विस्मृतीत गेलेले पदार्थ २ - लशुन पायसम अर्थात लसणाची खीर

यश राज's picture
यश राज in पाककृती
28 Jul 2022 - 5:54 pm

विस्मृतीत गेलेल्या पदार्थाच्या अनुशंगाने आजची पाककृती आहे लशुन पायसम अर्थात लसणाची खीर.

असे म्हणतात की पुरुष हे उत्तम बल्लवाचार्य असतात (माफ करा माझा स्त्री पुरुषांमध्ये भेद करण्याचा कोणताही हेतु नाही, ही फक्त म्हण किंवा धारणा आहे). मी २ पुरातन काळातील व्यक्तींची नावे सांगतो त्यामुळे या धारणेला पुष्टी मिळु शकेल

१. पांडवांपैकी एक असलेला भीम - विजनवासात असताना भीमाने विराट राजाच्या महाली बल्लवाचार्य म्हणुन काम केले होते. आता प्रचलीत असलेल्या श्रीखंडाचा जनक म्हणजे भीमच.(याबद्द्ल पुढच्या लेखात)

२. नल राजा : निषाद राजा नल म्हणजेच महाभारतातील प्रसिद्ध नल दमयंती या जोडीतील राजा. आज आपण बघत असलेल्या पाककृतीची व्युत्पत्ती राजा नलानेच केली आहे.

लसणाच्या खीरीकडे वळण्याअगोदर राजा नलाबद्द्ल थोडेसे.

निषाद राजा नल हा सर्वगुण सम्पन्न होता, त्याच्या तावडीत सापडलेल्या एका हंसाने त्याला विदर्भ (महाराष्ट्रातील) देशाच्या राजा भीम याची राजकन्या दमयंती बद्दल सांगितले . राजा तिच्या सौंदर्याचं वर्णन ऐकुन दमयंतीच्या प्रेमात पडला व तसेच त्याच हंसाने दमयंतीला राजा नलाबद्द्ल सांगितले. दमयंती पण मनोमन नलावर प्रेम करु लागली व दोघेही एकमेकांसाठी झुरु लागले.
पुढे भीमराजाने दमयंतीसाठी स्वयंवर ठेवले व त्यात देशोदेशींच्या राजांना निमंत्रण पाठवले. दमयंती च्या सौंदर्यामुळे मोहुन जाऊन ईन्द्र, वरुण्,यम , अग्नी इत्यादी देवताना तिच्या बरोबर विवाह करावासा वाटला. पण त्यांना दमयंतीचा संकल्प ठाऊक होता की ती नलराजालाच वरेल. त्यांनी नलराजाला गाठुन त्यांचा दुत म्हणुन दमयंती कडे जाउन या देवतांना निवडण्याचा प्रस्ताव दिला. पण राज नलाने त्यांना विनम्रपणे नकार दिला व म्हणाला की दमयंती फक्त आणि फक्त मलाच वरेल .
आता या देवतांनी ठरवले की आपण सर्व जण राजा नलाचे रुप घेवुन स्वयंवरामध्ये जावुया व नल व दमयंती ची परिक्षा घेवुया.

नल राजा व इतर सर्व जण राजा नलाचे रुप घेवुन स्वयंवरामध्ये पोहोचले पण दमयंतीने बरोबर ख-या नल राजाच्या गळ्यातच वरमाला टाकली. त्यामुळे बरेचसे देव नाराज झाले व काही नल व दमयंती परीक्षेला सफल झाले म्हणुन संतृष्ट झाले व त्यांनी दोघांना अनेक आशिर्वाद व वर दिले.
त्यातला एक वर यमराजाने नल राजाला दिला तो म्हणजे की "तु सुपशास्त्रात(म्हणजेच पाकशास्त्र) प्रविण हो "

पुढे उभयंतासमोर खुप अडिअडचणी आल्या व दोघांची ताटातुट झाली. त्या काळात कफल्ल्क झालेल्या नल राजाने अयोध्येच्या राजा त्रुतुपर्ण च्या दरबारी बल्लवाचार्य म्हणुन काम करायला सुरुवात केली.

