शशक २०२२ - धडपड

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
11 May 2022 - 11:09 pm

"घरुन काम करण्याची मुभा असतानाही या अवस्थेत रोज इतक्या दूर ऑफिसला जायचा हट्ट का लावलायंस?”
"आई, मला ऑफिसला जायचे डोहाळे लागलेत असं समज. फोन ठेवते आता"
- - - -
"ताई पुढच्या हफ्त्यापासून मला येता येणार नाही" गाडीची चावी देत तो म्हणाला
" तुमच्या बायकोची डिलीवरी होणार म्हणूनच ना ?" प्राजक्ताने हसत विचारलं
"ते आहेच. पण आता सगळे कामावर रुजू व्हायचं म्हणतात…ताई, आम्ही लाल डब्यावाले… हळुवार ड्रायव्हिंगची सवय नाही. पण तुम्ही सांभाळून घेतलंत… " तो हात जोडत म्हणाला
- - - -
तिच्या फोनवर संदेश आला.
"प्राजू , मी काळजीपोटी बोलले खरी... . पण चिघळलेल्या संपामुळे गरोदर असतानाच मला वैधव्य आलं तशी वेळ एका तिर्‍हाईत स्त्रीवर येवू नये म्हणून तुझी धडपड विलक्षणच.. "

प्रतिक्रिया

चांदणे संदीप's picture

11 May 2022 - 11:15 pm | चांदणे संदीप

+१

सं - दी - प

वामन देशमुख's picture

11 May 2022 - 11:18 pm | वामन देशमुख

+१

कर्नलतपस्वी's picture

11 May 2022 - 11:21 pm | कर्नलतपस्वी

आवडली

कर्नलतपस्वी's picture

11 May 2022 - 11:21 pm | कर्नलतपस्वी

आवडली

सुचिता१'s picture

11 May 2022 - 11:50 pm | सुचिता१

+1

डाम्बिस बोका's picture

11 May 2022 - 11:58 pm | डाम्बिस बोका

आवडली

सुक्या's picture

12 May 2022 - 12:34 am | सुक्या

+१

गामा पैलवान's picture

12 May 2022 - 1:15 am | गामा पैलवान

+१

शशक असल्याने अखेरीस जरा बाळबोध झालीये.

-गा.पै.

nutanm's picture

12 May 2022 - 1:40 am | nutanm

शेवट नीट कळला नाही

अमरेंद्र बाहुबली's picture

12 May 2022 - 1:55 am | अमरेंद्र बाहुबली

समजली नाही.

लोथार मथायस's picture

12 May 2022 - 4:02 am | लोथार मथायस

+१

कर्नलतपस्वी's picture

12 May 2022 - 5:46 am | कर्नलतपस्वी

+1

सुरसंगम's picture

12 May 2022 - 6:28 am | सुरसंगम

शेवट समजला नाही.

प्रचेतस's picture

12 May 2022 - 7:08 am | प्रचेतस

एसटी संपामुळे बेरोजगार झालेल्या एका एसटी ड्रायव्हरचं पोट भरावं म्हणून तिने स्वतःच्या कारवर ड्रायव्हर म्हणून नेमलं होतं.

निनाद's picture

12 May 2022 - 8:35 am | निनाद

समजवावी लागते त्या क्षणी ती कथा नसते, त्यामुळे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2022 - 10:07 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थँक्स डियर प्रचु. खुलाशामुळे कथा समजण्यास मदत झाली.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

12 May 2022 - 7:08 am | प्रचेतस

+१

+१
मनाला स्पर्शून गेली.

तर्कवादी's picture

1 Jun 2022 - 1:21 pm | तर्कवादी

मनाला स्पर्शून गेली.

भक्ती जी,
स्पर्धेत विजेता होण्याने जे समाधान कदाचित लाभले असते त्यापेक्षाही अधिक मला या प्रतिसादाने वाटले. आपण जे काही लिहिलंय ते कुणाच्या तरी मनाला स्पर्श करणारं आहे हा आनंद निराळाच. तुमच्या या प्रतिसाकरिता मनःपुर्वक धन्यवाद ...

