शशक'२०२२ - हिस्सा

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
24 May 2022 - 7:50 am

प्रसिद्ध उद्योजक द्वारकानाथ बोर्डमिटींग संपवून घरी आल्यावर केदारने आग ओकली.

"नवीन डीशवॉशर व वॉशिंग मशिनसाठी रिसर्च मी केला, प्रॉड्कट टीम व तंत्रज्ञान विकसित मी केले, मार्केटींग, डीलर नेटवर्क मीच पहातोय. मी सिईओ आहे कंपनीचा तरी तुम्ही कंपनीच्या समभागापैकी अर्धे करणला देता. करण माझा धाकटा भाऊ पण काय केले आत्तापर्यंत? धड शिक्षण नाही, टोळ्भैरवांना धरून झोपडपट्ट्यांमध्ये हिंडतो, कामवाल्यांना, कामगारांना त्यांचे हक्क वगैरे फालतू लेक्चर देतो. माझे मित्र म्हणाले की हे लोण सगळीकडे पसरतेयं. बर्‍याच जणांनी काम सोडले. कामवाल्यांच्या डिमांड वाढल्यात आता. अश्या माणसाला ५०% हिस्सा का?"

द्वारकानाथ हलकेच हसून म्हणाले," हेच तुला कळत नाही. प्रॉडक्टला मार्केटच नसेल तर ते घेणार कोण?"

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

24 May 2022 - 7:59 am | तुषार काळभोर

AI आणि ऑटोमेशन मुळे सर्व माणसांची कामे यंत्रे आणि संगणक करतील सगळ्यांच्या (किंवा बहुतेकांच्या नोकऱ्या जातील), असं नेहमीच म्हटलं जातं.
पण जर असं झालं तर त्या AI आणि ऑटोमेशनचा वापर करून बनलेलं वापरणार कोण?

तर्कवादी's picture

24 May 2022 - 10:02 am | तर्कवादी

ग्राहकांची क्रयशक्ती वाढली तरच उत्पादनांना मागणी वाढेल हे अर्थशास्त्रीय सत्य सांगितलंय. पण मांडणी अजून चांगली करता आली असती.

योगी९००'s picture

24 May 2022 - 1:28 pm | योगी९००

+१
आवडली.

चौथा कोनाडा's picture

24 May 2022 - 2:31 pm | चौथा कोनाडा

+१

धाकटा मुलगा : लग्नाच्या मार्केटमधलं प्रॉडक्ट ? .... अर्थात हे माझे आकलन !

वामन देशमुख's picture

24 May 2022 - 4:07 pm | वामन देशमुख

+१

म्हणजे, खरा विक्री करणारा तर धाकटा भाऊच म्हणायला हवा!

श्वेता व्यास's picture

24 May 2022 - 4:44 pm | श्वेता व्यास

+१
खरंय, कामवाल्यांचे नखरे सहन करण्यापेक्षा डिशवॉशर आणि वॉशिंग मशिन कधीही चांगला पर्याय आहेत.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:06 pm | चेतन सुभाष गुगळे

हेच तर कथालेखक सांगत आहेत.

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:10 pm | चेतन सुभाष गुगळे

म्हणजे धाकटा कामगारांना भडकवणार, त्यांचे पगार - अधिकार - दादागिरी वाढवून देणार आणि मग अशा उन्मत्त घरकाम व्यावसायिकांना कंटाळून लोक डिशवॉशर आणि वॉशिंग मशिन्स विकत घेणार. चांगली योजना आहे.

सौंदाळा's picture

26 May 2022 - 10:30 am | सौंदाळा

+१

सुखी's picture

26 May 2022 - 9:19 pm | सुखी

+१

स्मिताके's picture

27 May 2022 - 12:08 am | स्मिताके

+१

सुक्या's picture

27 May 2022 - 12:13 am | सुक्या

+१