श्री राघव यांनी म्हटल्या प्रमाणे आधीच्या धाग्यात खूप शोधाशोध करावी लागते म्हणून हा नवीन धागा.
सरकार पडल्यापासून उठा आणि आठा यांना खरी जाग आलेली दिसतेय.
करोना काळात खरी जनतेशी किंवा आमदारांशी संवाद साधण्याची गरज असताना दोघेही घराबाहेर पडले नाहीत. आणि आता सभा घेण्याचा दोघांनी सपाटा लावलाय.
आठा म्हणे राज्याचा दौरा करणार आहेत निष्ठा यात्रा या नावा खाली.
तर उठा महिला आघाडी बरोबर चर्चा करत आहेत.
काल ठाण्यातले सगळ्या रिक्षावाल्यांनी ए. शिं. ना पाठींबा म्हणून उत्सव मोर्चा काढला होता.
ठिकठिकाणी "होय आम्हाला गर्व आहे की एक रिक्षावाला मुख्यमंत्री झालाय " असे फलक लागलेत.
तसेच काल ठाण्यातले ६६ नगरसेवक खऱ्या शिवसेनेतून ए. शिं. च्या शिवसेना मध्ये गेलेत.
आता बोला.
प्रतिक्रिया
12 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
योगायोगाने मिळालेल्या मुख्यमंत्री पदाचा पुरेपुर वापर करुन एक सजग राजकारणी आहोत हे दाखवायची संधी उठा यांना मिळाली होती.
आणी ह्या संधीचा फायदा ऊचलून तियांनी सजग राजकारणी आहोत हे दाखवून दिले.12 Jul 2022 - 9:22 pm | अमरेंद्र बाहुबली
संजय राऊत यांना जनमानसात काडीची ही किंमत नाही हे त्यांना चांगले ठाउक आहे.
असं फक्त पिसे सोलून ऊघडे पडलेल्या भाजपेयींना वाटतं.अजुन ४ वर्षे साहेब राज्यसभेत बरळतील ...
बरळतं कोण? हे विधानसभेत पाहतेय जनता “अध्यक्ष महोदय“. :)12 Jul 2022 - 6:14 pm | श्रीगुरुजी
ठाकरे पितापुत्र, राऊत, परब, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, मनीषा कायंदे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, दीपाली सय्यद अशांपासून भाजपने दूर रहावे.
12 Jul 2022 - 9:23 pm | अमरेंद्र बाहुबली
ठाकरे पितापुत्र, राऊत, परब, किशोरी पेडणेकर, विनायक राऊत, अरविंद सावंत, मनीषा कायंदे, प्रताप सरनाईक, भावना गवळी, दीपाली सय्यद अशांपासून भाजपने दूर रहावे.
सत्ता मिळनार असेल तर उद्याच जाऊन भाजपेयी ह्यांचे पाय धरतील.12 Jul 2022 - 10:08 pm | इरसाल
सत्ता मिळनार असेल तर उद्याच जाऊन भाजपेयी ह्यांचे पाय धरतील.
सत्ता गेल्याचा धक्का अजुन ओसरलेला दिसत नाही. राज्यात भाजपच सत्तेत आहे. सर सांभाळा स्वतःला. संरा होत चाललाय तुमचा.
12 Jul 2022 - 9:20 pm | अमरेंद्र बाहुबली
खासदारांचेही बरोबर आहे म्हणा. त्यांना लोकांपुढे जाऊन मते मागायची असतात. संजय राऊतप्रमाणे बेताल बडबड करत उंटावरून शेळ्या हाकणे त्यांना परवडायचे नाही.
मला वाटतं खासदारांना ईडीची भिती असावी नाहीचर भाजप सारख्या पक्षा बरोबर जाण्यास कुठलाही खासदार तयार नसेल.
संजय राऊतप्रमाणे बेताल बडबड करत उंटावरून शेळ्या हाकणे त्यांना परवडायचे नाही.
संजय राऊतांनी अनेक भाजपेयींची पिसे सोलली होती. आपली अब्रू रोज वेशावर टांगू नये म्हणून भाजपने त्यांच्यावर ईडी सोडली तरी ते नमले नाहीत.काहीही झाले तरी ठाकरे, संजय राऊत ही घाण परत नको
मला वाटतंय ही लोकं चांगली होती. आता भाजप नावाची घाण सत्तेत आली नी लगेच गॅस सिलेंडर आणी विज दरवाढ झाली.राजकारणातून कायमचे हद्दपारच करायला हवे.
राजकारणातूनहदादपार करायचं असेल तर ईडी, राज्यपाल ह्यांचा गैरवापर करनारे तथाकथीत अभ्यासू करायला हवेत.शिवसेनेतही स्थानिक पातळीवर लोकांशी संपर्क आणि काम यामुळे लोकप्रिय असलेले नेते आहेत.
