शशक'२०२२ - ठीकाय

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
8 May 2022 - 12:31 pm

हे भामटे दोस्त..!
ग्लासच्या आवाजानं कबरीतसुद्धा सळसळतील...!

इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..!
तरीही ''येऊद्या अजून'' चाल्लेलंचाय..!

मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..!
पण मी म्हटलं की बाबा ठीकाय..!

मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात
"दहाच मिन्टात येतो" वगैरे भपाऱ्या..!
पण म्हटलं की बाबा ठीकाय..!

मग जुन्या गर्लफ्रेंडींना फोन लावून तिच्याशिवाय
ह्यांना जीवन अपुरं वाटतंय, हे पटवून द्यायलेले..!
पण म्हटलं की बाबा ठीकाय..!

पण आता ह्या दळींदरांनी मलाच बारच्या
टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलंय.‌.!
मी बिल भरायचं कबूल केल्याशिवाय मला बाहेर
येऊ देणार नाय म्हणतेत..!
दमलो ओरडून की, बिल वगैरे झूट असतंय म्हणून...!
पण कुणाला ऐकायला जाईना..!
काय करावं कळंना झालंय..!
अवघडाय..!

प्रतिक्रिया

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 May 2022 - 12:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान.

-दिलीप बिरुटे

भागो's picture

8 May 2022 - 12:56 pm | भागो

ठीकाय
+१

कॉमी's picture

8 May 2022 - 1:00 pm | कॉमी

मस्तय

सुरसंगम's picture

8 May 2022 - 4:39 pm | सुरसंगम

हा हा हा मस्त.

+१

मोहन's picture

8 May 2022 - 5:06 pm | मोहन

+१

गामा पैलवान's picture

9 May 2022 - 12:48 am | गामा पैलवान

+१
-गा.पै.

श्वेता२४'s picture

9 May 2022 - 11:50 am | श्वेता२४

+१

कपिलमुनी's picture

9 May 2022 - 4:33 pm | कपिलमुनी

+१

चांदणे संदीप's picture

9 May 2022 - 4:36 pm | चांदणे संदीप

लिहिलंय छान,पण शेवट परिणामकारक नाही वाटला.

सं - दी - प

विजुभाऊ's picture

9 May 2022 - 6:24 pm | विजुभाऊ

सहमत

प्रचेतस's picture

10 May 2022 - 9:21 am | प्रचेतस

+१

थोडी वेगळी, शेवट जरा परिणामकारक जमवता आला असता.

तुषार काळभोर's picture

14 May 2022 - 7:23 am | तुषार काळभोर

अवघडाय..!

प्राची अश्विनी's picture

16 May 2022 - 5:38 am | प्राची अश्विनी

+1

चौथा कोनाडा's picture

16 May 2022 - 6:05 pm | चौथा कोनाडा

+१

असे दोस्त असल्यावर अवघडाय..!

निनाद's picture

26 May 2022 - 7:46 am | निनाद

हे भामटे दोस्त..!
ग्लासच्या आवाजानं कबरीतसुद्धा सळसळतील...!

इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..!
तरीही ''येऊद्या अजून'' चाल्लेलंचाय..!

मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..!
पण मी म्हटलं की बाबा ठीकाय..!

मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात
"दहाच मिन्टात येतो" वगैरे भपाऱ्या..!
पण म्हटलं की बाबा ठीकाय..!

मग जुन्या गर्लफ्रेंडींना फोन लावून तिच्याशिवाय
ह्यांना जीवन अपुरं वाटतंय, हे पटवून द्यायलेले..!
पण म्हटलं की बाबा ठीकाय..!

आता गाड्या काडून जायलेत.
मी सांगतोय पिऊन चालवू नगा, लय वाईट असतंय!
पण कुणाला ऐकायला जाईना!
काय करावं कळंना झालंय!
पन येक खरं असतंय पन,
सांगायला लै अवघडाय येक्दा मेल्यावर!