मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - ठीकाय

साहित्य संपादक · · स्पर्धा
हे भामटे दोस्त..! ग्लासच्या आवाजानं कबरीतसुद्धा सळसळतील...! इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..! तरीही ''येऊद्या अजून'' चाल्लेलंचाय..! मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..! पण मी म्हटलं की बाबा ठीकाय..! मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात "दहाच मिन्टात येतो" वगैरे भपाऱ्या..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..! मग जुन्या गर्लफ्रेंडींना फोन लावून तिच्याशिवाय ह्यांना जीवन अपुरं वाटतंय, हे पटवून द्यायलेले..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..! पण आता ह्या दळींदरांनी मलाच बारच्या टॉयलेटमध्ये कोंडून ठेवलंय.‌.! मी बिल भरायचं कबूल केल्याशिवाय मला बाहेर येऊ देणार नाय म्हणतेत..! दमलो ओरडून की, बिल वगैरे झूट असतंय म्हणून...! पण कुणाला ऐकायला जाईना..! काय करावं कळंना झालंय..! अवघडाय..!

वाचने 7658 वाचनखूण प्रतिक्रिया 15

प्रचेतस Tue, 05/10/2022 - 09:21
+१ थोडी वेगळी, शेवट जरा परिणामकारक जमवता आला असता.

निनाद गुरुवार, 05/26/2022 - 07:46
हे भामटे दोस्त..! ग्लासच्या आवाजानं कबरीतसुद्धा सळसळतील...! इकडे रिकाम्या बडवायजर्सचा खच..! तरीही ''येऊद्या अजून'' चाल्लेलंचाय..! मघाशी टुन्न होऊन एकमेकांच्या आणि वेटरच्याही पप्प्या घ्यायलेले..! पण मी म्हटलं की बाबा ठीकाय..! मग आपापल्या बायकांशी फोनवर दबकत्या आवाजात "दहाच मिन्टात येतो" वगैरे भपाऱ्या..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..! मग जुन्या गर्लफ्रेंडींना फोन लावून तिच्याशिवाय ह्यांना जीवन अपुरं वाटतंय, हे पटवून द्यायलेले..! पण म्हटलं की बाबा ठीकाय..!
आता गाड्या काडून जायलेत. मी सांगतोय पिऊन चालवू नगा, लय वाईट असतंय! पण कुणाला ऐकायला जाईना! काय करावं कळंना झालंय! पन येक खरं असतंय पन, सांगायला लै अवघडाय येक्दा मेल्यावर!