तेथे त्याने पाकशास्त्रामध्ये असंख्य प्रयोग केले , नव नविन पाककृतींचे निर्माण केले. या सर्व पाककृतींचा व तसेच आहार व त्रूतुबद्द्ल व पाक गृहातील निगडीत असलेल्या अनेक गोष्टींसाठी एक विस्त्रुत ग्रंथ लिहिला तो म्हणजे "पाक दर्पणम" . हा ग्रंथ पुढे जावुन नलपाकदर्पणम म्हणुन प्रसिद्ध झाला.
संस्कृत मध्ये लिहिलेल्या या ग्रंथामध्ये अनेक शाकाहारी व मांसाहारी पदार्थान्ची रेलचेल आहे.या ग्रंथात साधारणतः ११ प्रकरणे आहेत व ७६१ संस्कृत श्लोक आहेत .
त्यातील चौथे प्रकरण हे अनेक प्रकारच्या पायसम साठी लिहिलेले आहे त्यात पहिली पाककृती जी आहे ती म्हणजे विचीत्र लशुन पायसम अर्थात लसणाची खीर.

आपल्या सुदैवाने जवळपास ५००० वर्षांपुर्वी लिहिलेल्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत ही आजही वाराणसीतील संपुर्णांनंद संस्कृत विद्यापीठात उपलब्ध आहे. व अनेक पाक विशारदांनी या ग्रंथाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये अनुवाद केला आहे. त्यातील एक प्रसिध्द मराठी अनुवाद हा १८९३ साली गोदावरी पंडित यांनी केला आहे. माझ्याकडे त्या पुस्तकाची प्रत आहे पण न जाणो का या लसणाच्या खीरिचा त्यात समावेश केला गेला नाही.

साहीत्य

सोलुन घेतलेल्या लसणाच्या १० पाकळ्या
दुध - १ लिटर
साखर - १ कप
वेलची पुड
बदाम काप, पिस्ता काप
सजावटी साठी - सुक्या गुलाबाच्या पाकळ्या

कृती:

सर्वप्रथम लसणाचा कच्चा वास जाण्यासाठी एका पातेल्यात पाणी घेवुन त्यात लसणाच्या पाकळ्या टाकुन ५ ते ७ मिनीटे उकळवुन घ्यावे.

boil

व गरम पाणी फेकुन देवुन त्या पाकळ्या थंड पाण्याने धुवुन बाजुला काढुन ठेवाव्यात.

cool

दुसर्या पातेल्यात १ लिटर दुध घेवुन ते अर्धा लिटर होईस्तवर आटवुन घ्यावे. त्यात आता उकडलेले लसुण, साखर घालावी , वेलची पूड व थोडे बदाम/पिस्ता काप टाकावेत.

put

एका स्मॅशर ने दुधातले लसुण दाबुन घ्यावेत. दुध आता पुढ्चे १५ ते २० मिनिटे उकळवुन घ्यावे.

आता १५/२० मिनिटांनंतर खीर तयार आहे. व त्यात गुलाबाच्या पाकळ्या पेरुन खायला द्यावी.

serve

आमच्या रेसिपी ची लिन्क

https://www.youtube.com/watch?v=vjad6dSmUYw&t=106s

आयुर्वेदानुसार या खीरीचे महत्व असे की हि पित्तशामक व व्याधीनाशाक आहे.

थोडे अवांतरः या खीरीला उत्तरेकडे बेनामी खीर पण म्हणतात , कारण यासाठी की बर्याच जणांना खीरीत लसुण ही कल्पनाच सहन होणार नाही म्हणुन हे नाव. माहीत नसताना खीर खाल्यावर लोकांना कळतच नाही की त्यात लसुण आहे म्हणुन. माझ्या लेकीला कच्च लसुण आवडत नाही पण माहीत नसल्याने तीने ही खीर गट्ट्म केली.