शिवसेनेतच आहेत त्यामुळेच तर युती करा म्हणून मातोश्रीवर विनवण्या कराया अटल बिहारी ते अमीत शहा सगळे यायचे.12 Jul 2022 - 9:03 pm | रात्रीचे चांदणे
पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा ने ISI साठी हेरगिरी केल्याचे कबूल केले आहे. २००७ ते २०१० मध्ये त्याने भारताला भेटी दिलेल्या होत्या. आमन की आशा , भारत पाकिस्तान क्रिकेट आणि पाकिस्तानी कलाकारांना भारतीय चित्रपटात कामं, हे असले प्रकार बंद झाले ते बरेच झालं. इंडिया today ची ही बातमी.
13 Jul 2022 - 10:54 am | निनाद
अहमद बुखारी, जामा मशिदीचे शाही इमाम आणि याह्या बुखारी यांनी पण स्वागत केल होते. पाकिस्तान हेरगिरीच्या प्रकरणात प्रत्येकवेळी अलीगढ चे नाव कसे गुंतलेले असते? हमीद अन्सारी याने नक्की काय केले त्याच्या काळात यावर तर एक चौकशीच नेमली पाहिजे असे वाटते.
13 Jul 2022 - 11:59 am | गामा पैलवान
हमीद अन्सारीने इराणमध्ये राजदूत असतांना भारतीय गुप्तचरखात्याचं अतोनात नुकसान करून ठेवलं होतं म्हणतात. कुलभूषण जाधव यांचं इराणमधनं अपहरण झालं होतं. त्या प्रकरणात कुठेतरी हमीद अन्सारीचं नाव पुढे आल्यास आश्चर्य नव्हे. हा आरोप नसून केवळ अंदाज आहे.
-गा.पै.
13 Jul 2022 - 6:18 pm | डँबिस००७
कॉंग्रेसनेच हामिद अंन्सारी नावाच्या महा हलकट माणसाला भारताचा पुर्व उपराष्ट्रपती बनवला. पुर्वी ईराणच्या राजदुत म्हणुन त्याने बर्याच
भारतीय रॉ एजंटांना एक्सपोज केले होते ज्या मुळे त्यांची हत्या झाली होती. त्या नंतरही तो गप्प बसला नाही. त्याने केलेले काळे कारनामे अखेर पाकिस्तानच्या पत्रकाराकडुनच ऊघड झाले. पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत पाकिस्तानचा पत्रकारा नुसरत मिर्झाला भारतात आमंत्रण दिले होते. तब्बल ७-८ वेळा हा पत्रकार भारतात येऊन हेरगीरी करुन माहिती गोळा करुन पाकिस्तानातल्या आय एस आय च्या बॉसला देत असे. सर्व साधारण पाकिस्तानच्या नागरीकाला भारताच्या व्हीजावर ३ शहरांना भेट देता येते, पण पुर्व उपराष्ट्रपती हामिद अंन्सारी यांनी विषेश निमंत्रण दिलेल्या ह्या पाकिस्तानी पत्रकाराला मात्र ७ शहर भेट द्यायची मुभा होती.
हामिद अंन्सारी च्या निरोपाच्या भाषणात श्री मोदीजींनी हामिद अंन्सारी बोचर्या शब्दात चांगलीच तासली होती.
https://www.youtube.com/watch?v=oYSqzPb2yUA
12 Jul 2022 - 10:29 pm | श्रीगुरुजी
आधी -
ज्याला राष्ट्रपतीपदासाठी सेनेचा पाठिंबा हवाय त्याने मातोश्रीवर येऊन पाठिंबा मागावा, आम्ही भाजपपुढे झुकणार नाही, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही . . .
आणि आता -
न मागताच सेनेचा भाजपच्या द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा!
झुकेगा नही साला!
12 Jul 2022 - 10:48 pm | क्लिंटन
उद्धव ठाकरेंनी दिलेला पाठींबा नाकारला पाहिजे. एकदा राजनाथ सिंग राज ठाकरेविषयी बोलले होते - उनका समर्थन मांगा किसने है? तसे या चुलत भावाविषयीही केले पाहिजे. तुमच्या पाठिंब्याची आम्हाला गरज नाही तुमचा पाठींबा नसेल तरी आमचा उमेदवार जिंकेल असे जाहीरपणे सांगायला हवे.
अर्थात भाजप नेत्यांमध्ये मातोश्रीबद्दल असलेल्या जिव्हाळ्यामुळे तसे काही व्हायची शक्यता जवळपास शून्य. ठाकरेंचे आभार मानायला स्वतः द्रौपदी मुरमू मातोश्रीवर गेल्या तरी आश्चर्य वाटू नये.
12 Jul 2022 - 10:55 pm | अमरेंद्र बाहुबली
राष्ट्रपतीपद हे पक्षनिरपेरक्ष असते. (निदान कोविंद ह्यांच्या आधीपर्यंत तरी. कोवींद ह्यांनी रात्री दोन वाजता सगी करून राज्यातील राष्ट्रपती राजवट ऊठवली होती. त्यामुळे मला त्यांच्या बद्द्ल फार आदर आहे.)