थोडं अविश्वसनीय वाटेल पण ही कथा माझ्या मनात अनेक तास घोळत होती पण तरीही ती लिहून झाल्यावर पुन्हा वाचुन बघताना मी भावूक झालो होतो. कथेची पहिली आवृत्ती खालीलप्रमाणे होते. दुसर्‍या एका प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणे ती समजण्यास क्लिष्ट वाटल्याने थोडे शब्द बदलून मग पाठवली.
---------------

"घरुन काम करण्याची मुभा असतानाही या अवस्थेत रोज इतक्या दूर ऑफिसला कशाला जायला हवं ?“
"आई मला ऑफिसला जायचे डोहाळे लागलेत असं समज मग. ठेवते आता फोन"

"ताई पुढच्या हफ्त्यापासून मला येता येणार नाही" गाडीची चावी देत तो म्हणाला
" तुमच्या बायकोची डिलीवरी होणार म्हणून ना ?" प्राजक्ताने हसत विचारलं
"ते बी आहेच. पण आता सगळे कामावर रुजू व्हायचं म्हणतात…बाकी आम्ही लाल डब्यावाले… हळुवार ड्रायव्हिंगची सवय नाही. पण तुम्ही सांभाळून घेतलंत… " तो हात जोडत म्हणाला
तिच्या फोनवर संदेश आला.
"प्राजू , मी काळजीपोटी बोलले गं. पण मला अभिमान वाटतो तुझा…. तुझ्या जन्माआधीच तुझ्या बाबांना हिरावून नेणार्‍या संपाशी आज तु तुझा संबंध नसूनही लढतेयस..."

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

12 May 2022 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान.

-दिलीप बिरुटे

मोहन's picture

12 May 2022 - 10:10 am | मोहन

+१
पण शेवट आणखी चांगला करता आला असता.

सौंदाळा's picture

12 May 2022 - 10:31 am | सौंदाळा

+१

सुरिया's picture

12 May 2022 - 10:50 am | सुरिया

आवडली
+१

सुरसंगम's picture

12 May 2022 - 11:55 am | सुरसंगम

खरी अडचण शेवटी आहे.
स्वलपविराम देऊन हे वाक्य तोडायला हवं होतं.
गरोदर शब्दानंतर (,) चिन्ह हवं होतं.
आणि म्हणून आईलापण संपामुळे मुळे वैधव्य आलेलं आहे हे अधोरेखित होतंय.

तुझी धडपड एक स्त्री विधवा होऊ नये म्हूणन चालली आहे.असं लिहलेलं चाललं असतं.

श्वेता व्यास's picture

12 May 2022 - 12:28 pm | श्वेता व्यास

+१

श्वेता२४'s picture

12 May 2022 - 1:52 pm | श्वेता२४

+१

संजय पाटिल's picture

12 May 2022 - 3:05 pm | संजय पाटिल

+१

चौथा कोनाडा's picture

12 May 2022 - 5:34 pm | चौथा कोनाडा

+१
आवडली

दोन वेळा वाचल्यावर समजली !

सुखी's picture

13 May 2022 - 12:30 am | सुखी

+१

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:49 am | तुषार काळभोर

+१

प्राची अश्विनी's picture

16 May 2022 - 5:29 am | प्राची अश्विनी

+1

स्मिताके's picture

22 May 2022 - 4:49 pm | स्मिताके

+१

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 6:37 pm | चेतन सुभाष गुगळे

ताई, आम्ही लाल डब्यावाले… हळुवार ड्रायव्हिंगची सवय नाही.

हे फार आवडलं. एसटी संपात जो तो उठसूट कर्मचार्‍यांना सहानुभूती दाखवत असताना यांचे चालक बेफाम वाहन चालवतात हे लिहिण्याचं धाडस दाखविल्याबद्दल अभिनंदन. स्वतःची दुचाकी / चारचाकी चालविताना एसटीच्या रफ ड्रायविंगचा फारच त्रास होतो. अनेकदा मरतामरता वाचलो आहे. रस्त्यावर स्वतःच्या सासर्‍याचं वाहन असल्यासारखे चालवित असतात. (बापाचं मुद्दाम लिहिलं नाही कारण असं चालविलं तर बाप देखील जिवंत ठेवणार नाही पोराला).

संतोष माने च्या (सगळे तसे नाहीयेत तरीही) व्यवसायबंधूंना मी तरी कोणतीही सहानुभुती दाखविणार नाही.

