Skip to main content

शशक'२०२२ - हिस्सा

शशक'२०२२ - हिस्सा

Published on 24/05/2022 - 07:50 प्रकाशित
प्रसिद्ध उद्योजक द्वारकानाथ बोर्डमिटींग संपवून घरी आल्यावर केदारने आग ओकली. "नवीन डीशवॉशर व वॉशिंग मशिनसाठी रिसर्च मी केला, प्रॉड्कट टीम व तंत्रज्ञान विकसित मी केले, मार्केटींग, डीलर नेटवर्क मीच पहातोय. मी सिईओ आहे कंपनीचा तरी तुम्ही कंपनीच्या समभागापैकी अर्धे करणला देता. करण माझा धाकटा भाऊ पण काय केले आत्तापर्यंत? धड शिक्षण नाही, टोळ्भैरवांना धरून झोपडपट्ट्यांमध्ये हिंडतो, कामवाल्यांना, कामगारांना त्यांचे हक्क वगैरे फालतू लेक्चर देतो. माझे मित्र म्हणाले की हे लोण सगळीकडे पसरतेयं. बर्‍याच जणांनी काम सोडले. कामवाल्यांच्या डिमांड वाढल्यात आता. अश्या माणसाला ५०% हिस्सा का?" द्वारकानाथ हलकेच हसून म्हणाले," हेच तुला कळत नाही. प्रॉडक्टला मार्केटच नसेल तर ते घेणार कोण?"

याद्या 8932
प्रतिक्रिया 12

AI आणि ऑटोमेशन मुळे सर्व माणसांची कामे यंत्रे आणि संगणक करतील सगळ्यांच्या (किंवा बहुतेकांच्या नोकऱ्या जातील), असं नेहमीच म्हटलं जातं. पण जर असं झालं तर त्या AI आणि ऑटोमेशनचा वापर करून बनलेलं वापरणार कोण?

ग्राहकांची क्रयशक्ती वाढली तरच उत्पादनांना मागणी वाढेल हे अर्थशास्त्रीय सत्य सांगितलंय. पण मांडणी अजून चांगली करता आली असती.

+१ धाकटा मुलगा : लग्नाच्या मार्केटमधलं प्रॉडक्ट ? .... अर्थात हे माझे आकलन !

+१ म्हणजे, खरा विक्री करणारा तर धाकटा भाऊच म्हणायला हवा!

+१ खरंय, कामवाल्यांचे नखरे सहन करण्यापेक्षा डिशवॉशर आणि वॉशिंग मशिन कधीही चांगला पर्याय आहेत.

In reply to by श्वेता व्यास

हेच तर कथालेखक सांगत आहेत.

म्हणजे धाकटा कामगारांना भडकवणार, त्यांचे पगार - अधिकार - दादागिरी वाढवून देणार आणि मग अशा उन्मत्त घरकाम व्यावसायिकांना कंटाळून लोक डिशवॉशर आणि वॉशिंग मशिन्स विकत घेणार. चांगली योजना आहे.

+१