अब्दूल कलाम भाजपचे नी प्रतिभाताई काॅंग्रेसच्या आहेत असं मला तरी कधी वाटलं नाही.
13 Jul 2022 - 6:47 pm | सुबोध खरे
प्रतिभाताई काॅंग्रेसच्या आहेत असं मला तरी कधी वाटलं नाही.
काय सांगताय?
त्या काँग्रेसच्या आहेत हे त्यांनी इतक्या वेळेस सिद्ध केलंय तरीही?
If the allotment of defence land for President Patil's home was controversial, so was the decision to construct a post-retirement home for the President at government expense. This decision to build a new house for the President, by itself, is a marked departure from tradition. In the past, former presidents lived in government accommodations in Delhi or returned to their home states.
Read more at:
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/president-...
खडकी छावणी मध्ये हुतात्मा जवानांच्या पत्नींसाठी असलेली २ लाख ६० हजार चौ फूट जागा आपल्या बंगल्याची ढापण्याचा त्यांचा प्रयत्न काहि नतद्रष्ट माजी सैनिकांच्या अवसानघातकी पणा मुळे त्यांना सोडून द्यायला लागला होता
13 Jul 2022 - 9:49 pm | अमरेंद्र बाहुबली
कोविंद ह्या भाजपच्या राष्ट्रपतींसारखं रात्री दोन वाजता ऊठून राष्ट्रपती राजवट ऊठवायचे कारनामे तर नाहीना केले?
14 Jul 2022 - 10:11 am | सुबोध खरे
हायला
इतक्या झटपट रंग बदलायचं तुमचं कौशल्य पाहून सरडा सुद्धा लाजेल
15 Jul 2022 - 11:51 am | Trump
म्हणजे भ्रष्टाचार केला तरी चालेल पण पहाटे राष्ट्रपती राजवाट उठवायला नको. हे असे का?
13 Jul 2022 - 11:21 am | डँबिस००७
मा. न मो यांच्या हस्ते नविन अशोक स्तंभाच
अनावरण होताच, बुद्धीजीवी, पुरोगाम्यांच्या अंगाची लाही लाही झाली.
पुर्वीच्या अशोक स्तंभावरील सिंहाचे तोंड बंद होते (मूग गीळुन) पण नव्या स्तंभावरील सिंहाचे तोंड उघडे असुन त्यातुन दात स्पष्ट दिसतात जणु ते सिंह गर्जना करत आहेत.
13 Jul 2022 - 11:49 am | कानडाऊ योगेशु
शास्त्रोक्त पध्दतीने विधीवत स्थापना केली आहे मा.पंतप्रधानांनी त्या स्तंभाची. त्यामुळे तर अजुनच मिरच्या झोंबतील मोदीविरोधकांना.
मागे राफेलवरही ओम आणि स्वस्तिक काढले होते राजनाथसिंगांनी तर ही मंडळी अगदी चवताळली होती.
13 Jul 2022 - 6:50 pm | सुबोध खरे
अनावरण होताच, बुद्धीजीवी, पुरोगाम्यांच्या अंगाची लाही लाही झाली.
मुळात हा स्तंभ हि सारनाथच्या मूळ स्तंभाची तंतोतंत प्रतिकृती आहे.
फरक एवढाच आहे कि आता तुम्ही ती खालून पाहत असल्याने सिंहाचे तोंड उघडे असल्याने आतील दात दिसत आहेत.
त्यामुळे डाव्या लोकांना तो सिंह रागीट असल्याचा भास होतोय.
13 Jul 2022 - 11:59 am | डँबिस००७
मला तर वाटत की मुद्दामच अश्या महत्वाच्या कार्यक्रमात वैदिक पद्धतीने अनावरण, उद्घाट्न वैगेरे करत असावेत जेणे करुन मिरच्या झोंबतील.
15 Jul 2022 - 11:47 am | विवेकपटाईत
करोंना काळात जनतेला लुटणार्या मेडिकल माफिया आता उघडा पडू लागला आहे. आजच बातमी वाचली. डोलो 650 ची लूट. दिल्ली असो वा मुंबई सर्वच डॉक्टर हीच गोळी लिहीत होते. का? उत्तर कुणा जवळ ही नाही?
"The evidence indicates that the group has adopted unethical practice to promote its products/ brands. The quantum of such freebies detected is estimated to be around Rs 1,000 crore, the IT department said."
https://www.moneycontrol.com/news/trends/tax-raids-on-dolo-650-maker-off...
15 Jul 2022 - 11:54 am | Trump
पंजाब, राजस्थान, बिहार, केरला आणि पश्चिम बंगाल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, श्रीलंकेच्या दिशेने आगेकुच.