आपल्या आईला वैधव्य आले तसे नवरा संपावर असताना दुसर्या बाईवर ही वेळ येऊ नये यासाठीची ही मुलीची धडपड. वैधव्य आलेल्या त्या आईची ही लेक गरोदर ही असू शकते म्हणून आईची धडपड तिने कामावर जाऊ नये व वर्क फ्रॅाम होमची सुविधा असताना ती न नाकारता घ्यावी.

तर्कवादी's picture

1 Jun 2022 - 1:09 pm | तर्कवादी

सर्व वाचक व प्रतिसादकांचे मनःपुर्वक आभार.
स्पर्धेत भाग घ्यायचे ठरल्यावर एखादं छानसं कथानक सुचणं खूप महत्वाचं होतं. एका सायंकाळी निवांतपणे मनाला सैल सोडल्यावर काही विषय मनात घोळू लागले. काहीसं भावूक लिहायचं हे मनात होतं पण तरी कथानक नेमकेपणानं आकार घेत नव्हतं.. पण नंतर पहाटे जाग येवून मनात कथानक निश्चित झालं. यापुढे ते कसं उलगडायचं ह्याबाबत विचार सुरु होता. कथानक ठरलं तरी ते उलगडायला कोणती पात्र हवीत याचा विचार सुरु होता. जसे नायिकेच्या सीमेवर शत्रुशी लढणार्‍या पतीशी होणार्‍या संवादातुन कथा उलगडायची का असाही विचार मनात आला.
हळू हळू दुपारपर्यंत नेमके पात्र, नेमके शब्द सापडत गेले. लिहून झाल्यावर पत्नीला आणि एका मैत्रिणीला वाचायला दिली पण दोघीनांही नेमका अर्थ पुर्णपणे समजला नाही. तेव्हा विचार करुन शेवटचे वाक्य बदलले. तसेच शंभर शब्दातील प्रत्येक शब्द महत्वाचा असल्याने प्रत्येक शब्दाचा पुन्हा पुन्हा विचार करुन शशकला अंतिम रुप दिले.
बहुतेक सर्व वाचकांना कथानक समजले आहेच तरी एकदा स्पष्टीकरण द्यायचा मोह होत आहे.
कथेची पार्श्वभुमी आहे संपाची, तसेच कोरोनाकाळात सुरु झालेल्या वर्क फ्रॉम होम कार्यपद्धतीचाही संदर्भ जोडला आहे . अलिकडेच झालेला एस टी कर्मचार्‍यांचा संप चिघळत गेला तशा काही कर्मचार्‍यांनी आत्महत्या केल्याच्या बातम्याही येवू लागल्या आणि याचनिमित्ताने १९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपाच्या आठवणीही निघू लागल्यात. त्या संपामुळे अनेक कामगारांनी आत्महत्या केल्याचे वाचनात आले होते. अनेक कुटुंबे देशोधडीला लागलीत.
तर अशाच एका संपामुळे (गिरणी कामगारांचा संप किंवा आणखी कुठलाही चिघळलेला संप) नायिका प्राजक्ताच्या वडीलांनी तिच्या जन्मापुर्वीच आत्महत्या केली.
संपात सहभागी एस टी चालकाची पत्नी गरोदर आहे आणि अर्थिक ओढाताणीतुन या चालकाने आपल्या वडीलांप्रमाणे कोणतेही पाऊल उचलू नये वा आपल्या आईवर आली तशी दुर्देवी वेळ एका तिर्‍हाईत स्त्रीवर येवू यासाठी त्याला मदत म्हणून तिने त्या चालकाला कामावर ठेवले आहे. तसेच प्राजक्ता स्वतःही गरोदर आहे आणि वर्क फ्रॉम होमची मुभा असल्याने खरं तर तिला ऑफिसला जाण्याची गरजही नाही. तरीही ती रोज ऑफिसला जाते ते फक्त सदर संपकरी चालकाला कामावर ठेवण्याचा बहाणा म्हणून. लाल डबा चालवणार्‍या या चालकाचे कार चालवणे तितकेसे सुखकारक नाही पण तरीही ती त्याला सांभाळुन घेते.

संपकरी चालकाची पत्नी गरोदर असल्याने नायिका तिची तुलना स्वतःच्या आईशी करते व नायिका स्वतःही गरोदर असल्याने तिची ही धडपड अधिकच विलक्षण ठरते असे दोन प्रमुख मुद्दे या कथेत आहेत.