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

28 Jul 2022 - 7:30 pm | विजुभाऊ

मस्त . करून पहातो

प्रचेतस's picture

28 Jul 2022 - 7:57 pm | प्रचेतस

भन्नाट लागणार हे. लसूण आवडत असल्याने ही खीर तर नक्कीच आवडेल.

यश राज's picture

28 Jul 2022 - 7:59 pm | यश राज

विजुभाऊ व प्रचेतस तुम्हाला धन्यवाद

कर्नलतपस्वी's picture

29 Jul 2022 - 11:42 am | कर्नलतपस्वी

नवनवीन मिळणार्‍या माहीती मुळे मिपा व मिपाकर आवडतात.
नवीन माहीतीबद्दल धन्यवाद.
आमच्या घरी वरीष्ठ कनिष्ठ सहकारी मित्रांसाठी डिनर होते. विल्सन नावाचा दाक्षिणात्य बल्लव म्हणाला सर ओनियन सुप बनवतो. कितीही नको म्हणालो आयकालाच तयार नव्हता. एकदाच ट्शेट्रा करा म्हणून मागे लागला, शेवटी म्हणलो आल्मोण्ड सुप सुद्धा बनव.विचार हाच की कांदा सुप बिघडल्यास फजिती नको. मित्रांनी बदाम सुप पेक्षा ओनियन सुप जास्त पसंत केले. आजीबात कांद्याचा वास नव्हता.

बनवण्याची हिच पद्धत होती.

लेख आवडला. पाककलेशी फक्त खाण्याकरता संबध.

सौंदाळा's picture

29 Jul 2022 - 11:55 am | सौंदाळा

जबरदस्त
लसूण आणि दूध हे काँबिनेशन वाचून विचित्र वाटले पण पुढची कृती आणि शेवटी लेकीने गट्टम केली म्हटल्यावर प्रश्नच मिटला.
कधीतरी करुन बघणार.
सांगण्याची पध्दत भारीच.

५००० वर्षांपुर्वी लिहिलेल्या या ग्रंथाची हस्तलिखित प्रत

बाबौ, भारतात उबलब्ध असलेली सर्वात जुनी हस्तलिखित प्रत किती जुनी आणि कोणत्या विषयाची असावी असा प्रश्न मनात आला.

ज्ञानोबाचे पैजार's picture

29 Jul 2022 - 12:02 pm | ज्ञानोबाचे पैजार

कधी विचारच केला नव्हता...
तुमच्या लेकीने गट्टम केले म्हणता म्हणजे नक्की चांगली होत असणार
करुन बघायलाच हवी
पैजारबुवा,

यश राज's picture

29 Jul 2022 - 12:52 pm | यश राज

धन्यवाद कर्नलजी, सौंदाळा व पैजार बुवा.
लसूण एकदा शिजला आणि त्याचा कच्चा व उग्र वास गेला की सांगूनही खरं वाटत नाही की खीर लसणाची आहे.

चांगली दिसत आहे.

अप्पा जोगळेकर's picture

29 Jul 2022 - 2:13 pm | अप्पा जोगळेकर

पण लसणीचा उग्र वास संपूर्ण निघून गेला तर लसून घालून काय साध्य होणार?

धन्यवाद

यश राज's picture

29 Jul 2022 - 2:49 pm | यश राज

धन्यवाद कंजुस, अप्पा आणि मुविकाका.

माझ्या माहीतीप्रमाणे, लसणाचा उग्र वास निघुन जरी गेला तरी लसणाचे गुणधर्म तसेच राहतात. तसाही उग्र वास जर तसाच ठेवला तर खीर म्हणुन खाणे अवघड जाईल.
दुसरा अजुन एक प्रकार म्हणजे कांदे पाक /कांद्याचा हलवा , या प्रकारात सुद्धा कांद्याचा उग्र वास घालवुन हा प्रकार करतात.

