव खाऊन सेक्स स्टॅमिना, पॉवर वाढतो याला शास्त्रीय आधार नाही.

डॉ. राहुल पाटील, लैंगिक समस्या तज्ञ, कोल्हापूर (मोबाईल-9822534754)

राहुल's picture

24 Sep 2022 - 10:16 am | राहुल

असा काही नियम आहे ??? किती पोस्ट्स दिवसातून कराव्यात??? म्हणजे मी daily posts करत जाईन

सुरिया's picture

24 Sep 2022 - 10:24 am | सुरिया

पोस्टचे नियम काही कल्पना नाही पण शुद्ध लेखनाच्या नियमानुसार एका प्रश्नाला एकच प्रश्नचिन्ह पुरे असते. प्रश्नातली आर्तता चिन्ह संख्येनुसार गृहीत धरली जात नाही.

मिपा म्हणजे फेसबुक नव्हे SEO करायला, त्यामुळे एका विषयावर एक पोस्ट टाका, एका दिवसाला एक नको.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 10:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर किती पोष्ट टाकाव्यात याचे काही नियम नाहीत. मिपावर कितीही पोष्ट्स टाकू शकता. पण, सारखा-सारखा तोच विषय यायला लागला किंवा त्या विषयातलं नावीन्य संपलं की मग ते विषय कंटाळवाणे व्हायला लागतात. वाचक लेखनापासून दूर जातात. लेखनाची टींगल व्हायला लागते. अर्थात, तुमच्याकडे माहिती-अनुभवांचा खुप साठा असणार आहे, तेव्हा ते वाचायला आवडेलच. लिहिते राहा. पण, अंदाज पाहुन आणि अधुन-मधुन, असे सुचवावेसे वाटते. बाकी, तुमची मर्जी.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

24 Sep 2022 - 8:07 am | प्रचेतस

मिपाचा मटा झाला वाटते :)

प्रसाद गोडबोले's picture

24 Sep 2022 - 8:27 am | प्रसाद गोडबोले

त्यातही डॉक्टरांनी अगदीच बेसिक बाळबोध प्रश्न घेतल्याने अगदीच मटा झाल्यासारखे वाटते =))))

उग्रसेन's picture

24 Sep 2022 - 8:17 am | उग्रसेन

डॉक्टर सायब. माहितीपुरक धागा.
अजुन येऊन द्या.

गवि's picture

24 Sep 2022 - 9:24 am | गवि

या विषयाला चिकटलेला टॅबू दूर होईल तर देशाचे कल्याण होईल. गैरसमजांची तर खाणच आहे जनतेत. त्यातून मग भलतेच काही भरकटणे होऊ शकते.

असे तज्ञ लोकांचे लेख स्वागतार्ह.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2022 - 9:30 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनविषय आणि आपल्या विचारांशी सहमती आहेच. सगळेच काही अशा विषयात तज्ञ असत नाही. आता माध्यमांच्या अधिक सोयी झालेल्या असल्या तरी या विषयावर अजुनही समाजात समज-गैरसमज आहेत. योग्य माहिती-प्रबोधन होणे गरजेचं. लेख आणि प्रश्नोत्तराचे स्वागत. डॉक्टर लिहिते राहावे..!

-दिलीप बिरुटे

समाजातअनेकदा सेक्स या विषयावर बोलायचं म्हटलं की एक प्रकारचा टॅबू असतो.
डाॅक्टरांनी सहसा चर्चिला न जाणारा विषय मांडला आहे. ही एक सुरवात समजावी.
आशा करतो धाग्याला वाईट वळण लागणार नाही.
डाॅक्टरांनी समाज प्रबोधन करत रहावे.

सुरिया's picture

24 Sep 2022 - 10:27 am | सुरिया

इस बात पे एक पावशेर अर्ज हे जणाब गणपा.
कळुलाचे पाणी कशाला ढवळीले,
नागाच्या पिलाला का ग खवळीले.

तज्ञ लोकांचे लेख स्वागतार्ह.

मुक्त विहारि's picture

24 Sep 2022 - 11:34 am | मुक्त विहारि

मिपाला, कुठलाही विषय वर्ज्य नाही, हे जाणवते ....

धर्मराजमुटके's picture

24 Sep 2022 - 2:44 pm | धर्मराजमुटके

दिवसातून किती पोस्टस कराव्यात ??

अगदीच कामशास्त्रीय प्रश्न झाला डॉक्टर साहेब. ते पेपरात दिवसातून किती वेळा सेक्स करावा असा प्रश्न विचारतात तसा.
उत्तर : याचे काही नियम ठरलेले नाही पण कोणतीही गोष्ट जास्त प्रमाणात केली तर त्यातील रस निघून जातो. शिवाय समोरची पार्टि पण तयार हवी (वाचायला). त्यामुळे याचे असे ठराविक उत्तर नाही देता येणार. शिवाय मिपा पडले पुरुषप्रधान. त्यामुळे पुरुष जसा जास्त काम केल्यामुळे थकतो तसाच इथला वाचक वर्ग देखील जास्त वाचल्यावर थकत असणार आणि त्याच्याकडे पुढे वाचायची शक्ती राहत नसणार. शिवाय प्राण्यांचे अवयव खाऊन वाचनशक्ती वाढते या समजूतीला आधार देणारा कोणताही शास्त्रीय आधार उपलब्ध नाही.

अवांतर : मिपावर स्वागत. टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.

प्रसाद गोडबोले's picture

25 Sep 2022 - 2:00 am | प्रसाद गोडबोले

टोपी उडविणार्‍या प्रतिक्रिया आल्या म्हणून इथे यायचे थांबवू नका. ही मिपाकरांची स्वागत करायची पद्धत आहे असं समजा.

+१
हेच म्हणतो.
लिहित रहा डॉक्टर. मिपाची शैली हसत खेळत कट्ट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसण्याची आहे. कट्ट्यावर नवीन कोणी आले कि चेष्टा मस्करी होणारच.
अ‍ॅज लाँग अ‍ॅज तुम्ही ठार आंधळा मोदी आणि हिंदुद्वेष दाखवणारे लेखन करत नाही तोवर तुम्हाला इथे कोणीही टोकाचे विरोधक लाभणार नाहीत ह्याची गॅरंटी देतो !

विनोदपुनेकर's picture

25 Sep 2022 - 6:20 pm | विनोदपुनेकर

एकाच विषयावर वारंवार लेख येत राहिले तर ते कंटाळवाणे आणि दुर्लक्षित होण्याची शक्यता जास्त