टर्मीनेटर's picture

31 Jul 2022 - 9:49 pm | टर्मीनेटर

पायसम मनापासून आवडते ओणमला माझ्या केरळी मित्रांकडे ह्यावर आडवा हात मारायला मजा येते. पण हे लसूण घातलेले पायसम पहिल्यांदाच ऐकले!

तसाही उग्र वास जर तसाच ठेवला तर खीर म्हणुन खाणे अवघड जाईल.

तो वास जर पूर्णपणे जात असेल तरच मी हा पदार्थ खाऊ शकेन अन्यथा नाही 😀

यश राज's picture

31 Jul 2022 - 11:05 pm | यश राज
यश राज's picture

31 Jul 2022 - 11:05 pm | यश राज
यश राज's picture

31 Jul 2022 - 11:06 pm | यश राज
यश राज's picture

31 Jul 2022 - 11:16 pm | यश राज
यश राज's picture

31 Jul 2022 - 11:16 pm | यश राज

तो वास जर पूर्णपणे जात असेल तरच मी हा पदार्थ खाऊ शकेन अन्यथा नाही

हो वास पूर्णपणे जातो त्यामुळे तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे.

श्वेता व्यास's picture

29 Jul 2022 - 2:56 pm | श्वेता व्यास

छान पाकृ. पित्तशामक आहे तर करून पहायलाच हवी.
बाकी पुरुष हे उत्तम बल्लवाचार्य असतात - सहमत!

यश राज's picture

29 Jul 2022 - 8:17 pm | यश राज

धन्यवाद श्वेता ताई.

मस्तच! फोटो खुपचं सुंदर.

यश राज's picture

29 Jul 2022 - 8:17 pm | यश राज

धन्यवाद भक्ती ताई

आयुर्वेदानुसार या खीरीचे महत्व असे की हि पित्तशामक व व्याधीनाशाक आहे.

ओके. मग ह्या व्याधीने ग्रस्त असणार्‍याने दमयंतीप्रमाणे "औषध नल गे मजला" असा श्लेष करावा काय :)

यश राज's picture

29 Jul 2022 - 8:16 pm | यश राज

औषध नल गे मजला

हा श्लेष मला लेखात वापरायचा होता. पण लेखनसीमा.
तुमच्या प्रतिसादामुळे तो आला . धन्यवाद

माझा आयुर्वेदाचा अभ्यास नाही पण अजून एक ऐकिवात असलेला उपयोग की ही खीर रसोन क्षिरपाक म्हणून औषधं बरोबर देतात. जाणकार प्रकाश टाकू शकतात.

आनंद's picture

31 Jul 2022 - 9:24 pm | आनंद

करुन पहिली!
घरात सगळ्यानाच आवडली!
अजुन अश्या पाकक्रुती येवुद्या!

यश राज's picture

31 Jul 2022 - 11:03 pm | यश राज

तुम्ही करून बघितली आणि सर्वांना आवडली हे ऐकून खूप आनंद वाटला
खूप धन्यवाद तुम्हाला.
तुमच्या प्रतिसादामुळे पुढच्या रेसिपी टाकण्यासाठी हुरूप आला.

जेम्स वांड's picture

1 Aug 2022 - 8:11 am | जेम्स वांड

लसूण पायेश आवडला, काहीतरी खरंच हटके आणि लॉस्ट रेसिपीज पैकी वाचल्याचे सार्थक वाटले झाल्यासारखे.

यश राज's picture

1 Aug 2022 - 12:42 pm | यश राज

जेम्स वांड खूप धन्यवाद तुम्हाला

नागनिका's picture

1 Sep 2022 - 12:16 pm | नागनिका

एपिक channel वर Lost Recepies च्या एका भागामध्ये या प्रमाणे कांद्याची खीर केलेली दाखवली होती..